Blog

Licious Start up business success story in Marathi

नाॅनवेज खाण्याचे शौकीन असलेल्या व्यक्तींची पहिली पसंत म्हणून लिशीअस ओळखले जाते.हे बंगळुरू मधील एक स्टार्ट अप व्यवसाय आहे.

लिशीअस ही दोन मित्रांनी मिळून सुरू केलेली स्टार्ट अप कंपनी आहे.

2021 मध्ये ह्या स्टार्ट अप व्यवसायाला ५२ मिलियन डॉलर इतकी फंडिग देखील प्राप्त झाली होती.हयाच मोठ्या फंडिगमुळे लिशीअस कंपनीचा भारतातील युनिकाॅन क्लबच्या यादीमध्ये समावेश देखील झाला आहे.

2021 मध्ये युनिकाॅन स्टार्ट अप बनलेल्या कंपनींच्या यादीत ह्या स्टार्ट अप कंपनीचे नाव 29 व्या क्रमांकावर आहे.हया कंपनीकडून दावा केला जातो की लिशीअस ही भारतातील पहिली डायरेक्ट टु कंझ्युमर कंपनी आहे.

म्हणजे फर्म मधुन डायरेक्ट ग्राहकांपर्यंत मांस पोहोचवणारी पहिली स्टार्ट अप कंपनी आहे.जी एक बिलियन डॉलर्स क्लब मध्ये प्रवेश करत डीटुसी युनिकाॅन स्टार्ट अप बनलेली आहे 

आजच्या लेखामध्ये आपण लिशीअस ही कंपनी कशी 1 बिलियन डॉलर्स एवढे मुल्य असलेली कंपनी बनली.ह्या स्टार्ट अप व्यवसायाची संपूर्ण यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

लिशीअस कसे बनले युनिकाॅन स्टार्ट?

आज आपल्या भारत जवळपास 73 टक्के लोक हे मांसाहारी आहेत.देशभरात लोक जवळपास हजारो ब्रँडचा वापर करतात.पण इथे मांसाचे कुठलेही विशिष्ट असे ब्रँड नव्हते.भारतात मांसाचा बाजार पाहीजे तसा व्यवस्थित नव्हता.

शहरात जी काही वेगवेगळ्या प्रकारची कत्तलखाने अणि मटनची दुकाने दिसुन येत होती ती न कुठल्या ब्रँडच्या अंतर्गत येत होती ना त्यांच्यावर कुठला काॅलिटी चेक होता.

ग्राहकांच्या समोरच मांस कापुन एका काळया रंगाच्या पिशवीत कापलेले मांस टाकुन त्यांच्या स्वाधीन केले जात होते.

कित्येक ग्राहकांना मटणाच्या काॅलिटीचा चांगला अनुभव मिळत नव्हता.तरी देखील बाजारात दुसरे कोणतेही चांगले दुकान उपलब्ध नसल्याने ईच्छा नसताना देखील त्या मटणाच्या दुकानातुनच मांस खरेदी करावे लागत असे.

ग्राहकांना मटण खरेदी करताना सामोरे जावे लागत असलेली ही समस्या दोन मित्रांच्या लक्षात आली.

तेव्हा मटण खरेदी करत असलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या ह्या मुख्य समस्येला दुर करण्याची जबाबदारी ह्या अभय हजुरा अणि विवेक गुप्ता दोन्ही मित्रांनी आपल्या अंगावर घेतली. 

ह्या दोघांचे असे मत होते की ह्या क्षेत्रात काम केले जाऊ शकते अणि पुढे जाऊन ह्या क्षेत्रात ते एक मोठा व्यवसाय स्थापित करू शकतात.

तसे पाहायला गेले तर सुरूवातीला मटणाच्या ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी विवेक गुप्ता तयार नव्हते.कारण विवेक एका अशा कुटुंबातील व्यक्ती होते जिथे कोणीही मांसाहारी आहाराचे सेवन करत नव्हते.स्वता विवेक देखील मांसाहार करत नव्हते.

पुढे विवेक जेव्हा नोकरीसाठी अमेरिकेला गेले तेव्हा तिथे त्यांनी मांसाहाराचे सेवण करण्यास सुरुवात केली होती.

अशा परिस्थितीत त्यांचे मत होते की ते असे कुठलेही काम करू शकणार नाहीत अणि अशा कामाला त्यांचे कुटुंब देखील मान्य करणार नाही.

याचसोबत विवेक यांना असे देखील वाटत होते की खरच ह्या क्षेत्रात काम केले जाऊ शकते मग आतापर्यंत ह्या क्षेत्रात इतर कोणी काम का नाही केले?

पण नंतर त्यांनी देखील ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी आपली सहमती दर्शवली.

एकेदिवशी अभय अणि विवेक दुपारचे जेवण करत असताना व्यवसाय कल्पणेवर चर्चा करत होते.हाॅटेलात जेवणासाठी गेल्यावर त्यांच्या जेवणात जे मटण आले होते त्याची गुणवत्ता खूप खराब होती.

