फस्ट क्राय स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा First cry Start up business success story in Marathi
फस्ट क्राय स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा First cry Start up business success story in Marathi
आज आपल्या भारत देशात दरवर्षी २.५० करोड लहान मुले जन्माला येतात.पण लहान मुलांसाठी सेवा देत असलेल्या कंपनी काही मोजक्याच आहेत.
आज आपल्या देशात पुरूषांसाठी हजारो ब्रँड उपलब्ध आहेत.पण लहान मुलांसाठी बोटावर मोजता येतील इतकेच मोजके ब्रँड उपलब्ध असल्याचे दिसून येते.
देशातील ह्याच एका समस्येवर सुपम माहेश्वरी नावाच्या एका मारवाडी व्यक्तीचे लक्ष गेले.यानंतर त्या मारवाडीने ह्या क्षेत्रात काम करत फक्त १२ वर्षात २२ हजार करोडची कंपनी उभी केली.
आजच्या लेखामध्ये आपण फस्ट क्राय ह्या स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा जाणुन घेणार आहोत.
ज्यात आपण फस्ट क्राय कंपनीने फक्त बेबी केअर प्रोडक्टची विक्री करून २२ हजार करोडची कंपनी कशी उभी केली हे जाणुन घेणार आहोत.
फस्ट क्राय युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?
फस्ट क्राय ही एक ई काॅमर्स बेबी केअर प्रोडक्ट सेलिंग कंपनी आहे.सुपम माहेश्वरी हे फस्ट क्राय ह्या कंपनीचे फाऊंडर आहेत.
सुपम माहेश्वरी हे एक मॅकेनिकल इंजिनिअर होते त्यांनी आपले इंजिनिअरींगचे शिक्षण दिल्ली येथील इंजिनिअरींग काॅलेज मधुन पुर्ण केले.अणि मग एमबीए केल्यानंतर त्यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश घेतला.
२००० मध्ये सुपम माहेश्वरी यांनी त्यांची पहिली कंपनी ब्रेन व्हिजा टेक्नॉलॉजी लिमिटेड नामक ई लर्निग प्लॅटफॉर्म लाॅच केले.हया कंपनीला सात वर्षे चालवल्या नंतर सुपम माहेश्वरी यांनी ह्या कंपनीला १६ मिलियन डॉलर मध्ये विकले.
ह्या कंपनीमुळे सुपम माहेश्वरी यांना व्यवसाय क्षेत्रातील खुप चांगला अनुभव प्राप्त झाला.यानंतर २०१० मध्ये त्यांनी फस्ट क्राय ह्या कंपनीची सुरूवात केली.
आज फस्ट क्रायदवारे १०० पेक्षा अधिक शहरात ४०० पेक्षा अधिक आउटलेटस उभारण्यात आले आहे.
फस्ट क्राय ६ हजार पेक्षा जास्त ब्रँडचे २ लाखपेक्षा अधिक बेबी आईटम विकण्याचे काम करते.
आज पाहायला गेले तर मोठमोठ्या स्टार्ट अप कंपनींचे अर्धे आयुष्य एक युनिकाॅन स्टार्ट अप बनविण्यात निघुन जाते पण सुपम माहेश्वरी यांनी १२ वर्षात तीन युनिकाॅन स्टार्ट अप उभारण्यात यश प्राप्त केले आहे.
युनिकाॅन स्टार्ट अप अशा कंपनीला म्हटले जाते जिचे बाजार मुल्यांकन ८३०० करोडपेक्षा अधिक असते.
आज व्यवसायाच्या इतिहासात अशा अनेक कंपन्या तसेच प्रोडक्ट आहेत ज्यांची निर्मिती कंपनीच्या मालकाने स्वतासाठी स्वताची समस्या दुर करण्यासाठी केली होती.
पण नंतर हेच प्रोडक्ट सर्वसामान्य ग्राहकांसाठी वापरण्यात आले अशी आपल्याकडे अनेक उदाहरणे देखील आहेत.
