Blog

इनमोबी स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Inmobi start up business success story in Marathi 

इनमोबी स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Inmobi start up business success story in Marathi 

इनमोबी हा एक मोबाईल जाहीरात प्लॅटफॉर्म आहे.जो कंपन्यांना प्रोडक्ट टेस्टिंग, रिसर्च अणि सर्वे करण्यासाठी मदत करतो.

इनमोबी ही भारतीय मोबाईल ॲड टेक्नॉलॉजी कंपनी आहे.हया कंपनीची सुरूवात २००७ मध्ये करण्यात आली होती.

इनमोबी ही जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारे मोबाईल ॲड नेटवर्क म्हणून ओळखले जाते.आज ही कंपनी संपूर्ण जगभरात १७० पेक्षा अधिक देशांमध्ये काम करत आहे.

सुरूवातीला हे एक एसएम एस आधारीत सर्च इंजिन होते.जिथे वापरकर्त्यांना कुठल्याही डेटा प्लॅनविना फक्त टेक्स्ट टाईप करून कुठलीही माहीती प्रादेशिक भाषेत प्राप्त करता येत होती.

पण २००७ मध्ये इनमोबीने आपले लक्ष जाहीरातीकडे वळवले.अणि हा त्यांचा एक उत्तम निर्णय ठरला.

पुढे २०२० मध्ये इनमोबीला गुगल कडुन देखील गुंतवणूक निधी प्राप्त झाला.अणि आज ही कंपनी बाजारातील मोठे ब्रँड युनिलिव्हर अणि लॉरीअल सारख्या दिग्दज कंपनीसोबत काम करत आहेत.

इनमोबी ह्या कंपनीने आपल्या उत्तम कामगिरीसाठी अनेक मोठमोठे पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत.ज्यात वल्ड ५० मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनी २०१८ हा पुरस्कार देखील समाविष्ट आहे.

इनमोबीने आतापर्यंत एक मोबाईल ॲड टेक्नॉलॉजीच्या रूपात अनेक मोठमोठ्या उपलब्धी देखील प्राप्त केल्या आहेत.

इनमोबीचे मंथली ॲक्टिव्हि युझर्स ७१५ मिलियन पेक्षा अधिक आहेत.इनमोबीने आतापर्यंत २१५.८ मिलियन डॉलर इतकी फंडिग देखील आतापर्यंत प्राप्त केली आहे.

आज इनमोबी कंपनीचे बाजार मुल्यांकन १५ बिलियन डॉलर्स पेक्षा अधिक आहे.आतापर्यंत इनमोबीने अनेक उल्लेखनीय यश संपादन केले आहे.ज्यात स्प्राऊटस,एम एम टीसी लॅब,मेटा फ्लो सोल्युशन सारख्या युएस आधारित कंपनी देखील समाविष्ट आहेत.इनमोबी ही भारतातील पहिली युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी आहे.

इनमोबी कंपनीचे फाऊंडर तसेच सीईओ नवीन तिवारी आहेत.नवीन तिवारी यांचा जन्म १४ डिसेंबर १९७७ रोजी कानपूर युपी मधील एका सर्वसाधारण,शिक्षित कुटुंबात झाला होता.

नवीन तिवारी यांच्या वडिलांचे नाव सच्चिदानंद आहे जे आय आयटी कानपूर मधील डीन तसेच इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते.

नवीन तिवारी कानपूर मध्येच लहानाचे मोठे झाले अणि त्यांनी आय आयटी कानपूर मधूनच वर्ष २००३ मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली होती.

यानंतर मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर नवीन यांनी मॅकिन्से ॲण्ड कंपनी मध्ये नोकरी करत आपल्या करीअरची सुरुवात केली.जवळपास तीन वर्ष नवीन तिवारी यांनी ह्या कंपनीत नोकरी केली.

नवीन तिवारी यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक कंपन्यांच्या टाॅप मॅनेजमेंट सोबत काम केले.

मग त्यांनी वेंचर कॅपिटल फर्म चार्लस रिवर्स वेंचर ह्या कंपनीत देखील आपली सेवा दिली.इथे त्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची रणनीती तयार करण्याचे काम केले.

अणि मग वर्ष २००५ मध्ये नवीन तिवारी यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये एमबीए करण्यासाठी हाॅर्वर्ड बिझनेस स्कुल मध्ये प्रवेश घेतला.

एमबीएचे शिक्षण पूर्ण करत असतानाच नवीन तिवारी यांनी भारतासाठी काहीतरी करावे असे ठरवले.

 म्हणुन आपले मास्टरचे शिक्षण पूर्ण करत असतानाच नवीन यांनी अमेरिकेत इंडिया स्कुल हाऊस नावाच्या एका एनजीओची स्थापणा केली.

ह्या एनजीओ द्वारे ते भारतातील जेवढेही सरकारी स्कुल आहेत त्यांच्यासाठी फंड गोळा करत असत.आजही हे एनजीओ ह्या क्षेत्रात काम करत आहे.

नवीन तिवारी यांना इथेच थांबायचे नव्हते त्यांना आणखी काही करायचे होते त्यातच त्यांनी त्यांचे एमबीएचे शिक्षण पूर्ण करत असताना बघीतले की जेवढेही उद्योजक व्यवसायिक आहेत ते आपल्या प्रमाणे एक सर्वसामान्य व्यक्तीच आहेत.

इथुनच त्यांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.अणि ते उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहु लागले.

