Blog

पेटीयम स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Paytm Start up business success story in Marathi 

पेटीयम स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Paytm Start up business success story in Marathi 

खुप जणांची अशी तक्रार असते की इंग्रजी माध्यमातुन शिक्षण न घेता मराठी अणि हिंदी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे आपण आपल्या आयुष्यात अपयशी ठरलो.

पण ज्यांचे जीवनातील उद्दिष्ट ध्येय निश्चित असते.ज्यांच्या मध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते अणि त्यांच्या डोक्यात नेहमी काहीतरी नवीन गोष्ट करण्याची कल्पणा सुरू असते.

असे व्यक्ती अज्ञानाला किंवा इतर कुठल्याही परिस्थितीला दोष न देता ती कमतरता भरून काढतात अणि आपले ध्येय गाठत असतात.

आजच्या लेखामध्ये आपण पेटीअम ह्या स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

पेटीअम युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?

विजय शेखर शर्मा हे पेटीअम ह्या कंपनीचे सीईओ आहेत.विजय शेखर शर्मा यांचे प्राथमिक शिक्षण हिंदी मेडिअम मधुन झाले होते.

पेटीअमचे संस्थापक तसेच सीईओ विजय शेखर शर्मा हे त्यांच्या शाळेतील एक अत्यंत बुद्धिमान हुशार विद्यार्थी होते.आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षाचे असताना विजय दिल्ली येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी आले.

दिल्ली येथे विजय शेखर शर्मा यांनी इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला.विजय शाळेत शिकत असताना देखील वर्गात पहिल्या बाकावर बसायचे.

म्हणुन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर इंजिनिअरींग काॅलेज मध्ये देखील ते पहिल्याच बाकावर बसत.एकेदिवशी विजय शेखर शर्मा यांना त्यांच्या शिक्षकाने एक प्रश्न विचारला ज्याचा अर्थ विजय यांना समजला नाही.ज्यामुळे विजय यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

कारण विजय शेखर शर्मा यांचे प्राथमिक शिक्षण हिंदी मेडिअम मधुन झाले होते.अणि इंग्रजी भाषेसोबत त्यांचा दुरपर्यत कुठलाही संबंध देखील नव्हता.

विजय शेखर शर्मा यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे इंग्रजी माध्यमातुन उत्तर न देता आल्यामुळे संपूर्ण वर्गात त्यांची खिल्ली उडविण्यात आली.

इंग्रजी मध्ये बोलता नाही येत त्यामुळे वर्गात आपली चेष्टा करण्यात आली याची मनात खंत निर्माण झाल्याने विजय शेखर शर्मा यांनी सर्वात शेवटच्या बाकावर बसायला सुरुवात केली.

असे म्हटले जाते की आपली कमकुवत बाजु कधीकधी आपल्यासाठी फायदेशीर देखील ठरते.विजय शेखर यांना त्यांच्या कमकुवत बाजुचा हाच लाभ प्राप्त झाला.

मग विजय शेखर शर्मा यांनी हळुहळु क्लास अटेंड करणे बंद केले अणि ते त्या वेळात ते इंग्रजी पुस्तकाचे वाचण करण्यासाठी ग्रंथालयात जाऊन बसु लागले.

ग्रंथालयात वाचण करण्यादरम्यान विजय शेखर शर्मा यांनी वेगवेगळ्या स्टार्ट अप व्यवसायाच्या,उद्योजकांच्या सक्सेस स्टोरी वाचल्या.

वेगवेगळ्या उद्योजकांच्या स्टार्ट अप व्यवसायाच्या इंग्रजी भाषेत लिहिलेल्या सक्सेस स्टोरी वाचुन विजय शेखर शर्मा खुप प्रभावित झाले याचसोबत त्यांचे इंग्रजी देखील सुधारले.

इंग्रजी पुस्तक वाचनाने विजय शेखर शर्मा यांना अनेक फायदे झाले.इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचल्याने त्यांचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व निर्माण झाले.

याचसोबत नवनवीन स्टार्ट अप व्यवसायाच्या यशोगाथा वाचून त्यांच्या विचार शैलीत मोठे परिवर्तन घडून आले.वाचणातुनच विजय यांना देखील उद्योजक बनण्याची

प्रेरणा प्राप्त झाली.

मग विजय शेखर शर्मा यांनी देखील ठरवले की आपण नोकरी न करता स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा अणि आपण देखील एक यशस्वी उद्योजक बनायचे.

याचसाठी काॅलेजमध्ये असलेल्या कंप्युटर लॅबमध्ये जाऊन विजय यांनी कोडिंग प्रोग्रॅमिंग शिकण्यास सुरुवात केली.मग त्यांनी रोज काॅलेज मधील कंप्युटर लॅबमध्ये बसुन उत्तमरीत्या कोडिंग शिकुन घेतली.

अणि मग महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच कोडिंगचा चांगला अनुभव प्राप्त झाल्यानंतर १९९७ मध्ये विजय यांनी आपल्या एका क्लासमेंट सोबत मिळुन इंडिया साईट डाॅट नेट ह्या नामक एका वेबसाईटची डिझाईनिंग केली.

