Blog

इलॅस्टिक रण स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Elastic run Startup business success story in Marathi 

इलॅस्टिक रण स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Elastic run Startup business success story in Marathi 

इलॅस्टिक रण हे एक बीटुबी ईकाॅमर्स स्टार्ट अप आहे.हया स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात २०१६ मध्ये संदीप देशमुख,शिदेश बंसल,सौरभ निगम ह्या तिघांनी मिळून केली होती.

ह्या तिघांनी आपल्या प्लॅटफॉर्मला किराणा स्टोअर्स अणि एफएम सीजी अणि ग्रोसरी ब्रॅडसोबत डायरेक्ट कनेक्ट केले.

ग्रामीण क्षेत्रात खोल पोहोच अणि डेटा एज प्रदान केले.

इलॅस्टिक रणने आपल्या प्लॅटफॉर्मवर ईकाॅमर्स कंपनीला देखील ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास साहाय्य केले.

एवढेच नव्हे तर वित्तीय संस्था बॅक यांना देखील आर्थिक सेवा विस्तारीत करण्यास साहाय्य प्रदान केले.

इलॅस्टिक रणने २०२२ मध्ये साॅफ्टबॅक व्हिजन फंड टु, गोल्डमन सॅककडुन ३०० मिलियन डॉलर इतकी फंडिग प्राप्त केली ज्यामुळे कंपनीचे एकुण मुल्यांकन १.५ बिलियन डॉलर्स इतके झाले.

यानंतर इलॅस्टिक रण ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे नाव युनिकाॅन क्लबच्या यादीमध्ये समाविष्ट झाले.

इलॅस्टिक रण हे आज भारतातील सर्वात यशस्वी बीटुबी ईकाॅमर्स स्टार्ट अप म्हणून ओळखले जाते.जे किराणा स्टोअरला सक्षम करते अणि त्यांना कमी खर्चात पोहोच समाधान प्रदान करते.

इलॅस्टिक रण हे बीटुसी ईकाॅमर्स कंपन्यांना त्यांच्या लाॅजिस्टिक नेटवर्क सेवांचा वापर करून ग्रामीण ग्राहकांपर्यंत पोहचवण्यास सक्षम करते.

इलॅस्टिक रण हे एक बीटुबी प्लॅटफॉर्म आहे जे किराणा ब्रँड अणि एफ एमसीजी यांना ग्रामीण बाजारपेठेशी जोडण्याचे काम करते.

इलॅस्टिक रण युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?

इलॅस्टिक रण ह्या कंपनीने ग्रामीण भारतातील एक गंभीर समस्या सोडवली.ज्यामुळे आज ह्या कंपनीचे नाव युनिकाॅन स्टार्ट अप व्यवसायांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले‌ आहे.

आपल्या भारत देशात जवळपास १ करोड ३० लाख किराणा स्टोअर्स आहेत.ज्यापैकी १ करोड किराणा स्टोअर्स हे फक्त ग्रामीण क्षेत्रात आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे देशात हिंदुस्थान युनिलिव्हर,आयटीसी,डाबर,मारीको,नेसले इत्यादी सारख्या टाॅप एफ एमसीजी कंपनींचे टाॅप नेटवर्क असुन देखील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या ग्रामीण किराणा स्टोअर्सला दरमहिन्याला ग्रामीण रिटेल मार्केट मधील एक खुप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

 बाजारातील ह्याच ग्रामीण रिटेल मार्केट मधील समस्येचे निराकरण करण्याचे काम इलॅस्टिक रण हे स्टार्ट अप करत आहे.

इलॅस्टिक रण ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात संदीप देशमुख,शितीज बंसल,सौरभ निगम ह्या तीन्ही मित्रांनी मिळून केली होती.

आज इलॅस्टिक रण ही कंपनी ग्रामीण रिटेल मार्केट मधील एक गंभीर समस्या सोडवून युनिकाॅन स्टार्ट अप बनली आहे.

एखाद्या रिटेल स्टोअरचा मालक एखाद्या मोठ्या शहरात किंवा शहरी भागात असतो.अणि त्याच्या स्टोअर्स मध्ये मॅगी, बिस्कीट टाटा मिठाची पुडी इत्यादी असे कुठलेही एफ एमसीजी प्रोडक्ट संपते.

तेव्हा तो लगेच आपल्या परिसरातील एखाद्या चांगल्या होलसेलर किंवा डिस्ट्रि ब्युटर यांना फोन करून पुन्हा त्या प्रोडक्टची ऑडर करत असतो.

पण याचठिकाणी शहरापासून ५० ते ६० किलोमीटर दुर इतक्या अंतरावर वास्तव्यास असलेल्या छोट्या गावात किंवा शहरातील रिटेलरला ही सुविधा उपलब्ध होत नसते.

कारण त्यांना आपल्या गावात असा कुठलाही होलसेलर किंवा डिस्ट्रिब्युटर प्राप्त होत नसतो.

अणि जेव्हा रिटेलर आपल्या गावाजवळील एखाद्या होलसेलरला फोन करतात तेव्हा होलसलर त्यांना आम्ही तुमच्या एरियात सप्लाय नाही करत नाही असे उत्तर देऊन मोकळे होत असत.

