एमडी एच स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा MDH start up business success story in Marathi
एमडी एच स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा MDH start up business success story in Marathi
आज आपल्याला टिव्हीवर एक जाहीरात पाहायला मिळते.त्यात असली मसाले सच सच एमडी एच,एमडी एच असे म्हटले जाते.
आज एमडी एच मसाल्याचे किमान एक तरी पॅकेट आपल्या प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाक घरात आपणास दिसून येते.
एम डी एच मसाल्याच्या ह्या पॅकेटवर एक वृदध आजोबांचा फोटो देखील आपणास पाहायला मिळतो.
आज आपल्याला एम डी एच मसाल्याच्या पॅकेटवर फोटो असलेल्या वृदध व्यक्तीचे नाव तर माहीत आहे पण यांची यशोगाथा माहीत नाही.
आजच्या लेखामध्ये आपण महाशय धर्मपाल गुलाटी नावाच्या ह्या वृद्ध आजोबाने देशातच नव्हे तर परदेशातही एम डी एच मसाल्याला कसा मान सन्मान अणि इज्जत प्राप्त करून दिली हे जाणुन घेणार आहोत.
टांगा चालवणारे वृद्ध आजोबा कसे बनले अरबपती?
महाशय धर्मपाल गुलाटी हे एक सर्वसाधारण पाचवी उत्तीर्ण टांगा चालवणारे व्यक्ती होते.फाळणी दरम्यान त्यांचे घर,पैसा अणि दुकान इत्यादी सर्व काही पाकिस्तान ह्या देशात राहुन गेले होते.
यानंतर धर्मपाल गुलाटी यांनी एका छोट्याशा दुकानातुन मसाल्याची विक्री करण्यास सुरुवात केली.
आज धर्मपाल गुलाटी यांनी सुरू केलेले एमडी एच मसाले हे एव्हरेस्ट नंतरचा दुसरा सर्वात मोठा ब्रँड म्हणून बाजारात प्रसिद्ध आहे.
धर्मपाल गुलाटी यांनी एमडी एच मसाल्याची फक्त देशातच विक्री करत नाही तर आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये ह्या मसाल्याची निर्यात करत आहे.
पण सध्या सिंगापुर,हाॅगकाॅग,माॅरिशस ह्या तीन देशांमध्ये एम डी एच मसाले कंपनीच्या काही मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
एमडी एच मसाल्याने मागील वर्षी १६०० करोड रुपये इतकी मालाची विक्री केली होती.म्हणजे एका दिवसाला साडेचार करोड इतक्या मालाची विक्री एम डी एच मसाले कंपनीने केली आहे.
२०१७ मध्ये धर्मपाल गुलाटी हे एफ एम सीजी क्षेत्रात सर्वात जास्त वेतन प्राप्त करणारे सीईओ देखील २०१७ मध्ये बनले होते.
आपल्या उत्तम कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
एमडी एच मसाल्याची सुरूवात –
एमडी एच मसाल्याची मुळ सुरूवात १९१९ मध्ये करण्यात आली होती.आपण जे एमडी एच मसाले पॅकेट बघतो ते ह्या एमडी एच मसाल्याचा दूसरा भाग आहे.
एम डी एच मसाल्याची सुरूवात धर्मपाल गुलाटी यांचे वडील चुन्ननीलाल गुलाटी यांनी सियालकोट ह्या ठिकाणी केली होती.त्यावेळी सियालकोट हे आपल्या भारतातच होते.
धर्मपाल गुलाटी यांचे जास्त शिक्षण झालेले नव्हते त्यांनी फक्त पाचव्या इयतेपर्यत आपले शिक्षण केले होते.लहानपणी शाळेत शिकत असताना एकदा शिक्षकांनी त्यांना शिक्षा केली होती ज्यामुळे त्यांनी पुन्हा कधीही शाळेत न जाण्याचे ठरवले होते.
मग धर्मपाल गुलाटी यांनी लहानपणापासूनच शाळेत जाणे बंद केले असल्याने त्यांनी घरातील छोट्या मोठ्या कामात हातभार लावण्यास सुरुवात केली.
कधी त्यांनी साबण तसेच आरसे विकले तर कधी मेहंदी कोनची विक्री देखील केली.पण ह्या सर्व व्यवसायात सुरूवातीला चांगले वाटत पण पुन्हा काही दिवसांनी दुसरे काही करण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न होत.