उदा जिरोधा,आदीदास इत्यादी
फस्ट क्रायची कथा देखील काही अशाच पद्धतीने सुरू झाली होती.जेव्हा सुपम माहेश्वरी वडील बनले तेव्हा त्यांना आपल्या बाळासाठी बेबी प्रोडक्ट हवे होते.
पण देशात कुठेही त्यांना आपल्या बाळासाठी बेबी प्रोडक्ट उपलब्ध झाले नाही.सुपम माहेश्वरी हे उद्योजक असल्याने ते नेहमी युएस युके जात असत.
त्यामुळे त्यांनी परदेशातुन आपल्या बाळासाठी बेबी प्रोडक्ट खरेदी करत आपली गरज भागवली.
पण नंतर सुपम माहेश्वरी यांच्या मनात विचार आला की जशी ही समस्या त्यांच्यासमोर आज निर्माण झाली.
आज अनेक पालक आहेत ज्यांना ह्या समस्येला सामोरे जावे लागत असेल.मग देशातील सर्व गरजु आई वडिलांची ही मुख्य समस्या दूर करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे असा विचार त्यांच्या मनात आला.
यानंतर सुपम माहेश्वरी यांनी बाजारात रिसर्च करण्यास सुरुवात केली.जे प्रोडक्ट सर्विस ते लाॅच लाॅच करत आहेत ते बाजारात इतर ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपलब्ध आहे किंवा नाही.
मग सुपम माहेश्वरी यांनी ॲमेझाॅन, फ्लिपकार्ट ह्या ऑनलाईन ईकाॅमर्स वेबसाइटवर रिसर्च केले की लहान बाळांचे बेबी केअर प्रोडक्ट ह्या ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईट वर उपलब्ध आहे किंवा नाही.
पण ॲमेझाॅन फ्लिपकार्टवर बघितल्यावर त्यांना हे दिसुन आले की तिथे करोडो कॅटॅगरी उपलब्ध आहेत.
पण लहान मुलांसाठी पुरेसे बेबी केअर प्रोडक्ट दिसून येत नव्हते.अणि जे काही प्रोडक्ट होते ते शोधायला खूप अडचण येत होती.अणि त्यांची किंमत देखील खुपच जास्त होती.
याचसोबत लहान बाळाशी संबंधित अशा अनेक वस्तू होत्या ज्या ॲमेझाॅन फ्लिपकार्ट वर उपलब्ध देखील नव्हत्या.
मग त्यांनी बाजारात ऑफलाईन उपलब्ध असलेल्या इतर किरकोळ दुकानांना भेट दिली तिथे देखील त्यांना प्रोडक्ट उपलब्ध असल्याचे दिसून आले नाही.अणि जिथे प्रोडक्ट उपलब्ध असायचे तिथे चांगली क्वालिटी दिली जात नव्हती.
अणि काही ठिकाणी प्रोडक्टची काॅलिटी चांगली होती.पण प्रोडक्टचे रेट फिक्स नव्हते दुकानदार व्यक्ती बघुन कुठल्याही भावात प्रोडक्टची विक्री करत होते.
मग इथे सुपम माहेश्वरी यांना बाजारात एक मोठा गॅप दिसुन आला.कारण ईकाॅमर्स वेबसाइटवर देखील बेबी प्रोडक्ट उपलब्ध नाहीये.
अणि ऑफलाईन मध्ये प्रोडक्ट उपलब्ध आहेत पण तिथे देखील कुठे काॅलिटी खराब दिली जाते तर कुठे कुठल्याही भावात प्रोडक्टची विक्री केली जात आहे.
मग ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सुपम माहेश्वरी यांनी बाजारातील हा मोठा गॅप भरून काढण्यासाठी.देशातील सर्व पालकांची समस्या दूर करण्यासाठी २०१० मध्ये फस्ट क्राय ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली.
