Blog

पॅनासोनिक कंपनीची यशोगाथा Panasonic success story in Marathi 

पॅनासोनिक कंपनीची यशोगाथा Panasonic success story in Marathi 

१२५ वर्षांपूर्वी जपानमधील एका कंपनीत एक मुलगा काम करत होता.त्या मुलाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बनविण्याची खुपच हौस तसेच आवड होती.

एकेदिवशी त्या मुलाने विश्रांतीच्या वेळेत एक इलेक्ट्रिक साॅकेट तयार केले.अणि साॅकेट बनवून आपल्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारीला दाखविले.

तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी म्हणतो हे साॅकेट काही कामाचे नाहीये तु नको ते काम करणे बंद कर अणि जे काम तुला देण्यात आले आहे फक्त तेवढेच करत जा.

त्या मुलाला त्याने बनवलेल्या इलेक्ट्रिक डिव्हाईस वर पुर्ण विश्वास होता.म्हणून त्याने कंपनीतील नोकरी सोडली अणि त्याच्याकडे जेवढीही रक्कम शिल्लक होती त्यामध्ये घरीच छोटासा कारखाना सुरू करत काही इलेक्ट्रिक साॅकेटचे प्रोडक्ट्स तयार केले.

अणि रोज मार्केट मध्ये जाऊन लोकांना त्याचे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी कन्व्हेयन्स करू लागला.तो लोकांना सांगत असे हे प्रोडक्ट खूप उत्तम आहे याचा अमुक गोष्टींसाठी वापर केला जातो आपण हे खरेदी करा.

पण दिवसभर वणवण भटकंती करूनही कोणीही त्याचे प्रोडक्ट खरेदी करत नव्हते.मग निराश होऊन तो मुलगा पुन्हा घरी जात असे.

त्या मुलावर एकवेळ अशी आली की त्याच्याकडे दोन वेळचे जेवण करण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते.त्याला त्याच्या घरातील सामान विकुन आपला उदरनिर्वाह करावा लागला होता.

तरी देखील त्यामुलाने हार न मानता आपले कार्य सुरू ठेवले.मग एकेदिवशी त्या मुलाकडे हजार पीस साॅकेटची एक मोठी ऑडर आली.

आपल्याला पहिली मोठी ऑडर प्राप्त झाल्यानंतर त्या मुलाने आयुष्यात पुन्हा कधीच मागे वळून बघितले नाही.आज त्याने यशाची अनेक शिखरे पार केली आहेत.

आज पुर्ण जग त्या मुलाला कोनोसुके ह्या नावाने ओळखते.

आज संपूर्ण जगात कोनोसुके यांच्या पॅनासोनिक नामक कंपनीने तयार केलेल्या प्रोडक्टचा वापर केला जातो.

आजच्या लेखामध्ये आपण कोनोसुके यांच्या पॅनासोनिक कंपनीची संपूर्ण यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

एका छोट्याशा मजदुराने कशी उभी केली ७० बिलियन डॉलर्सची कंपनी?

२७ नोव्हेंबर १८९४ मध्ये जपान मधील वाकायामा प्रिफॅक्चर येथे पॅनासोनिक कंपनीचे मालक कोनोसुके मतसुशिता यांचा जन्म झाला होता.

कोनोसुके मतसुशिता हे त्यांच्या पाच बहिणी अणि तिन्ही भावांमध्ये सर्वात लहान होते.सुरूवातीचे काही वर्ष त्यांच्या अगदी सुखात अणि आनंदात पार पडले.

पण जेव्हा कोनोसुके चार वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना व्यवसायात खूप मोठे नुकसान झाले होते.

ज्यामुळे त्यांना त्यांची सर्व संपत्ती देखील विकावी लागली.

एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या गावाकडचे घर देखील सोडुन जावे लागले होते.अणि कामाच्या शोधात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शहरात यावे लागले होते.

पण शहरात आल्यानंतर देखील कोनोसुके यांच्या परिवाराच्या आर्थिक परिस्थिती मध्ये कुठलीही सुधारणा झाली नव्हती.

