फ्लिपकार्ट स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Flipkart Start up business success story in Marathi
फ्लिपकार्ट स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Flipkart Start up business success story in Marathi
चंदिगड मध्ये जन्म घेतलेल्या सचिन बंसल यांनी आय आयटी दिल्ली मधुन कंप्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरिंग मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
सचिन बंसल यांचा जन्म चंदिगड मध्ये झाला होता.त्यांचे वडील एक व्यावसायिक होते आणि त्यांची आई एक घरगृहिणी होती.
आय आयटी दिल्ली मधुन कंप्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरिंग मध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर वर्ष २००६ मध्ये सचिन बंसल यांना जगातील सर्वात मोठी ई काॅमर्स कंपनी ॲमेझाॅन मध्ये नोकरी मिळाली.
ॲमेझाॅन मध्ये नोकरी करत असताना सचिन बंसल यांना ईकाॅमर्स मार्केट मध्ये व्यवसायाची एक चांगली संधी दिसुन आली अणि त्यांनी नोकरी सोडण्याचा खुप मोठा धाडसी निर्णय घेतला.
त्यानंतर ॲमेझाॅन मध्ये एक वर्ष नोकरी केल्यानंतर सचिन बंसल यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.अणि त्यानंतर त्यांचे मित्र बिन्नी बंसल यांच्यासमवेत मिळुन सप्टेंबर २००७ मध्ये फ्लिपकार्ट ह्या ई काॅमर्स स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली.
बिन्नी बंसल यांनी देखील सचिन बंसल यांच्यासमवेत आय आयटी दिल्ली मधुन कंप्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली होती.सचिन बंसल अणि बिन्नी बंसल दोघे महाविद्यालयात एकमेकांचे क्लासमेंट होते.त्यामुळे दोघांचे विचार एकमेकांशी जुळायचे.
सचिन बंसल अणि बिन्नी बंसल ह्या दोघांनी सुरूवातीला फक्त चार लाखाची गुंतवणूक करत फ्लिपकार्टवर ऑनलाईन पद्धतीने पुस्तके विकण्यास सुरुवात केली.आज ही कंपनी ४० बिलियन डॉलर्सची झाली आहे.
जेव्हा सचिन बंसल अणि बिन्नी बंसल यांनी ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा त्यांना प्रारंभी जास्त ऑडर देखील प्राप्त होत नव्हते.ज्यामुळे फ्लिपकार्ट कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
फ्लिपकार्ट कंपनीने तब्बल तीन वर्षे संघर्ष केल्यावर कंपनीचे सीईओ सचिन बंसल यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने पुर्ण ऑनलाईन मार्केट मध्ये मोठे परिवर्तन घडून आले.
वर्ष २०१० मध्ये फ्लिपकार्टने पहिल्यांदा भारतात कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून दिला.हा निर्णय फ्लिपकार्ट करीता खूप मोठा गेम चेंजर निर्णय होता.
यानंतर फ्लिपकार्टने फक्त पुस्तकेच नव्हे तर त्यासोबत इतरही इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, मोबाईल एसी फ्रीज इत्यादी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकण्यास सुरुवात केली.
यानंतर फ्लिपकार्टने २०१४ मध्ये बिग बिलियन डेज नावाचा सेल लावला.यानंतर फ्लिपकार्ट कंपनी आकाशात उंच भरारी घेऊ लागली.
आज बाजारात फ्लिपकार्ट हे ॲमेझाॅनचे सर्वात मोठी प्रतिस्पर्धीं ई काॅमर्स कंपनी बनलेली आहे.२०२३ मध्ये फ्लिपकार्टचे एकुण बाजार मुल्यांकन ४० बिलियन यूएस डाॅलर्स इतके होते.
फ्लिपकार्टला पहिली ऑडर कशी मिळाली?
फ्लिपकार्ट्ने जेव्हा आपल्या स्टार्ट अपची सुरूवात केली तेव्हा २००७ मध्ये हैदराबाद मधील पुस्तक वाचणाची आवड असलेल्या बीके चंद्रा यांना लिविंग मायक्रोसॉफ्ट टु चेंज दी वल्ड हे पुस्तक वाचण्याची ईच्छा झाली.
चंद्रा बाबु हे पुस्तक खरेदी करण्यासाठी हैदराबाद पर्यंत गेले पण त्यांना हे पुस्तक नाही मिळाले.मग चंद्रा बाबु यांनी हे पुस्तक ऑनलाईन सर्च करण्यास सुरुवात केली.
तेव्हा एका युझरच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांना फ्लिपकार्टची लिंक प्राप्त झाली तिथून त्यांनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर जाऊन ते पुस्तक उपलब्ध आहे का हे बघीतले.
मग सर्च केल्यावर चंद्रा बाबु यांना लिविंग मायक्रोसॉफ्ट टु चेंज दी वल्ड हे पुस्तक फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर उपलब्ध दिसुन आले.
