कॅडबरी चाॅकलेटची संपूर्ण यशोगाथा Cadbury chocolate success story in Marathi
कॅडबरी चाॅकलेटची संपूर्ण यशोगाथा Cadbury chocolate success story in Marathi
आपण जर आपल्या मानवी जीवनातील अविष्कारांची एक यादी बनवायचे म्हटले तर त्यात चाॅकलेटचा क्रमांक सर्वात पहिला येईल.
चाॅकलेट हा एक असा गोड खाद्यपदार्थ आहे ज्याचे सेवन आज लहान मुलांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यत सर्वच जण करतात.
चाॅकलेटचे नाव तोंडात आल्यावर सर्वात पहिले आपल्यासमोर कॅडबरीचे चित्र उभे राहते.आज लहान मुले देखील दुकानात गेल्यावर चाॅकलेट पाहीजे असे न बोलता डेअरी मिल्क पाहिजे असे बोलतात.
आजच्या लेखामध्ये आपण कॅडबरीची सुरूवात कधी अणि कशी झाली होती?कॅडबरीने आज एवढे यश कसे प्राप्त केले हे जाणुन घेणार आहोत.
कॅडबरीची सुरूवात ही जाॅन कॅडबरी नावाच्या एका लहान मुलापासून झाली होती.जाॅन कॅडबरी याचा जन्म १२ ऑगस्ट १८०१ रोजी ब्रिटन मधील बरमिंगम नावाच्या एका शहरात झाला होता.
आज दोनशे वर्षांपेक्षा अधिक जुन्या एका लहान मुलामुळे आज आपणा सर्वांना कॅडबरी नावाच्या एका गोड पदार्थाचे सेवन करायला मिळते आहे.
जाॅन कॅडबरी यांचा जन्म त्यांचा जन्म बोकर धर्मात झाला होता जाॅन कॅडबरी यांचा जन्म अशा समाजात झाला होता ज्या समाजातील लोकांची आपली स्वताची एक वेगळीच मान्यता होती.
ह्या धर्मातील लोक देवाला मानत होते देवाची पूजा अर्चा करण्यासाठी कुठल्याही मंदिरात ते जात नसत.हया लोकांचे असे मत होते की त्यांच्यात अणि देवामध्ये कुठलाही धर्माची भिंत येऊ शकत नाही.
हे लोक आपल्या धर्माला कुठल्याही देवाशी तसेच धार्मिक स्थळाशी जोडत नसत.अणि ह्या धर्मातील लोकांच्या ह्या वेगळ्या प्रथा परंपरांमुळे समाजातील इतर लोक त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असत.
अणि त्याकाळी लोक खुप रूढी परंपरांचे पालन करणारे होते अणि जी व्यक्ती चर्च मध्ये जात नसेल त्या व्यक्तीला समाजातुन बेदखल करण्यात येत असत.
अणि बोकर धर्मातील ह्या सर्व धार्मिक रूढी परंपरांमुळे ह्या धर्मातील मुलांना कुठल्याही चांगल्या शाळेत प्रवेश प्राप्त होत नव्हता.अणि त्यांना कुठे चांगली नोकरी देखील प्राप्त होत नव्हती.
बोकर धर्मातील लोकांच्या वेगळ्या प्रथा परंपरांमुळे त्यांना सैन्यात देखील भरती केले जात नव्हते.अशावेळी ह्या बोकर धर्मातील लोकांकडे एकच पर्याय उरला होता स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करणे.
ह्याच परिस्थिती मध्ये त्याकाळी जाॅन कॅडबरी देखील फसलेले होते.म्हणुन जाॅन कॅडबरी यांनी आपल्या धर्मातील शाळेतुन शिक्षण केले.
अणि मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुठुनही आर्थिक मदत प्राप्त नाही झाली तेव्हा त्यांनी स्वताची पाॅकीट मनी जमवण्यासाठी एका काॅफी शाॅपमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
मग दुकानात काम करताना त्यांनी काही पैशांची बचत देखील केली.अणि मग त्याच पैशात फक्त २३ वर्षाचे असताना १८२४ मध्ये त्यांनी स्वताचे एक दुकान सुरू केले.
