Blog

इकिगाई पुस्तकाचा परिचय Ikigai book review in Marathi 

इकिगाई पुस्तकाचा परिचय ikigai book review in Marathi 

इकिगाई ह्या पुस्तकाचे लेखक हेक्टर गार्सिया हे आहेत.इकिगाई हया पुस्तकात जापनीज लोकांच्या दिर्घायुष्यी निरोगी जीवन जगण्याचे तसेच त्यांच्या यश अणि आनंदाचे रहस्य सांगितलेले आहे.

जपान ह्या देशामध्ये ओकिनावा नावाचे आयर्लंड आहे.हया आयलॅडवर वास्तव्यास असलेले व्यक्ती १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षे जीवन जगतात.

ओकिनावा ह्या ठिकाणी वास्तव्यास असलेले ८० ते ९० वर्षाचे वृद्ध व्यक्ती देखील रोज सकाळी झोपेतून उठून सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या उत्साहाने तसेच आनंदाने आपले काम करतात.

आपल्या भारत देशात ६० ते ६५ वय झाल्यावर लगेच लोक सेवानिवृत्ती घेत असतात.पण ओकिनावा ह्या आयलॅडवरील व्यक्ती हे मृत्यू येईपर्यंत सेवानिवृत्ती घेण्याचा विचार देखील करत नाहीत.

आज संपूर्ण जगभरात सर्वात सर्वात जास्त वर्षे निरोगी अणि तंदुरुस्त जीवन जगणारे व्यक्ती ओकिनावा येथे आढळुन येतात.

जपानमधील ओकिनावा ह्या आयलॅडवर वास्तव्यास असलेले सर्व व्यक्ती आपले जीवन सुखात अणि आनंदात जगण्यासाठी एका फाॅर्म्युलाचा वापर करतात.

ह्या फाॅर्म्युलाचे नाव इकिगाई असे आहे.इकिगाई म्हणजे जीवन जगण्याचे उद्दिष्ट.

जापनीज लोक असे मानतात की आपल्या प्रत्येकाचा जन्म विनाकारण झालेला नाहीये.आपल्या प्रत्येकाचा जन्म कोणत्या ना कोणत्या एका मुख्य उद्दिष्टाच्या पुर्तीसाठी तसेच एखादे विशेष कार्य करण्यासाठी झालेला आहे.

अणि हे जीवन जगण्याचे उद्दिष्ट हेच आपल्या प्रत्येकाचे इकिगाई असते.

अणि जर आपण आपल्या ह्या इकिगाई व्यतिरीक्त इतर कुठलेही काम केले तर आपल्याला ते काम करताना आनंद प्राप्त होत नाही जो आपल्या इकिगाई नुसार काम करताना आपणास प्राप्त होतो.

अणि जेव्हा आपण आपल्या इकिगाई विरूद्ध काम करत असतो तेव्हा आपण नेहमी ताणतणाव अणि चिंतेत राहत असतो.कारण आपण आपल्या जीवन जगण्याच्या उद्दिष्टानुसार इकिगाई नुसार आपले कार्य करत नसतो.

आज कुठलीही व्यक्ती ह्या इकिगाई नावाच्या जापनीज फाॅर्म्युलाचा वापर करून आपले जीवन जगण्याचे उद्दिष्ट शोधून काढु शकते.

जेव्हा आपल्यावर आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर एखाद्या कंपनीत नोकरी करण्याची वेळ येते.

तेव्हा आपल्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागत असतो तो निर्णय म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात काय करायचे आहे?कोणते काम करायचे आहे?

हा निर्णय घेणे खुप महत्वाचे असते कारण आपण आपल्या आयुष्याचा सर्वात जास्त वेळ काम करण्यात व्यतीत करत असतो.

अशावेळी आपल्याला आजुबाजुचे लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतील.

कोणी सल्ला देईल तुला जे काम करायला आवडते जे काम करताना तुला आनंद प्राप्त होतो ते काम तु करायला हवे.