एकवेळ अशी आली की त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली होती की फक्त ९ वर्षाचे असताना कोनोसुके यांना त्यांचे शिक्षण सोडून द्यावे लागले होते.

अणि त्यानंतर त्यांनी एका दुकानात काम करायला सुरुवात केली होती.पण काही दिवसातच बाजारात मंदी आल्याने दुकानाच्या मालकाने त्यांना कामावरून काढून टाकले.

ज्यामुळे कोनोसुके मतसुशिता हे पुन्हा कामाच्या शोधात वणवण भटकू लागले.कामाच्या शोधात वणवण भटकल्यावर एका सायकलच्या दुकानात कोनोसुके यांना नोकरी मिळाली.

सायकलच्या दुकानात काम करत असताना कोनोसुके अनेक महत्वपूर्ण गोष्टी शिकले.पण त्यांना कायमस्वरूपी सायकलच्या दुकानात काम करायचे नव्हते.

म्हणून सायकलच्या दुकानात नोकरी करत असताना त्यांनी वेगवेगळ्या कंपनीत नोकरीचा शोध घेऊ लागले.अणि मग तब्बल पाच वर्षे सायकलच्या दुकानात काम केल्यानंतर अचानक त्यांनी एकेदिवशी वर्तमानपत्रात ओसाका इलेक्ट्रिक लाईट कंपनीची एक जाहीरात वाचली.

मग कोनोसुके यांनी ओसाका इलेक्ट्रिक लाईट कंपनीत नोकरीसाठी अर्ज देखील केला.अणि नशिबाने त्यांना तिथे नोकरी प्राप्त झाली.

ओसाका इलेक्ट्रिक लाईट कंपनीत काम करताना कोनोसुके यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकावयास मिळाल्या.

कोनोसुके यांना इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात खूप रूची होती म्हणून ते कामा दरम्यान जेवणाची सुटटी झाल्यावर त्या रिकाम्या वेळात इलेक्ट्रॉनिक विषयी माहीती असलेल्या पुस्तकांचे वाचन करायचे.

अणि पुस्तक वाचन केल्याने प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या बळावर वेगवेगळे प्रयोग देखील करत होते.कोनोसुके हे खुप मेहनती होते ते कामातील छोटयात छोट्या गोष्टी देखील अत्यंत बारकाईने अणि व्यवस्थित समजून घेत होते.

कोनोसुके यांची कामातील निष्ठा प्रामाणिकपणा आणि मेहनत बघुन तब्बल पाच वर्षांनंतर त्यांची कंपनीत टेक्निकल इन्स्पेक्टर म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती.

त्यावेळी कोनोसुके मतसुशिता यांचे वय फक्त २० वर्ष इतके होते.तरी देखील एवढ्या कमी वयात आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी एवढे मोठे पद कंपनीत प्राप्त केले होते.

कोनोसुके यांच्या मेहनती अणि कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा निष्ठा हया गुणांमुळे हळूहळू त्यांचे दारिद्रय दुर झाले.अणि ते कंपनीत काम करत चांगली कमाई करू लागले होते.

पण कोनोसुके मतसुशिता यांची महत्वाकांक्षा खूप मोठी होती त्यामुळे ते नेहमी रिकाम्या वेळात काही ना काही नवीन प्रयोग करत असत.

एकेदिवशी असेच नेहमीप्रमाणे प्रयोग करता करता त्यांनी एक इलेक्ट्रिक साॅकेट तयार केले.अणि मोठ्या उत्साहाने ते त्यांच्या कंपनीतील सुपरवायजर यांना ते साॅकेट दाखवण्यासाठी गेले.

पण कंपनीतील सुपरवायजर कोनोसुके यांनी तयार केलेले साॅकेट बाजारात अजिबात चालणार नाही असे त्याला सांगतात अणि ते रिजेक्ट करतात.

तसेच तुला जे काम दिले आहे तेवढेच करत जा विनाकारण असे नसते प्रयोग करत जाऊ नको अशी ताकीद देखील देतात.पण कोनोसुके यांचा त्यांनी तयार केलेल्या प्रोडक्टवर ठामपणे विश्वास होता.

