Blog

लुईस विटोन बॅगची यशोगाथा Louis Vuitton bags success story in Marathi

लुईस विटोन बॅगची यशोगाथा Louis Vuitton bags success story in Marathi

लुईस विटोन बॅगची सुरूवात एका अनाथ मुलाने केली होती.लुईस विटोन नावाचा तेरा वर्षीय मुलगा १८३५ मध्ये आपल्या सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून साडेचारशे किलोमीटर इतका पायी प्रवास करत घरातुन पळुन जातो.

तेव्हा औद्योगिक क्रांतीचा काळ होता.अणि त्याचवेळी रेल्वे प्रवासाला देखील खुपच प्रसिद्धी मिळत होती.तेव्हा लुईस विटोन याने रिच इलिट करीता लगेज पॅकिंग करण्याचे काम सुरू केले.

बाजारातील संधी बघुन त्यांनी स्वताचा एक ट्रंकचा व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय खुप प्रसिद्ध देखील झाला.

पण १८७० मधील युद्धामुळे लुईस विटोन यांना एका रात्रीत स्वताचा उद्योग व्यवसाय सोडून जावे लागले.अणि थोडे दिवस एका आश्रय शिबिरात राहावे लागले होते.

पण लुईस यांनी हार न मानता युद्ध संपुष्टात आल्यानंतर पुन्हा आपला ट्रंकचा व्यवसाय नव्याने सुरू केला.ट्रंकच्या विशषतेमुळे त्यांच्या व्यवसायाला पुन्हा गती मिळाली.

आज लुईस विटोन यांच्या कंपनीकडे बलगेरी,डिओर,फेन्डी,जिवेची इत्यादी सारख्या महागड्या ब्रँडची मालकी असलेली पाहायला मिळते.

आजच्या लेखामध्ये आपण लुई विटाॅन बॅगची संपूर्ण यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

एकेकाळी स्वताचे घर नसलेला एक अनाथ मुलगा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला?how a homeless kids become the richest man in world 

लुईस विटोन हा एक महागडा फ्रेंच फॅशन ब्रँड आहे.जो हाय एंड बॅग,लगेज,कपडे,बुट परफ्यूम इत्यादी बनविण्याचे काम करतो.

ह्या ब्रँडची सुरूवात १८५४ मध्ये लुईस विटोन यांनी पॅरीस मध्ये केली होती.लुईस विटाॅन हे त्यांच्या सिग्नेचर मोनोग्राम कॅनव्हास अणि प्रिमियम शिल्प कौशल्याकरीता अधिकतम ओळखले जातात.

लुईस विटाॅनचा लोगो एलवी आज संपूर्ण जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहे.आज हा ब्रँड विलासी अणि शानदार जीवण शैलीचे स्टेटस म्हणून देखील ओळखला जातो.

लुई विटाॅनची प्रत्येक बॅग पाच हजार पेक्षा अधिक वेळा उघडुन बंद केली जाते.फक्त त्या बॅगची चैन तसेच हुक मजबुत आहे किंवा नाही हे तपासून बघण्यासाठी.

लुई विटाॅनची प्रत्येक बॅग तयार करण्याची प्रक्रिया खुप गहन आहे त्यामुळे एकाच वेळी २० ते २५ कारागिर बसुन ह्या बॅग बनविण्याचे काम केले जाते.

यामुळे लुई विटाॅनदवारे बनविण्यात आलेली प्रत्येक बॅग हाताने बनविण्यात आलेली असते.हया बॅग बनविण्यासाठी शिलाई मशिन व्यतिरीक्त इतर कुठलेही मोठे मशीन वापरण्यात येत नाही.

आपल्या कंपनीतील बॅगच्या निर्मितीसाठी एवढी मोठी प्रक्रिया पार पाडणे त्यासाठी लागणारा खर्च करणे हे बाजारातील कुठल्याही छोट्या मोठ्या कंपनींसाठी शक्य नाहीये.

लुई विटाॅन ही आज एकमेव ६४ बिलियन क्युरोची लक्झरीयस ब्रँड कंपनी आहे.आज बाजारातील ही एवढी मोठी कंपनी अशा एका व्यक्तीने उभी केली आहे.

ज्याच्याकडे एकवेळ राहण्यासाठी हक्काचा निवारा नव्हता खाण्यासाठी पुरेसे अन्न घेण्याकरीता पैसे नव्हते.

ह्या कथेची सुरुवात तिथुन होते जेव्हा १३ वर्षीय लुई विटाॅन नावाचा एक मुलगा त्याच्या सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून साडेचारशे किलोमीटर इतक्या दूर अंतरावर चालत जातो.

चालत चालत तो ४६९ किलोमीटर एवढे अंतर पार करून पॅरिस येथे पोहोचतो.हा एवढा मोठा रस्त्याचा पल्ला पार करण्यासाठी लुई विटाॅन यांना तब्बल दोन वर्ष इतका कालावधी लागला होता.