तेव्हा विवेक गुप्ता म्हणाले की आपल्याला ह्या बाजारात काही वेगळे करायचे असेल तर ह्या मेलेल्या चिकन मध्ये जीव निर्माण करावा लागेल.म्हणजे लोक खात असलेल्या चिकनच्या काॅलिटी मध्ये सुधारणा घडवून आणावी लागेल.

इथूनच दोघांनी लिशिअस ह्या स्टार्ट अप व्यवसायाअंतर्गत लोकांना उत्तम दर्जाचे चिकन उपलब्ध देण्याचा निर्णय घेतला.यासाठी ते सर्व काही करायला तयार होते जे करणे आवश्यक आहे.

मग २०१५ मध्ये विवेक अणि अभय यांनी बंगळूर येथे आपल्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली.त्यांनी आपल्या ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे नाव लिशिअस असे ठेवले ज्यात delicious मधुन डीई काढुन टाकण्यात आला.

अणि ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे नाव लिशिअस असे ठेवण्यात आले होते.लिशिअस ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट होते.

ग्राहकांना अशा गुणवत्ताहीन मांसाची विक्री अजिबात करायची नाही जे आपण स्वता खाऊ शकत नाही.त्यांना उत्तम दर्जाचेच मटण खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायचे.

तब्बल सहा सात वर्षे कंपनींने ह्याच मिशनवर लक्ष केंद्रित करत काम केले ज्यामुळे आज लिशिअस ही एक युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी बनली आहे.

लिशीअस ह्या कंपनीचे बिझनेस मॉडेल फर्म टु फोर्क आहे.म्हणजे मांस फर्म मधुन डायरेक्ट ग्राहकाच्या थाळीमध्ये जायला हवे.

लिशीअस कंपनी सर्व पुरवठा साखळीला स्वता हाताळते.यानंतर त्यावर प्रक्रिया करणे त्याचे स्टोरेज करणे अणि पॅकींग करून ते ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम देखील लिशीअस कंपनी स्वता करते.

कंपनीने त्यांचे प्रोसेसिंग अणि पॅकेजिंग युनिटस बसवले आहेत.यामुळे ग्राहकांपर्यंत जे मांस पोहोचविण्यात येते ते एकदम स्वच्छ अणि दर्जेदार स्वरूपाचे असते.हे मांस ग्राहकांसाठी वैज्ञानिक पद्धतीने पॅक करण्यात येते.

कंपनीकडून असा दावा करण्यात येतो की ग्राहकाने आॅडर केल्यानंतर फक्त ९० ते १२० मिनिटांच्या आत पॅकेजची डिलीव्हरी करण्यात येते.

लिशीअस कंपनीकडुन ग्राहकांना चिकन,मटण, सी फुड अन्न,मासे इत्यादींची व्हरायटी उपलब्ध करून दिली जाते.

कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टवर १५० काॅलिटी चेक असतात.

लोकांना उत्तम दर्जाचे मांस उपलब्ध करून देण्याच्या एका छोट्याशा विचाराने सुरू करण्यात आलेल्या ह्या स्टार्ट अप व्यवसाय कंपनीची कमाई आज ५२ मिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे.

आज लिशिअस कंपनी १६ शहरांमध्ये काम करत आहे.लिशीअसचे ३०० पेक्षा अधिक स्टोअर युनिट देखील आहेत.१०० पेक्षा जास्त त्यांचे डिलिव्हरी चॅनल्स आहेत जिथुन लिशीअस लोकांच्या घरापर्यंत मांस पुरवठा करते.

लिशीअस कंपनीकडे आज पाच हजार पेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.२० लाखापेक्षा अधिक जेवणाचे आॅडर दर महिन्याला लिशीअसकडे प्राप्त होतात.

लिशीअसचे बिझनेस मॉडेल –

लिशीअस ही स्टार्ट अप कंपनी पशुधन शेतकरी अणि मच्छीमार यांच्याशी चिकन तसेच मासे घेण्यासाठी संपर्क साधते.

सर्व प्रक्रियेत पशुधन शेतकरी यांना जी आर्थिक गरज असते ती सर्व लिशीअसकडुन उपलब्ध करून देण्यात येते.तसेच लिशीअसकडुन प्रशिक्षित डॉक्टर देखील पशुधन शेतकरी मच्छीमार यांच्याकडे प्रशिक्षण देण्यासाठी पाठविण्यात येतात.

यानंतर सर्व मांस शेतकरीकडुन प्राप्त करत कंपनीच्या प्रोसेसिंग युनिट मध्ये आणण्यात येते.प्रोसेसिंग युनिटपर्यत आणण्यासाठी ज्या ट्कचा वापर केला जातो ते रेफ्रीजरेटर अणि तापमान नियंत्रित असतात.

मांसाला कंपनीच्या स्टोअर किपिंग युनिट मध्ये आणल्यानंतर यांची टीम रिसर्च करत असते की त्या प्रोडक्ट मध्ये सुरक्षा मानदंडाचा वापर करण्यात आला आहे किंवा नाही.

यानंतर त्याला कोल्ड स्टोरेज मध्ये नियंत्रित तापमानामध्ये ठेवण्यात येते.यानंतर यांचे स्वताचे प्रशिक्षित कसाई असतात जे स्वता मांस कापत असतात.

