Blog

मान्यवर ह्या व्यवसायाची यशोगाथा Manyavar success story in Marathi 

मान्यवर ह्या व्यवसायाची यशोगाथा Manyavar success story in Marathi 

रवी मोदी नावाच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील छोट्याशा व्यापारीने फक्त १० हजार रुपये इतके भांडवल जवळ असताना देखील कपडयांचे दुकान सुरू केले.

अणि त्याच छोट्याशा दुकानाला २३ वर्षात त्याने ३० हजार करोडचा ब्रँड बनविले आहे.

आज ह्या ब्रँडचे ६०० भारतीय अणि १२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्टोअर आहेत.अणि वर्षाला चाळीस लाखापेक्षा अधिक पीस आज तो विकत आहे.

मान्यवर ह्या दुकानाचे मालक रवी मोदी यांचा त्यांच्या वडिलांसोबत फक्त २० हजार रुपये वरून एक छोटासा वाद झाला.यानंतर रागात वडिलांचे दुकान सोडुन त्यांनी बाजारात स्वताचे एक वेगळे दुकान सुरू केले होते.

अणि आज त्यांच्या ह्याच व्यवसायाचे एकुण नेटवर्थ २० हजार करोड इतके आहे.आज रवी मोदी हे आपल्या भारत देशातील ५० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

आज त्यांनी बॅकेकडुन कोणतेही कर्ज न घेता, बाजारातील इतर कंपन्यांकडुन कुठलीही फंडिंग वगैरे प्राप्त न करता स्वताच्या मेहनतीच्या अणि व्यवसाय ज्ञानाच्या बळावर हे सर्व करून दाखवले आहे.

आजच्या लेखामध्ये आपण रवि मोदी यांच्या मान्यवर ह्या व्यवसायाची संपूर्ण यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

एक सर्वसामान्य कपड्यांच्या व्यापारीने बाजारात ३० हजार करोडचा ब्रँड कसा उभा केला?

रवि मोदी यांच्या वडिलांचे कोलकत्ता येथे १४० स्वेअर फुट एवढे कपडयांचे छोटेसे एक दुकान होते.

व्यावसायिक घराण्यातील मुलांना कमी वयातच आपल्या उद्योग व्यवसायात समाविष्ट केले जाते.रवी मोदी यांनी देखील फक्त १३ वर्षाचे असताना वडिलांच्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात जाणे सुरू केले.

रवी मोदी रोज शाळा सुटल्यावर वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात कामाला जात.अणि एवढेच नव्हे तर शनिवारी रविवारी देखील सुट्टीच्या दिवशी ते दुकानात जात असत.

वडिलांनी सुरू केलेल्या कपड्यांच्या दुकानात त्यांनी ९ वर्षे काम केले.अणि सेल्स विषयी अत्यंत बारकाईने करत त्यातील सर्व महत्वाच्या गोष्टी शिकुन घेतल्या.

रवी मोदी यांचे मत होते की दुकानात एखादा ग्राहक कपडे खरेदी करण्यासाठी आला अणि आपण त्याला एकच शर्टची विक्री केली.तर अशा वेळी आपण फक्त पोस्टमन सारखे काम करतो.

आपल्या दुकानात एक कपडा खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीस आपणास तीन शर्ट विकता आले पाहिजे तेव्हाच आपण एक चांगला सेल्समन ठरतो.

यालाच क्राॅस सेल अपसेल असे देखील म्हणतात.ज्यात एखादा ग्राहक शर्ट खरेदी करण्यासाठी आला तर शर्ट सोबत पॅन्ट देखील विकणे.

अणि जिथे एखादा ग्राहक आपल्या दुकानात एक शर्ट खरेदी करण्यासाठी येतो तिथे आपण त्याला दोन शर्ट विकले त्याला अपसेल असे म्हणतात.अणि ही गोष्ट रवी मोदी कुठलेही पुस्तक वाचुन नव्हे तर आपल्या वैयक्तिक अनुभवातुन शिकले होते.

रवी मोदी आपल्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात काम करत होते पण सेल्स बाबद रवी मोदी यांचे वेगळे विचार होते अणि त्यांच्या वडिलांचे वेगळे विचार होते.

रवी मोदी आपल्या वडिलांना म्हणाले तुम्ही दुकानात पॅन्ट शर्ट जिन्स वगैरे ठेवतातच ना मग कुर्ता पायजमा देखील दुकानात विक्रीसाठी ठेवत जा.

त्यावर त्यांचे वडील म्हणाले असे नाही होत अणि तु मला उद्योग व्यवसाय कसा करायचा शिकवू नकोस मी ह्या क्षेत्रात खुप जुना आहे.मी कित्येक वर्षांपासून ह्या व्यवसायात आहे.