मग त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले तु बाहेर कुठेही कामाला जाऊ नको आपल्या दुकानातच काम करत जा.
मग ते आपल्या वडिलांसोबत रोज दुकानात बसु लागले वडिलांसोबत दुकानात काम करण्यात त्यांचे चांगले मन रमु लागले.
पण यातच १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली.ज्यात सियालकोट पाकिस्तान मध्ये समाविष्ट करण्यात आले.
मग त्यांनी त्यांचे तेथील घर, स्वताचा उद्योग व्यवसाय दुकान इत्यादी सर्व काही तिथेच पाकिस्तान मध्ये राहु दिले अणि ते ट्रेन मध्ये बसुन भारतात अमृतसर येथे आले.
अमृतसर येथे आल्यावर काही दिवसांनी ते दिल्ली येथे गेले.
तेथे त्यांना प्रश्न पडला की उदरनिर्वाह करण्यासाठी काय काम करावे तेव्हा तिथे त्यांनी टांगा चालवणे सुरू केले.
पण काही दिवस टांगा चालविल्यानंतर त्या कामात देखील त्यांचे मन लागले नाही म्हणून त्यांनी टांगा चालवणे देखील सोडुन दिले.
मग धर्मपाल गुलाटी यांनी विचार केला की असे कोणते काम करावे जिथे आपल्याला कायमस्वरूपी तग धरून काम करता येईल.
मग त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या वडिलांचे दुकान आले जिथे ते आनंदाने काम करत होते.मग त्यांनी त्यांच्याजवळ असलेला टांगा विकुन अणि त्यात अजुन थोडे पैसे जोडुन स्वताचे एक दुकान सुरू केले.
ह्या दुकानाचे नाव देखील त्यांनी तेच ठेवले जे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या दुकानाचे ठेवले होते महाशय दी हटटी.
इथूनच सध्याच्या एमडी एच मसाल्याची सुरूवात देखील झाली.
पण जेव्हा धर्मपाल गुलाटी यांनी बाजारात मसाल्याची विक्री सुरू केली तेव्हा बाजारात असे अनेक प्रतिस्पर्धीं उद्योग व्यवसायिक होते जे बाजारात कित्येक वर्षांपासून मसाल्याची विक्री करत होते.
आता धर्मपाल गुलाटी यांना बाजारातील इतर सर्व प्रतिस्पर्धीं दुकानांशी स्पर्धा करत स्वताचा उद्योग व्यवसाय चालवायचा होता.
त्यामुळे त्यांनी आपल्या मसाल्यांना बाजारातील इतर प्रतिस्पर्धी दुकानदारांच्या तुलनेत अधिक उत्तम कसे बनवता येईल याचा विचार करण्यास सुरुवात केली.
कारण त्यावेळी बाजारातील जेवढेही दुकानदार मसाल्याची विक्री करत होते.ते सर्व भेसळयुक्त तसेच बनावटी मसाल्याची विक्री करत होते.
कारण त्यांच्याकडे ग्राहकांना उत्तम दर्जाचे मसाले उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते.म्हणुन ते कधी कच्च्या मसाल्याची विक्री करत तर कधी हळदी मध्ये काहीतरी मिक्स करत होते.
धर्मपाल गुलाटी यांनी ठरवले असते तर त्यांनी देखील बाजारातील इतर प्रतिस्पर्धी दुकानदारांच्या समवेत आपल्या ग्राहकांना भेसळयुक्त तसेच बनावटी मसाल्याची विक्री केली असती.
पण हे सर्व धर्मपाल गुलाटी यांच्या तत्वांच्या विरोधात होते त्यांनी ठरवले आपण बाजारात विक्री करायची तर उत्तम दर्जाच्या मसाल्यांची विक्री करायची.
आपण कुठलेही बनावट,भेसळयुक्त मसाल्यांची विक्री करायची नाही.
पण इथे देखील एक समस्या होती धर्मपाल गुलाटी यांनी उत्तम दर्जाचे मसाले बनवणे सुरू केले तर मसाल्याचे भाव देखील जास्त होतील अणि त्यांच्या बनवलेल्या मसाल्यांचा भाव जास्त असल्याने ग्राहक त्यांच्याकडुन मसाल्याची खरेदी करणार नाही.