स्वताच्या काॅफी शाॅपमध्ये जाॅन चहासोबत काॅफी अणि चाॅकलेट ड्रिंक देखील विकत होते.
काही वर्षे स्वताच्या काॅफी शाॅपमध्ये काम केल्यानंतर अणि आपल्या ग्राहकांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यावर त्यांना लक्षात आले की त्यांच्या काॅफी शाॅपमध्ये येणारे अधिकतम लोक चहा कॉफीपेक्षा चाॅकलेट ड्रिंक पिण्यासाठी अधिक येत आहे.
ह्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करत जाॅन कॅडबरी यांनी सात वर्षे काॅफी शाॅप चालवले.अणि मग जेव्हा त्यांचा व्यवसाय उत्तम चालण्यास सुरुवात झाली.
तेव्हा जाॅन कॅडबरी यांनी १८३१ मध्ये त्यांच्या शाॅपमधून काॅफी चहा विकणे बंद करून अधिकतम प्रमाणात चाॅकलेट ड्रिंक बनवून त्याची विक्री करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले.
जाॅन कॅडबरी यांच्या ह्या निर्णयामुळे त्यांना उद्योग व्यवसायात हळुहळू यश प्राप्त होण्यास सुरुवात झाली.
मग हळूहळू जेव्हा जाॅन कॅडबरी यांच्या शाॅपमध्ये चाॅकलेट ड्रिंकची मागणी वाढली तेव्हा जाॅन यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चाॅकलेट ड्रिंकच्या १६ प्रकारच्या नवीन व्हरायटी आपल्या मेन्यू मध्ये समाविष्ट केल्या.
जाॅन कॅडबरी यांची ही युक्ती यशस्वी ठरली अणि पंधरा वर्षांत त्यांनी बनवलेली स्पेशल कॅटबरी चाॅकलेट ड्रिंक त्याच्या शाॅपच्या आजुबाजुच्या सर्वच परिसरात प्रसिद्ध झाली.
अणि ती लोकांमध्ये तेव्हा पहिली चाॅकलेट कोल्ड ड्रिंक् म्हणून प्रसिद्ध देखील झाली.शाॅपमध्ये ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती ज्यामुळे जाॅन वरील कामाचा ताण देखील वाढत होता.
म्हणून १८४७ मध्ये त्यांनी त्यांचे बंधु बेंजामिन यांना देखील त्यांच्या व्यवसायात समाविष्ट करुन घेतले.मग दोघे भावांनी मिळुन त्या शाॅपचा मोठ्या पातळीवर विस्तार करण्याचे ठरवले.
अणि मग दोघे भावांनी मिळुन ब्रीज ट्रीट येथे पहिल्यांदा एक मोठा कारखाना सुरू केला.कॅटबरी आधीच आपल्या चाॅकलेट ड्रिंकच्या चवीसाठी प्रसिद्ध होते.
त्याचमुळे १९५४ मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने कॅटबरी यांना राॅयल वाॅरंट नावाचे एक प्रमाणपत्र देखील बहाल केले होते.
त्यावेळी राॅयल वाॅरंट सर्टिफिकेट अशाच उत्तम प्रोडक्टला प्राप्त होत असत ज्यांची गुणवत्ता उत्तम स्वरूपाची आहे.अणि लोकांना ते सर्वात जास्त आवडत असत.अणि जे प्रोडक्टचा वापर मोठमोठे राजे महाराजे देखील करत होते.
यानंतर हळुहळू जाॅन यांनी बनवलेली कॅटबरी आपल्या उत्तम चव अणि गुणवत्तामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाली.