म्हणुन कोनोसुके यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला अणि नोकरी सोडून त्यांनी बचत केलेल्या पैशांतून काही संसाधनांची खरेदी केली.

स्वताची एक टीम तयार केली ज्यात त्यांच्या पत्नी अणि भावंड अणि कामावरील सहकारींचा देखील समावेश होता.

ह्या सर्वांसोबत मिळुन कोनोसुके यांनी घरातुनच एक छोटीशी कंपनी सुरू करत साॅकेट तयार करणे सुरू केले.त्यांनी त्यांच्या अपार्टमेंट मधील दोन रूम मध्येच एक छोटेस शाॅप चालु केले.

अणि बाजारात विक्रीसाठी बसुन त्यांच्या प्रोडक्टची विक्री करू लागले.त्यांनी लोकांना कन्व्हेयन्स करण्याचा खुप प्रयत्न केला पण पण सुरूवातीला कोनोसुके यांच्याकडील प्रोडक्ट खरेदी करण्यास कोणीही तयार होत नव्हते.

त्यामुळे त्यांना दिवसभर प्रोडक्टच्या विक्रीसाठी वणवण भटकंती करून पुन्हा रिकाम्या हाती घरी परतावे लागत होते.

प्रोडक्टची विक्री होत नाहीये हे बघुन त्यांच्यासोबत जे कर्मचारी कामाला होते त्यांनी देखील त्यांच्यासोबत काम करणे सोडले.

कोनोसुके यांनी नोकरी सोडुन दिली होती त्यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी इतर कुठलेही साधन उपलब्ध नव्हते बाजारात त्यांचे प्रोडक्ट देखील कोणी खरेदी करत नव्हते.

त्यामुळे त्यांना खिशात पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आली होती.एक वेळ अशी आली की त्यांच्याकडे दोन वेळचे जेवण करण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते.

त्यांना काही दिवस त्यांच्या घरातील सामान विकुन आपला उदरनिर्वाह करावा लागला होता.या दरम्यान कोनोसुके यांच्या मनात विचार आला की आपण हे सर्व सोडुन जुनी नोकरीच करणे योग्य ठरेल.

पण एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये देखील कोनोसुके यांनी हार मानली नाही.कोनोसुके यांना त्यांच्या प्रोडक्टवर ठामपणे विश्वास होता.

त्यामुळे त्यांनी कित्येकदा नकार मिळुन देखील आपले कार्य करणे बंद केले नाही.त्यांनी आपले प्रोडक्ट बनवणे अणि त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करणे सुरूच ठेवले.

ह्या दरम्यान कोनोसुके यांनी त्यांच्या प्रोडक्टवर नवनवीन प्रयोग देखील केले.त्यांनी भरपूर प्रोडक्ट तयार केले.

ज्यातील एका प्रोडक्टमुळे त्यांचे पुर्ण आयुष्यच बदलून गेले.

खुप दिवस मेहनत करून कोनोसुके यांनी पंख्यासाठी एक इंसुलेशन प्लेट तयार केली होती.हया इंसुलेशन प्लेटची बाजारात खुपच मागणी होती.

त्यामुळे हया प्रोडक्टची विक्री करून त्यांनी भरपूर पैशांची कमाई केली ज्यामुळे त्यांचे दारिद्रय देखील दूर झाले.

पुढे ७ मार्च १९१८ रोजी कोनोसुके यांनी स्वताची एक कंपनी सुरू केली जिचे नाव मतसुशिता इलेक्ट्रिक देखील सुरू केली जिचे रूपांतर नंतर पॅनासोनिक मध्ये करण्यात आले होते.

कोनोसुके यांनी तयार केलेले इंसुलेशन प्लेटची बाजारात उत्तमरीत्या विक्री सुरू होती तरी देखील कोनोसुके यांच्या डोक्यात इलेक्ट्रिक साॅकेटचाच विचार सुरू होता.

मग कोनोसुके यांनी बाजारातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या साॅकेटला रिडिझाईन केले.यानंतर त्यांना टु वे साॅकेट,अटॅचमेंट प्लग असे दोन खुप यशस्वी प्रोडक्ट प्राप्त झाले.