अशावेळी त्या गावातील रिटेलरला आपल्या स्टोअरला बंद करून दोन तीन दिवसांसाठी शहरात जावे लागत.अणि तेथील एखाद्या चांगल्या होलसेलर कडुन माल खरेदी करावा लागत.

रिटेलरला शहरात किराणा माल खरेदी करण्यासाठी जावे लागत असल्याने दोन तीन दिवस आपले स्टोअर बंद ठेवावे लागत ज्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होत होते.

याचसोबत शहरातुन किराणा माल खरेदी करून गावापर्यंत आणण्यासाठी देखील रिटेलरला खुप पैसे खर्च करावे लागत होते.अणि हीच आत्ताच्या काळातील ग्रामीण रिटेल मार्केट मधील सर्वात मोठी समस्या आहे.

आपल्यातील खूप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल जे होलसेलर शहरात आपला किराणा माल पुरवितात ते गावात आपल्या मालाचा पुरवठा का नाही करत.याला कारणीभूत आहे मागणी अणि पुरवठयाची समस्या.

जेव्हा एखादा डिस्ट्रि ब्युटर शहरातील एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आपल्या मालाचा सप्लाय करण्यासाठी जातो.तेव्हा तो फक्त एका किराणा स्टोअर्स करीता जात नाही.त्याच्याकडे त्या विशिष्ट क्षेत्रातील इतरही ऑडर देखील असतात.

तो सप्लायर त्या विशिष्ट क्षेत्रातील सर्व ऑडरला एकाचवेळी कलेक्ट करतो अणि एकाचवेळी त्या क्षेत्रातील सर्व रिटेल शाॅपला सर्विस देत असतो.याने त्या सप्लायरला चांगला नफा प्राप्त होतो.

पण गावात तसे नसते.कारण गावात जास्त किराणा स्टोअर्स उपलब्ध नसतात अणि तिथे प्रत्येक रिटेलर खूप दूर अंतरावर वास्तव्यास असतात.अणि गावात मोजकेच किराणा स्टोअर्स असल्याने मालाची मागणी देखील खुप कमी असते.

त्यामुळे होलसेलरला गावात किराणा माल आणण्यासाठी वाहतुक खर्च हा मालाच्या किमतीपेक्षा जास्त लागतो.याणमुळे कुठलाही होलसेलर किंवा डिस्ट्रि ब्युटर अशा नुकसानदायी कराराला सामोरे जाण्यास तयार नसतात.

ज्याचे परिणाम स्वरूप ग्रामीण भागातील रिटेलरला आपल्या किराणा स्टोअर्स मध्ये किराणा माल आणण्यासाठी अधिक आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागते.

बाजारातील ह्या एवढ्या मोठ्या समस्येकडे कोणीच लक्ष देत नव्हते पण संदीप देशमुख,शिदेश बंसल अणि सौरभ निगम ह्या तिन्ही मित्रांनी ह्या समस्येकडे बाजारातील एक सुवर्णसंधी म्हणून पाहीले.

अणि बाजारातील ह्या समस्येला सोडविण्यासाठी इलॅस्टिक रण ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली.इलॅस्टिक रणने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ४ हजार ७५५ करोड इतकी कमाई केली होती.

अणि आज इलॅस्टिक रणने भारतातील एक लाखापेक्षा अधिक गावातील ६ लाखापेक्षा अधिक स्टोअर्सला आपल्या अॅपच्या माध्यमातून कनेक्ट देखील केले आहे.

इलॅस्टिक रणने ग्रामीण भागातील रिटेलरची समस्या कशी सोडवली?

इलॅस्टिक रण छोटे गाव अणि शहरातील अशा रिटेलरशी संपर्क साधते.ज्यांच्याकडे काही अतिरिक्त जमीन असते.

रिटेलर आपली जमीन देण्यास तयार झाल्यावर कंपनी त्यांना जमिनीचे भाडे देऊन त्या जमिनीवर एक मिनी वेअर हाऊस तयार करते.

याने कंपनी अणि रिटेलर दोघांनाही बराच नफा प्राप्त होतो.ग्रामीण भागात एकाच क्षेत्रात भरपूर रिटेलर्स उपलब्ध होत नसतात.म्हणुन कंपनी अशा क्षेत्रात एक मिनी वेअर हाऊस तयार करते.

याचसोबत कंपनी आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी लोकल लाॅजिस्टिक कंपनींशी देखील संपर्क साधते.जेणेकरून त्यांना रिटेलरने ऑडर केलेले प्रोडक्ट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवता येतील.

इलॅस्टिक रण कंपनी लोकल लाॅजिस्टिक कंपनींशी करार ऑन डिमांड ह्या आधारावर करते.म्हणजे जेव्हा त्यांना आवश्यकता असते तेव्हाच ते त्यांची मदत घेतील.

ज्यामुळे इलॅस्टिक रणला कुठल्याही लोकल लाॅजिस्टिक कंपनीला फिक्स किंमत द्यावी लागत नाही ज्यामुळे त्यांना आपल्या पैशाची देखील बचत करता येते.

आज इलॅस्टिक रणने मायक्रो डिस्ट्रि ब्युटर अणि उद्योजक यांचे एक नेटवर्क तयार केले आहे.जे एकत्रितपणे ग्रामीण रिटेल मार्केट मधील समस्येचे निराकरण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button