Blog

कार २४ स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Car 24 success story in Marathi 

कार २४ स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Car 24 success story in Marathi 

कार २४ ही बाजारातील सेकंड हॅण्ड कारची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करणारी एक आॅनलाईन कंपनी आहे.

कार २४ ची स्थापना २०१५ मध्ये विक्रम चोपडा,मेहुल अग्रवाल,गजेंद्र जांगिड,रूचित अग्रवाल यांनी जुन्या कारची खरेदी करून त्याची विक्री करणारे एक व्यासपीठ म्हणून केली होती.आज ही कंपनी एक युनिकाॅन स्टार्ट अप बनली आहे.

कार २४ युनिकाॅन स्टार्ट अप कशी बनली?How car 24 become unicorn start-up 

कार २४ ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात २०१५ मध्ये गुडगाव मधील एका छोट्याशा पेट्रोल पंप पासुन झाली होती.

इथे सुरूवातीला विक्रम चोपडा अणि त्यांच्या टीमने एक छोटेसे आॅफिस सेट अप केले.तिथेच जमीनीवर त्यांना रात्री झोपावे लागत असे.

अणि दिवसा जेव्हा कोणी कार मालक त्याच्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर येत तेव्हा त्याला हे विचारणा करत आपल्याला आपली कार विकायची आहे का?

सुरूवातीला कोणीही ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले नाही पण तब्बल १०० ते २०० लोकांना विचारल्यानंतर शेवटी त्यांना एक दोन असे कार मालक भेटतात ज्यांना आपली कार विकायची होती.

यानंतर विक्रम चोपडा यांनी एका कार मुल्यांकन कर्ताला फक्त १५ हजाराचे वेतन देऊन आपल्याकडे कामावर ठेवले.हा कार मुल्यांकन कर्ता त्यांच्यासाठी कारचा तपासणी अहवाल तयार करत असत.

अणि मग कार मुल्यांकन कर्ता जो तपासणी अहवाल तयार करायचा त्याला विक्रम चोपडा अणि त्यांची टीम इच्छुक खरेदीकर्तांना व्हाटस अप वर पाठवत.

सुरूवातीला २०० ते ३०० कारची डील त्यांनी अशाच पद्धतीने घडवून आणली.

फक्त एक छोटीशी शक्कल लढवून विक्रम चोपडा अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुठलेही आॅफिस तसेच कुठलाही सेट अप न करता सेकंड हॅण्ड कार खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

प्रारंभी कार २४ कंपनी कारशी संबंधित कागदपत्रे बनवण्याचे अणि विकण्याचे काम करायची.पण आपल्या प्लॅटफॉर्मला पुढे नेत त्यांनी सेकंड हॅण्ड कारची खरेदी विक्री करणे सुरू केले.

हे स्टार्ट अप सुरू केल्यानंतर सर्व कार मालकांची कार खरेदी किंवा विक्री करण्याची समस्या कायमची दुर झाली.अणि कालांतराने हे स्टार्ट अप एक यशस्वी स्टार्ट अप बनले.

कार २४ वर सेकंड हॅण्ड कारची खरेदी अणि विक्री हे दोन्ही व्यवहार पार पडत असत.याने सेकंड हॅण्ड कारची खरेदी तसेच विक्री करू इच्छित असलेल्या व्यक्तींना कार २४ मुळे एक प्लॅटफॉर्म प्राप्त झाले.

आज कार २४ ह्या स्टार्ट अपचे १८१ शहरांमध्ये २२४ शाखा आहेत.लोकांचा आपल्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे हे बघुन विक्रम चोपडा यांनी एक अॅप लाॅच करायचे ठरवले.

सुरूवातीला सर्वांनी अॅपला विरोध केला कारण त्यांचे असे मत होते की कुठलाही डिलर त्या अॅपचा वापर करणार नाही.

पण तरी देखील विक्रम चोपडा यांनी कार २४ चे एक आॅनलाईन अॅप लाॅच केले.सुरूवातीलाच २०१५ पासुन २०१८ पर्यंत ४ ते ५ हजार कारची त्यांनी दरमहा खरेदी विक्री केली.

ह्या सुरूवातीच्या तीन वर्षांच्या काळात ३०० लोकांची टीम बनली ज्याद्वारे विक्रम यांनी महिन्याला ५ ते ६ हजार कारची खरेदी विक्री करण्याचे काम केले.

ह्यासाठी त्यांनी जवळपास ४०० करोड इतकी फंडिंग प्राप्त केली होती.सध्या ह्या कंपनीचे मुल्य एकुण ३.३ बिलियन डॉलर्स इतके आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button