फस्ट क्राय ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केल्यानंतर सुपम माहेश्वरी यांनी प्रारंभी सर्व प्रोडक्ट विक्रीसाठी न ठेवता फक्त लहान मुलांच्या खेळण्या टाॅईज वगैरे विकण्यावर लक्ष दिले.
अणि सुरूवातीला त्यांनी फक्त मेट्रो सिटी अणि मुख्यत्वे पुण्यात आपल्या व्यवसाय उद्योग उभारण्याकडे लक्ष केंद्रित केले.अणि मग हळुहळू त्यांनी आपल्या मित्र तसेच सहकारी वर्गामध्ये हे बिझनेस मॉडेल टेस्ट देखील केले.
मग हळूहळू त्यांचे बिझनेस मॉडेल काम करत आहे लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे हे बघुन सुपम माहेश्वरी यांचा आत्मविश्वास अधिक वाढला.
सुपम माहेश्वरी हे फ्रुगल माईंडसेट असलेले व्यक्ती होते.म्हणजे ते पैसे खर्च करण्यात कंजुषी करत नव्हते.पण पैसे खर्च करताना सर्व काही बघुन समजून मगच खर्च करत कुठेही पैसे खर्च करणारे व्यक्ती नव्हते.
सुपम माहेश्वरी यांचे असे मत होते की कुठल्याही व्यवसायात घाईगडबड करून त्यात फेल होण्यापेक्षा हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत यशस्वी झालेले अधिक उत्तम.
म्हणुन सुपम माहेश्वरी यांनी एका छोट्याशा स्टोअर मधुन आपल्या स्टार्ट अप व्यवसायास प्रारंभ केला.मग त्यांनी विचार केला की कमी पैसे खर्च करून,कमी एफर्ट लावून कोणती गोष्ट आपणास साध्य करता येईल.
मग त्यांना आपणास ॲग्रीगेटर माॅडेल बनता येईल हे उत्तर प्राप्त झाले.मग त्यांनी विचार केला की ते स्वताची फस्ट क्राय वेबसाईट अशी बनवू शकतात.
जिथे फस्ट क्राय कंपनी स्वताचे प्रोडक्ट तर विक्री करेलच शिवाय इतर रिटेलरला देखील त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकते.
यामुळे जे ग्राहक फस्ट क्राय वेबसाईट वर व्हिझिट करण्यासाठी येतील त्यांना कंपनीच्या वेबसाइटवर जास्तीत जास्त पर्याय तसेच ब्रँड दिसुन येतील.ज्यामुळे जास्तीत जास्त वेळ वेबसाईटवर टिकुन राहील.
तसेच फस्ट क्राय वरील इतर विक्रेत्यांना देखील आपले प्रोडक्ट विकण्यासाठी पुरेशी सवलत मिळेल.याचसोबत फस्ट क्रायचे ॲग्रीगेटर प्लॅटफॉर्म देखील काम करेल.
याचकरीता फस्ट क्रायने इतर विक्रेत्यांना देखील त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रोडक्टची विक्री करण्यास परवानगी दिली ज्यामुळे आज फस्ट क्रायच्या प्लॅटफॉर्मवर आज ६ हजारपेक्षा जास्त ब्रँड आहेत.जे २ लाख पेक्षा जास्त बेबी प्रोडक्ट ह्या ऑनलाईन वेबसाईटवर विकत आहेत.
एकेकाळी फस्ट क्रायची सुरूवात फक्त लहान मुलांच्या खेळण्या टाॅईज वगैरे विकण्यापासुन झाली होती.
पण आज इथे लहान मुलांसाठी कपडे,बुट,लहान मुलांसाठी दुध पिण्याची बाटली,डायपर,बेबी केअर स्कीन प्रोडक्ट इत्यादी सर्व काही उपलब्ध असल्याचे दिसून येते.