एमबीएचे शिक्षण करत असताना त्यांना आपल्या सहकारींसाठी भारत भ्रमण आयोजित करण्याची संधी मिळाली.ज्यामुळे त्यांच्या इतर सहकारींना देखील भारताशी संबंधित आर्थिक संभावना, भारतीय संस्कृती, तसेच येथील सर्वसामान्य जनतेविषयी जाणुन घेण्याची संधी प्राप्त झाली.

भारतभ्रमण ट्रीप दरम्यानच नवीन तिवारी यांच्या डोक्यात मोबाईल डील्स तसेच मोबाईल सर्च संबंधित व्यवसाय करण्याची कल्पणा आली.

यानंतर त्यांनी २००७ मध्ये मुंबई मधील एका छोट्याशा फ्लॅट मध्ये रूम घेतला अणि तिथे १० कर्मचारी सोबत घेऊन एमखोज नावाची एक कंपनी सुरू केली.

इनमोबी ही कंपनी बंगलौर आधारित मोबाईल जाहीरात टेक कंपनी आहे ह्या कंपनीची सुरूवात नवीन तिवारी यांनी २००७ मध्ये केली होती.

इनमोबी आज ही गुगल ॲडमोब नंतरची जगातील दुसरी सर्वात मोठी मोबाईल जाहीरात कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

इनमोबी भारतातील पहिली युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी कशी बनली?

इनमोबी ही एक मोबाईल जाहीरात कंपनी आहे.हया कंपनीची सुरूवात मुंबई मधील एका छोट्याशा फ्लॅट मधुन झाली होती.आज ह्या कंपनीचे बाजार मुल्यांकन १५ बिलियन डॉलर्स इतके आहे.

२०११ मध्ये इनमोबी ही भारतातील पहिली युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी बनली होती.

नवीन तिवारी स्टार्ट अप प्रवासाची सुरुवात २००७ पासुन झाली होती.२००७ मध्ये नवीन तिवारी यांनी मोहीत सक्सेना,अभय हिंदवी,मोहीत गुप्ता अणि आपल्या काही कर्मचारींच्या साहाय्याने एम खोज नावाने सुरूवात केली.

सुरूवातीला ही कंपनी एस एम एस आधारीत सर्च सर्विस देण्याचे काम करत होती.पण २००९ मध्ये वाढत्या मोबाईल मार्केटची गरज त्यांच्या लक्षात आली.

आज कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर तो सर्वप्रथम मोबाईलवर सर्च करत असतो.

इथुनच नवीन तिवारी यांना मोबाईल जाहिरातीच्या क्षेत्रात करीअर करण्याची एक चांगली सुवर्णसंधी दिसुन आली.मग त्यांनी २००९ मध्ये आपल्या व्यवसायाचे नाव बदलुन इनमोबी असे ठेवले.

अणि आपल्या व्यवसायास मोबाईल जाहीरात प्लॅटफॉर्मच्या रूपात रूपांतरित केले.आपल्या व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर नवीन तिवारी यांच्या कंपनीसमोर अनेक मोठमोठी आव्हाने आली.

ज्यात सर्वात पहीले आव्हान होते आपल्या व्यवसायासाठी निधी गोळा करणे.कारण नवीन यांना आपल्या ह्या व्यवसायाचा एका मोठ्या पातळीवर विस्तार करायचा होता.

ज्यासाठी त्यांना निधीची नितांत आवश्यकता होती.पण तेव्हा भारतातील लोकांमध्ये गुंतवणूक करण्या‌विषयी एवढी जागरूकता निर्माण झाली नव्हती.

अशावेळी नवीन तिवारी यांच्याकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे परकीय गुंतवणूक दारांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी राजी करणे.

पण इथे देखील त्यांच्यासमोर एक आव्हान होते परकीय गुंतवणूक दारांना हे समजावून सांगणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते की भारतात देखील उत्तम साॅफ्टवेअरची निर्मिती होऊ शकते.

कारण त्यावेळी भारतात टेक्नॉलॉजीचा एवढा विकास झालेला नव्हता.त्यामुळे बाजारात भारतीय साॅफ्टवेअरला अधिक किंमत नव्हती.

ह्याच कारणामुळे परकीय गुंतवणूक दार देखील भारतीय साॅफ्टवेअर मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करणे टाळत असत.

पण तरी देखील नवीन तिवारी यांनी त्यांच्या कठोर मेहनत अणि अनुभवाच्या जोरावर अनेक कंपन्यांकडून निधी प्राप्त केला.

पुढे १५ डिसेंबर २०११ मध्ये इनमोबीने साॅफ्ट केबिनेलकडुन २०० मिलियन डॉलर इतकी फंडिग प्राप्त केली याचसोबत इनमोबी ही कंपनी भारतातील पहिली युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी देखील बनली.

त्यानंतर २० डिसेंबर २०२० रोजी इनमोबीने गुगलकडून १४५ मिलियन डॉलर इतकी फंडिग देखील प्राप्त केली.

इनमोबीचे बिझनेस मॉडेल –

इनमोबी एक खुप सहज सोप्या बिझनेस मॉडेलवर काम करते.जसे आपण गुगल ॲडमोब दवारे आपल्या मोबाईल ॲपला माॅनिटाईज करतो.

एकदम त्याचप्रमाणे इनमोबी ह्या प्लॅटफॉर्मवर देखील आपण आपल्या मोबाईल ॲपला माॅनिटाईज करू शकतो.

याचसोबत जसे आपण गुगल ॲडव्हरबचा वापर करून आपल्या प्रोडक्टची कंपनीची जाहीरात करतो.त्याचप्रमाणे आपल्याला इनमोबीच्या साहाय्याने देखील आपल्या कंपनीची कंपनीच्या प्रोडक्टची जाहीरात करता येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button