ओबेरॉय हॉटेलची यशोगाथा Oberoi hotel success story in Marathi
ओबेरॉय हॉटेलची यशोगाथा Oberoi hotel success story in Marathi
ओबेरॉय ह्या हाॅटेलचे नाव आपल्याला भारतात कधी ना कधी ऐकायला मिळाले असेलच.आज ओबेरॉय हॉटेल फक्त भारतातच नव्हे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये उपलब्ध आहे.
आज ओबेरॉय हॉटेलने जे काही यश प्राप्त केले आहे आपल्या उद्योग व्यवसायाचा वेगवेगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे.
हे सर्व ओबेरॉय हॉटेलचे मालक मोहनसिंग ओबेरॉय यांना कुठल्याही वारशात प्राप्त झाले नव्हते.मोहनसिंग ओबेरॉय यांनी जवळ फक्त २५ रूपये शिल्लक असताना ह्या हाॅटेलचा पाया रचला होता.
एकवेळ अशी होती की ओबेरॉय हॉटेलचे मालक मोहनसिंग ओबेरॉय यांना कुठलीही चांगली नोकरी प्राप्त होत नव्हती.
तेव्हा मोहनसिंग ओबेरॉय यांनी त्यांचा अणि त्यांच्या आईचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका बुटांच्या कारखान्यात काही काळ मजदुरी केली होती.
पण आज आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मोहनसिंग ओबेरॉय यांनी अरबो रूपयांचे साम्राज्य स्थापित केले आहे.
आजच्या लेखामध्ये आपण जवळ फक्त २५ रूपये असताना मोहनसिंग ओबेरॉय यांनी ओबेरॉय हॉटेल सारखे अरबो रूपयांचे साम्राज्य कसे उभे केले?ओबेरॉय हॉटेलच्या यशाचे रहस्य काय आहे हे जाणुन घेणार आहोत.
ओबेरॉय हॉटेलचे मालक राय बहादुर मोहनसिंग ओबेरॉय यांचा जन्म १५ ऑगस्ट १८९८ रोजी वर्तमान पाकिस्तान मधील झेलम नदीवर वास्तव्यास असलेल्या एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता.
मोहनसिंग अवघ्या सहा महिन्यांचे होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.अशा परिस्थितीत मुलांचे संगोपन करण्याची,घर चालवण्याची सर्व जबाबदारी त्यांच्या आईवर आली होती.
त्यावेळी एकट्या महिलेने स्वता आपले घर चालवणे आपल्या मुलाबाळांचे कुटुंबाचे पोट भरणे एक खुप मोठी गोष्ट होती.
मग अशा अवघड परिस्थितीत सापडल्यानंतर आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर मोहनसिंग ओबेरॉय रावळपिंडी येथे गेले.
तिथे त्यांनी एका सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला.अणि त्या़ंचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
मग महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहनसिंग ओबेरॉय त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एक चांगली नोकरी शोधू लागले.
पण खुप प्रयत्न केल्यावर देखील मोहनसिंग ओबेरॉय यांना कुठल्याही चांगल्या ठिकाणी नोकरी प्राप्त झाली नाही.
मग नोकरीच्या शोधात वणवण भटकत असलेल्या मोहनसिंग ओबेरॉय यांना त्यांच्या एका मित्राने टायपिंग तसेच स्टेनोग्राफरचे काम शिकण्याचा सल्ला दिला.
मग आपल्या मित्राचे ऐकुन त्यांनी अमृतसर मधील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये टायपिंग शिकणे सुरू केले.पण
कालांतराने त्यांच्या लक्षात आले की याने देखील त्यांना चांगली नोकरी प्राप्त होऊ शकत नाही.
टायपिंग शिकुन देखील आपल्याला नोकरी मिळणार नाही हे कळल्यावर मोहनसिंग ओबेरॉय खुपच निराश झाले.
मोहनसिंग ओबेरॉय यांच्या डोक्यात एकच विचार चालु होता.त्यांना कुठल्याही परिस्थितीत छोटी मोठी का होईना पण एक नोकरी प्राप्त व्हायला हवी.
जेणेकरून त्यांना आपल्या आईला आर्थिक मदत करता येईल.अणि तिच्यावरील खर्चाचे ओझे देखील कमी करता येईल.
खुप शोधाशोध करूनही जेव्हा मोहनसिंग ओबेरॉय यांना एकही नोकरी मिळाली नाही नसल्याने त्यांना अमृतसर मध्ये वास्तव्य करणे अवघड झाले होते.
कारण तेथे राहण्यासाठी त्यांच्याकडे पर्याप्त पैसे नव्हते.अणि अमृतसर शहरात महागाई जास्त असल्याने त्यांना खर्च देखील खूप जास्त करावा लागत होता.