म्हणजे ग्राहक जी वस्तू खरेदी करण्यासाठी फस्ट क्राय प्लॅटफॉर्मवर येत असत त्या प्रोडक्ट संबंधित इतर महत्वाचे प्रोडक्ट जे पालकांना लहान मुलांसाठी लागतात ते देखील विकण्यावर फस्ट क्रायने लक्ष दिले.
जेणेकरून बेबी केअर प्रोडक्टशी संबंधित इतर प्रोडक्ट विकत घेण्यासाठी त्यांचे ग्राहक दुसरया कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाणार नाही.अणि कंपनीच्या विक्रीत देखील वाढ होईल.
मग फस्ट क्रायने बाजारात आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत हे जाणून घेण्यास सुरुवात केली.जेणेकरून त्यांना आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांशी टक्कर देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करता येईल.
रिसर्च केल्यावर फस्ट क्रायला हे लक्षात आले की ह्या क्षेत्रात ॲमेझाॅन फ्लिपकार्ट जास्त काम करत नाही म्हणून ते त्यांचे प्रतिस्पर्धी नाहीये.
पण बाजारात जी काही छोटीमोठी दुकाने उभी होती ती सर्व फस्ट क्राय करीता बाजारातील मोठे प्रतिस्पर्धीं ठरणार होते.
ज्यांच्याशी फस्ट क्रायला टक्कर देता येत नव्हते.
कारण तेव्हा २०१० मध्ये ऑनलाईन कुठलेही प्रोडक्ट विकत घेण्याआधी ग्राहक चार वेळा विचार करायचे.कारण त्यांना भीती वाटत की कुठलेही खराब प्रोडक्ट नको खरेदी करायला.त्यात आपले पैसे विनाकारण वाया नको जायला.
म्हणून तेव्हा सर्व ग्राहक कुठलेही प्रोडक्ट बघुन त्याची व्यवस्थित चौकशी करून त्याचा दर्जा वगैरे चेक करून झाल्यावर मग ते खरेदी करत असत.
अणि ही सुविधा फस्ट क्राय आपल्या ग्राहकांना तेव्हा देऊ शकत नव्हते कारण फस्ट क्राय आपल्या ग्राहकांना ऑनलाईन प्रोडक्ट विक्री करत होते.
अणि बाजारात जेवढेही छोटेमोठे दुकानदार होते त्यांनी ताई,बहिण वहिणी असे करत करत सर्व ग्राहकांचा विश्वास संपादीत केला होता त्यामुळे सर्व ग्राहक कुठलेही प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी त्याच छोट्या मोठ्या दुकानदारांकडे जात असत.
यामुळे ग्राहक प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी ऑनलाईन जात नव्हते मग यावर उपाय म्हणून सुपम माहेश्वरी यांनी वर्क मध्ये थोडे इनोव्हेशन केले अणि ते ऑनलाईन टु ऑफलाईन केले.
म्हणजे फस्ट क्रायने ऑनलाईन सोबत स्वताचे एक ऑफलाईन स्टोअर देखील ओपन केले.
यामुळे ज्या ग्राहकांना प्रोडक्ट खरेदी करण्याअगोदर ते ट्राय करायचे होते त्याची काॅलिटी चेक करायची होती ते फस्ट क्रायच्या ऑफलाईन स्टोअर मध्ये जाऊन ट्राय करू शकत होते.
फस्ट क्रायने ऑनलाईन वेबसाईटवर जे प्रोडक्ट विकण्यासाठी अधिक ठेवले होते तेच प्रोडक्ट त्यांच्या ऑफलाईन स्टोअर मध्ये देखील विक्रीसाठी अधिक ठेवले.
म्हणजे फस्ट क्रायने जशी आपली वेबसाईट ग्राहकांसाठी डिझाईन केली होती एकदम तसेच ऑफलाईन स्टोअर देखील त्यांच्यासाठी डिझाईन केले होते.