आपल्या ह्या दोन वर्षांच्या पायी प्रवासात जागोजागी मुक्काम करताना लुईने वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव प्राप्त केला.

तसेच आपल्या ह्या पायी प्रवासात त्याने स्वताला वेगवेगळ्या कला कौशल्यात पारंगत बनविण्याचा प्रयत्न देखील केला होता.कधी लुईने हाॅटेल मधील किचनमध्ये हेल्पर तर कधी वेटर म्हणून देखील काम केले.

आपल्या ह्या पायी प्रवासातील सर्व अनुभवांना प्राप्त करून जेव्हा लुई विटाॅन पॅरिस येथे पोहोचले तेव्हा तिथे औद्योगिक क्रांती सुरू होती.

पॅरीस मध्ये वास्तव्यास असताना लुईला एक गोष्ट लक्षात आली की रेल्वेचा प्रवास हा आता दिवसेंदिवस अधिक प्रसिद्ध होत आहे.

म्हणून त्यांनी त्वरीत रिच एलिट करीता एक प्रोफेशनल लगेज पॅकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

इथे काम करत असताना लुई विटाॅन यांच्या निदर्शनास आले की बाजारात लगेज पॅकिंग तसेच बाॅक्सचा व्यवसाय खुप जोराने चालत आहे.

हे सर्व बघुन लुईने बाजारात असलेली भविष्यातील संधी ओळखत एका कौशल्य सामान कारागिराच्या हाताखाली काम करून ते काम शिकुन घेण्यास सुरुवात केली.

कौशल्य सामान कारागिराच्या हाताखाली काम करत असताना काम शिकण्याच्या निमित्ताने लुई विटाॅन यांनी लगेज बॅगला जवळुन समजुन घेण्यास सुरुवात केली.

लुई विटाॅन यांना तेव्हाच बाजारात एक मोठा गॅप दिसुन आला.त्यावेळी बाजारात फक्त वुडन अणि आयर्न फ्रेम असलेले जड बाॅक्स उपलब्ध होते.

ज्यांचा आकार देखील अव्यवहार्य होता.ज्यामुळे सामान भरताना यात जास्त जागेची आवश्यकता भासत होती.

बाजारातील हीच एक मोठी समस्या दुर करण्यासाठी लुई विटाॅन यांनी स्वताचे एक शाॅप उघडले अणि बाजारातील ग्राहकांसाठी एक नवीन प्रकारच्या लगेज बॅग बनविण्यास सुरुवात केली.

लुई विटाॅन यांनी सर्वप्रथम बॅग बनविण्यासाठी वुडन तसेच प्राण्यांच्या कातडीचा जागी कॅनव्हासचा वापर करणे सुरू केले.याने बाॅक्स घट्ट अणि टिकाऊ बनले.

बॅगचा आकार हा अधिकतम भौमौतिक ठेवला.जेणेकरून जास्तीत जास्त बॅग्ज एकाच ठिकाणी ठेवता येतील.ही एक नवी संकल्पना बाजारातील खूप मोठी गेमचेंजर ठरली.

१८५८ मध्ये ह्या एका छोट्याशा संशोधनाद्वारे लुई विटाॅन यांनी ट्रॅव्हल जगतात एक मोठी क्रांती घडवून आणली होती.अणि हा तो काळ वाहतुकीला सुरूवात झाली होती.

युद्ध तसेच राजकीय कारणांकरीता लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या सामानासोबत प्रवास करण्यास सुरुवात केली होती.

त्याचदरम्यान लुई विटाॅन यांनी बाजारात आपल्या सामानाच्या बॅगा आणुन आपल्या उद्योग व्यवसायास प्रारंभ केला होता.

दुसरीकडे अनेक कुटुंबांना युद्धामुळे आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागत होते.लोकांना युदधादरम्यान हे देखील समजले की आपले भविष्य अप्रत्याशित असणार आहे.

त्यामुळे लोक आपल्या भविष्याच्या योजने संदर्भात गंभीर होऊ लागले होते.

लुई विटाॅन यांच्याद्वारे बनविण्यात आलेले बाॅक्स एवढे परिपुर्ण होते की नोपोलियन तिसरा यांची पत्नी इंप्रेस यूजिनी यांनी लुई यांना त्यांचा वैयक्तिक बाॅक्स मेकर म्हणून कामाला ठेवुन घेतले.

लुई विटाॅन यांचे नशिब खरया अर्थाने तेव्हा चमकण्यास सुरुवात झाली होती जेव्हा पॅरीसची इंप्रेस यूजिनी स्वीस कॅनालच्या ओपनिंग मध्ये उपस्थित राहण्यासाठी लुईने बनवलेले बाॅक्स घेऊन गेली होती.