ह्या कंपनीचे सर्व मांस कापण्यासाठी ठेवलेल्या कसाईंना पुर्णपणे प्रशिक्षित केले गेले असते मांस कापताना कशा प्रकारे त्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी हे देखील त्यांना शिकवलेले असते.

मांस कापुन झाल्यानंतर त्याला एका सफेद पॅकेट मध्ये पॅक केले जाते.अणि डिलिव्हरी करण्याच्या ठिकाणी पाठविण्यात येते.

लिशीअस कंपनीकडे एक डेटा टीम देखील उपलब्ध आहे जी डेटा सायन्सच्या मदतीने पुढील येणारया दिवसात मांसाची मागणी किती वाढणार आहे याचे विश्लेषण करत असते.

याने त्यांना आपल्या प्रोडक्टचे वेस्टेज रोखण्यास मदत होते.सुरूवातीला कंपनीचे प्रोडक्ट ३० टक्के इतके वाया जात होते जे आता ३ टक्के एवढे झाले आहे.

जेव्हा एखादा ग्राहक यांच्या वेबसाईटवर येतो तेव्हा तो कोणकोणत्या गोष्टी स्क्रोल करतो आहे?अणि कार्ट मध्ये कोणकोणते प्रोडक्ट समाविष्ट करतो आहे.

ह्या सर्व बाबींच्या मदतीने कंपनीच्या डेटा रिसर्च मध्ये सर्वात जास्त स्पष्टीकरण प्राप्त होते.याने भविष्यात प्रोडक्टची मागणी किती वाढणार आहे हे समजून घेण्यास त्यांना मदत होते.

अणि ग्राहक जेव्हा कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन मांसाहारी जेवणाची आॅडर करतात तेव्हा लिशीअसचे जवळपास असलेल्या डिलिव्हरी स्टेशन मध्ये ही आॅडर जाते.

मग त्या आॅडरला व्यवस्थित पॅक करून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते.

लिशीअस कंपनी एकुण तीन माॅडेलवर काम करते 

2 hours delivery 

6 hours delivery 

12 hours delivery – यात ग्राहकाला एक रात्र अगोदर आॅडर केल्यास सकाळी घरपोच आॅडर पोहोचवली जाते.

याचसोबत कंपनीने ग्राहकांचा प्रतिसाद जाणुन घेण्यासाठी उत्तम प्रणाली तयार केली आहे.

आपल्या सेवेविषयी ग्राहकांचा प्रतिसाद जाणुन घेण्यासाठी कंपनीने काॅल सेंटर, फिडबॅक फाॅम,मेसेज रेटिंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सर्वांच्या साहाय्याने लिशीअस आपल्या ग्राहकांचा प्रतिसाद प्राप्त करत असते.म्हणजे कंपनीकडुन जे चिकन मटण मासे ग्राहकांना सर्व करण्यात येत आहेत त्यांची गुणवत्ता कशी आहे?

याने कंपनीला आपल्या सर्विस मध्ये आपणास कोणती सुधारणा करायची आहे हे समजण्यास मदत होते.

सर्व प्रक्रियेत ज्या बर्फाचा वापर केला जातो तो बर्फ देखील कंपनीकडुन बनविण्यात आलेला असतो. प्रक्रियेत वापरण्यात आलेली प्रत्येक वस्तू स्वता लिशीअस कंपनीकडुन बनविण्यात आलेली असते.

जेणेकरून त्यांना आपल्या ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा पुरवता येते.लिशीअस भारताचे पहिले स्टार्ट अप आहे ज्याला FSC 2002 दवारे सर्टिफाईड करण्यात आले आहे.

लिशीअसची मार्केटिंग स्ट्रॅटेजी –

लिशीअस कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी देखील युनिक आहे.लिशीअसला आपल्या ग्राहकांची मानसिकता कळते की एखाद्या ग्राहकाने त्यांच्याकडुन दोन किंवा तीन वेळा आॅडर स्वीकार केली.

तर तो ग्राहक स्वता कंपनीसोबत जोडला जातो.कारण लिशीअस कंपनी आपल्या ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट सर्विस द्वारे बेस्ट काॅलिटी प्रदान करते.

याचमुळे लिशीअस कडुन जेवण आॅडर केलेल्या ग्राहकांपैकी ९० टक्के ग्राहक इथे पुन्हा आॅडर करत असतात.

याचकरीता लिशीअस त्यांच्या आॅडरवर ग्राहकांना मोठमोठ्या आॅफर प्रदान करते.जसे की ग्राहकांना ५० टक्के सवलत देणे, प्रत्येक आॅडरवर ग्राहकाला काहीतरी फ्री देणे इत्यादी.

यामुळे नवनवीन ग्राहक लिशीअस सोबत जोडले जातात.कंपनीने आपल्या ब्रँड व्हॅल्यू मध्ये वाढ करण्यासाठी अनिल कपुर, अर्जुन कपुर सारख्या सेलिब्रिटींना देखील हायर केले होते.

ह्या दोघांनी लिशिअस वर एक जाहीरात केली होती जी खुपच प्रसिद्ध झाली होती.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button