तर कोणी सांगेल तु जे काम करण्यात पारंगत आहे ज्यात तुझे कौशल्य आहे जे काम करण्याचा अनुभव तुझ्याजवळ आहे असे एखादे काम तु करायला हवे.

काही व्यक्ती आपल्याला असा देखील सल्ला देतील तु असे एखादे काम करायला हवे ज्यात सर्वात जास्त पैसे प्राप्त होतील.

किंवा आपल्याला काही लोकांकडून असा देखील सल्ला दिला जाईल जे काम करणे संपूर्ण जगाच्या मानवतेच्या हितासाठी आवश्यक आहे असे एखादे काम आपण करायला हवे.

अणि सगळ्यात महत्वाची समस्या ही आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्याला ह्या चारही पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय निवडण्यास सांगतात.पण हा एक चुकीचा सल्ला आहे.

कारण इकिगाई म्हणजे जीवन जगण्याचे उद्दिष्ट ह्या चारही गोष्टींचे मिश्रण आहे.

हया चार घटकांपैकी कुठलाही एक घटकाचा देखील आपण विचार करणे सोडुन दिले तर आपल्याला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागु शकते.

आपण आपला इकिगाई कसा शोधायचा?

आपले इकिगाई शोधताना ह्या चारही चार प्रश्नांचा विचार केला जातो.

सर्वात पहिला प्रश्न आहे आपल्याला काय आवडते?यानंतर दुसरा प्रश्न आहे आपण कुठले काम करण्यात चांगले आहे असे कोणते काम आहे जे आपण उत्तम पद्धतीने करू शकतो?

तिसरा प्रश्न आहे बाजारातील असे कोणते काम आहे जे आपल्याला येते अणि जे केल्यावर आपणास लोक त्याबदल्यात पैसे देखील देतील?

चौथा प्रश्न आहे जगाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, लोकांना काय हवे आहे?

जे काम करायला आपल्याला आवडते अणि आपण ते काम उत्तम पद्धतीने करू शकतो आपण ते काम करण्यात पारंगत देखील आहे असे काम आपले पॅशन ठरते.

उदा एक मुलगा आहे त्याला लिहिण्याची आवड आहे.अणि तो लेखनाचे काम उत्तम पद्धतीने करू शकतो तो ते काम करण्यात अत्यंत पारंगत देखील आहे.

म्हणजे पहिल्या अणि दुसरया प्रश्नाचे उत्तर प्राप्त झाल्यावर आपल्याला त्या मुलाचे प्रोफेशन लेखनक्षेत्र असायला हवे हे कळते.

अणि तिसरया प्रश्नाचा विचार केल्यावर आपल्याला त्या मुलाला बाजारात लेखन करून भरपूर पैसे कमवता येतील का हा प्रश्न निर्माण होतो.लोक त्याने केलेल्या लिहिण्याच्या कामाच्या बदल्यात त्याला पैसे देतील का?हा देखील प्रश्न पडतो.

अणि चौथा प्रश्न पडतो तो म्हणजे जगाला काय हवे आहे लोकांना काय हवे आहे?

ह्या वरील चारही प्रश्नांचे उत्तर जेव्हा त्या मुलाच्या छंद आवड, अणि एक्स्पर्टीज सोबत जुळुन येईल तेव्हा त्या मुलाला त्याचा इकिगाई सापडला असे म्हटले जाईल.

उदा, राहुल नावाचा एक मुलगा आहे त्याला लिहिण्याची खूप आवड आहे अणि ते काम करण्यात तो पारंगत देखील आहे.

आज बाजारात अशा अनेक एजंसी तसेच मोठमोठ्या कंपन्या वेबसाईट आहेत ज्यांना आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विस विषयी माहिती लिहुन घेण्यासाठी रायटरची आवश्यकता आहे.

