Blog

जगातील नंबर वन टुथ पेस्ट कोलगेटची यशोगाथा Colgate success story in Marathi 

जगातील नंबर वन टुथ पेस्ट कोलगेटची यशोगाथा Colgate success story in Marathi 

कोलगेट हे संपूर्ण जगभरात सर्वात जास्त विक्री होणारे एक अत्यंत महत्वाचे टुथ पेस्ट ब्रँड आहे.

आज अधिकतम घरांमध्ये टुथ पेस्टला टुथ पेस्ट नव्हे तर कोलगेट असे म्हटले जाते.यावरून आपण बाजारातील ह्या ब्रँडच्या यशाचा अंदाजा लावू शकतो.

आज आपल्या भारत देशातील प्रत्येक घराघरात दात घासण्यासाठी कोलगेट ह्या टुथ पेस्टचा अधिकतम प्रमाणात वापर केला जातो.

आजच्या लेखामध्ये आपण जगातील अव्वल क्रमांकाचे टुथ पेस्ट म्हणून ओळखले जाणारया कोलगेटची संपूर्ण यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

कोलगेट कंपनीची सुरूवात विल्यम कोलगेट यांनी केली होती.प्रांरभी विल्यम कोलगेट यांच्या कंपनीद्वारे टुथ पेस्ट नव्हे तर साबण तयार केला जात असे.

कोलगेट कंपनीचे टुथ पेस्ट जेव्हा पहिल्यांदा बाजारात विक्रीसाठी आले होते तेव्हा हे एका काचेच्या जारमध्ये ठेवले जात होते.

कोलगेट कंपनीचे संस्थापक विल्यम कोलगेट यांचा जन्म २५ जानेवारी १७८३ रोजी इंग्लंड मधील हाॅलिंगवाॅन्ड ह्या ठिकाणी झाला होता.

विल्यम कोलगेट यांच्या वडिलांचे नाव राॅबर्ट कोलगेट असे होते.रोबर्ट कोलगेट हे शेतात मोलमजुरी करून त्यांचा अणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

पण काही वर्षांनी ते १७९८ मध्ये आपल्या सर्व कुटुंबियांसोबत अमेरिका येथील मॅरिंगलॅन्ड येथे शिफ्ट झाले.

तिथे त्यांनी एका व्यक्तीसोबत मिळुन साबण अणि मेणबत्ती तयार करण्याचे काम सुरू केले.हया कामात विल्यम कोलगेट हे देखील त्यांच्या वडिलांची मदत करत होते.

पण जास्तकाळ हा व्यवसाय चालला नाही अणि अवघ्या दोन वर्षांत राॅबर्ट कोलगेट यांना बंद करावा लागला.

जवळ उदरनिर्वाह करण्याचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने राॅबर्ट कोलगेट अणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत गेली.

म्हणून आपल्या कुटुंबाचे दारिद्य्र दूर करण्यासाठी १६ वर्षीय विल्यम कोलगेट यांनी काम करण्यासाठी आपले घर सोडले.

मग अनेक वर्षे छोटी मोठी कामे केल्यानंतर १८०४ मध्ये विल्यम कोलगेट हे न्युयाॅर्क ह्या शहरात आले.

न्युयाॅर्क शहरात आल्यानंतर विल्यम कोलगेट यांनी एका साबणाच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली.

ह्या साबण तयार करण्याच्या कारखान्यात काम करत असताना त्यांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवसायातील अनेक महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या.

पुढे विल्यम कोलगेट यांनी ठरवले की पुढे जाऊन आपण देखील हाच साबण तयार करण्याचा व्यवसाय करायचा.

म्हणून त्यांनी साबण तयार करण्याच्या कारखान्यात काम करत असताना कंपनीच्या काम करण्याच्या सर्व पद्धती व्यवस्थित शिकुन तसेच व्यवस्थित समजुन देखील घेतल्या.

कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी हे देखील जाणुन घेतले की बाजारातील कंपनी काय चुका करीत आहेत अणि ह्या सर्व चुकांमुळे कंपन्यांना कुठल्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

मग जवळपास दोन वर्ष साबण बनविण्याच्या कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी कंपनीतील काम सोडुन गेले.अणि मग १८०६ मध्ये छोट्या पातळीवर का होईना स्वताचा एक साबण तयार करण्याचा उद्योग व्यवसाय सुरू केला.