विजय यांनी काॅलेज मध्ये शिकत असताना आपल्या क्लासमेट सोबत मिळुन इतरही छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यास सुरुवात केली.

दोन वर्षांनंतर एका अमेरिकन कंपनीने एक मिलियन डॉलर देऊन इंडिया साईट डाॅट नेट ही वेबसाईट खरेदी केली.

मग २००१ मध्ये विजय यांनी आपल्या दोन क्लासमेंट सोबत मिळुन दिल्ली मध्ये एक छोटासा रूम भाड्याने घेतला.अणि सर्व मिळुन प्रत्येकी पाच लाख रुपये इतकी गुंतवणूक करत वन नाईंटी सेव्हन नावाची एक कंपनी सुरू केली.

वन नाईंटी सेव्हन ही कंपनी मोबाईल वापरकर्त्यांना मोबाईल संबंधित न्युज,एस एम एस,रिंगटोन तसेच ज्योक सारखी कंटेंट सेवा प्रदान करत असत.

पण अमेरिकेवर झालेल्या एका हल्ल्यामुळे वन नाईंटी सेव्हनच्या व्यवसायात खूप मंदी आली.अणि कंपनीकडे असलेला शिल्लक निधी देखील संपुष्टात आला.

ज्यामुळे विजय यांच्यासोबत कंपनीमध्ये पार्टनरशिप असलेल्या अनेक व्यक्तींनी माघार घेण्यास कंपनी सोडण्यास सुरुवात केली.तब्बल दोन वर्षे विजय यांना ह्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले.

२००३/२००४ मधील संघर्षाच्या काळात विजय यांनी इतर कंपनीमध्ये नोकरी करत आपल्या कंपनीला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

ह्या कालावधीत आपल्या कंपनीमध्ये काम करत असलेल्या कर्मचारींचे वेतन देण्यासाठी त्यांनी २४ टक्के इतक्या वार्षिक व्याज दरावर पैसे उचलले.

२००४ मध्ये विजय यांच्या बुडत्या जहाजाला पीयुष अग्रवाल यांचा आधार प्राप्त झाला.पीयुष अग्रवाल यांनी विजय शेखर शर्मा यांच्या कंपनीमध्ये आठ लाखांपर्यंतची गुंतवणूक केली.

अणि ४० टक्के शेअर देखील खरेदी केले.

पीयुष अग्रवाल यांनी केलेल्या गुंतवणुकीनंतर पुढे कंपनीच्या कॅश प्लो मध्ये प्रगती होऊ लागली.

मग विजय शेखर शर्मा यांच्या एक गोष्ट लक्षात आली की स्मार्ट फोनचा वापर सध्या दिवसेंदिवस अधिक वाढत आहे म्हणून त्यांनी ठरवले की स्मार्ट फोन संबंधित असा एखादा व्यवसाय सुरू करायचा ज्याने लोकांच्या समस्या दूर होतील.

मग विजय शेखर शर्मा यांनी वन नाईंटी सेव्हन कम्युनिकेशन लिमिटेड अंतर्गत २०१० मध्ये पेटीएम डाॅट काॅम नावाची वेबसाईट सुरू केली.अणि,ऑनलाईन मोबाईल रिचार्ज सुविधेस प्रारंभ केला.

पेटीअम डाॅट काॅम वेबसाईट सुरू झाली तेव्हा बाजारात इतर वेबसाईट देखील उपलब्ध होत्या ज्या आपल्या ग्राहकांना मोबाईल रिचार्जची सुविधा देत होत्या.

पण पेटीएमची प्रणाली बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अधिक सरळ अणि सोपी होती.

पुढे पेटीअमच्या व्यवसायात अधिक वाढ होऊ लागल्यावर विजय शेखर शर्मा शर्मा यांनी पेटीएमवर ऑनलाईन वाॅलेट, मोबाईल रिचार्ज,बिल पेमेंट,मनी ट्रान्स्फर, शाॅपिंग इत्यादी नवीन फीचर देखील समाविष्ट केले.

२०१७ मध्ये पेटीअमने भारतातील पहिले पेमेंट ॲप बनण्याचा बहुमान प्राप्त केला.तेव्हा शंभर मिलियनपेक्षा अधिक लोकांनी हे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड देखील केले.

२०१८ मध्ये वाॅरेन बफेट यांनी पेटीअम मध्ये ३०० मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली अणि २.६ टक्के इतके पेटीअमचे शेअर्स खरेदी केले.

पुढे २०१९ मध्ये पेटीअमने एक साऊंड बाॅक्स लाॅच केला जो पेटीअमने घेतलेला एक खूप मोठा गेम चेंजर निर्णय ठरला.

शेवटी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर काही विशिष्ट कालांतराने विजय शेखर शर्मा यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ त्यांना मिळालेच.ज्याचे परिणाम स्वरूप आज पेटीअम हे भारतातील पाचवे युनिकाॅन स्टार्ट अप म्हणून ओळखले जाते.

पेटीअमचे आज ३५० मिलियन युझर्स आहेत अणि आज पेटीएमचे एकुण बाजार मुल्यांकन ५.५ बिलियन डॉलर्स इतके आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button