इथूनच लुई विटाॅन यांच्या बॅकला आंतरराष्ट्रीय बाजारात महत्व प्राप्त झाले.

तेथील कार्यक्रमात आलेल्या रशियन इजिप्तीशियन अणि स्पॅनिश इलिटस एकाच वेळी लुईचे कायमस्वरूपी ग्राहक बनले.पण हे लुई विटाॅन यांचे खुप छोटे यश होते.

पुढे १८७० मध्ये फ्रॅको पर्शियन युदधादरम्यान लुई विटाॅन यांना आपल्या कुटुंबासमवेत एका रात्रीत फ्रान्स मधुन पलायन करावे लागले होते.

एवढे नाव कमविल्यानंतर लुई विटाॅन अणि त्यांच्या कुटुंबीयांवर एक वेळ अशी आली की लुई अणि त्यांचे संपूर्ण कुटुंब एका आश्रय शिबिरात निवारा उपलब्ध नसल्याने उपासमार करत काही काळासाठी वास्तव्यात होते.

काही कालावधीनंतर युद्ध संपुष्टात आले पण लुई विटाॅन अणि त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी कमी झाल्या नाहीत.

शेवटी जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या घरातील सामाना समवेत वर्क शाॅप मधील सर्व महत्वाचे सामान चोरी झाले आहे.

यामुळे लुई विटाॅन यांनी जिथुन आपल्या कामाची सुरूवात केली होती पुन्हा ते त्याच स्थितीत आले होते.

पण लुई विटाॅन आता यांच्याकडे आधीपेक्षा जास्त प्रमाणात कामाचा अनुभव देखील होता.अणि लुई विटाॅन यांना माहीत होते की त्यांच्या युनिक इनोव्हेश मुळे त्यांच्या बॅगला सर्वाधिक पसंती प्राप्त झाली होती.

याचकरीता आपल्या त्याच जुन्या यशाला गवसणी घालण्यासाठी लुई विटाॅन यांनी अजुन एक इनोव्हेटिव्ह आयडिया अंमलात आणली.

यावेळी लुई विटाॅन यांनी लगेज अणि बॅगवर रेड अणि पेज कलर असलेल्या पट्टी बनविण्यास सुरुवात केली याने ग्राहकाला आपले सामान रेल्वे मध्ये टाकत असताना तसेच खाली उतरवत असताना ते त्यांचेच सामान आहे हे लक्ष्यात येण्यास फायदेशीर ठरले.

याने ट्रेन मधील पॅसेंजरला आपले सामान ओळखणे सोयीस्कर झालेच शिवाय त्यांना एक ब्रॅडचा वापर करत असल्याचा अनुभव देखील प्राप्त होत असे.

यामुळे थोड्याच दिवसात लुई विटाॅनच्या बॅगने पुन्हा एकदा बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.पण एकेदिवशी लुई विटाॅन यांचे आकस्मिक निधन झाले.

यानंतर लुई विटाॅन यांच्या सर्व व्यवसायाची धुरा त्यांचे पुत्र जाॅर्ज विटाॅन यांच्या हातात आली.

जाॅर्ज विटाॅन यांनी देखील एल व्हीच्या बॅगला एका नवीन पद्धतीने इनोव्हेट केले अणि बॅगवर असे एक लाॅक तयार केले ज्याला हॅरी हाॅडी यांनी देखील तोडण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

त्यावेळी बाजारातील ग्राहकांची सर्वात महत्वाची समस्या आपल्या लगेज मधुन सामान चोरीला जाण्याची होती ह्याच समस्येला लक्षात घेऊन जाॅर्ज यांनी लगेज बॅगसाठी असे एक कुलूप बनवले जे कोणीही तोडु किंवा उघडु शकत नव्हते.

यामुळे लुई विटाॅनने बाजारात पुन्हा एकदा जोराने मुसंडी मारली.कालांतराने ग्राहकांचा लुई विटाॅन वरील विश्वास अधिक वाढत गेला अणि लुई विटाॅनचे स्टोअर्स संपूर्ण यूरोपात उघडण्यास सुरूवात झाली.

याचदरम्यान जाॅर्ज विटाॅन यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कंपनीला त्यांचा प्रसिद्ध एलवी मोनोग्राम तसेच फ्लाॅरेल पॅटर्न देखील दिला.

यावरून आपणास एक गोष्ट लक्षात येते की लुई विटाॅन ही कंपनी आधीपासूनच खुप इनोव्हेटिव्ह होती.ज्यामुळे कंपनी यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे.

आज बाजारात अनेक यशस्वी लक्झरी ब्रँड उपलब्ध आहेत तरी देखील ग्राहकांचे लक्ष त्या ब्रँडकडे जात नाही तसेच बाजारात लुई विटाॅन आजही फॅशनेबल लक्झरीयस ब्रँड मध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

कारण लुई विटाॅन आपल्या बाजारातील वेगळेपणावर अधिक भर देते.

एलवी आपल्या उत्पादनासाठी कमी पैसे घेऊन काम करत असलेल्या भारतीय कामगारांची नियुक्ती करत नाही यांची पुर्ण उत्पादन प्रक्रिया फ्रान्स मध्येच कुशल कर्मचारींच्या हस्ते पार पाडली जाते.

याने कंपनीला आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता ग्राहकांचा विश्वास देखील संपादीत करता येतो.

एलवी कंपनीच्या लीगल टीममध्ये एकुण ६० वकील आहेत.अणि एलवी कंपनी दरवर्षी १६ मिलियन डॉलर्स इतका खर्च बाजारातील फेक एलवी प्रोडक्टची निर्मिती करत असलेल्या व्यक्तींवर,कंपनींवर कारवाई करण्यासाठी करते.

एलवी कंपनीकडून गुणवत्तेचे अधिक प्रमाणात नियमन केले जाते.कंपनी आपल्या ब्रॅडला सर्वाधिक उत्तम ठेवण्याचे काम करते.

कोरोनाच्या काळात जेव्हा लोक आपल्या घराबाहेर पडत नव्हते.जीव जाण्याच्या भीतीने जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी देखील घराबाहेर पडत नव्हते.

तेव्हा एलवीने आपल्या ग्राहकांसाठी बाजारात एक नवीन संकल्पना अस्तित्वात आणली.ज्यात ग्राहकांना फक्त अपाॅईटमेंट घ्यावी लागत असे त्यानंतर ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तुंने भरलेली कार त्यांच्या घरासमोर उभी राहत असे.

यात ग्राहकांना घरबसल्या स्टोअर मध्ये खरेदी करत असल्याचा अनुभव प्राप्त होत असे.

एलवी कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टचे एक सेल्स टार्गेट असते जे पुर्ण झाल्यानंतर एलवी कंपनी त्या प्रोडक्टची विक्री करणे बंद करते.

उरलेले हे सर्व प्रोडक्ट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना भेट म्हणून वितरीत केले जातात किंवा त्यांना जाळुन टाकण्यात येते.पण पुन्हा त्याची विक्री केली जात नाही.

पण आज एलवी कंपनीच्या ह्या व्यवसायाला विटाॅन कुटुंबातील कोणी व्यक्ती नव्हे तर एक बाहेरील व्यक्ती चालवत आहे.

कारण १९८० मध्ये एलवी कंपनीची सुत्रे विटाॅन कुटुंबाकडून काढुन घेत एका बाहेरील व्यक्तीच्या हातात देण्यात आली होती.आज यांच्या एका हालचालीने एलवी कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे.

जाॅर्ज विटाॅन यांची एकुण तीन नातवंडे होती.या तिन्हींचे कंपनीच्या बाबतीत वेगवेगळे दृष्टिकोन वेगवेगळ्या प्रकारचे होते.यामुळे तिघांमध्ये नेहमी मतभेद होत असत.

म्हणून ह्या तिघांचे भाऊ हेन्री रिकेमर यांनी कंपनीला सांभाळण्याचे ठरवले.

जेव्हा हेन्री रिकेमर यांनी एलवी कंपनीच्या वितरण प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की रिटेलर्स बॅगची शंभर टक्के नफ्यावर विक्री करत आहेत.

म्हणजे बाजारात ते एक लाखाची बॅग दोन लाखाला विकत होते.अणि मॅन्युफॅक्चरींग कंपनीला याचा कुठलाही हिस्सा मिळत नव्हता.

एलवी कंपनीच्या नफ्याची टक्केवारी ही रिटेलर्सच्या नफ्याच्या टक्केवारीच्या तुलनेत खुप कमी होती.

मग त्यांनी बाजारात लगेच आपल्या एका नवीन स्ट्रॅटेजीचा वापर केला.

कंपनीने सर्व कच्चा माल आणण्यापासून ग्राहकांना प्रोडक्ट पोहोचवणे इत्यादी पुर्ण प्रक्रिया आपल्या स्वताच्या हातात घेतली.यामुळे एलवी मध्ये मध्यस्थी तसेच रिटेलर्स यांचा संबंध राहीला नाही.

ज्यामुळे रिटेलर्सच्या प्राॅफिट मार्जिन मध्ये फक्त १० ते १५ टक्केच वाढ झाली अणि कंपनीच्या नफ्यात तब्बल ४० टक्के इतकी वाढ घडुन आली.याचसोबत कंपनीच्या प्रोडक्टचे गुणवत्ता नियंत्रण देखील पुर्णतः त्यांच्या हातात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button