त्यांनी तयार केलेले हे प्रोडक्ट त्यांच्या लाईट साॅकेटपेक्षा बाजारात अधिक प्रसिद्ध झाले.कोनोसुके यांच्याकडे तीन असे यशस्वी प्रोडक्ट होते ज्यांच्या द्वारे त्यांनी भरपूर नफा प्राप्त केला.

ज्यामुळे त्यांनी आपला उद्योग व्यवसाय एका मोठ्या दोन मजली इमारतीत शिफ्ट केला अणि तिथे २० कर्मचारीं कामाला देखील ठेवले.

पुढे १९२० मध्ये कंपनीला खुप यश प्राप्त झाले ज्यामुळे पॅनासोनिक कंपनीचे नाव देशातील दिग्दज कंपन्यांच्या यादीत देखील समाविष्ट झाले.

पण एवढे मोठे यश प्राप्त झाल्यानंतर देखील कंपनीला अशा अनेक मोठमोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले ज्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे हिंमत अणि धैर्याची आवश्यकता होती.

कोनोसुके यांना त्यांच्या नवीन प्रोडक्ट मध्ये एक मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते.

हे कोनोसुके यांनी तयार केलेले असे प्रोडक्ट होते जे बाजारात चालणारच असा कोनोसुके यांना ठामपणे विश्वास होता.

ह्या प्रोडक्टची कल्पणा कोनोसुके यांना स्वप्नात आली होती तेव्हापासून कोनोसुके यांच्या डोक्यात फक्त त्याच प्रोडक्ट विषयी विचार सुरू होते.

कोनोसुके यांचे प्रोडक्ट हे एक सायकलीचे लाईट होते.तेव्हा बाजारात बॅटरीवर चालणारे लाईटस उपलब्ध होते पण त्या लाईटामुळे फक्त दोन तीन तास प्रकाश प्राप्त होत असे.

याचमुळे अनेक सायकल चालवणारे व्यक्ती त्यांच्या सोबत कॅन्डल घेऊन चालत होते.म्हणजे जिथून लाईट विझेल तिथुन त्यांना पुढचा प्रवास हातात कॅन्डल घेऊन करता येईल.

कॅंडल लावून एका जागेवरून दुसरया जागी जाणे त्यावेळी लोकांना एक अत्यंत अवघड जात होते.

याचकरीता कोनोसुके यांनी सहा महिने मेहनत घेत बुलेटच्या आकाराचा एक सायकलीचा लॅम्प तयार करतात.हया लॅम्पचे वैशिष्ट्य होते की हा लॅम्प ३० ते ४० मिनिटे चालत होता.

कोनोसुके यांना त्यांच्या ह्या प्रोडक्टवर खूप आशा होती म्हणून उत्साहात त्यांनी शहरातील सर्व होलसेलर सोबत संपर्क साधला.पण त्यांचा लॅम्प कोणीही खरेदी करण्यास तयार नव्हते.

कोनोसुके यांनी तयार केलेले प्रोडक्ट यामुळे बाजारात कोणी घेत नव्हते कारण त्यावेळच्या लोकांचा असा समज होता की बॅटरीवर चालणारे लाईटस खराब असतात.

म्हणून बाजारातील एकही ग्राहक त्यांचे बॅटरीवर चालणारे लाईटस खरेदी करत नव्हते.ज्यामुळे होलसेलर देखील असे लाईटस आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवत नव्हते.

कोनोसुके यांना विश्वास होता की भविष्यात नक्कीच त्यांचे हे प्रोडक्ट प्रसिद्ध होईल अणि लोक त्याची खरेदी देखील करतील.पण तशी वेळ आलीच नाही.

यानंतर परिस्थिती अजुन खराब झाली सप्टेंबर १९२३ मध्ये ग्रीट कॅनडो नावाचा एक भुकंप आला ज्याने अर्थव्यवस्थेचे खूप नुकसान झाले.ज्यामुळे बाजारातील प्रोडक्टची विक्री होणे देखील कमी झाले.

पण कोनोसुके यांनी हार न मानता चार वर्षांनंतर पुन्हा एकदा बाईसिकल लॅम्पला एक चौकोनी आकारात डिझाईन केले.