अणि त्याबदल्यात ते रायटरला पैसे द्यायला देखील तयार आहेत.

अणि आज बाजारात असे लाखो लोक आहेत जे इंटरनेटवर चांगली माहीती शोधत असतात.

ज्यांना वेगवेगळ्या विषयांवर अचुक माहीती हवी असते अशा गरजु लोकांसाठी इंटरनेटवर अचुक माहीती असलेले ब्लाॅग लिहुन देखील राहुल चांगले पैसे कमावू शकतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर ज्या गोष्टीची जगाला आवश्यकता आहे अणि तेच काम करायला आपल्याला मनापासून आवडते अणि आपण त्या कामात पारंगत देखील आहे.

शिवाय लोक त्या कामाच्या बदल्यात आपल्याला पैसे देण्यास देखील तयार आहेत.अशा वेळी आपले आवडते काम आपण ज्यात पारंगत आहे हेच आपले जीवन जगण्याचे उद्दिष्ट म्हणजे इकिगाई बनुन जाते.

आपला इकिगाई शोधण्यासाठी फक्त आपले पॅशन कशात आहे हे शोधुन चालत नाही.

आपण त्या कामात पारंगत आहे का?आपल्याला त्या कामाच्या बदल्यात बाजारात पैसे मिळतील का तसेच लोकांना त्या कामाची आवश्यकता आहे का? ह्या तीन प्रश्नांची उत्तरे शोधणे देखील आवश्यक असते.

आज आपल्याला आपल्या आजुबाजूला जेवढेही यशस्वी व्यक्ती दिसुन येतात त्या सर्व व्यक्तींनी सर्वप्रथम आपले इकिगाई शोधुन काढले अणि त्या दिशेने कार्य करण्यास सुरुवात केली.

त्याचमुळे आज त्यांनी जीवनात नाव,पैसा प्रसिद्धी, प्राप्त केली आहे.

आज प्रत्येकाने आपले इकिगाई शोधणे गरजेचे आहे कारण याने आपल्या जीवनाला एक विशिष्ट दिशा प्राप्त होत असते.ज्यामुळे जीवनात न भरकटता आपल्याला त्या दिशेने सातत्याने वाटचाल करता येते.

आज ज्या लोकांनी आपल्या इकिगाई नुसार आपले काम निवडले आहे ते त्यांच्या कामात एवढे अधिक मग्न असलेले आपणास दिसून येतील की त्यांना आपले काम करत असताना आपल्या तहान भूकेचा देखील विसर पडलेला आहे.

ते आपल्या कामात इतके रमलेले असतात की आजुबाजुला काय घडते आहे कोण त्यांच्या जवळ येऊन बसले आहे?कोण त्यांच्या समोरून ये जा करत आहे याचे देखील त्यांना कधी कधी भान राहत नाही.

आज जगातील सर्वात प्रसिद्ध ॲनिमेटेड स्टुडिओ पैकी एक जपान मधील स्टुडिओ गिबली जे संस्थापक हयाओ मियाजाकी हे त्यांच्या कामात इतके रमलेले असतात की ते रविवार तसेच इतर सुट्टीच्या दिवशी देखील त्यांच्या स्टुडिओ मध्ये काम करताना दिसुन येतात.

आज ७९ वय झाल्यानंतर देखील ते कधीही आपले काम करताना थकत नाहीत.कारण त्यांनी त्यांचा इकिगाई शोधुन काढला अणि रोज ते त्यावरच आनंदाने काम करत असतात.

इकिगाई ही एक अशी संकल्पना आहे ज्यामुळे आपले मन अणि शरीर बळकटी मिळते.

एका संशोधनातून समोर आले आहे की ज्या व्यक्तींकडे जीवन जगण्याचे उद्दिष्ट नसते त्यांचे आयुष्य कमी कमी होऊ लागते.

म्हणून दिर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट शोधून काढणे अणि रोज त्या दिशेने कार्य करत राहणे अत्यंत आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button