पॅराशुट ऑईलची यशोगाथा Parachute oil success story in Marathi
पॅराशुट ऑईलची यशोगाथा Parachute oil success story in Marathi
आज आपल्याला भारत देशातील प्रत्येक घराघरात निळ्या रंगाची एक खोबरेल तेलाची बाटली दिसुन येते.रोज सकाळी अंघोळ झाल्यावर सर्वप्रथम आपण डोक्याला खोबरेल तेल लावतो.अणि मग आपले केस विंचरत असतो.
आज वर्षानुवर्षापासुन घराघरात पॅराशुट नावाचे एक नारळाचे तेल डोक्याला लावण्यासाठी आपल्या देशातील लोकांकडून वापरले जात आहे.
आज पॅराशुट ऑईल हे खोबरेल तेल भारतातील पहिल्या क्रमांकाचे हेअर ऑईल ब्रॅड म्हणून ओळखले जाते.
पॅराशुट कंपनीला आपल्यापर्यंत ही निळ्या रंगाची खोबरेल तेलाची बाटली पोहोचवण्यासाठी अनेक अडीअडचणींना संकटांना सामोरे जावे लागले आहे.
बाजारात एकवेळ अशी आली होती की पॅराशुट कंपनी काही कालावधी करीता बंद देखील झाली होती.
पण आज हीच कंपनी देशातील पहिल्या क्रमांकाचे हेअर ऑईल ब्रॅड म्हणून प्रसिद्ध आहे.अणि हेच तेल आपल्या देशातील प्रत्येक घरात सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते.
आजच्या लेखामध्ये आपण पॅराशुट ऑईल कंपनी देशातील पहिल्या क्रमांकाची हेअर ऑईल ब्रॅड कसे बनले हे जाणुन घेणार आहोत.
पॅराशुट ऑईल कंपनी देशातील पहिल्या क्रमांकाचे हेअर ऑईल ब्रॅड कसे बनले?
पॅराशुट ऑईल हे बाॅम्बे ऑईल नावाच्या कंपनीकडून बाजारात आणण्यात आले होते.कंपनीला प्रारंभीच्या काळात हे तेल विकताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
बाजारात काही मोजकेच व्यक्ती होते जे ह्या तेलाची खरेदी करत होते.पण तरी देखील ह्या कंपनीने हार मानली नाही.
आज आपल्याला दुकानात पॅराशुट कंपनीचे खोबरेल तेल एका छोट्याशा बाटलीत दिले जाते.पण सुरूवातीला असे नव्हते.
सुरूवातीला पॅराशुट ऑईल हे तेल पंधरा लिटरच्या एका स्टीलच्या डब्यात विकले जात होते.पण त्यावेळी लोकांकडे एवढे अधिक पैसे नव्हते की ते पंधरा लिटरचा डबा खरेदी करतील.
ह्याच कारणामुळे बाजारातील सर्वसामान्य ग्राहक ह्या तेलाची खरेदी करत नव्हते.म्हणुन प्रारंभी ह्या तेलाचा वापर फक्त श्रीमंत लोक करीत होते.
सुरूवातीच्या काळात बाॅम्बे ऑईल कंपनीच्या पॅराशुट ऑईलला भारतीयांची पसंत बनता आले नाही ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानाला देखील सामोरे जावे लागले.
ह्या नुकसानामुळे कंपनी एवढी उद्ध्वस्त झाली होती की कंपनीला टाळे ठोकण्याची वेळ आली होती.पण त्याचवेळी ह्या कंपनीत हर्ष मारीवाला आले.अणि त्यांनी कंपनीच्या सर्व व्यवसायाची धुरा स्वता सांभाळली.
बाॅम्बे ऑईल हर्ष मारीवाला यांचा कौटुंबिक व्यवसाय होता.त्यांना हा व्यवसाय फक्त बाॅम्बे पर्यंत मर्यादित ठेवायचा नव्हता.त्यांना ह्या उद्योग व्यवसायाचा विस्तार संपूर्ण भारतात करायचा होता.
मग हर्ष मारीवाला हे स्वता बाजारात फिरू लागले अणि बाजारातील ग्राहक त्यांच्या कंपनीचे पॅराशुट ऑईल का खरेदी करत नाहीये याचे कारण त्यांनी दुकानदारांशी चर्चा करत जाणुन घेण्यास सुरुवात केली.
मग ते नागपुरला गेले अणि तेथील होलसेल दुकानदारांशी आपल्या प्रोडक्टविषयी चर्चा केली.मग अनेक होलसेल दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पॅराशुट ऑईल खुपच उत्तम आहे.
बाजारातील ग्राहकांना हे तेल आवडते देखील ते याचा वापर करू इच्छीत आहेत पण सर्व ग्राहकांची १५ लिटरचा तेलाचा डबा खरेदी करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्हती.
म्हणून बाजारातील अधिकतम ग्राहक ईच्छा असुन देखील पॅराशुट ऑईलची खरेदी करत नव्हते.
मग हर्ष मारीवाला यांना समजले की आपल्याला जर आपल्या विक्री मध्ये वाढ करायची असेल तर मोठ्या नव्हे तर छोट्या डब्यात तेलाची विक्री करावी लागेल.जेणेकरून सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोकांना देखील त्या तेलाच्या डब्याची खरेदी करता येईल.
मग यानंतर हर्ष मारीवाला यांनी पॅराशुट ऑईलचे छोटे डब्बे तयार करण्यास सुरुवात केली.अणि ग्राहकांना तेलाचे छोटे डब्बे उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या विक्री मध्ये अधिक वाढ होऊ लागली.कंपनी पुन्हा वेगाने प्रगती करू लागली होती.
१९८० पर्यंत पॅराशुट ऑईलची विक्री स्टीलच्या छोट्या डब्ब्यात केली जात होती.पण हे डब्बे कंपनीला खरेदी करण्यासाठी जास्त दर मोजावे लागत होते.
त्याचदरम्यान बाजारात प्लॅस्टिकच्या वापरास सुरूवात झाली होती.प्लास्टिक हे स्टील पेक्षा स्वस्त अणि अधिक टिकाऊ होते.
मग हर्ष मारीवाला यांनी देखील आपल्या तेलाची विक्री करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास सुरुवात केली.
मग त्यांनी पॅराशुट ऑईलची विक्री करण्यासाठी प्लास्टिकचे निळे डब्बे तयार केले.
हा प्लास्टिकचा निळा डब्बा दिसायला खुप आकर्षक होता त्यामुळे ग्राहक त्याची खरेदी करू लागले.
हया प्लास्टिकच्या डब्यात तेलाची विक्री करण्यात हर्ष मारीवाला इतके हरवले होते की त्यांनी फक्त त्या प्लास्टिकच्या डब्याच्या आकर्षकतेवर लक्ष दिले.
थोड्याच दिवसात त्यांना पुन्हा कळते की बाजारातील ग्राहकांनी पुन्हा त्यांच्या कंपनीचे पॅराशुट ऑईल खरेदी करणे बंद केले आहे.
हे ऐकुन हर्ष मारीवाला देखील हताश निराश झाले ते विचार करू लागले.त्यांनी ग्राहकांना मोठ्या डब्यात तेल खरेदी करणे परवडत नाही म्हणून आपण त्यांच्यासाठी छोट्या डब्यात तेलाची विक्री सुरू केली.
मग पुन्हा त्यांनी मार्केट रिसर्च केले त्यात त्यांना कळले की ग्राहकांना नारळाचे तेल अणि त्याचा सुगंध देखील आवडतो.
हे ऐकुन हर्ष हैराण झाले.
हर्षल मारीवाला पुन्हा विचार करू लागले की सर्व काही ठिक आहे मग असे कोणते कारण आहे ज्यामुळे बाजारात आपल्या पॅराशुट ऑईलची खरेदी ग्राहक करत नाहीये.
मग खुप दिवस संशोधन केल्यावर त्यांना पॅराशुट ऑईलची विक्री न होण्याचे कारण समजले.
ज्या बाटलीत हर्ष मारीवाला यांची कंपनी तेल विक्री करत होती ती बाटली छोटी अणि प्लास्टिकची होती त्यामुळे बाटलीला उंदीर कुरतडत होते.
उंदीर प्लास्टिकच्या बाटली तसेच त्यात असलेले नारळाचे तेल ह्या दोन गोष्टींच्या आकर्षणामुळे उंदीर तेलाची बाटली कुरतडत होते.
आता ह्या समस्येतुन बाहेर कसे पडायचे याचा विचार हर्ष मारीवाला करू लागले.कारण आता ते बाजारात ग्राहकांना खरेदी करणे परवडत नाही म्हणून पंधरा लिटरचा तेलाचा डब्बा देखील विकु शकत नव्हते.
अणि एखाद्या छोट्या प्लास्टिकच्या बाटली मध्ये देखील तेलाची विक्री करू शकत नव्हते कारण त्याला उंदीर कुरतडून काढतील.
अणि त्यांनी उंदिरांपासुन बचाव करण्यासाठी छोटी स्टीलची तेलाची बाटली तयार केली तर त्याच्या किंमतीत वाढ झाली असती.अणि मग बाजारातील सर्वसामान्य ग्राहकांना ह्या तेलाची खरेदी करता येणार नव्हती.
अशा प्रकारे आपल्या कंपनीतील पॅराशुट ऑईल बाटलीला देशातील घराघरात पोहचवण्यासाठी हर्ष मारीवाला यांच्या कंपनीला खुप मेहनत घ्यावी लागली होती.
मग सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा विचार केल्यावर हर्ष मारीवाला यांची नजर तेलाच्या बाटलीच्या आकाराकडे जाते.मग त्यांच्या लक्षात आले की त्यांनी तयार केलेली तेलाची बाटली चौकोनी होती.
म्हणून उंदिरांना सहजरीत्या बाटलीवर चढुन तिला कुरतडता येत होते.मग हर्ष मारीवाला यांनी पॅराशुट ऑईलच्या आकारात बदल केला अणि तिचा आकार गोल बनविला.
यामुळे उंदीर त्या तेलाच्या बाटलीकडे आकर्षित होत असत पण त्यांना त्या बाटलीला कुरतडुन खाता येत नव्हते.अणि हर्ष मारीवाला यांनी तेलाच्या बाटलीला असे डिझाईन केले की त्यातुन एक तेलाचा थेंब देखील खाली पडणार नव्हता.
आपण केलेला प्रयोग किती यशस्वी ठरतो याची तपासणी करण्यासाठी हर्ष मारीवाला यांनी ह्या सर्व बाटलींची प्रयोगशाळेत तपासणी केली.
त्यांनी आठ दहा तेलाच्या नवीन बाटल्या घेतल्या अणि त्या उंदिरांनी भरलेल्या एका पिंजऱ्यात ठेवल्या.मग काही दिवसांनी बघितल्यावर त्यातील एकही बाटली उंदीराने कुरतडलेली नव्हती.
मग त्यांनी होलसेल दुकानदारांना काही बाटल्या सॅपल टेस्ट म्हणून विक्रीसाठी दिल्या.अणि मग सर्व व्यवस्थित आहे कळल्यावर पुन्हा कंपनीने तेलाच्या बाटली विक्रीसाठी ठेवल्या.
आज पॅराशुट ऑईलला स्टीलच्या डब्यातून प्लास्टिकच्या बाटलीमध्ये येण्यासाठी तब्बल दहा वर्षे इतका कालावधी लागला.
प्लास्टिकच्या बाटली मध्ये तेलाची विक्री केल्याने कंपनीच्या पैशांची अधिक बचत देखील होत होती.हे सर्व पैसे कंपनीने आपल्या प्रोडक्टच्या प्रमोशनसाठी खर्च केले.
ज्यामुळे काही वर्षांत पॅराशुट बाजारात एक मोठा ब्रँड बनले.पण बाजारातील इतर प्रतिस्पर्धी पॅराशुट ऑईलची नक्कल करू लागले.
पण कंपनीने हार मानली नाही त्यांनी ह्या समस्येवर देखील उपाय शोधुन काढला.मग बाजारातील नकली कंपनींपासुन बचाव करण्यासाठी कंपनीने विदेशी साच्याने आपल्या बाटल्या बनविल्या.
यानंतर बाजारातील कुठल्याही कंपनीला त्यांची नक्कल करता आले नाही.ज्यामुळे पॅराशुट ऑईलची भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात विक्री होऊ लागली.
यानंतर देखील हर्ष मारीवाला थांबले नाही अनेक वर्षे आपल्या कौटुंबिक व्यवसायात काम केल्यानंतर हर्ष मारीवाला यांनी १९९० मध्ये मारीको लिमिटेड नामक स्वताची एक कंपनी सुरू केली.
मग त्यांनी बाॅम्बे ऑईलचे प्रोडक्ट पॅराशुट अणि सफोला ऑईल दोन्ही कंपन्यांशी जोडले.त्यांच्या ह्या कंपनीने बाजारात प्रवेश करताच बाजारातील सर्व कंपन्यांना काही वर्षातच मागे टाकले.
हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या दिग्दज कंपनीला देखील पॅराशुट कंपनीच्या समोर हार पत्करावी लागली होती.हया कंपनीला ५० टक्के रक्कम फक्त पॅराशुट ऑईलची विक्री करून प्राप्त होत असत.
पुढे १९९९ मध्ये हर्ष मारीवाला यांच्या मारीको कंपनीने भारताच्या बाहेर आपले पाऊल टाकले.अणि बांगलादेश मध्ये पॅराशुट ऑईलची विक्री करण्यास सुरुवात केली.
बांगलादेश मधील लोकांना मारीको कंपनीचे तेल त्याचा सुगंध पसंद येऊ लागले.मग हळूहळू भारताप्रमाणेच बांगलादेश मध्ये देखील पॅराशुट ऑईलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
यानंतर कंपनीने आपले नवनवीन प्रोडक्ट बनवून बाजारात लाॅच केले.पुढे २००६ मध्ये कंपनीने आफ्रिकन ठिकाणी देखील आपले प्रोडक्टची विक्री करण्यास सुरुवात केली.
२०११ पर्यंत कंपनीने बाजारात पॅराशुट कंपनीचे नवनवीन प्रोडक्ट आणले.ज्यात पॅराशुट ॲडव्हान्स बाॅडी लोशन, पॅराशुट गोल्ड हेअर क्रीम इत्यादीचा समावेश होता.
२०१६ मधील एका आकडेवारीनुसार पॅराशुट हेअर ऑईल,अणि सफोला ऑईल दवारे मारीको कंपनीला जवळपास ७२५ करोड इतका नफा प्राप्त झाला होता.
आज पॅराशुट ऑईल फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील सर्वात प्रसिद्ध अणि लोकांच्या आवडते हेअर ऑईल ब्रॅड आहे.