अणि समजा त्यांनी आहे कमी रेट मध्ये ग्राहकांना उत्तम दर्जाचे मसाले उपलब्ध करून दिले तर त्यांना त्यातुन काहीच नफा प्राप्त होणार नव्हता.
पण धर्मपाल गुलाटी यांनी ठरवले आपल्याला नफा प्राप्त नाही झाला तरी चालेल पण आपण ग्राहकांना परवडेल अशा दरात त्यांच्यासाठी उत्तम दर्जाचे मसाले बनविणार.
मग विचार विनिमय करून झाल्यावर जिथे इतर दुकानदार १० रूपये प्राप्त करता तिथे आपण पाच रुपये इतकाच नफा प्राप्त करू.पण बाजारात ग्राहकांना उत्तम दर्जाचे मसाले उपलब्ध करून देणार असे ठरवितात.
मग धर्मपाल गुलाटी यांनी उत्तम दर्जाचे मसाले बनवणे सुरू केले.त्यांनी मसाला खरेदी करण्यापासून ते कुटण्यापर्यतच्या सर्व प्रक्रियेवर स्वता जातीने लक्ष दिले.
एवढेच नव्हे तर कुटलेल्या सर्व मसाल्यांची पॅकिंग देखील ते स्वता आपल्या हाताने आपल्या डोळ्यासमोर करत होते.
मग सर्व प्रक्रियेवर स्वता लक्ष ठेवून काम केले.
स्वताच्या नियंत्रणात सर्व मसाले बनवून ते पॅक करून जेव्हा धर्मपाल गुलाटी यांनी त्याची बाजारातील ग्राहकांना विक्री केली.
तेव्हा त्याच्या उत्तम चवीने अणि आस्वादाने बाजारातील सर्व ग्राहक एमडी एच मसाल्याकडे अधिक आकर्षित होऊ लागले.
मग बाजारातील इतर सर्व मसाले एकीकडे अणि धर्मपाल गुलाटी यांचे एमडी एच मसाले एकीकडे अशी बाजारात स्थिती निर्माण झाली.धर्मपाल गुलाटी यांच्या दुकानासमोर मसाले खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढु लागली.
धर्मपाल गुलाटी यांनी जो काही कमी मार्जिन ग्राहकांना उत्तम दर्जाचे मसाले कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्राप्त केला होता.
त्या सर्व मार्जिनची भरपाई त्यांच्या दूकानातील एमडी एच मसाल्याच्या पॅकेटची अधिक जास्त प्रमाणात विक्री झाल्याने झाली.
धर्मपाल गुलाटी यांनी त्यांच्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे मसाले बाजारात कमी किंमतीत उपलब्ध करून दिले ज्यामुळे बाजारात त्यांच्या मसाल्याची विक्री अधिकतम प्रमाणात होऊ लागली.एमडी एच मसाले हे बाजारात उत्तम बनले.
पुढे बाजारात स्वताची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी स्वताचा एक ब्रँड तयार करण्यासाठी धर्मपाल गुलाटी यांनी एक युक्ती लढवली.
बाजारातील सर्व दुकानदार आपल्या ग्राहकांना प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकुन मसाले देत होते पण धर्मपाल गुलाटी यांनी प्लॅस्टिकच्या पिशवीत मसाले टाकले पण त्या पिशवीला एका पेपर बाॅक्स मध्ये टाकले.
अणि त्या बाॅक्सवर आपल्या दुकानाचे नाव लिहिले.एवढया छोट्या बाॅक्सवर महाशय दी हटटी एवढे लांबलचक दुकानाचे नाव न टाकता त्यांनी एम डी एच मसाले असे नाव टाकले.
पुढे ह्या नावाने बाजारातील इतर दुकानदारांनी आपले प्रोडक्ट ची विक्री करू नये म्हणून धर्मपाल गुलाटी यांनी त्यांचा एक फोटो देखील त्या बाॅक्सवर लावला.
अशा पद्धतीने एमडी एचने बाजारातील इतर प्रतिस्पर्धींपेक्षा आपले प्रोडक्ट अधिक उत्तम दर्जात उपलब्ध करून दिलेच शिवाय त्यांनी त्याची पॅकिंग देखील वेगळ्या पद्धतीने केली.
एकदा धर्मपाल गुलाटी हे काही व्यावसायिक कामानिमित्त मुंबई येथे गेले होते.तिथे त्यांनी एक मसाल्याचे दुकान बघितले.