मग जेव्हा मोहनसिंग ओबेरॉय यांच्या खिशातील सर्व पैसे संपले तेव्हा मोहनसिंग ओबेरॉय पुन्हा आपल्या गावाकडे परत आले.
त्यावेळी मोहनसिंग ओबेरॉय यांच्या डोक्यात हाच एक विचार सुरू होता.त्यांना कुठल्याही परिस्थितीत नोकरी प्राप्त करायची आहे.
मग खुप शोधाशोध केल्यावर पाहीजे तशी नोकरी न मिळाल्याने नाइलाजाने त्यांनी आपल्या काकांच्या सांगण्यावरून शिक्षण झालेले असताना देखील त्यांनी लाहोर येथील एका बुटांच्या कारखान्यात मजदुरी करण्यास सुरुवात केली.
ही नोकरी करण्याचे त्यांचे अजिबात मन नव्हते पण पैसे कमविण्यासाठी त्यांना ती नोकरी करावी लागली.म्हणुन मोहनसिंग ओबेरॉय यांनी कारखान्यात काम करणे सुरू ठेवले.
पण नशिबाच्या पुढे कोणाचे काहीही चालत नाही हेच मोहनसिंग ओबेरॉय यांच्या बाबतीत देखील झाले.
काही कालावधीनंतर लाहौर मधील ज्या बुटांच्या कारखान्यात मोहनसिंग ओबेरॉय मजदुरी करत होते तो कारखानाच बंद पडला.
यामुळे मोहनसिंग ओबेरॉय पुन्हा नोकरीच्या शोधात वणवण भटकू लागले.मग कुठेही नोकरी न मिळाल्याने ते पुन्हा आपल्या गावी परतले.
गावी परतल्यावर १९२० मध्ये त्यांचा विवाह कोलकत्ता येथील एका मुलीशी झाला.त्यावेळी मोहनसिंग ओबेरॉय यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी नव्हती.
तसेच त्यांच्याकडे कुठलीही वडिलोपार्जित वारसा संपत्ती देखील नव्हती.पण असे असताना देखील त्यांच्या सासरयाने त्यांच्या मुलीचा हात मोहनसिंग ओबेरॉय यांच्या हातात दिला.
मोहनसिंग ओबेरॉय यांच्या मते त्यांच्या सासरयाला त्यांचा स्वभाव अणि व्यक्तीमत्व आवडले होते म्हणून मोहनसिंग यांच्याजवळ कुठलीही संपत्ती तसेच नोकरी नसताना देखील त्यांनी आपल्या मुलीचा हात मोठ्या विश्वासाने त्यांच्या हातात दिला होता.
मग लग्न झाल्यानंतर मोहनसिंग ओबेरॉय यांचा अधिकतम वेळ सासुरवाडीतच जात असे.
याचदरम्यान प्लेगची साथ पसरली होती अणि सासुरवाडीतुन जेव्हा ते आपल्या गावी परतले तेव्हा त्यांनी बघितले गावात सर्वत्र प्लेगची साथ पसरली आहे.
ह्या परिस्थितीत त्यांना आपल्या आईसोबत गावीच राहायचे होते पण त्यांच्या आईने त्यांना स्पष्टपणे नकार दिला.आईने सांगितले की तु आपल्या सासुरवाडीला परत जा अणि तिथेच एखादी नोकरी कर.
कारण गावात राहिल्यास मोहनसिंग ओबेरॉय यांना देखील प्लेग होण्याची शक्यता होती.शेवटी मोहनसिंग ओबेरॉय यांना आपल्या आईचे बोलणे ऐकावे लागते.
अणि ते त्यांचे सर्व सामान कपडे वगैरे एका बॅगमध्ये भरून पुन्हा सासुरवाडीकडे जाण्यासाठी निघाले.जाताना त्यांच्या आईने त्यांच्या हातात २५ रूपये दिले.
जेव्हा मोहनसिंग ओबेरॉय यांच्या आईने त्यांच्या हातात ते २५ रूपये ठेवले होते तेव्हा त्यांनी विचार देखील केला नव्हता ह्याच २५ रूपयात ते भविष्यात करोडोंचे साम्राज्य उभे करणार आहे.
मग पुन्हा सासुवाडीला आल्यावर मोहनसिंग घरबसल्या नोकरीचा शोध घेऊ लागले.तेव्हा वर्तमानपत्रात त्यांना एक जाहिरात दिसते.त्या जाहिरातीमध्ये लिपिक पदाच्या सरकारी नोकरी विषयी सांगितले होते.
मोहनसिंग ओबेरॉय यांना ही लिपिकची नोकरी त्यांच्यासाठी योग्य वाटली म्हणून त्यांनी ठरवले की शिमला येथे जाऊन आपण ह्या नोकरीसाठी परीक्षा द्यायची.