त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे पुस्तक पाहीजे होते म्हणून त्यांनी कुठलाही विचार न करता हे पुस्तक फ्लिपकार्ट वरून ऑडर केले.
पण फ्लिपकार्ट वरून ऑडर केल्यानंतर देखील कित्येक दिवस चंद्रा बाबु यांना हे पुस्तक मिळाले नाही कारण हे पुस्तक तेव्हा फ्लिपकार्ट जवळ देखील उपलब्ध नव्हते.
पण चंद्रा बाबु यांनी ऑडर केलेले पुस्तक फ्लिपकार्टवरची पहिली ऑडर असल्याने सचिन बंसल अणि बिन्नी बंसल यांना आपल्या पहिल्या ग्राहकाला निराश करायचे नव्हते.
मग सचिन बंसल बिन्नी बंसल यांनी खुप ठिकाणी ह्या पुस्तकाचा शोध घेतला.अणि अखेरीस त्यांना हे पुस्तक मिळाले. अणि मग हे पुस्तक खरेदी करून विवेक के चंद्रा यांना फ्लिपकार्टचे पहिले ग्राहक बनण्याचा बहुमान प्राप्त झाला.
सचिन बंसल अणि बिन्नी बंसल यांनी बंगलौर मधील एका अपार्टमेंट मधुन आपल्या ई काॅमर्स स्टार्ट अप व्यवसायास सुरुवात केली होती.प्रथमत फ्लिपकार्ट हे एक ऑनलाईन बुक स्टोअर होते.
पण आज फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठी ई काॅमर्स कंपनी बनलेली आहे.प्लिपकार्टला आता वाॅल मार्टने मिळवले आहे.
फ्लिपकार्ट देशातील दुसरे सर्वात मोठे युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?
ॲमेझाॅन मध्ये नोकरी करत असताना सचिन बंसल बिन्नी बंसल ह्या दोघांना ई काॅमर्स मध्ये व्यवसायाची एक मोठी संधी दिसुन आली.
यानंतर त्या दोघांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला अणि सप्टेंबर २००७ मध्ये फ्लिपकार्ट ह्या ई काॅमर्स स्टार्ट अप व्यवसायास प्रारंभ केला.
जेव्हा भारतात फ्लिपकार्टची सुरूवात झाली तेव्हा इथे काही मोजक्याच कंपन्या होत्या.ज्या एकदम असुन नसल्यासारख्या होत्या.
अणि बाजारात ज्या ई काॅमर्स कंपन्यां अस्तित्वात होत्या त्या लोकांच्या मानसिकतेमुळे फेल होत होत्या.तेव्हा लोकांची मानसिकता अशी होती की कोणतीही वस्तू आपल्याला तिला हात न लावता किंवा न बघता कशी खरेदी करता येऊ शकते.
अणि वस्तु प्राप्त होण्याच्या अगोदर लोकांना ऑनलाईन पेमेंट देखील करायचे नव्हते.सचिन बंसल अणि बिन्नी बंसल यांनी लोकांची हीच मानसिकता कॅश ऑन डिलिव्हरीची सेवा उपलब्ध करून देत परिवर्तित केली.असे भारतात पहिल्यांदाच घडुन आले होते.
याअगोदर सर्व ऑनलाईन शाॅपिंग वेबसाईट फक्त क्रेडिट कार्ड अणि डेबिट कार्ड दवारे पैसे घेत असत.अणि त्यावर ग्राहकांना जास्त विश्वास नव्हता.
फ्लिपकार्ट कंपनीची सुरूवात २००७ पासुन पुस्तक विकण्यापासुन झाली.जवळपास जास्त कर्मचारी वर्ग कामाला नसल्याने सचिन बंसल अणि बिन्नी बंसल स्वता स्कुटर वर ग्राहकांना पुस्तके पोहोचवण्यास जात होते.
बुक स्टोअर समोर उभे राहुन आपल्या नवीन व्यवसायाचे पॅपलेट वाटत होते.सचिन अणि बिन्नी बंसल यांच्या मेहनतीला फळ प्राप्त झाले अणि २००८/२००९ मध्ये फ्लिपकार्टने ४० मिलियन रूपये इतकी विक्री करण्यात यश प्राप्त केले.
हे सर्व पाहुन बाजारातील गुंतवणूकदार देखील कंपनीकडे आकर्षित होऊ लागले अणि फ्लिपकार्टला जास्तीत जास्त फंडिंग प्राप्त झाली.यानंतर फ्लिपकार्टने पुन्हा मागे वळून बघितले नाही.
पुढे २०१४ मध्ये फ्लिपकार्टने मिंत्रा डाॅट काॅम सारख्या अनेक ऑनलाईन वेबसाइटला खरेदी केले.२०१६ मध्ये फ्लिपकार्टची विक्री ४० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचली होती.
आज ह्या कंपनीत १५ हजारपेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.