दुकानदाराने खुप उत्तम पद्धतीने दुकानाची इंटिरिअर डिझायनिंग केली होती.एकदम उत्तम पद्धतीने रांगेत मसाल्याचे पॅकेट विक्रीसाठी दुकानात रचले होते.
मग धर्मपाल गुलाटी यांनी ठरवले आपण देखील आपल्या दुकानाची अशाच पद्धतीने साज सजावट करायची.दुकानाचे इंटेरीअर डिझायनिंग अशाच पद्धतीने करायची.
यानंतर धर्मपाल गुलाटी यांनी आपल्या दुकानाच्या गुणवत्तेत देखील अधिक सुधारणा केली.त्यांनी एक उत्तम दर्जाचे एक नवीन दुसरे मोठे दुकान खरेदी केले.
त्या दुकानाची इंटिरिअर डिझायनिंग देखील बाजारातील इतर दुकानांच्या तुलनेत एकदम वेगळ्या पद्धतीने अणि उत्तमरीत्या केली.याचसोबत त्यांनी दुकानात विक्रीसाठी आणलेल्या मालाची देखील एकदम उत्तम पद्धतीने सजावट केली.
अशा प्रकारे मसाल्याचा दर्जा उत्तम,मसाल्याची पॅकिंग वेगळी अणि दुकान देखील बाजारातील इतर दुकान दारांपेक्षा अलग बनवत धर्मपाल गुलाटी यांनी बाजारात स्वताचा एक युनिक ब्रँड तयार केला.
मग बाजारात एमडी एच मसाल्याचा एक युनिक ब्रँड तयार झाल्याने धर्मपाल गुलाटी यांच्यावरील कामाचा ताण वाढु लागला म्हणून मग त्यांनी काही कामाची आऊट सोर्सिग करणे सुरू केले.
यात देखील त्यांनी कोणाकडून हळदी पावडर तयार करून घेतली तर कोणाकडून मसाले बनवून घेतले.तसेच व्यवसायाच्या प्रक्रियेत आपल्या काही मित्रांना देखील समाविष्ट करून घेतले.सर्व मित्रांना वेगवगळी कामे नेमुन दिली.
असे करत करत धर्मपाल गुलाटी यांनी आपल्या सर्व नातलगांना मित्रांना देखील आपल्या उद्योग व्यवसायात समाविष्ट करुन घेत स्वताची एक मोठी टीम तयार केली.
पण इथे देखील काही वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले धर्मपाल गुलाटी यांनी त्यांच्या ज्या मित्राला सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम नेमुन दिले होते.
तो कमी पैशात मसाले बनविण्यासाठी निकृष्ट दर्जा असलेल्या कच्चा मालाची खरेदी करत होता अणि त्याद्वारे मसाले बनवत होता.सर्व खरेदीमागे परस्पर कमिशन देखील काढत होता.
दुसरीकडे त्यांनी ज्या व्यक्तीला हळदीची पावडर बनवण्यास सांगितले तो हळदीच्या पावडर मध्ये हरभरा दाळ मिक्स करत होता.ह्या गोष्टी जास्त काळ चालल्या असत्या तर आज एमडी एच मसाले बाजारात ब्रँड बनले नसते.
पण हे सर्व काही जास्त दिवस चालले नाही ह्या सर्व गोष्टी धर्मपाल गुलाटी यांच्या लवकरच लक्षात आल्या.कारण सुरूवातीला धर्मपाल गुलाटी स्वताच खरेदी,पॅकेजिंग,दळण्याचे, सर्व प्रक्रियांवर लक्ष देण्याचे काम करत होते.
म्हणून जेव्हा एक दोनदा धर्मपाल गुलाटी यांनी मसाल्याच्या पॅकेटच्या सॅपलला हात लावला अणि तयार केलेल्या मसाल्याचा वास घेतला तेव्हा त्यांना लगेच लक्षात आले की मसाल्यात काहीतरी गडबड आहे.
मग धर्मपाल गुलाटी यांनी जेवढेही मित्र तसेच जवळच्या नातलगांना काम नेमुन दिले होते सर्वांना कामावरून काढून टाकले अणि त्यांनी ठरवले की आपल्याला जर मसाल्याचा दर्जा उत्तम ठेवायचा असेल तर आता बाहेरुन आउट सोर्सिग करून चालणार नाही.