आपल्या ह्या कंपनीचे नाव त्यांनी विल्यम कोलगेट ॲण्ड कंपनी असे ठेवले.काही दिवसातच विल्यम कोलगेट यांनी सुरू केलेला हा नवीन उद्योग व्यवसाय जोरात चालु लागला.

अणि ते यशाच्या दिशेने वाटचाल करू लागले होते.

पण त्याच दरम्यान अनेकवेळा त्यांना हदयविकाराचे झटके आले.त्यामुळे काही वर्ष तब्येत बरी नसल्याने त्यांना आपल्या उद्योग व्यवसायाकडे लक्ष देता आले नाही.

ज्यामुळे विल्यम कोलगेट यांच्या कंपनीला नुकसानाला सामोरे जावे लागले.मग आजारातून बरे होऊन विल्यम कोलगेट पुन्हा जोरात कामाला लागले.

अणि काही वर्षातच त्यांनी पुन्हा आपल्या कंपनीला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले.

विल्यम कोलगेट हे एक धार्मिक व्यक्ती होते.त्यांचे मत होते की आपण आज जे काही प्राप्त केले आहे ते परमेश्वराच्या कृपेने प्राप्त केले आहे.

म्हणून त्यांनी त्यांच्या अकाऊंटंटला देवाच्या नावाने एक खाते उघडण्यास सांगितले.अणि हया खात्यात विल्यम कोलगेट कंपनीच्या नफ्यातील दहावा हिस्सा जमा करत होते.

अणि मग देवाच्या नावाने उघडलेल्या खात्यात जेवढेही पैसे जमत होते ते पैसे विल्यम कोलगेट गरीब गरजु व्यक्तींना दान करून देत होते.

पुढे कालांतराने जसजसे विल्यम कोलगेट यांच्या व्यवसायात वाढ झाली तसतसे त्यांच्या नफ्यात देखील अधिक वाढ होऊ लागली.

मग त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायातील नफ्यातुन प्राप्त झालेली ५० टक्के रक्कम दान करण्यास सुरुवात केली.

अणि मग एक यशस्वी उद्योजक बनल्यानंतर २५ मार्च १८५७ रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.अणि मग त्यांच्या व्यवसायाची धुरा त्यांच्या तिन्ही मुलांनी आपल्या खांद्यावर घेतली.

अणि मग ह्या तिघांनी कंपनींमध्ये टुथ पेस्ट बनविण्यास सुरुवात केली.त्यांनी कंपनीचे पहिले टुथ पेस्ट १८७३ मध्ये लाॅच केले होते.

तेव्हा टुथ पेस्ट हे टयुब मध्ये नव्हे तर एका जारमध्ये ठेवले जात होते.पण कालांतराने पॅकेजिंग मध्ये देखील एक मोठे परिवर्तन घडून आले.

मग १८९६ पासुन बाजारातील ग्राहकांना हे टुथ पेस्ट टयुब मध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झाली.अशा प्रकारे विल्यम कोलगेट यांनी सुरू केलेल्या साबण तयार करत असलेल्या कंपनीने बाजारात टुथ पेस्ट,परफ्यूम,शेविंग क्रीम बनवण्यास देखील सुरूवात केली.

१९२८ पासुन कोलगेट कंपनीने पालमोलिव्ह कंपनीसोबत मिळुन प्रोडक्ट बनवण्यास सुरुवात केली.आज देखील ह्या कंपनीत हजारो कर्मचारी कामाला आहेत.

आज कोलगेट कंपनी जगातील ५९ व्या क्रमांकावर असलेले सर्वात जास्त मौल्यवान ब्रँड म्हणून ओळखले जाते.

कोलगेट कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी –

१९३७ मध्ये जेव्हा कोलगेट कंपनीच्या हे निदर्शनास आले की भारतात जेवढेही टुथ पेस्ट आहेत त्यांची चव औषधा प्रमाणे कडू आहे.ज्यामुळे ग्राहकांमध्ये एक नाराजी होती.

तेव्हा कोलगेटने बाजारातील ग्राहकांसाठी एक गोड अणि मिल्क फ्लेवर मधील टुथ पेस्ट लाॅच करण्याचे ठरवले जेणेकरून ग्राहकांना आपले दात घासताना अधिक आरामदायी वाटेल.

यामुळे काही वर्षातच कोलगेट कडे ५० टक्के मार्केट शेअर देखील आला.

कोलगेट ही एक अमेरिकन कंपनी आहे तरी देखील आज भारतातील ८० टक्के घरात ह्या कंपनीचे टुथ पेस्ट वापरले जाते.