मग आईने हातात दिलेल्या २५ रूपयात ते शिमला येथे क्लार्कच्या पदाची नोकरी प्राप्त करण्यासाठी तेथे परीक्षा देण्यासाठी जातात.
त्या परीक्षेसाठी मोहनसिंग यांनी कुठलीही पुर्व तयारी देखील केली नव्हती.पण त्यांना ह्या परीक्षेत बसुन स्वताचे नशीब एकदा का होईना आजमावून बघायचे होते.
त्याकाळी शिमला हे इंग्रजांच्या राजवटीची राजधानी होते.याचमुळे तिथे मोठमोठ्या इमारती तसेच हाॅटेल पाहायला मिळायचे.
शिमला येथे ज्या क्लार्कच्या पदाची नोकरी प्राप्त करण्यासाठी मोहनसिंग परीक्षा देण्यासाठी गेले होते त्या परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले.
पण याचदरम्यान त्यांच्या नशिबाने त्यांना त्या दरवाज्यावर आणुन ठेवले जिथुन त्यांच्यासाठी यशाचे रस्ते खुले होणार होते.
शिमला येथे फिरताना मोहनसिंग ओबेरॉय त्यावेळच्या सर्वात प्रसिद्ध हाॅटेलात सिसिल मध्ये गेले.त्यावेळी मोहनसिंग तिथे राहण्यासाठी नव्हे तर काम शोधण्यासाठी गेले होते.
एवढ्या मोठ्या हाॅटेलात नोकरी मिळणे शक्य नाही हे मोहनसिंग यांना माहीत होते तरी देखील ते नोकरीसाठी एक प्रयत्न करण्यासाठी तिथे गेले होते.
ह्यावेळी मोहनसिंग ओबेरॉय यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली अणि हाॅटेलच्या मॅनेजरने त्यांना नोकरीवर ठेवून घेतले.
तिथे त्यांना ४० रूपये महिन्याने क्लार्कची नोकरी मिळाली होती.मग मोहनसिंग त्याच हाॅटेलात राहुन नोकरी करु लागले.
हाॅटेलात नोकरी करत असताना आपल्या कामामुळे त्यांना बढती प्राप्त होत गेली कधी हाॅटेलात त्यांनी मॅनेजर,स्टोअर किपर इत्यादी पदावर काम केले.
हाॅटेलातील क्लार्क, मॅनेजर स्टोअर किपर हे तिन्ही कामे मोहनसिंग एकटे सांभाळत होते.आपल्या ह्या कठोर परिश्रमाने प्रामाणिकपणाने तेथील हाॅटेल मालकांचे मन जिंकून घेतले.
एकदा सिसिल हाॅटेलचे मॅनेजर काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तेव्हा मॅनेजरच्या अनुपस्थितीत सिसील हाॅटेल मधील मॅनेजरचे काम मोहनसिंग ओबेरॉय यांना सोपविण्यात आले होते.
ह्या कालावधीत मोहनसिंग ओबेरॉय यांनी हाॅटेलच्या नफ्यात दुप्पट वाढ केली.यामुळे त्यांच्या कामाने खुश झालेल्या हाॅटेल मालकाने त्यांना कॅशिअरचे काम दिले.
हळुहळू त्यांचे वेतन देखील ४० रूपये वरून ५० रूपये करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांची हाॅटेल मध्येच राहण्याची सोय देखील करण्यात आली.
राहण्याची सोय झाल्यावर मोहनसिंग ओबेरॉय यांनी त्यांच्या पत्नी इसार देवी यांना देखील शिमला येथे त्यांच्या समवेत राहण्यासाठी आणले.
हाॅटेल मध्ये काम करत असताना मोहनसिंग अणि त्यांच्या पत्नी हाॅटेल करीता लागणारा भाजीपाला खरेदी करण्यासाठी स्वता बाजारात जात होते.
याचदरम्यान पंडित मोतीलाल नेहरू सीसीर हाॅटेल मध्ये गेले.याचदरम्यान त्यांनी मोहनसिंग यांना एक महत्वाचे टायपिंगचे काम दिले.
मोहनसिंग ओबेरॉय यांनी ते टायपिंगचे काम रात्रभर जागून पुर्ण केले.त्यांच्या ह्या कामावर खुश होऊन पंडित मोतीलाल नेहरू यांनी त्यांना एक शंभरची नोट बक्षिस म्हणून दिली.
मोहनसिंग ओबेरॉय ज्या सीसीर हाॅटेल मध्ये काम करत होते ते हाॅटेल एका ब्रिटीश दांपत्याने सुरू केले होते.त्यामुळे जेव्हा भारतातील ब्रिटिशांची पकड कमकुवत होऊ लागली तेव्हा त्या ब्रिटीश दांपत्याने हाॅटेल बंद करण्याचा अणि भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी हाॅटेलचे मालक असलेल्या त्या ब्रिटीश दांपत्याने मोहनसिंग ओबेरॉय यांच्यासमोर २५ हजार रुपये मध्ये आपले हाॅटेल खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला.
