ओला कॅब स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Ola cab Start up business success story in Marathi
ओला कॅब स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Ola cab Start up business success story in Marathi
२०१० मध्ये ओलाचे संस्थापक भावेश अग्रवाल यांना बंगलोर येथुन बांदीपुर येथे जायचे होते तेव्हा त्यांनी ऑनलाईन एक लोकल टॅक्सी बुक केली.पण त्या टॅक्सीची सर्विस खूप खराब होती.
लोकल टॅक्सीने प्रवास करत असताना टॅक्सी ड्रायव्हरने भावेश अग्रवाल यांच्याकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली.
पण भावेश अग्रवाल यांनी त्या टॅक्सी ड्रायव्हरला अतिरिक्त पैसे देण्यास स्पष्टपणे नकार दिला.म्हणुन टॅक्सीच्या ड्रायव्हरने भावेश अग्रवाल यांना भर रस्त्यात टॅक्सी मधुन उतरवून दिले.
एवढेच नव्हे तर त्या टॅक्सीचा ड्रायव्हर भावेश अग्रवाल यांच्यासोबत व्यवस्थित देखील बोलला नाही त्यांनी भावेश अग्रवाल यांच्याशी एकदम उद्धटपणे वर्तवणुक केली.
भावेश अग्रवाल यांना लोकल टॅक्सी प्रवास करत असताना प्राप्त झालेल्या एका वाईट अनुभवामुळे भावेश अग्रवाल
यांच्या मनात विचार आला की जे आज माझ्यासोबत घडले आहे ते रोज इतर लोकांसोबत देखील घडत राहील.
म्हणुन त्यांनी विचार केला की आपण यावर काहीतरी तोडगा काढणे गरजेचे आहे नाहीतर रोज सर्वसामान्य लोकांना अशा खराब अनुभवाला सामोरे जावे लागेल.
म्हणुन भावेश अग्रवाल यांच्या डोक्यात सर्वसामान्य लोकांसाठी एक सेफ अणि सुरक्षित टॅक्सी सर्विस सुरू करण्याचा विचार आला.
तेव्हा वर्ष २०१० भावेश अग्रवाल यांनी त्यांचे मित्र अंकित भाटी यांच्यासोबत मिळुन ओला कॅबची सुरूवात केली.भावेश अग्रवाल यांना ओला सर्विसचा भारतात सगळीकडे विस्तार करायचा होता.
८ डिसेंबर २०१० रोजी ओला कॅब सर्विसची मुंबई मध्ये सुरूवात करण्यात आली होती.ओलाने फक्त दोन वर्षांच्या कालावधीत आपले वर्चस्व टॅक्सी बुकिंग मध्ये निर्माण केले होते.
सुरूवातीला नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या भावेश अग्रवाल यांच्या कुटुंबीयांचा देखील विरोध होता.
पण जेव्हा ओला कॅबला त्यांची पहिली फंडिग स्नॅपडिलचे फाऊंडर यांच्याकडून प्राप्त झाली तेव्हा त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना सपोर्ट करू लागले.
ओलाने स्वताच्या कारचा वापर न करता थर्ड पार्टी कारचा आपल्या कंपनीमध्ये कॅब सर्विस देण्यासाठी वापर केला.
सुरूवातीला भावेश अग्रवाल अणि त्यांची टीम फक्त फोन काॅलदवारे बुकिंग स्वीकारत होती.नंतर त्यांनी बाजारात लोकांना ऑनलाईन देखील कॅब बुक करता यावी म्हणून ओला कॅबची एक अधिकृत मोबाईल ॲप देखील लाॅच केली.
२०१५ मध्ये ओला कॅबचे भारतात खुप मोठे मार्केट शेअर होते.अणि ओला कॅब भारतातील १०० पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध देखील झाले होते.
ओला कॅबचे फाऊंडर भावेश अग्रवाल यांनी आयटी बाॅम्बे इथून २००४ मध्ये कंप्युटर सायन्स मध्ये बीटेकची पदवी प्राप्त केली होती.अणि यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट इंडिया मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.
पुढील दोन वर्षांपर्यंत त्यांनी मायक्रोसॉफ्ट इंडिया मध्येच नोकरी केली.मग २०१० मध्ये त्यांना टेक्सीने प्रवास करताना प्राप्त झालेल्या एका वाईट अनुभवामुळे त्यांनी नोकरी सोडली अणि २०१० मध्ये ओला कॅब सर्विसची सुरूवात केली.
भावेश अग्रवाल यांचे बिझनेस मॉडेल सर्वसामान्य लोकांसाठी होते.जे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले होते.अणि हेच ओलाच्या यशाचे सर्वात मोठे सिक्रेट देखील होते.
ओला कंपनी अधिक प्रगती करत गेली अणि वर्ष २०१७ मध्ये भावेशने ओला इलेक्ट्रिक नावाची एक कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.ही कंपनी इलेक्ट्रिक बाईक बनवत असत.
कारण भावेश अग्रवाल यांना माहीत होते की भविष्यात पेट्रोल डिझेल बंद होईल अणि इलेक्ट्रिक वाहनांची सुरूवात होईल.म्हणुन त्यांनी २०१७ मध्ये घोषणा केली की ते ओलाची इलेक्ट्रिक स्कुटर बनवणार आहे.
पुढे २०१८ मध्ये भावेश अग्रवाल यांनी त्यांचे इलेक्ट्रिक वाहन लाॅच केले.ज्याचे नाव ओला एस वन असे होते.यात सर्व गोष्टी परफेक्ट ज्यामुळे ओला एसवन सर्वांना मात देत बाजारात प्रसिद्ध देखील झाली.
अणि मग २०१९ मध्ये २ हजार करोडचे नेटवर्थ बनवत ओला देशातील एक युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी बनली.
आज ओला कॅबकडे १५ लाखापेक्षा अधिक ड्रायव्हर उपलब्ध आहेत.अणि आज ओला कॅब भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया,न्युझीलंड युके मधील सर्वात प्रसिद्ध राईड शेअरींग कंपनी बनली आहे.