पण पुढे १८६० मध्ये जाॅन कॅडबरी अणि त्यांच्या भावामध्ये व्यापारावरून भांडण झाले त्यानंतर बेंजामिन यांनी जाॅन कॅडबरी यांच्या सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा जाॅन यांचे देखील वय अधिक झाले होते म्हणून त्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसायाला त्यांच्या दोन्ही मुलांवर रिचर्ड आणि जाॅर्ज वर सोपवले.
कॅडबरी यांनी सुरू केलेला चाॅकलेट ड्रिंकचा व्यवसाय उत्तम पद्धतीने चालु होता.त्यांनी ठरविले असते तर आपल्या उद्योग व्यवसायाला आहे तसेच सुरू ठेवत चांगले आयुष्य जगले असते पण त्यांना काही मोठे करायचे.
कुठल्याही प्रोडक्टला वर्षोनुवर्षे जिवंत ठेवण्यासाठी वर्षभर त्यावर प्रयोग करत राहणे त्यात परिवर्तन करत राहणे आवश्यक असते.
हे काम विल्यम कॅडबरीचे मुले जाॅर्ज अणि रिचर्ड यांनी केले होते.दोघे भाऊ कॅटबरी मध्ये केलेल्या त्यांच्या सर्व परिवर्तनात भरपूर यशस्वी ठरत होते.
अणि कॅडबरी आपल्या प्रयोगांसाठी ओळखली जात असे त्यामुळे त्यांचा प्रयोग संपूर्ण ब्रिटनमध्ये यशस्वी ठरला.
अणि मग १८७० मध्ये जाॅर्ज अणि रिचर्ड यांनी आपल्या प्रोडक्टला इतर देशांमध्ये देखील विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान कॅटबरीच्या सुरूवातीचा एक भक्कम पाया रचलेल्या जाॅन कॅडबरी यांचे ११ मे १८८९ रोजी निधन झाले.
मग पुढील १० वर्षात कॅडबरीला एका नवीन यश प्राप्त करून दिलेल्या रिचर्ड यांचा देखील मृत्यू झाला.हयामुळे पूर्ण कंपनी चालविण्याची जबाबदारी जाॅर्ज कॅटबरी यांच्या एकट्याच्या खांद्यावर आली.
जाॅर्ज यांनी निवृत होण्याआधी कॅटबरीला अशा ठिकाणी नेऊन ठेवले ज्यामुळे कॅटबरीला एक नवीन वळण प्राप्त झाले.
जाॅर्ज यांनी १९०५ मध्ये बाजारात आता प्रसिद्ध असलेल्या डेअरी मिल्क चाॅकलेटच्या उत्पादनास सुरुवात केली.
जाॅर्ज यांचे स्वप्न होते की त्यांच्या चाॅकलेट ड्रिंकची चव प्रत्येकाला चाखायला मिळाली ज्यासाठी त्यांना डेअरी मिल्क बाजारातील सर्वात उत्तम पर्याय म्हणून दिसुन आले.
आज आपण ज्या चाॅकलेटचे सेवन करतो त्यासाठी जाॅर्ज यांनी १८५७ पासुन संशोधन करण्यास सुरुवात केली होती.अणि हे संशोधन १९०५ मध्ये पुर्ण झाले.
म्हणजे ५० वर्ष फक्त एक डेअरी मिल्क चाॅकलेट बनविण्यासाठी त्यांनी दिले.
आज बाजारात उपलब्ध असलेले कॅटबरीचे सर्व प्रोडक्ट सर्वात वेगळे आहेत.आज कॅटबरी कंपनी ५० पेक्षा अधिक देशांमध्ये आपला उद्योग व्यवसाय चालवत आहे.
आज लहान मुलांपासून मोठया माणसांपर्यंत प्रत्येक व्यक्ती डेअरी मिल्कचा शौकीन आहे.कॅडबरी आपल्या भारत देशात सर्वात जास्त विक्री होणारे चाॅकलेट आहे.
आज आपल्याला ही चव चाखता येण्यासाठी १०० वर्षांची मेहनत जाॅन कॅडबरी अणि त्यांच्या पश्चात त्यांच्या टीमने घेतली आहे.