यात फस्ट क्रायने जास्त विक्री होणारे तसेच जास्त मार्जिन असणारे प्रोडक्ट अगोदर ठेवले अणि मग इतर प्रोडक्ट अशा पद्धतीने फस्ट क्रायने आपले ऑफलाईन स्टोअर डिझाईन केले होते.
यामुळे बाजारातील ग्राहक देखील फस्ट क्रायकडे हळुहळू वळु लागले कारण इथे त्यांना ऑनलाईन अणि ऑफलाईन दोघे पद्धतीने प्रोडक्ट खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
म्हणजे ग्राहक ऑफलाईन स्टोअर मध्ये जाऊन पहिले प्रोडक्ट बघुन ट्राय करून मग ते ऑनलाईन खरेदी करू शकत होते.
ह्या माॅडेलवर काम करत करत आज फस्ट क्रायने बाजारात स्वताचे ४०० पेक्षा जास्त स्टोअर सुरू केले आहेत.
अणि हे सर्व स्टोअर सुरू करण्यासाठी त्यांना कुठलाही खर्च देखील करावा लागला नाही रिअल इस्टेट,इंटेरीअर इत्यादी वर पैसे खर्च करण्यापेक्षा फस्ट क्रायने फ्रेंचायजी देऊन हे सर्व स्टोअर सुरू केले होते.
फस्ट क्रायने सुरूवातीला प्रत्येक शहरात स्वताचे स्टोअर सुरू केले पण आपल्या उद्योग व्यवसायाचा अधिक विस्तार करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त फ्रेंचायजी देण्यावर अधिक भर दिला.
कारण फ्रेंचाईजी माॅडेल मध्ये फस्ट क्रायला स्वताची जागा देण्याची आवश्यकता नव्हती.इंटेरिअरचा खर्च देखील करण्याची गरज नव्हती फक्त कंपनीला आपले प्रोडक्ट विकायचे होते.
अणि फ्रेंचाईजी घेत असलेली कंपनी देखील विचार करते प्रोडक्ट आपल्याला हीच कंपनी देते आहे अणि आपल्या जवळील प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी ग्राहक देखील आपल्याला फस्ट क्राय आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून देत आहे.
यामुळे फस्ट क्राय कडुन फ्रेंचायजी घेत असलेल्या कंपनीला देखील फ्रेंचायजी घेण्यास कुठलीही हरकत नव्हती.
याचसोबत फस्ट क्रायची आणखी एक समस्या होती ती म्हणजे ऑनलाईन व्यवसायात लॉजिस्टिक्स.
जेव्हा ग्राहक फस्ट क्राय कडुन कुठलेही प्रोडक्ट खरेदी करत तेव्हा तो पोहोचवण्यासाठी लाॅजिस्टिक कंपनी येत होती.
अणि त्यातच लाॅजिस्टिक कंपनी दुसरी एखादी थर्ड पार्टी होती.
फस्ट क्राय आपल्या ग्राहकांना जिथे सांगत की दोन दिवसांत त्यांचे सामान पोहोचवण्यात येईल त्याठिकाणी ती लाॅजिस्टिक कंपनी चार दिवस लावत होती.त्यात सामान देखील तुटलेल्या अवस्थेत ग्राहकांपर्यंत दिले जात होते.
ज्यामुळे फस्ट क्रायबाबत ग्राहकांचे नकारात्मक प्रतिसाद प्राप्त होण्यास सुरुवात झाली म्हणून फस्ट क्रायने स्वताची एक कंपनी सुरू केली जिचे नाव एक्स प्रेस बीज असे होते.
एक्स्प्रेस बीज ही कंपनी इतकी यशस्वी ठरली की फस्ट क्रायचे प्रोडक्ट तर तिने डिलीव्हर केलेच शिवाय ह्या कंपनीने बाजारातील इतर कंपनीचे प्रोडक्ट देखील डिलीव्हर करण्यास सुरुवात केली.