पण त्यावेळी मोहनसिंग ओबेरॉय यांच्याकडे एवढे पैसे नव्हते म्हणून त्यांनी पैसे जमविण्यासाठी थोडा वेळ मागितला.
मोहनसिंग यांच्याकडे तेव्हा पैसे नव्हते पण त्यांनी विचार केला की हे हाॅटेल त्यांनी खरेदी केले तर त्यांचे नशिब बदलून जाईल.
मग त्यांनी इकडुन तिकडून पैसे जमविण्यास सुरूवात केली.हाॅटेल खरेदी करण्यासाठी पैसे जमविण्यासाठी मोहनसिंग यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने तसेच वडिलोपार्जित संपत्ती देखील विकली.
अणि असे करत पाच वर्षाच्या आत सर्व रक्कम त्यांनी हाॅटेल मालकाच्या ताब्यात दिली.मग १४ ऑगस्ट १९३४ रोजी सिसील हाॅटेल मोहनसिंग यांचे झाले.
मग सिसील हाॅटेल खरेदी केल्यानंतर मोहनसिंग ओबेरॉय यांनी मागे वळून बघितले नाही.
पुढे १९४७ मध्ये त्यांनी ओबेरॉय पाल्म बीच हाॅटेल सुरू केले.याचसोबत त्यांनी मर्क्युरी ट्रॅव्हल नावाची एक ट्रॅव्हल एजन्सी देखील सुरू केली.
यानंतर १९४९ मध्ये मोहनसिंग यांनी ईस्ट इंडिया हाॅटेल लिमिटेड नावाची एक हाॅटेल कंपनी देखील सुरू केली.
दर्जिलिंग येथील अनेक पर्यटक क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी हाॅटेल्सची खरेदी केली.
१९६६ मध्ये मोहनसिंग ओबेरॉय यांनी मुंबई मध्ये स्वताचे ३४ ते ३६ मजली हाॅटेल्स उभारले.मुंबई येथे हाॅटेल उभारण्यासाठी त्यांना १८ करोड इतकी किंमत मोजावी लागली होती.
१९५९ मध्ये मोहनसिंग ओबेरॉय यांनी फ्लाईट मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अन्न उपलब्ध करून देण्यासाठी एक केटरींग सर्विस सुरू केली होती.
अणि १९६० मध्ये भारतातील पहिले फाईव्ह स्टार हॉटेल ओबेरॉय हॉटेल सुरू केले.
हळुहळू मोहनसिंग ओबेरॉय देशातील सर्वात मोठ्या हाॅटेल उद्योजकांपैकी एक बनले.अणि आज ओबेरॉय हॉटेल बाजारातील सगळ्यात मोठे हॉटेल गृप म्हणून ओळखले जाते.
आज मोहनसिंग ओबेरॉय ह्या जगात नाहीये पण त्यांनी ओबेरॉय हॉटेलचा जो काही पाया रचला होता.आज तो अधिक मजबूत झालेला आपणास दिसून येतो.
आज ओबेरॉय गृपचा टर्न ओव्हर १५०० करोडपेक्षा अधिक आहे.आज ओबेरॉय गृपचे भारतातच नव्हे तर जगभरातील वेगवेगळ्या ३५ पेक्षा अधिक देशांमध्ये हाॅटेल उपलब्ध आहेत.
ज्यात मलेशिया, माॅरिशस,सौदी अरब, इंडोनेशिया इत्यादी सारख्या मोठमोठ्या देशांचा समावेश आहे.
भारतात दिल्ली, मुंबई, बंगलौर, शिमला,गुरगाव,सवाई माधवपुर इत्यादी ठिकाणी ओबेरॉय हाॅटेलच्या शाखा उपलब्ध आहेत.
आज हाॅटेल इंडस्ट्रीचे जनक मोहनसिंग ओबेरॉय यांनी उभ्या केलेल्या ह्या व्यवसायाची धुरा १९८० पासुन त्यांचे पुत्र विकास ओबेरॉय सांभाळत आहेत.
विकास ओबेरॉय यांनी १९८० मध्ये ह्या व्यवसायाला पुढे नेण्यास सुरुवात केली.तेव्हा त्यांनी इंडोनेशिया, मलेशिया सिंगापूर, माॅरिशस इत्यादी सारख्या देशात पर्यटक इंडस्ट्री खुप सुधारीत आहे.म्हणून त्यांनी ह्या देशांमध्ये आपले हाॅटेल उभारले.
ओबेरॉय हॉटेल मध्ये ग्राहकाने प्रवेश केल्यापासून तो चेक आऊट करण्या पर्यंत सर्व गरजांकडे विशेष लक्ष दिले जाते.