Blog

मिस्टर बीस्टची यशोगाथा Mr beast success story in Marathi 

मिस्टर बीस्टची यशोगाथा Mr beast success story in Marathi 

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक मुलगा आज युटयुबच्या माध्यमातून एवढे पैसे कमवत आहे की युटयुबचे सीईओ निल मोहन यांची एकुण नेटवर्थ १५० मिलियन डॉलर इतकी आहे.

अणि त्याचठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या त्या युटयुबर असलेल्या मुलाचे एकुण नेटवर्थ ५०० मिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे.

आजच्या लेखामध्ये आपण जगातील सर्वात मोठे युटयुबर म्हणून ओळखले जाणारे मिस्टर बीस्ट यांच्याविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

मिस्टर बीस्ट कसे बनले जगातील सर्वात मोठे युटयुबर?how mister beast become world biggest YouTuber 

७ मे १९९८ रोजी अमेरिका मधील कॅनसस येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जेम्स स्टेपन डोनाल्डसन यांचा जन्म झाला होता.

जेम्स डोनाल्डसन यांना त्यांची आई प्रेमाने जिमी म्हणत असत.सोशल मिडियावर सर्व जण जिमी यांना मिस्टर बीस्ट ह्या नावाने ओळखतात.

जिमी यांची आई सैन्यात होती आणि त्यांचे कुटुंब जास्त श्रीमंत देखील नव्हते अणि खुप गरीब देखील नव्हते.

२००७ मध्ये जिमी यांच्यासोबत अशी एक घटना घडुन आली की त्या एका घटनेमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलुन गेले.

२००७ मध्ये जिमी यांच्या आईवडिलांमध्ये फारकती होते.कारण जिमी यांचे वडील त्यांच्या आईस शारीरिक तसेच मानसिक त्रास देत होते.यामुळे जिमी यांच्या आईने आपल्या पतीसोबत फारकती घेण्याचा निर्णय घेतला.

जिमी यांच्या आईवडिलांमध्ये फारकती झाली तेव्हा जिमी फक्त ९ वर्षाचे होते आपल्या आईवडिलांना वेगळे होताना बघुन जिमी खुप निराश झाले.निराशेमुळे जिमी डिप्रेशन मध्ये देखील चालले गेले.

आईवडिलांच्या फारकतीनंतर जिमी अणि त्यांच्या भावाने आईसोबत राहायला सुरुवात केली.जिमी यांचे मन अभ्यासात अजिबात लागत नव्हते.

जिमी यांना तेव्हा युटयुबमध्ये रूची निर्माण झाली होती.२१० मध्ये जेव्हा युटयुब अमेरिकेत ट्रेंड बनु लागले होते तेव्हा युटयुबरची अमेरिकेत ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.

तेव्हा हे सर्व बघुन जिमी यांच्या डोक्यात देखील युटयुबर बनण्याचा विचार निर्माण झाला.याचकरीता फक्त १३ वर्षाचे असताना जिमी यांनी २०१२ मध्ये जिमी यांनी स्वताचे एक युटयुब चॅनल सुरू केले होते.

ह्या युटयुब चॅनलला मिस्टर बीस्ट यांनी मिस्टर बीस्ट ६००० असे दिले होते.

जिमी यांच्या मिनीक्राफ्ट आयडीचे नाव देखील मिस्टर बीस्ट ६००० होते म्हणून त्यांनी त्यांच्या युटयुब चॅनलला देखील तेच नाव दिले.

जिमी यांनी युटयुबवर व्हिडिओ बनवायला सुरुवात तर केली पण त्यांना यश प्राप्त होत नव्हते.मग तब्बल पाच वर्षे मेहनत घेत त्यांनी युट्यूबच्या अलगोरिदमची माहीती प्राप्त केली.

याचमुळे त्यांना युटयुब अलगोरिदमचा किडा म्हणून देखील ओळखले जाते.

सन २०१६ मध्ये जिमी यांनी ग्रीन विलिये ख्रिश्चन अकॅडमी मध्ये पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला.अणि त्याचवेळी जिमी यांच्या युटयुब चॅनलवर ३० हजार सबस्क्राईबर देखील झाले होते.

जिमी यांच्या गेमिंग व्हिडिओ मध्ये ग्रोथ होण्यास सुरुवात झाली होती अणि त्यांच्या सबस्क्राईबर मध्ये देखील वाढ होत होती.

याचवेळी २०१६ मध्ये जिमी यांनी काॅलेजचे शिक्षण अर्धवट सोडून दिले अणि फुलटाईम युटयुबवर व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली.

जिमी यांनी काॅलेज सोडले म्हणून त्यांची आई त्यांच्यावर खुप चिडली अणि रागात त्यांनी जिमी यांना घरातुन बाहेर हाकलून देते.

पण काही काळानंतर मिस्टर बीस्ट जिमी आपल्या आईजवळ जातात अणि तिला व्यवस्थित समजावून सांगतात तेव्हा जिमीच्या डोळ्यात असलेला आत्मविश्वास बघुन त्यांच्या आईने देखील त्यांच्या ह्या निर्णयाला पाठिंबा दिला.

२०१७ पर्यंत जिमी यांनी त्यांच्या कंटेंट मध्ये खूपच सुधारणा घडवून आणली होती.हया एका वर्षाच्या कालावधीत त्यांनी खुप काही गोष्टी देखील शिकुन घेतल्या.

मग जानेवारी २०१७ मध्ये जिमी यांनी एक चॅलेजिंग व्हिडिओ बनवला जिथे त्यांनी एका लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च केली.

हा व्हिडिओ बनविण्यासाठी जिमी यांना तब्बल ४० तासाचा कालावधी लागला होता.पण फास्ट फाॅरवड केल्याने हा व्हिडिओ २४ तासाचा बनला.

जिमी यांचा हा चॅलेजिंग व्हिडिओ जागोजागी व्हायरल झाला अमेरिकेत हा ट्रेंड बनला अमेरिकेत जिमी यांचे नाव खुप प्रसिद्ध झाले.

ज्यामुळे २०१७ मध्येच जिमी यांच्या युटयुब चॅनलवर १ मिलियन पेक्षा जास्त सबस्क्राईबर झाले होते.अणि ६ नोव्हेंबर २०१८ मध्ये जिमी यांच्या युटयुब चॅनलवर १० मिलियन सबस्क्राईबर झाले होते.

अणि पुढे ८ जानेवारी २०१९ मध्ये जिमी यांच्या युटयुब चॅनलवर २० मिलियन सबस्क्राईबर झाले.यामुळे फास्ट ग्रोव्ह होत असलेल्या युटयुब चॅनल मध्ये जिमी यांनी स्वताचे एक रेकाॅड तयार केले.

जिमी यांच्या युटयुब चॅनलने २०१८ मध्ये सर्वात जास्त प्रगती केली कारण त्यावेळी टी सिरीज अणि प्युडी पाई मध्ये सबस्क्राईबर बनविण्यासाठी स्पर्धा सुरू होती.

त्याचदरम्यान जिमी यांनी ट्रेंड फाॅलो केला आणि त्यांनी प्युडी पाईला सपोर्ट करण्यासाठी खुप जास्त व्हिडिओ बनवुन युटयुबवर अपलोड केले.

याचसोबत जिमी यांनी सब टु प्युटी पाई ह्या नावाने टी शर्ट चे देखील वितरण केले.ज्यामुळे प्युटी पाई चे दर्शक मिस्टर बीस्ट यांना अधिक पसंद करू लागले.

मिस्टर बीस्ट यांना युटयुबवर फाॅलो करू लागले त्यांचे व्हिडिओ पाहु लागले.अणि मिस्टर बीस्ट यांना सपोर्ट देखील करू लागले.

यामुळेच २०१८ मध्ये मिस्टर बीस्ट यांच्या युटयुब चॅनलवर लाखोच्या करोडोंच्या संख्येत सबस्क्राईबर अणि व्युव्ह येण्यास सुरुवात झाली.

पुढे २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये मिस्टर बीस्ट यांनी त्यांच्या युटयुब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला ज्यात त्यांनी दिले होते आय ओपन अ फ्री बॅक.

हळुहळू ह्या व्हिडीओ वर असे आरोप करण्यात आले की मिस्टर बीस्ट यांनी आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये बनावट नोटांचा वापर केला आहे.

मग कालांतराने बीस्ट यांनी लोकांच्या मनात असलेले सर्व संशय दुर केले अणि २०२० मध्ये मिस्टर बीस्ट हे युटयुबवरून सर्वात जास्त कमाई करणारे क्रिएटर बनले.

मग जगभरातील युटयुबरची नजर मिस्टर बीस्ट यांच्या युटयुब चॅनलकडे जाऊ लागली.मग मिस्टर बीस्ट यांनी आपल्या कंटेंट मध्ये अधिक सुधारणा घडवून आणली.

अणि स्वताची एक मोठी टीम तयार केली त्यामुळे आज मिस्टर बीस्ट यांच्याकडे २५० पेक्षा अधिक जणांची टीम आहे.

आपल्यातील खूप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल मिस्टर बीस्ट यांच्या यशाचे मुख्य कारण काय आहे त्यांनी खरोखरच आपल्या चॅनलची ग्रोथ करण्यासाठी युटयुब अलगोरिदम हॅक केले होते का?

मिस्टर बीस्ट यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना आपल्या अनेक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की युट्यूबवर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होण्याची तीन प्रमुख कारणे आहेत.

पहिले कारण आहे सीटीआर मिस्टर बीस्ट यांच्या थंबनेलचा कलर खुप हलका अणि आकर्षक स्वरूपाचा असतो.

त्यामुळे शंभर थंबनेल मध्ये देखील मिस्टर बीस्ट यांचा थंबनेल सर्वात जास्त आकर्षक दिसुन येते.

मिस्टर बीस्ट यांनी सांगितले आहे की जर आपल्याला आपल्या युटयुब व्हिडिओवर प्राॅपर वाॅचटाईम दिसुन येत असेल तर युटयुबला आपल्या व्हिडिओला व्हायरल करावेच लागते.

मिस्टर बीस्ट यांचे व्हिडिओ कितीही मोठा असला तरी देखील त्यात त्यांनी म्युझिक वगैरे समाविष्ट करून अशा पद्धतीने एडिट करतात की त्यांचे व्हिडिओ बघायला लोकांना खुप जास्त मज्जा येते.

त्यामुळे लोक त्यांचा पुर्ण व्हिडिओ किंवा ५० टक्के व्हिडिओ तरी बघतातच.यामुळे मिस्टर बीस्ट यांना जास्त वाॅचटाईम प्राप्त होतो अणि त्याचमुळे त्यांचे व्हिडिओ युटयुबवर सर्वात जास्त व्हायरल होतात.

मिस्टर बीस्ट आपल्या व्हिडिओ मध्ये नेहमी जेवढी अपेक्षा त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी येत असलेल्या दर्शकांना नसेल त्यापेक्षा अधिक आपल्या व्हिडिओ द्वारे देण्याचा प्रयत्न करतात.

यामुळे दर्शकांना एक नवीन अनुभव प्राप्त होतो एक नवीन कंटेंट प्राप्त होतो.त्यामुळे दर्शक जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्या युटयुब चॅनलवर एंगेज राहतात.

युटयुबने देखील आपल्या अधिकृत वेबसाईटवर स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्ही युटयुबच्या अलगोरिदमचा विचार करू नका तुम्ही फक्त तुमच्या आॅडियन्सचा विचार करा जर तुम्ही तुमच्या दर्शकांना आपल्या व्हिडिओ द्वारे एंगेज केले तर युटयुब स्वताहून तुमच्या व्हिडिओला व्हायरल करेल.

आज मिस्टर बीस्ट यांचे कमाईचे अनेक स्त्रोत आहेत.युटयूबवर आज त्यांचे पाच ते सहा युटयुब चॅनल आहेत जिथून ते चांगली कमाई करतात.

मिस्टर बीस्ट युटयुब, ब्रँड प्रमोशन, द्वारे कमाई करतात याचसोबत त्यांचा स्वताचा एक ब्रँड प्रोडक्ट आहे ज्यात ते मिस्टर बीस्ट ह्या नावाने चाॅकलेट, बर्गर अणि कपडयांची विक्री करतात.

म्हणजे युटयुबर असण्यासोबत ते एक उत्तम व्यावसायिक देखील आहेत.आज आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर जिमी जगातील जगातील सर्वात मोठे युटयुबर म्हणून ओळखले जातात.

आज मिस्टर बीस्ट यांच्या युटयुब चॅनलवर जेवढे सबस्क्राईबर आहेत अणि व्युव्ह आहेत तेवढे सबस्क्राईबर व्युव्ह जगातील कुठल्याही युटयुब चॅनलवर आपणास दिसून येत नाही.

मिस्टर बीस्ट यांच्या पहिल्या चॅनलवर मिस्टर बीस्टवर २८८ मिलियन पेक्षा जास्त सबस्क्राईबर असलेले आपणास दिसून येते.याचठिकाणी टी सिरीजवर आपल्याला फक्त २६८ मिलियन सबस्क्राईबर असल्याचे दिसून येते.

मिस्टर बीस्ट यांच्या गेमिंग चॅनलवर ४४ मिलियन सबस्क्राईबर आहेत.याचसोबत बीस्ट रिॲक्ट, बीस्ट टु, बीस्ट फिलानथ्राॅपी इत्यादी सारख्या युटयुब चॅनलवर देखील मिलियन मध्ये सबस्क्राईबर असल्याचे दिसून येते.

हे सर्व स्त्रोत मिळुन मिस्टर बीस्ट महिन्याला जवळपास १० मिलियन डॉलर पेक्षा अधिक कमाई करतात. 

अमेरिकेतील ग्रीन वाईल्ड मध्ये आठ करोडपेक्षा अधिक किंमतीचे त्यांचे एक स्टुडिओ आहे तसेच एक वेअरहाऊस देखील आहे जिथे ते व्हिडिओ शुटिंग करतात.याचसोबत मिस्टर बीस्ट यांच्याकडे शंभर एकर जमीन आहे.

मिस्टर बीस्ट यांनी जेव्हा त्यांच्या युटयुब प्रवासाची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे मोठमोठी महागडी संसाधने देखील उपलब्ध नव्हती.त्यांच्याकडे फक्त एक सेकंड हॅण्ड लॅपटॉप होता.

मिस्टर बीस्ट यांनी सुरूवातीला एकदम मुलभूत विषयावर व्हिडिओ अपलोड करत होते पण त्याने त्यांच्या व्हिडिओला जास्त व्युव्ह देखील प्राप्त होत नव्हते.

पण हळुहळू त्यांनी आपल्या क्रिएटिव्ह थिंकिंगचा वापर करत आपल्या व्हिडिओ मध्ये अधिक सुधारणा घडवून आणल्या.

मिस्टर बीस्ट गेमिंग पासुन चॅलेजेस पर्यंतचे सर्व व्हिडिओ बनवायचे.अणि मिस्टर बीस्ट यांच्या मध्ये एक गुण होता ते इतर युटयुब पेक्षा वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे.

मिस्टर बीस्ट हे वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडीयांचा वापर करून सातत्याने व्हिडिओ बनवायचे.

मिस्टर बीस्ट यांच्या आयुष्याने एक वेगळे वळण तेव्हा प्राप्त झाले जेव्हा त्यांनी काऊंटींग टु वन लॅक हा व्हिडिओ बनवला होता ज्यात त्यांनी एक लाखांपर्यंतची काऊंटींग करण्यासाठी अनेक तासाचा कालावधी लावला होता.

यानंतर त्यांचा हा व्हिडिओ युटयुबवर भरपूर व्हायरल देखील झाला होता.यानंतर त्यांनी अजुन वेगवेगळ्या प्रकारचे युनिक व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली.ज्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे दान केले होते.अनेक लोकांसाठी त्यांनी चॅरीटी एव्हेंट देखील केले.

नवनवीन आयडीयावर व्हिडिओ बनवणे आपल्या दर्शकांना मोठमोठे गिफ्ट देणे यामुळे त्यांच्या सबस्क्राईबर मध्ये खुप जास्त वाढ झालेली आपणास दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button