त्यावर रवी मोदी म्हणाले ठिक आहे जशी तुमची मर्जी.

पण एकदा रवी मोदी यांचे वडिल सात आठ दिवसांसाठी बाहेरगावी गेले.त्याच वेळी वडिलांच्या नकळत रवी मोदी यांनी दुकानात शंभर कुर्ते विक्रीसाठी मागवून घेतले.

पण जेव्हा रवी मोदी यांचे वडिल बाहेरगावाहून सात दिवसांनी परत येतात अणि त्यांच्या लक्षात ही गोष्ट येते तेव्हा त्यांचे वडील त्यांच्यावर खुप चिडतात.

पण जेव्हा त्यांना कळते की ह्या सात दिवसात त्यांनी १०० पैकी ८० कुडत्यांची विक्री केली तेव्हा त्यांचा राग थोडा शांत होतो.

पण रवी मोदी यांचे वडिल त्यांना सक्त ताकीद देतात पुन्हा माझ्या गैरहजेरीत माझ्या नकळत असे कुठलेही काम करू नको.

पण रवी मोदी हे हाडाचे व्यावसायिक होते.त्यांना आपल्या उद्योग व्यवसायात नेहमी काहीतरी नवीन प्रयोग करण्याची सवय होती.

रवी मोदी जेव्हा दुकानात स्वताच्या मर्जीने एखादा निर्णय घेऊन नवनवीन प्रयोग करायचे.तेव्हा त्यांचे त्यांच्या वडिलांसोबत भांडण होत असे.

एकेदिवशी रवी मोदी यांच्या वडिलांनी त्यांना खूप सुनावले की तुझ्या ह्या वागण्यामुळे एखाद्या दिवशी मला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल.अणि तुझ्या ह्या वागण्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ देखील येईल.

रवी मोदी यांच्या मनाला आपल्या वडिलांचे हे कडु शब्द खुप लागले त्यांना वाटले आपण दुकानात फक्त २० हजाराचा छोटासा व्यवहार केला तरी आपल्या वडिलांनी आपल्याला किती सुनावले.

मग त्यांनी रागाच्या भरात वडिलांनी म्हटले मी उद्यापासून कधीच तुमच्या दुकानात येणार नाही असे बोलत ते आपल्या आईकडे गेले अणि त्यांनी आईकडे १० हजाराची मागणी केली.

ते आपल्या आईला म्हणाले आई मला माझ्या हिशोबाने व्यवसाय करायचा आहे वडिलांची व्यवसाय करण्याची पद्धत मला अजिबात पटत नाही.

मग आईने त्यांना १० हजार रुपये स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले.अणि त्याच पैशात त्यांनी स्वताचे एक नवीन दुकान सुरू केले.त्या दुकानाचे नाव वेदांत फॅशन असे होते.

रवी मोदी यांचे लग्न २१ वर्षाचे असताना झाले अणि २२ वर्षाचे असताना त्यांना एक अपत्य देखील झाले होते.ज्याचे नाव वेदांत असे ठेवले.

मग लग्न झाल्यानंतर रवी मोदी यांनी त्यांच्या मुलाच्याच नावावर आपले दुकान सुरू केले होते.

रवी मोदी यांच्या दुकानाचे नाव वेदांत फॅशन होते पण रवी मोदी यांचे मत होते की वेदांत नावाने बाजारात आपला ब्रँड तयार होणार नाही.

अणि रवी मोदी यांची ईच्छा होती की वडिलांनी तर त्यांच्या दुकानात पाहीजे तसा मान सन्मान इज्जत आपल्याला दिली नाही त्यामुळे बाजारात सर्व लोकांनी त्यांना त्यांच्या बाजारात उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायामुळे इज्जत द्यायला हवी त्यांचा आदर सन्मान करायला हवा.

म्हणुन खुप विचार विनिमय केल्यावर रवी मोदी यांनी आपल्या उद्योग व्यवसायास मान्यवर असे नाव देण्याचे ठरवले.

रवी मोदी सर्वप्रथम बाजारात मोठ्या स्वरूपाच्या स्टोअर वर विशेष लक्ष केंद्रित केले.

पेंटालोन,विशाल मेगा मार्ट कमी मार्जिन मध्ये रोख मध्ये आपल्या मालाची विक्री करत होते.अणि बाकीचा माल बाजारातील इतर रिटेलरला विकत होते.अणि त्यात थोडा जास्त मार्जिन ठेवत होते.कारण बाजारात त्या मालाची विक्री कोणी करत नव्हते.

त्यावेळी बाजारातील सर्व दुकाने पॅन्ट शर्ट विकत होते अणि मान्यवर ही एकमेव कंपनी होती जी कुर्ता पायजमा विकत होती.म्हणून कंपनीचा माल देखील झटपट विकण्यात येत होता.

असे केल्यामुळे काहीच वर्षात कंपनीचा टर्न ओव्हर २० करोडवर येऊन पोहचला.

बाजारातील मोठ्या स्वरूपाच्या स्टोअरला माल विकण्यात एक समस्या होती की ते ग्राहकांचा डेटा शेअर करत नव्हते त्यांचे प्रोडक्ट कोणी कोणी घेतले आहे.

यामुळे ग्राहकांना कुठले प्रोडक्ट आवडले कुठले प्रोडक्ट त्यांना आवडले नाही याबाबत प्रतिसाद प्राप्त होत नव्हता त्यामुळे आपल्या प्रोडक्ट उत्पादन करण्यामध्ये काय बदल करायचा आहे हे देखील त्यांच्या लक्षात येत नव्हते.

मग त्यांनी स्वताचे एक स्टोअर सुरू करण्याचे ठरवले जेणेकरून त्यांना बाजारातील आपल्या ग्राहकांना काय आवडते काय नाही आवडत त्यांची मागणी काय आहे हे लक्षात येईल.

मग रवी मोदी यांनी भुवनेश्वर येथे आपले पहिले स्टोअर सुरू केले.यानंतर कालांतराने त्यांनी स्वताचे दुसरे तिसरे स्टोअर देखील सुरू केले.

पण बाजारात स्वताचे वेगळे स्टोअर उघडण्यात खुप पैसा खर्च होत होता म्हणून त्यांनी कोको company own company operated मेथडचा वापर न करता फोको franchise own company operated मेथडचा वापर केला.

मग रवी मोदी यांनी बाजारातील इतर कंपन्यांना फोको मेथडने आपल्या ब्रँडची फ्रेंचाईजी देणे सुरू केले ज्यात पैसा कंपन्या खर्च करतील स्टोअर त्याच सुरू करतील अणि 

त्या स्टोअरला सांभाळण्याचे काम रवी मोदी यांची कंपनी करेल.

बाजारातील कंपन्यांनी त्यांच्याकडे फ्रेंचायजी घेण्यास सुरुवात केली.अणि स्व खर्चातुन स्वताचे स्टोअर देखील उघडले.

पण इथे देखील एक समस्या होती जरी मान्यवर कंपनीला फ्रेंचाईजी माॅडेल मध्ये स्टोअर उभे करण्यासाठी स्वता पैसे खर्च करावे लागत नव्हते तरी देखील हे सर्व स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी लागत होती.

मग ह्यावर उपाय म्हणून त्यांनी फोफो franchise own franchise operated ह्या मेथडचा अवलंब केला ज्यात 

बाजारातील कंपन्यांना स्वताच फ्रेंचाईजी लावता येत होती कर्मचारी देखील स्वताच त्यात कामाला ठेवायचे होते.

अणि माल देखील स्वताच विकायचा होता.

यात मान्यवर कंपनी फक्त डिझाईन बनवण्याचे, मार्केटिंग करण्याचे अणि कंपनींच्या दुकानात माल पोहोचवणे ह्या तीन जबाबदारया पार पाडणार होती.

फोफो मेथडने बाजारात आपले स्टोअर उघडण्यात आल्यानंतर त्यात खरेदी करण्यासाठी ग्राहक येण्यासाठी कंपनी creation of brand ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करते.मग बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी काय करायला हवे हा विचार केला.

मग त्यांच्या लक्षात आले की लग्न हा आपल्या भारत देशातील सर्वात मोठा उत्सव आहे.आज भारतातील लोक सर्वात जास्त खर्च लग्न समारंभातच करतात अणि अधिकतम व्यावसायिक ह्याच लग्नाच्या कार्यक्रमांमधुन सर्वांधिक कमाई अणि आपल्या मालाची विक्री देखील करतात.

आज भारतात दरवर्षी जवळपास १ करोड विवाह होतात.अणि एका लग्नात जवळपास १० लाखांपर्यंतचा खर्च केला जातो.

अणि एवढ्या मोठ्या बाजारात भारतीय ब्रँड नाहीये सर्व बाजार असंघटित आहे.मग रवी मोदी यांनी विचार केला की आज बाजारात जेवढेही कपड्यांची खरेदी केली जाते ते सर्व बाजार असंघटित आहेत.यात कुठलाही मोठा ब्रँड बाजारात उपलब्ध नाहीये.