आज टुथ पेस्ट असो किंवा टुथ ब्रश आज प्रत्येक जण कोलगेट कंपनीचे घेणे अधिक पसंत करते.

कोलगेट कंपनीने आपल्या कंपनीचा जगभरात प्रचार प्रसार करण्यासाठी सुरुवातीला फ्री मध्ये प्रोडक्ट दिले होते.एवढेच नव्हे तर कंपनीने आपल्या प्रोडक्टच्या मार्केटिंग करीता डाॅलर मध्ये पैसे खर्च केले आहेत.

बाजारात आपल्या प्रोडक्टचा प्रचार प्रसार करण्यासाठी १९११ मध्ये कोलगेट कंपनीने सर्व शाळा अणि हाॅस्पिटल मध्ये २० लाख टूथ पेस्टचे सॅपल फ्री मध्ये वाटले होते.

आज कोलगेट कंपनीच्या हयाच गुंतवणुकीमूळे आज ह्या कंपनीचे मूल्य ७१.६ बिलियन डॉलर्स इतके आहे.

याचसोबत एका छोट्याशा आयडीयामुळे देखील कोलगेटच्या विक्री मध्ये ४० टक्के इतकी झाली होती.

एकवेळ अशी होती की कोलगेटच्या विक्री मध्ये जास्त वाढ होत नव्हती.तेव्हा एक व्यक्ती कंपनीच्या मॅनेजमेंट समोर एक प्रस्ताव सादर करतो.

तो व्यक्ती कंपनीच्या मॅनेजमेंट टीमला म्हणतो माझ्याकडे एक अशी आयडिया आहे ज्याने तुमच्या सेल्स मध्ये दुप्पट वाढ होईल.

पण ती आयडिया मी तुम्हाला तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही मला १ लाख डॉलर देशाल तेव्हा कोलगेट कंपनीच्या मॅनेजमेंट कडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे मॅनेजमेंट टीम ह्या प्रस्तावास मंजुरी देतात.

मग तो व्यक्ती हातात पेपर अणि एक पेन घेतो अणि फक्त चार वाक्य त्यावर लिहितो हे वाक्य मेक द होल बिगर असे असते.

त्या व्यक्तीचे म्हणने असे असते की कंपनीने कोलगेटच्या टुथ पेस्टच्या डायमीटर मध्ये वाढ केली तर कोलगेट कंपनीच्या विक्री मध्ये अधिक वाढ होईल.

कारण डायमीटर मध्ये वाढ झाल्याने टुथ पेस्ट जास्त बाहेर पडेल जेणेकरून टुथ पेस्ट लवकर संपेल अणि ग्राहक पुन्हा पुन्हा ते खरेही करण्यासाठी त्यांच्याकडे येतील.

आपल्या प्रोडक्ट विषयी ग्राहकांच्या मनात असलेल्या विश्वासात अधिक वाढ करण्यासाठी कोलगेट कंपनी आपल्या प्रोडक्ट मध्ये नेहमी इंडियन डेंटल असोसिएशनचा उल्लेख करते.

अणि इंडियन डेंटल असोसिएशनच्या कुठल्याही कार्यक्रम तसेच स्काॅलरशीपकरीता कोलगेट कंपनीकडुन स्पाॅन्सर केले जाते.त्यामुळे आयडीए देखील देशातील लोकांना कोलगेटचा वापर करण्याचा सल्ला देते.

एकीकडे जिथे बाजारातील इतर ब्रँडने इंडियन डेंटल असोसिएशनचा विश्वास संपादीत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

तिथे कोलगेटने फक्त इंडियन डेंटल असोसिएशनच्या इव्हेंट तसेच स्काॅलरशीपला स्पाॅन्सर करून आपल्या कंपनीला भारतातील अव्वल क्रमांकाचा ब्रँड बनवले.

आपल्या उद्योग व्यवसायाचा जगभरात विस्तार करण्यासाठी कंपनीने इतर देशांत देखील आपले सेट अप करण्यास सुरुवात केली होती.

कोलगेट कंपनीने आपल्या उद्योग व्यवसायाचा जगभरात विस्तार करण्यासाठी १९१४ मध्ये कॅनडा,१९२१ साऊथ स्पेसिफिकेशन,१९२२ युरोप,१९२५ लॅटिन अमेरिका,अणि १९२९ मध्ये आफ्रिका इत्यादी वेगवेगळ्या देशांमध्ये आपले सेट अप तयार केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button