ज्यामुळे एक्स प्रेस बीज ही कंपनी देखील युनिकाॅन स्टार्ट अप बनली.म्हणजे इथून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की आपली समस्या हीच आपल्यासाठी एक मोठी व्यवसाय कल्पणा ठरते.
फस्ट क्रायची मार्केटिंग स्ट्रॅटेजी-
प्रत्येक प्रोडक्ट खरेदी करण्याची एक विशिष्ट पद्धत असते.
अणि बेबी केअर प्रोडक्ट हे गाईडेड बाईंग असतात ज्यात प्रोडक्ट खरेदी करावे किंवा नाही करावे तर का करावे याचे पुर्ण मार्गदर्शन यात प्राप्त केले जाते.
याकरिता फस्ट क्रायने पालकांची एक कम्युनिटी तयार केली.इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर याचे पेजेस तसेच चॅनल देखील उपलब्ध आहेत.
यात नियमित नवीन लाॅच केलेल्या प्रोडक्ट विषयी फस्ट क्रायकडुन माहिती दिली जाते.हे प्रोडक्ट कशासाठी उपयोगी पडेल? त्याचा वापर कसा करावा? त्याचे फायदे कोणकोणते आहेत?
यात पालक आपापसात टीप्स देखील शेअर करत असतात.लहान मुलांसाठी काय खरेदी करायला हवे?काय खरेदी नाही करावे त्यांना काय खायला द्यावे कोणती गोष्ट खायला नाही द्यावी ह्या सर्व गोष्टीवर फिडबॅक शेअर केले जात.याचमुळे फस्ट क्रायच्या विक्रीत देखील वाढ होते.
फस्ट क्रायदवारे आपल्या प्रोडक्टच्या मार्केटिंग करीता अजुन एक जबरदस्त स्ट्रॅटेजीचा वापर केला जातो ज्याला फस्ट क्राय बाॅक्स असे म्हटले जाते.
फस्ट क्रायने संपूर्ण भारतात १० हजारपेक्षा जास्त हाॅस्पिटल सोबत टाय अप केले आहे.त्या हाॅस्पिटल मध्ये जेव्हा नवीन बेबी जन्माला येतो तेव्हा त्यांच्या पालकांना हाॅस्पिटलच्या फस्ट क्राय बाॅक्स दिला जातो.
ह्या बाॅक्स मध्ये लहान मुलांसाठी डायपर,तेल, क्रीम, इत्यादी बेबी केअर प्रोडक्ट समाविष्ट असतात.याने फस्ट क्रायची मार्केटिंग ब्रॅडिंग देखील होते अणि नवजात बालकाचे पालक देखील खुश होतात.
ह्या बाॅक्स मध्ये जेवढेही प्रोडक्ट आहेत ते फस्ट क्रायने प्रत्येक ब्रँडच्याकडुन मागवलेले असतात.ज्यात पॅम्परने डायपर टाकलेले असतात.डव्ह कडुन क्रीम टाकण्यात येते.
अशा पद्धतीने इतर सर्व ब्रँडचे प्रोडक्ट देखील ह्या फस्ट क्राय बाॅक्स मध्ये समाविष्ट केले जातात.फस्ट क्राय फक्त ह्या सर्व वस्तुंची एक किट तयार करून आपल्या ग्राहकांना देते.जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक त्यांच्या स्टोअर मध्ये येतील.
यात देखील एका ग्राहकाला बाॅक्स प्राप्त करण्यासाठी किंमत ५० ते १०० रूपये इतकी किंमत लागते.
आज आपल्या भारत देशात ११४ युनिकाॅन स्टार्ट अप आहेत त्यातील १७ युनिकाॅन स्टार्ट अप आहेत जे नफा प्राप्त करत आहेत.
ह्या १७ युनिकाॅन स्टार्ट अप व्यवसायांच्या यादीत फस्ट क्रायचे देखील नाव आहे.आज फस्ट क्रायचे बाजारातील एकुण मुल्यांकन ३ बिलियन डॉलर्स इतके आहे.