मग त्यांनी स्वताचा एक नवीन कारखाना सुरू केला ज्यात त्यांनी मसाल्याची पॅकिंग,मसाले दळणे,हळदीची पावडर तयार करणे इत्यादी सर्व कामे करणे सुरू केले.
कालांतराने धर्मपाल गुलाटी यांनी एमडी एच मसाले मधून दिल्ली मध्येच व्यापार करत १६०० करोड इतका टर्न ओव्हर देखील जनरेट केला.यात देखील दिवसाला साडे चार करोड इतकी मसाल्यांची विक्री केली.
धर्मपाल गुलाटी यांनी आपल्या दुकानातील मालाच्या विक्रीत वाढ करण्यासाठी काय केले?
धर्मपाल गुलाटी यांनी दिल्ली मधील अशा सर्व वेगवेगळ्या ठिकाणी आपले मसाल्याचे दुकान सुरू केले.जेथील ग्राहकांना त्यांचे दुकान दुर अंतरावर असल्याने दुकानात मसाले खरेदी करण्यासाठी येणे शक्य होत नव्हते.
एमडी एच मसालेने दिल्ली मधील सर्व ठिकाणी एक शाखा उघडुन संपूर्ण दिल्ली शहरातील ग्राहकांना आपल्याकडे वळवून घेतले.
यामागे त्यांचा एक हेतू होता त्यांच्या प्रोडक्टची जास्तीत जास्त ग्राहकां मध्ये विक्री झाली पाहिजे तसेच दिल्ली मधील प्रत्येक ग्राहक त्यांच्या दुकानात मसाले खरेदी करण्यासाठी आला पाहिजे.
एमडी एच मसालेने आपल्या सेल्स मध्ये वाढ करण्यासाठी आपल्या प्रोडक्ट मध्ये वाढ केली.सुरूवातीला एम डी एच मसाले बाजारात फक्त साध्या मसाल्याची विक्री करत होते.
पण हळुहळू त्यांनी मसाल्याचे मिश्रण देण्यास सुरुवात केली.एम डी एच मसालेने मिक्स मसाल्याची विक्री करणे सुरू केले.
ज्यात छोले भटुरे मसाला, मिक्स पावभाजी मसाला,पावभाजी मसाला,सांबर मसाला इत्यादी सारख्या वेगवेगळ्या मसाल्यांची विक्री केली.आज ५० पेक्षा जास्त प्रोडक्टची विक्री एमडी एच मसाले बाजारात करीत आहे.
आज घरगृहिणी खरेदी करण्यास गेल्यावर एम डी एच कंपनींचे मसाले,पावभाजी,मिरची, सांबार इत्यादी सर्व गोष्टी खरेदी करतात.
आज महिला ह्या सर्व वस्तुंचा उपयोग करत घरबसल्या पावभाजी ,साऊथच्या डिशेस इत्यादी सर्व गोष्टी देखील बनवू शकतात.कारण ह्या सर्व डिशेस बनवण्यासाठी लागणारे मसाले आज त्यांच्या घरात उपलब्ध आहेत.
अशा पद्धतीने एकाच ग्राहकाला जास्तीत जास्त प्रोडक्टची विक्री करून देखील एम डी एच मसालेने बाजारात आपल्या विक्रीमध्ये वाढ केली आहे.
याचसोबत एमडी एच मसाले कंपनीने आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यावर देखील विशेष लक्ष केंद्रित केले.
यासाठी एमडी एच मसाले कंपनीने नवीन मार्केट मध्ये प्रवेश केला.सांबार मसाल्याच्या द्वारे त्यांनी साऊथ मध्ये प्रवेश केला.पावभाजी मसाल्याच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र मध्ये प्रवेश केला.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या एरियातील वेगवेगळे मसाले घेऊन एमडी एच देशातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले.
एवढेच नव्हे तर आज ज्या ज्या देशात भारतीय लोक वास्तव्यास आहेत अणि ते एमडी एच मसाले वापरणे पसंत करतात तिथे देखील जाऊन पोहोचले आहे.
आज एमडी एच मसाले संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.भारतात एमडी एच मसाल्याला मसालि किंग म्हणून ओळखले जाते.
१०० पेक्षा जास्त देशांमध्ये एमडी एच मसाल्याची निर्यात केली जाते.
३ डिसेंबर २०२० रोजी धर्मपाल गुलाटी जेव्हा ९८ वर्षाचे होते तेव्हा वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते.