Blog

एम यु सिग्मा स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Mu Sigma Start up business success story in Marathi 

एम यु सिग्मा स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Mu Sigma Start up business success story in Marathi 

जे हाडाचे व्यावसायिक असतात ते आपल्या व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी मोठ्यात मोठी जोखीम देखील घ्यायला तयार असतात.

अशीच एक जोखिम घेऊन बंगळूर येथे वास्तव्यास असलेल्या धीरज राजाराम यांनी स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू केला होता.

धीरज राजाराम यांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळ पुरेसे पैसे नव्हते म्हणून स्वताचे घर विकले अणि एम यु सिग्मा ह्या आपल्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली होती.

आज एम यु सिग्मा हा व्यवसाय भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया,युएस,युके इत्यादी सारख्या मोठमोठ्या देशात विस्तारलेला आहे.

आजच्या लेखामध्ये आपण एम यु सिग्मा ह्या स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

एम यु सिग्मा युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?

एम यु सिग्मा ही एक भारतीय निर्णय विज्ञान फर्म आहे.आज ही फर्म फक्त भारतातच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रसिद्ध आहे.

एम यु सिग्मा ह्या निर्णय विज्ञान फर्मची सुरूवात धीरज राजाराम यांनी २००४ मध्ये केली होती. 

एम यु सिग्मा फार्मास्युटिकल,तंत्रज्ञान अणि दुरसंचार उद्योग,एअरलाईन, हेल्थकेअर,हाॅस्पिटॅलिटी, मनोरंजन तसेच बाजारातील इत्यादी उद्योग व्यवसायात कार्यरत असलेल्या कंपन्यांना सेवा प्रदान करते.

आज अनेक मोठमोठ्या देशातील दिग्दज कंपन्या देखील एम यु सिग्मा ह्या निर्णय विज्ञान फर्मकडुन तांत्रिक सेवेचा लाभ प्राप्त करत आहेत.

एम यु सिग्मा ह्या निर्णय विज्ञान फर्मच्या वतीने संपूर्ण जगभरातील वेगवेगळ्या देशातील कंपन्यांना डेटा विश्लेषणाची सेवा प्रदान केली जाते.

एम यु सिग्मा हे फर्म कंपनींसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे तसेच साॅफ्टवेअर डेव्हलप करते.एम यु सिग्माचे मुख्यालय शिकागो इलिनोइस ह्या ठिकाणी आहे.

याचसोबत बंगलौर येथे एम यु सिग्माचे जागतिक वितरण केंद्र देखील स्थापित करण्यात आले आहे.

आतापर्यत एम यु सिग्माने जगभरातील वेगवेगळ्या देशातील ५०० पेक्षा अधिक कंपन्यांना तसेच संस्थांना डेटा विश्लेषणाची सेवा प्रदान केली आहे.

याचसोबत एम यु सिग्मा बाजारातील कंपन्यांना जोखिम विश्लेषणाची सेवा देखील प्रदान करते.ज्यात क्रेडिट स्कोअरींग करणे,फसवणुकीचा शोध लावणे, रेटिंग नुकसान इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

आज बाजारातील प्रत्येक कंपनीला स्वताला बाजारपेठेत स्थापित करण्यासाठी ह्या सेवा घेणे अनिवार्य असते.

अमेरिकेत वास्तव्यास असताना धीरज राजाराम यांनी बुज एलन हॅमिल्टन तसेच प्राईज वाॅटर हाऊस कुर्पर ह्या कंपनीचे धोरणात्मक सल्लागार होते.इथे धोरणात्मक सल्लागार म्हणून काम करताना त्यांना अनेक नवनवीन अनुभव देखील प्राप्त झाले.

अमेरिकेत वास्तव्यास असतानाच धीरज राजाराम यांच्या लक्षात आले की आपल्या भारत देशात देखील विश्लेषण कौशल्याचा वापर केला जाऊ शकतो.

धीरज राजाराम यांना त्यांच्या ह्या व्यवसाय कल्पणेवर इतका ठाम विश्वास होता की त्यांनी ह्या आयडीयावर काम करण्यासाठी स्वताचे घर विकले.

त्यातुन जे काही पैसे प्राप्त झाले त्यात त्यांनी आपल्या सेविंग मधील अजुन दोन लाख डॉलर जोडले अणि २००४ मध्ये एम यु सिग्मा ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली.

धीरज राजाराम यांनी कंपनीची नोंदणी शिकागो मध्ये केली अणि कंपनीचे एक कार्यालय बंगळूर येथे देखील सुरू केले.

एम यु सिग्माची सुरूवात केल्यानंतर धीरज राजाराम यांनी सर्वप्रथम बंगळूर येथे एक इन हाऊस ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित केला.

यानंतर त्यांनी बंगळूर येथील अनेक फ्रेशर्सला वित्तीय सेवा, फार्मास्युटिकल, तंत्रज्ञान अणि दुरसंचार उद्योग व्यवसाय, इत्यादी मध्ये विशेष ट्रेनिंग देखील प्रदान केली.

पुढे २००५ मध्ये एम यु सिग्मा कंपनीने मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्दज कंपनीसोबत एक करार केला.इथुनच एम यु सिग्माने उंच भरारी घेतली.

आज एम यु सिग्माच्या क्लाईट यादीमध्ये डेल, वाॅलमार्ट,पी फिजर आय एनसी इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.आज एम यु सिग्मा कंपनीमध्ये चार हजार पेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.

आज हे सर्व कर्मचारी बंगलौर पासुन शिकागो, ऑस्ट्रेलिया,ब्रिटन इत्यादी जगातील मोठमोठ्या देशांपर्यत पसरलेले आहेत.

२०१३ मध्ये मास्टर कार्ड ह्या कंपनीने एम यु सिग्मा मध्ये ४५ मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली होती.आज एम यु सिग्मा ह्या कंपनीचे एकुण बाजार मुल्यांकन १.५ बिलियन डॉलर्स पेक्षा अधिक आहे.

एम यु सिग्मा ही आपल्या भारत देशातील तिसरी युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी आहे.जी व्यावसायिकांच्या समस्येचे निराकरण करते.

कंपनीची सुरूवात केली तेव्हा सुरूवातीचे चार वर्ष धीरज राजाराम यांनी स्व खर्चातुन कंपनी चालवली.मग चार वर्षांनंतर एम यु सिग्मा मध्ये एफ टिव्ही कॅपिटलने ३० मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली.

यानंतर २०११ मध्ये सिकोया कॅपिटलने कंपनीत २५ मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली.यानंतर २०१३ मध्ये मास्टर कार्डने देखील एम यु सिग्मा मध्ये ४५ मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली.

यानंतर कंपनीचे बाजार मुल्यांकन १ अरब डाॅलरपेक्षा अधिक झाले अणि एम यु सिग्माने देशातील युनिकाॅन स्टार्ट अप व्यवसायाच्या यादीत आपले नाव नोंदवले.

एक वेळ अशी होती की एम यु सिग्माकडे फक्त एकच क्लाईट उपलब्ध होता.पण आज एम यु सिग्मा ५०० संस्थांच्या २०० पेक्षा जास्त कंपन्यांना आपली सेवा प्रदान करते.

ज्यात डेल,वाॅलमार्ट तसेच एअरलाईन फास्ट फूड जगतातील अनेक दिग्दज कंपन्या देखील समाविष्ट आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button