पारले जी बिस्किट्सची यशोगाथा Parle G biscuits success story in Marathi
पारले जी बिस्किट्सची यशोगाथा Parle G biscuits success story in Marathi
आज घराघरात लहान मुले असो किंवा घरातील मोठी माणसे,वृद्ध व्यक्ती सर्वच जण रोज सकाळी चहासोबत पारले जी हे बिस्कीट खाण्याला अधिक पसंती देतात.
आज आपल्याला आपल्या भारत असा एकही भारतीय व्यक्ती दिसुन येणार नाही ज्याने सकाळी चहात बुडवून पारले जी हे बिस्कीट खाल्ले नसेल.
पारले जी हे आज जगात सर्वात जास्त विकले जाणारे बिस्किट आहे.पारले जी ह्या बिस्किटची सुरूवात मोहनलाल दयाळ नावाच्या एका गरीब टेलरने १९२९ मध्ये केली होती.
पारले जी ह्या बिस्किटचा पाया ब्रिटीश राजवटीत टाकण्यात आला होता.एक वेळ अशी होती की ब्रिटीश काळात बिस्कीट खाणे देशातील लोकांसाठी एक खूप मोठी गोष्ट होती.
मोहनलाल दयाळ यांनी बघितले की तेव्हा बिस्कीट हे फक्त ब्रिटीश लोक किंवा भारतातील हाय क्लास श्रीमंत लोक खात होते.
ब्रिटीश काळात काही मोजक्याच दुकानांमध्ये बिस्किटने भरलेला एक विशेष पद्धतीचा एक बाॅक्स दिसुन येत असे.
ह्या बाॅक्सवर मोठमोठ्या अक्षरात लिहिलेले असायचे हंटली ॲण्ड पाल्मर.
ह्या बिस्किटच्या बाॅक्सची खरेदी करून त्याला सरळ ब्रिटीश लोकांच्या महलामध्ये पोहोचवण्यात येत होते.हे बिस्किट मोठमोठे ब्रिटीश अधिकारी सकाळ अणि संध्याकाळी चहामध्ये बुडवून खात होते.
अणि त्यावेळी भारतातील गरीब लोक ह्या बिस्किटच्या बाॅक्सकडे फक्त दुरून पाहत असत.कारण एवढे महागडे बिस्किट खरेदी करण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती.
मग हळूहळू हे हंटली ॲण्ड पाल्मर नावाचे बिस्कीट देशातील काही मोठ मोठ्या राजा महाराजा अणि श्रीमंत लोकांच्या महलापर्यत देखील पोहोचवण्यात येऊ लागले.
पण ह्या बिस्किटची किंमत एवढी अधिक होती की देशातील गरीब लोकांना हे बिस्कीट खरेदी करणे शक्य नव्हते.म्हणून गरीब लोक फक्त दुरूनच ह्या बिस्कीटकडे पाहुन खुश होत असत.
पण देशात असे काही श्रीमंत लोक देखील होते जे हे बिस्किट खरेदी करू शकत होते पण हे बिस्किट आपल्या घरात आणने किंवा खाण्यापासून दुर पळत होते.हे बिस्किट खाणे म्हणजे धर्म भ्रष्ट करणे असा त्यांचा समज होता.
कारण हंटली ॲण्ड पाल्मर हे बिस्किट बनवण्यासाठी ब्रिटीश लोक अंडयाचा वापर करत असत.मग लाला राधा मोहन यांनी देशातील लोकांच्या ह्या समस्येचे निराकरण केले.
लाला राधा मोहन यांनी १९९८ दरम्यान दिल्ली मध्ये हिंदु बिस्किट नावाची एक कंपनी सुरू केली.हया कंपनीचे मुख्य उद्दिष्ट हिंदु लोकांमध्ये बिस्किट अधिक प्रसिद्ध करणे होते.
ह्या कंपनीत बिस्किट बनवण्यासाठी फक्त ब्राहमण अणि उच्च वर्गीय हिंदु धर्मीय लोकांना हायर करण्यात आले होते.
म्हणजे हिंदु धर्मातील लोकांच्या नजरेत हे बिस्कीट सुरक्षित राहील.
कारण त्यावेळी ब्रिटीश लोक जे बिस्किट बनवत त्यात अंड्याचा वापर केला जात होता म्हणून बिस्किट खाल्ल्याने आपला धर्म भ्रष्ट होईल हा लोकांना समज दुर करण्यासाठी फक्त हिंदू लोकांना हे बिस्कीट बनवण्याच्या कामासाठी कंपनीने हायर केले.
पहिल्याच वर्षी कंपनींने आपल्या बिस्किटची जाहीरात केली ज्यात सांगण्यात आले होते की त्यांनी आपले बिस्किट फक्त हिंदू कामगारांच्या टीमकडुन बनवून घेतले आहे.
अणि हे बिस्किट फक्त दुधापासून तयार केले जाते यात पाण्याचा एक थेंब देखील मिक्स केला जात नाही.
पुढे हिंदु बिस्किटला लोकांकडून पसंती प्राप्त होत आहे हे बघुन इतर व्यावसायिकांनी देखील ह्या बिस्किटची विक्री करण्यास सुरुवात केली.
ज्यामुळे राधा मोहन यांनी सुरू केलेल्या हिंदु बिस्किटला खुप नुकसानाला सामोरे जावे लागले.मग पुढे हिंदु बिस्किटला ब्रिटानिया टीम सोबत मर्ज व्हावे लागले.
पण बाजारात एवढे वेगवेगळ्या कंपनीचे बिस्किट आल्यानंतर देखील बिस्किटच्या किंमती कमी करण्यात आल्या नाही.ज्यामुळे अजुनही देशातील गरीब लोकांसाठी
बिस्किट खाणे एक मोठी पर्वणीच होती.
मग ७ ऑगस्ट २००५ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी आंदोलनाचा पाया रचण्यात आला.
अणि देशातील लोकांनी विदेशी वस्तुंवर बहिष्कार घातला.
अणि स्वदेशी वस्तु खरेदी करण्यावर अधिक भर दिला.
ह्या स्वदेशी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी देशातील अनेक उद्योजक लोकांनी देशातील जनतेला स्वदेशी लोकल प्रोडक्ट उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग व्यवसाय देखील सुरू केले.
ह्याच आंदोलनातुन प्रेरीत होऊन गुजरात मधील एक टेलर मोहनलाल दयाळ यांनी देखील स्वदेशी चळवळीत भाग घेण्याचे ठरवले.
मग त्यांनी विचार केला की आपण आपल्या देशात एक स्वदेशी टाॅफी अणि चाॅकलेटची कंपनी सुरू करायला हवी.
कारण याने ब्रिटीशांना खुप मोठे आर्थिक नुकसान तर होणार होतेच.
शिवाय त्यांना ह्या इंग्रज लोक सेवन करत असलेल्या टाॅफी चाॅकलेटची चव देशातील गरीब मुलांना देखील चाखण्यासाठी उपलब्ध करून द्यायची होती.
कारण त्यावेळी ब्रिटिशांच्या मुलांच्या हातात चाॅकलेट खाण्याची इच्छा होत असत पण ते खुप महागडे असल्याने त्यांना खरेदी करता येत नव्हते.ते फक्त ब्रिटिशांच्या मुलांना ते चाॅकलेट बघत असत.
मोहनलाल दयाळ यांच्यापुढे एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला की आपण ही टाॅफी बनवायची कशा पद्धतीने.
कारण तेव्हा भारतात असे कुठलेही संसाधन उपलब्ध नव्हते.जिथुन ते टाॅफी बनवणे शिकु शकतील.
मग मोहनलाल दयाळ यांनी एक मोठा निर्णय घेतला अणि हे काम शिकण्यासाठी ते १९२९ मध्ये जर्मनी ह्या देशात गेले.
काही काळ जर्मनी मध्ये वास्तव्यास राहुन मोहनलाल दयाळ यांनी टाॅफी कशा पद्धतीने बनवितात?हे शिकुन घेतले.
अणि मग भारतात परत आले भारतात परत येताना त्यांनी टाॅफी बनविण्यासाठी सोबत एक टाॅफी बनविण्याचे मशिन देखील आणले.
मग भारतात परत आल्यावर मोहनलाल दयाळ यांनी मुंबई मधील विले पार्ले एरियातील एका जुन्या कारखान्याची खरेदी केली अणि तिथे आणलेले सर्व मशिन बसविले.
प्रथमतः मोहनलाल दयाळ यांच्या कंपनीमध्ये फक्त बारा कर्मचारी कामाला होते.अणि हे सर्व व्यक्ती मोहनलाल दयाळ यांच्या कुटुंबातील नात्यातील व्यक्ती होते.
मोहनलाल दयाळ यांनी प्रत्येक व्यक्तीला आपापल्या क्षमतेनुसार पात्रतेनुसार वेगवेगळे काम नेमुन दिले.
यात कोणाला टाॅफी बनविण्याचे काम दिले तर कोणाला पॅकेजिंग सप्लायचे काम दिले.अणि एका जणाला मॅनेजर म्हणून नेमण्यात आले.
सुरूवातीला कंपनीला नाव देण्याचा विचार कोणाच्याही मनात आला नाही.मग पुढे काही कालावधी नंतर ज्या ठिकाणी हा कारखाना सुरू करण्यात आला होता त्या ठिकाणाचे नावावरून कंपनीचे नाव विले पार्ले वरून पार्ले असे ठेवण्यात आले.
पार्ले कंपनींमध्ये सर्वप्रथम मोहनलाल दयाळ अणि त्यांच्या टीमने ऑरेंज कॅन्डी बनविण्यास सुरुवात केली.अणि त्यावेळी हे खुप प्रसिद्ध देखील झाले होते.
पण बाजारात भारतीय ग्राहकांना परवडेल अशा दरात कुठलेही बिस्किट उपलब्ध नव्हते.मग भारतीय लोकांना परवडेल अशा दरात बिस्किट उपलब्ध करून देण्यासाठी
१९३९ मध्ये पार्ले कंपनीने आपले बिस्किट मार्केट मध्ये आणले.
ह्या बिस्किटाचे नाव पार्ले ग्लु को असे ठेवण्यात आले होते.उत्तम दर्जामुळे हे बिस्किट भारतीय लोकांमध्ये खुपच प्रसिद्ध झाले.
दुसरया महायुद्धाच्या दरम्यान भारतीय अणि ब्रिटीश दोन्ही सैन्याने ह्या बिस्किटाचे भरपूर सेवण केले होते.पुढे १९४७ मध्ये जेव्हा भारत देश ब्रिटिशांच्या तावडीतुन स्वतंत्र झाला
तेव्हा अचानक गहुची कमतरता भासु लागली.
यामुळे पार्ले कंपनीला त्यांचे लु को बिस्किटच्या उत्पादन थांबवावे लागले होते.कारण हे बिस्किट बनवण्यासाठी मुख्यत्वे गव्हाचा वापर केला जात होता.
मग ह्या संकटातुन बाहेर पडण्यासाठी पार्ले कंपनीने ज्वारीपासुन बनविण्यात आलेले बिस्किट विक्री करणे सुरू केले.
अणि एका जाहिराती मध्ये देशातील स्वातंत्र्य सेनानींना नमन करत पार्ले कंपनीने आपल्या ग्राहकांना आवाहन केले की जो पर्यंत गहुचा पुरवठा आधीप्रमाणे सुरू होत नाही.
तोपर्यंत देशातील लोकांनी कंपनीने तयार केलेल्या ह्या नवीन बिस्किटाचे सेवण करावे.
मग पुढे परिस्थितीत परिवर्तन घडुन गहुची टंचाई दुर झाल्यावर,आधीसारखी देशातील स्थिती नाॅरमल झाल्यावर पुन्हा बिस्किट बनवण्यासाठी कंपनीने गव्हाचा वापर करण्यास सुरुवात केली.
काही वर्षे व्यवस्थित पार पडल्यानंतर १९६० दरम्यान बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी पार्ले कंपनीने बनविलेल्या बिस्किट प्रमाणे ग्लु को बिस्किट ह्या नावाने बाजारात आपापले बिस्किट लाॅच करण्यास सुरुवात केली.
यामुळे बाजारातील ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला की पार्ले कंपनीकडुन बनविण्यात येणारे ग्लू को बिस्किट नेमके कोणते आहे.
त्यामुळे ग्राहक बाजारातील दुसरेच बिस्किट पार्ले कंपनीचे ग्लु को बिस्किट समजुन खरेदी करू लागले.ज्यामुळे बाजारातील पार्ले कंपनीच्या बिस्किटाची विक्री देखील कमी कमी होऊ लागली.
मग आपल्या बिस्किटांच्या विक्रीत होत असलेली घट थांबवण्यासाठी पार्ले कंपनीने आपल्या कंपनीच्या प्रोडक्टच्या ब्रॅडिंगकडे अधिक लक्ष केंद्रित केले.
सगळ्यात पहिले पार्ले कंपनीने बाजारात आपले नवीन पॅकेजिंग बनविण्यास सुरुवात केली.यानंतर पार्ले कंपनीचे बिस्किट एका पिवळ्या वॅक्स पेपर मध्ये गुंडाळुन विक्रीसाठी येऊ लागले.
ज्यावर लाल रंगाच्या पार्ले ब्रॅडींग सोबत एका लहान मुलीचा फोटो देखील लावण्यात आला होता.हया मुलीच्या फोटोचे चित्रण जाहीरात एजन्सी एव्हरेस्ट ब्रांड सोल्युशनचे मगनलाल दय्या यांनी केले होते.
१९८०,१९९० मध्ये लहान मुले अणि त्यांचे पालकही ह्या नवीन ब्रँडींगमुळे पार्ले बिस्किटकडे अधिक आकर्षित होऊ लागले.अणि बाजारात पार्ले कंपनीने स्वताची एक वेगळी ओळख देखील निर्माण केली.
पुढे १९८२ मध्ये पार्ले कंपनीने पार्ले ग्लु कोला पार्ले जी ह्या नावाने रिपॅकेज केले.यात जिचा अर्थ ग्लु को असा होता.
अणि १९८२ मध्येच पार्ले जीचे पहिले टिव्ही कमर्शियल देखील आले.
ज्यात एक आजोबा आपल्या नातवंडांसोबत नाचगाणे करत असताना दिसुन येत होते.पुढे १९९८ मध्ये पार्ले कंपनीला शक्तीमानच्या स्वरूपात एक ब्रँड ॲनडाॅर्सर प्राप्त झाला.
तेव्हा १९९० मध्ये टिव्ही सीरिअल मधील शक्तीमान लहान मुलांमध्ये खुपच प्रसिद्ध होता.आपल्या आवडत्या सुपर हिरो शक्तीमानमुळे लहान मुलांमध्ये पार्ले जीला अधिक पसंती प्राप्त झाली.
यानंतर जी म्हणजे जिनिअस, हिंदुस्थान की ताकद,रोको मत टोको मत सारख्या टॅग लाईनमुळे पार्ले जी बाजारात नेहमी चर्चेचा विषय ठरली.
आज बाजारात पार्ले जीने आपला एक मोठा पोर्टफोलिओ देखील तयार केला आहे.ज्याच्या मध्ये बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किट, कॅन्डी अणि नमकीनचा देखील समावेश होतो.
सुरूवातीला पार्ले जी आपल्या स्वस्त दर अणि उत्तम गुणवत्तेमुळे बाजारात खुप प्रसिद्ध होतेच.पण आज देखील भारतात पार्ले जी चे ४० टक्के पेक्षा अधिक मार्केट शेअर असलेला दिसुन येतो.
अणि हा मार्केट शेअर देशातील सर्व बिस्किट ब्रँड मध्ये सर्वात जास्त आहे.
आज १०० वर्षांनंतर देखील बाजारात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी काही महत्वपूर्ण स्ट्रॅटेजीचा वापर केला.आज पार्ले कंपनीकडे पार्ले जीच्या रूपात एक हिरो प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेच.
पण पार्ले जी मध्ये प्राप्त झालेल्या भरघोस यशानंतर देखील कंपनी बसुन राहीली नाही.आज पार्ले कंपनीने मार्केट रिसर्च करून लोकांच्या पसंती नापसंतीला जाणुन घेतले.
जेव्हा पार्ले कंपनीने आपल्या पार्ले ग्लु को बिस्किटला बाजारात लाॅच केले होते तेव्हा कंपनीला कळुन गेले होते की
चहासोबत सर्वच लोकांना गोड बिस्किट खायला आवडत नाही.
काही लोक असे देखील आहेत ज्यांना चहासोबत नमकीन खायला आवडते.म्हणुन १९३८ मध्ये पार्ले कंपनीने मोनॅको नावाचे खारे बिस्किट देखील लाॅच केले.
याचसोबत लहान मुले तसेच तरूणाईला आकर्षित करण्यासाठी पार्ले जी कंपनीने पार्ले जी स्लिक्स देखील लाॅच केले.याचे छोटछोटे चौकोनी आकार असलेले नमकीन त्यावेळी तरूणांमध्ये खुप प्रसिद्ध झाले.
मग १९६३ मध्ये पारलेने बाजारात किशमी नावाची एक टाॅफी देखील आणली.नंतर १९६६ मध्ये पार्लेने बाजारात पाॅपिन्स लाॅच केले.यातील रंगीबेरंगी कॅन्डीला मुलांमध्ये खुप जास्त पसंती प्राप्त झाली.
याचसोबत पार्लेने टवेटी ट्वेंटी,मेलेडी,क्रॅकजॅक, मिल्क शक्ती,मॅगो बाईट,मॅजिक्स,लंडन डेअरी,हाईड ॲण्ड सीक सारखे अनेक प्रोडक्ट बाजारात लाॅच केले.
ह्या प्रोडक्टला देखील ग्राहकांकडून भरपुर पसंती प्राप्त झाली.आज ह्या सर्व प्रोडक्ट मुळे पार्ले कंपनीने भारतातील बिस्किट मार्केट मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
वर्ष २०१२ पर्यंत पार्लेने ४० लाख दुकानांच्या माध्यमातून आपले प्रोडक्टची विक्री केली.२०१३ मध्ये पार्ले कंपनीचा एकुण टर्न ओव्हर ५ हजार करोड पेक्षा जास्त झाला होता.
कोरोनाच्या काळात देशात लाॅकडाऊन दरम्यान देखील पार्ले जीला खुप फायदा झाला होता.ज्यामुळे कंपनीचा टर्न ओव्हर ८ हजार करोड पेक्षा अधिक पुढे गेला होता.
आज पार्ले जी भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील सर्वात जास्त विक्री होणारे बिस्किट ब्रँड म्हणून बाजारात ओळखले जाते.
पार्ले जी दरमहिन्याला एक अरब बिस्किटचे पुडे तयार करते.आज प्रत्येक सेकंदाला ४ हजार ५५१ पार्ले बिस्किटचे सेवन केले जाते.
एकवेळ अशी आली बाजारात पार्ले जी बिस्किटची मागणी इतकी अधिक वाढली की कंपनीला ग्राहकांकडून जेवढी मागणी केली जात होती तेवढ्या बिस्किटचे उत्पादन करता येत नव्हते.
अशा परिस्थितीत पार्ले जी कंपनीने एक महत्वाचा निर्णय घेतला कंपनीने लोकल बेकरी सोबत टाय अप केले यानंतर कंपनीने बाजारातील लोकल बेकरींना आपल्या बिस्किटचा सिक्रेट फॉर्मुला देखील दिला.
यामुळे बिस्किट तयार करण्याचा कंपनीवर असलेला अतिरिक्त कामाचा ताण देखील कमी झाला.अणि बाजारात एक मजबुत पुरवठा साखळीची निर्मिती देखील झाली.
कारण ज्या दुकानातील पार्ले बिस्किटचे पुडे संपत असत.तिथे त्यांच्या जवळील बेकरीतुन लगेच नवीन पॅकेट पोहोचवण्यात येऊ लागले.
ही स्ट्रॅटेजीचा वापर काहीकाळ पार्ले कंपनीने केला.पण जेंव्हा बाजारातुन प्रचंड ऑडर येण्यास सुरुवात झाली तेव्हा
कंपनीने आपले लक्ष उत्पादनात वाढ करण्यावर केंद्रीत केले.
जास्त उत्पादन करण्यासाठी कंपनीला जास्तीत जास्त कच्च्या मालाची आवश्यकता होती.हया कच्चा मालाची एकाच वेळी जास्त खरेदी केल्यास चांगला डिस्काउंट प्राप्त होत होता.
हाच फायदा पार्ले कंपनीला देखील प्राप्त झाला.मग पार्ले बिस्किटचे बल्क प्रोडक्शन करणे सुरू केल्यावर त्यांच्या नफ्यात अधिक वाढ होण्यास सुरुवात झाली.
आता बाजारात प्रचंड संख्येने असे ग्राहक तयार झाले होते जे पार्ले जी बिस्किटचे शौकीन झाले होते.याचमुळे दुकानदार देखील दुकानातील पार्ले जी बिस्किटचे पॅकेट संपण्याच्या आधी नवीन र्ऑडर देण्यासाठी धावपळ करू लागले.
दिवसेंदिवस आपल्या प्रोडक्टची बाजारातील वाढती मागणी गरज पाहता कुठल्याही कंपनीने आपल्या प्रोडक्टच्या किंमतीत वाढ केली असती पण पार्ले कंपनीने आपल्या प्रोडक्टच्या किंमतीत कुठलीही वाढ केली नाही.
जेव्हा पार्ले जी कंपनीने पार्ले बिस्किटची सुरूवात केली तेव्हा देखील हे बाजारातील सर्वात स्वस्त बिस्किट होते अणि आज देखील हे बाजारातील सर्वात स्वस्त बिस्किट म्हणुन ओळखले जाते.
मागील २५ वर्षात महागाई मध्ये प्रचंड वाढ होऊन देखील पार्ले कंपनीकडुन त्यांच्या बिस्किटच्या किंमतीत एक रूपयाने देखील वाढ करण्यात आली नाही.
एवढ्या कमी किंमतीत आपले प्रोडक्ट बाजारात उपलब्ध करून देत देखील पार्ले जीने बाजारात मागील वर्षी २५६ करोड रुपये इतका नफा प्राप्त केला आहे.
खरे पाहायला गेले तर पारले कंपनी आपल्या पारले बिस्किटच्या किंमतीत वाढ करत आहे पण ग्राहकांना याच्या विषयी भनक देखील लागत नाहीये.
पारले कंपनीला ही एक गोष्ट व्यवस्थित माहीत आहे की बाजारातील ग्राहकांना अधिक पैसे देणे आवडत नाही कारण जेव्हा पार्ले कंपनीने आपल्या बिस्किटांच्या किंमतीत ५० पैसे इतकी वाढ केली होती तरी त्यांच्या पार्ले बिस्किटच्या विक्री मध्ये घट होण्यास सुरुवात झाली होती.
एवढेच नव्हे तर लोक रस्त्यावर उतरून याविरूदध आंदोलन करू लागले होते.म्हणून पार्ले कंपनीने निर्णय घेतला की आपण बिस्किटच्या किंमतीत वाढ न करता हळुहळू
बिस्किट पुडयातील बिस्किटच्या प्रमाणात घट करायची.
याचमुळे सुरूवातीला पार्ले कंपनीने बाजारात जिथे १०० ग्रॅमचे बिस्किटचे पॅकेट ४ रूपयात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले होते.
आज ५ रूपयात फक्त ५५ ग्रॅम पर्यंतचे पार्ले बिस्किट पॅकेट बाजारात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अशा पद्धतीने पार्ले कंपनी आपल्या प्रोडक्टच्या किंमतीत वाढ न करता त्याच्या प्रमाणात घट करत नफा प्राप्त करत आहे.
आज पार्ले जी बिस्किटची ख्याती फक्त भारतातच नव्हे तर युएस ए,युके,कॅनडा न्यूझीलंड इत्यादी सारख्या देशात देखील अधिक प्रमाणात पाहायला मिळते.येथील लोक देखील पार्ले बिस्किटचे अधिक सेवण करतात.
आज वेगवेगळ्या देशात पार्ले जी बिस्किटचे मॅन्युफॅक्चरींग युनिट देखील उभारण्यात आले आहेत.आज भारतीयां प्रमाणे चीन मधील लोक देखील पार्ले जी बिस्किटचे सर्वाधिक चाहते झाले आहेत.
त्यामुळे चीन मध्ये देखील ह्या बिस्किटचे सर्वाधिक प्रमाणात सेवन केले जाते.