आतुन यात कुठलाही विशेष बदल करण्यात आला नव्हता फक्त लॅम्पचे बाहेरील आकारात बदल करण्यात आला होता.

बाजारात यापूर्वी कधी लोकांनी चौकोनी आकार असलेला बॅटरीवर चालणारा लॅम्प बघितलाच नव्हता.

लोकांच्या मनात बॅटरीवर चालत असलेल्या लॅम्प विषयी जे नकारात्मक विचार होते.ते नकारात्मक विचार दूर करण्यासाठी ही युक्ती कोनोसुके यांनी लढवली होती.

कोनोसुके यांनी तयार केलेल्या ह्या लॅम्पने हळुहळू बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली.

मग कोनोसुके यांनी ह्या प्रोडक्टची यशस्वीपणे विक्री व्हावी म्हणून वेगवेगळ्या दुकानांमध्ये विक्रीसाठी १० हजार सॅपल दिले.

ज्यामुळे पहिल्या वर्षाच्या शेवटपर्यंत कोनोसुके यांनी लॅम्पचे ३० हजार युनिट इतकी विक्री करणे सुरू केले.याने कोनोसुके यांना ही गोष्ट लक्षात आली की आपले प्रोडक्ट कितीही उत्तम असो.

ग्राहक त्याची तोपर्यंत खरेदी करत नाही जोपर्यंत आपण बाजारात त्याची योग्यरीत्या मार्केटिंग करत नाही.म्हणून यानंतर कोनोसुके यांनी प्रोडक्टच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यासोबत त्याच्या मार्केटिंगला देखील महत्व देणे सुरू केले.

जेणेकरून त्यांच्या प्रोडक्ट विषयी बाजारातील ग्राहकांमध्ये अधिकतम प्रमाणात जनजागृती होईल.याकरीता १९२९ मध्ये त्यांनी कंपनीची नव्या पद्धतीने रचना केली.

याकरिता त्यांनी त्यांच्या मुख्य प्रोडक्ट इलेक्ट्रिक साॅकेट,बॅटरी,बाईसिकल लॅम्प,रेडिओ इत्यादी करीता वेगवेगळ्या तुकड्या तयार केल्या.

यातील प्रत्येक तुकडीत त्यांच्या नॅशनल सेल्स डिपार्टमेंट सोबत प्रादेशिक डिपार्टमेंट देखील होते.अणि त्यांना डायरेक्ट मॅन्युफॅक्चरींग डिपार्टमेंट सोबत लिंक करण्यात आले.

यामुळे प्रोडक्टचे उत्पादन त्याच्या विक्रीवर अवलंबून झाले.ज्याप्रमाणे बाजारात ग्राहकांची मागणी असायची प्रोडक्टची निर्मिती देखील त्यानुसार केली जाऊ लागली.

यामुळे कंपनीचा ओव्हर प्रोडक्शन तसेच अंडर प्रोडक्शन सारख्या समस्यांपासून बचाव झाला.

१९३० दरम्यान कंपनीत १० हजारपेक्षा अधिक कर्मचारी कामाला होते.पण त्याचवेळी दुसरे जागतिक महायुदध सुरू झाले.

दुसरया जागतिक महायुद्धामुळे पॅनासोनिक कंपनी उद्धवस्त होण्यास सुरुवात झाली.कंपनीला उत्पादनासाठी मालाची अणि कंपनीत काम करण्यासाठी कामगारांची कमतरता जाणवू लागली.

कारण दुसरया जागतिक महायुद्धाच्या दरम्यान आवश्यक वस्तुंचा पुरवठा देखील बंद करण्यात आला होता अणि युदधासाठी लोकांना सैन्यात भरती केले जाऊ लागले होते.

याचदरम्यान पॅनासोनिक कंपनीवर दबाव टाकण्यात आला की त्यांनी युदधात वापरल्या जात असलेल्या संसाधनांची निर्मिती करण्यावर अधिक भर द्यावा.

कोनोसुके यांना आशा होती दुसरे महायुद्ध संपुष्टात आल्यानंतर सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल.पण अचानक जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब हल्ला केला.

ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जपान मध्ये जिवीत तसेच वित्तहानी झाली.युदधात जपान हरल्यानंतर अमेरिकेने जपानवर आपले नियंत्रण मिळवणे सुरू केले.

अमेरिकेने काढलेल्या एका फर्मान मध्ये असे दिले होते की कोनोसुके यांना त्यांच्या कंपनीत राजीनामा द्यावा लागेल.

अमेरिकेने दिलेल्या ह्या आदेशाचा कोनोसुके यांनी विरोध केला नाही.

पण कोनोसुके यांच्या कंपनीत कामाला असलेल्या कर्मचारींनी याला विरोध दर्शवत आंदोलन करणे सुरू केले.

सर्व कर्मचारींचे मत होते की कोनोसुके यांनी कंपनीचा राजीनामा दिला तर कंपनी उद्धवस्त होईल.मग कर्मचारींच्या आंदोलनामुळे कोनोसुके यांनी राजीनामा देण्याचा आपला हुकुम अमेरिकेने मागे घेतला.

पण तोपर्यंत पॅनासोनिक कंपनीला खुप जास्त नुकसान झाले होते.कंपनीची प्रगतीचा वेग देखील खुपच कमी झाला होता.

तरी देखील कोनोसुके यांनी हार पत्करली नाही त्यांनी ह्या अवघड परिस्थितीकडे एक संधी म्हणून बघितले.

कोनोसुके यांचे असे मत होते की चांगली वेळ जशी आपल्यासाठी फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे वाईट वेळ देखील फायदेशीर ठरते.

कारण जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असते तेव्हा आपल्याला कुठलाही नवीन बदल घडवून आणायची नवीन प्रयोग करण्याची भीती वाटते.कारण त्यात आपणास अपयशी होण्याची भीती वाटत असते.

पण वाईट वेळेत काही नवीन प्रयोग केला नवीन परिवर्तन केले तर अपयशी होण्याची कुठलीही भीती आपल्याला नसते.त्यामुळे अशा परिस्थितीत जोखीम घेण्यास कुठलीच हरकत नसते.

कोनोसुके यांनी त्यांच्या कर्मचारींना प्रोत्साहन दिले अणि सांगितले की असे समजा आपली कंपनी नवीन आहे अणि आपण नवीनतम सुरुवात केली आहे.

आपल्या ह्या विचाराने कोनोसुके यांच्या पॅनासोनिक कंपनीने त्यांच्या लक्ष्यित ग्राहकांमध्ये देखील मोठे परिवर्तन घडवून आणले.

कोनोसुके यांच्या कंपनीने आता लोकल मार्केट सोडुन जागतिक बाजारातील ग्राहकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली.

याशिवाय पॅनासोनिक कंपनीकडे दुसरा पर्याय देखील उरलेला नव्हता कारण जपानची अर्थव्यवस्था खुपच ढासळलेली होती.

अणि कंपनीची परिस्थिती एवढी बिकट झाली होती की त्यांना आपल्या कर्मचारींना देखील आधार देता येत नव्हते.

म्हणून कंपनीने वेस्टर्न प्रोडक्ट लाॅच करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले.ज्यात वाॅशिंग मशिन, टिव्ही, फ्रीज,रेडिओ,राईस कुकर,टेप रेकाॅडर,एसी इत्यादींचा समावेश होता.

याच काळात कंपनीचे नाव बदलून पॅनासोनिक ठेवण्यात आले होते.कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली एक चांगली ओळख निर्माण करण्यासाठी कंपनीला एका इंग्रजी नावाची आवश्यकता होती.

आपल्या कंपनीने लाॅच केलेल्या प्रोडक्टच्या विश्वसनीयतेमुळे कंपनीने जागतिक बाजारपेठेत खूप नाव प्रसिद्धी प्राप्त केली.इथुनच कंपनीच्या सुवर्णकाळाचा आरंभ झाला होता 

मग पुढे २७ एप्रिल १९७९ रोजी ९९ वर्षाचे असताना कोनोसुके यांचे निधन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button