मग त्यांनी ठरवले की बाजारात ते सर्वच कपडे न विकता फक्त लग्न समारंभात परिधान केले जाणारे कपड्यांची विक्री करतील.

अणि बाजारात लोक आता मान्यवरची तेव्हाच आठवण करतील जेव्हा त्यांच्याकडे लग्न समारंभ असेल.

मग मान्यवरने शंभर टक्के ब्रॅडिंग मार्केटिंग केली अणि लग्न म्हणजे मान्यवर अशी बाजारात आपली एक ओळख निर्माण केली.

मग आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी मल्टीप्लेक्स मध्ये जाहीरात करणे सुरू केली.कारण मल्टीप्लेक्स मध्ये सर्व पैसेवाले लोक सिनेमा बघण्यासाठी येत असतात.

सिनेमा थिएटर मध्ये जेव्हा लोक हातात पाचशे रूपयाचे पाॅपकाॅन घेऊन बसलेले असायचे त्याचवेळी अधुन मधुन मान्यवरने आपली जाहीरात दाखवणे सुरू केले.

अणि स्क्रीनवर जाहिरात सुरू असल्यावर लोकांना सिनेमा सोडुन कुठे जाता देखील येत नव्हते म्हणून याच एक दोन मिनिटात मान्यवरची उत्तम जाहिरात होत होती लोकांना ती जाहीरात नाइलाजाने पाहावीच लागत होती.

अणि जाहीरातीत सेलिब्रिटी दिसुन येत असल्याने लोक मान्यवरकडे अधिक आकर्षित होऊ लागले.याच्याने मान्यवरच्या सेल्स मध्ये अधिक वाढ होऊ लागली.

अणि सेल्स मध्ये वाढ झाल्यावर मान्यवरने तेच पैसे पुन्हा अजुन जास्त मार्केटिंग करण्यासाठी गुंतविले.

यानंतर मान्यवरने आयपीएल मधील ३ संघांना स्पाॅन्सर करण्यास सुरुवात केली.मग २०१७ मध्ये मान्यवरने विराट कोहली याला आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साईन केले.

यानंतर मग मान्यवरने फक्त विवाह म्हणजेच मान्यवर नव्हे तर कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम देशातील प्रत्येक सण उत्सव म्हणजे मान्यवर अशी ओळख निर्माण करण्याचे ठरवले.

यासाठी त्यांनी विराट कोहली सोबत हर त्योहार भारत का त्योहार ह्या नावाने एक कार्यक्रम लाॅच केला अणि आम्ही फक्त वेडिंग वेअर नाहीये आम्ही फंक्शन वेअर आहे असे सांगण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी अनुष्का शर्मा यांचे विराट कोहली सोबत प्रेमसंबंध होते.अणि दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती.मग मान्यवरने विचार केला यापेक्षा मोठी जोडी पुर्ण भारतात नाहीये.

मग मान्यवरने याचा फायदा उठवत अनुष्कासोबत देखील एक नवीन ब्रँड लाॅच केला.ज्याचे नाव मोहे असे होते.कंपनीने ठरवले मान्यवर पुरुषांसाठी अणि मोहे महिलांसाठी असेल.

रवी मोदी यांच्या कंपनीने प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळे ब्रँड तयार केले.मग त्यांनी विचार केला मान्यवर मध्ये आपले फक्त १५ ते २० हजार कपड्यांची विक्री होते आहे.

आपण अप्पर मिडल क्लास लोकांना टार्गेट केले करण्यासाठी तमेव नावाने एक नवीन ब्रँड लाॅच केला.मग त्यांनी लोअर कॅटॅगरी करीता देखील मंथन नावाचे ब्रँड लाॅच केले 

अशा पद्धतीने रवी मोदी यांनी प्रत्येक कॅटॅगरी करीता वेगवेगळे ब्रँड तयार केले.अणि सर्व कॅटॅगरी मधील ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहीराती देखील आहेत.

जाहीरातीदवारे दांपत्याला प्रभावित करण्यासाठी विराट अनुष्का, तरूणांना प्रभावित करण्यासाठी कार्तिक आयर्न किंवा रणवीर सिंग, महिलांना प्रभावित करण्यासाठी आलिया भट्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहीराती रवी मोदी यांच्या कंपनीकडे आहेत.

अणि आपल्या उद्योग व्यवसायाची ब्रॅडिग मार्केटिंग सेलिब्रिटी तसेच मल्टीप्लेक्स द्वारे करण्यासाठी त्यांनी रि इन्वहेस्टमेंट ह्या स्ट्रॅटेजीचा वापर केला.

२००३ मध्ये जेव्हा रवी मोदी यांनी नवीनच पैसे कमवायला सुरूवात केली होती.तेव्हा नवीनतम पैसे कमवायला सुरूवात केल्यानंतर त्यांनी कमावलेल्या पैशात मर्सिडीज कार घेण्याचे ठरवले.

मग त्यांचे वडील त्यांना सांगतात की मर्सिडीज कार घेण्यात पैसे न गुंतवता उद्योग व्यवसाय अधिक मोठा करण्यासाठी आपल्या कमावलेल्या पैशांची गुंतवणूक कर.

खरे पाहायला गेले तर २००३ पर्यंत रवी मोदी यांचा उद्योग व्यवसाय इतका वेगाने सुरू होता की मर्सिडीज कार खरेदी केली तरी त्यांच्या कडील पैसे कमी झाले नसते.पण त्यांनी वडिलांचे ऐकले.अणि व्यवसायात पैशाची गुंतवणूक केली.

२०१७ पर्यंत रवी मोदी होंडा सिटी चालवत होते.पण २०१७ मध्ये घरच्यांना सांगण्यावरुन त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी मर्सिडीज कार खरेदी केली.

२०१९ मध्ये मान्यवरची विक्री ८ करोड इतकी झाली होती.पुढे २०२० मध्ये ९१५ करोड इतकी झाली. त्यानंतर २०२१ मध्ये ५७४ करोड,२०२२ मध्ये १०७० करोड इतकी झाली.

रवी मोदी त्यांच्या कमाई मधील सर्वात मोठा भाग मार्केटिंग करण्यासाठी खर्च करत नाहीत.ते फक्त ७ ते ८ टक्के भाग आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी खर्च करतात.

म्हणजे १ हजार करोडची सेलिंग झाली तर त्यातुन फक्त ७५ करोड इतके पैसे ते मार्केटिंग मध्ये खर्च करायचे.अणि मार्केटिंग मध्ये एक रूपया खर्च केल्यावर यांच्या नफ्यात ६.६ रूपये इतकी वाढ होत.

मान्यवर कंपनीचा एकुण प्राॅफिट मार्जिन ३० टक्के टॅक्स भरल्यानंतर ७५ टक्के इतका निघतो.मान्यवर जेवढे पैसे आपल्या उद्योग व्यवसायात गुंतवते त्याच्या ७५ टक्के पैसे अधिक प्राप्त करते.

म्हणजे मान्यवरने एका वर्षात १०० रूपयांची गुंतवणुक व्यवसायात केली तर त्याच वर्षी ७५ रूपये कमवून देखील घेते.

मान्यवर आपल्या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरींग स्वता न करता बाहेरून करवून घेते.आज संपूर्ण भारतात ४५० पेक्षा अधिक विक्रेते आहेत ज्यांच्यापासुन मान्यवर माल बनवून घेण्याचे काम करते.

आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मान्यवर विक्रीसाठी जेवढ्या मालाचे उत्पादन करते तो सर्व माल विकला देखील जातो.न विकला गेलेला माल त्यांच्याकडे जास्तीत जास्त ३ टक्के इतकाच माल शिल्लक राहतो.

अणि हा उरलेला ३ टक्के माल ते जाळुन टाकतात किंवा गरीबांना दान करून टाकतात त्याची विक्री करत नाही.

कारण मान्यवर आपल्या ग्राहकांच्या संपूर्ण डेटाचे विश्लेषण करते.डेटा विश्लेषण करून ते आपल्या ग्राहकाला काय हवे आहे काय नको आहे हे सर्व ते जाणुन घेतात.

मान्यवरने जेव्हापासून पहिले स्टोअर उघडले आहे तेव्हापासून ते साॅफ्टवेअर मध्ये डेटा तपासणी करतात.कुठल्या ठिकाणचे ग्राहक कोणत्या रंगाचे,कोणत्या डिझाईनचे कपडे परिधान करतात.

कोणत्या हंगामात आपले ग्राहक कोणते कपडे परिधान करतात.आपल्या कोणत्या ठिकाणचे ग्राहक कोणत्या सणाच्या दिवशी कसा पेहराव करतात.

इत्यादी सर्व डेटाचे मान्यवर विश्लेषण करते अणि त्याच स्वरूपानुसार मान्यवर काम करते.त्यामुळे त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेला माल वाया देखील जात नाही.

आज मान्यवरचे भारतामधील एकुण मार्केट कॅप 33,354 करोडपेक्षा अधिक आहे.रवी मोदी हे आज भारतातील ६४ वे सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button