Blog

रेझोर पे स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Razor pay Start up business success story in Marathi 

रेझोर पे स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Razor pay Start up business success story in Marathi 

आॅनलाईन पेमेंट करत असताना आपल्यातील कित्येक जणांनी रेझर पे ह्या गेट वेने पेमेंट केले असेल.रेझर पे भारत देशातील दुसरी सर्वात मोठे फिनटेक स्टार्ट अप कंपनी आहे.

रेझर पे हे आपल्या भारत देशातील एक असा स्टार्ट अप व्यवसाय आहे.ज्याला १०० पेक्षा जास्त बॅकेकडुन नकार देण्यात आला तरी देखील त्यांनी हार नाही मानली.

अणि बाजारात तब्बल ५२ हजार करोडची कंपनी उभारण्यात यश प्राप्त केले.रेझर पे ही पेटीएम नंतरची भारतातील दुसरी अशी फिनटेक कंपनी आहे जी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.

आज बाजारात रेझर पेचे एकुण मुल्यांकन ७.५ बिलियन डॉलर्स इतके आहे.

यावरून आपणास प्रेरणा प्राप्त होते की शेकडो वेळा नकार प्राप्त होऊन देखील दोन व्यक्तींने साडे सात बिलियन डॉलर्सची कंपनी उभारली तर आपण का नाही स्वताची कंपनी उभी करू शकत?

रेझर पे ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात २०१४ मध्ये हर्षिल माथुर अणि शशांक कुमार ह्या दोघांनी मिळुन केली होती.

जेव्हा ह्या दोघांनी ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा ही व्यवसाय कल्पणा घेऊन हर्षिल माथुर अणि शशांक कुमार हे दोघेही शंभरपेक्षा जास्त बॅकेत गेले.

पण त्या सर्वच बॅकेनी त्यांची सर्विस घेण्यास स्पष्टपणे नकार दिला.मग खुप बॅकेकडुन नकार प्राप्त झाल्यानंतर एका बॅकेनी त्यांची सर्विस घेण्यासाठी होकार दिला.

यानंतर रेझर पे ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दुसरी फिनटेक कंपनी म्हणून उदयास आली.आज ह्या कंपनीचे बाजारातील एकुण मुल्यांकन ५२ हजार करोडपेक्षा अधिक आहे.

आजच्या लेखामध्ये आपण रेझर पे ह्या स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

रेझर पे युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?

रेझर पेची सुरूवात २०१४ मध्ये तेव्हा झाली जेव्हा दोन आयटी पदवीधर व्यक्ती शशांक कुमार अणि हर्षिल माथुर ह्या दोघांना मार्केट मध्ये एक उणीव दिसुन आली.

बाजारात असे खूप मोठे छोटे स्टार्ट अप व्यवसाय होते ज्यांना आॅनलाईन पेमेंट करण्यास अडचण होत होती.

म्हणुन ह्या दोघांनी मिळुन रेझर पे ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली.

रेझर पे हे एक फिनटेक स्टार्ट अप असल्याने त्यांना बॅकेसोबत देखील बोलायचे होते.पण जेव्हा हर्षिल अणि शशांक कुठल्याही बॅकेत आपला प्रस्ताव घेऊन जात तेव्हा त्यांना बॅकेकडुन नकार प्राप्त होत असत.

प्रत्येक बॅकेकडुन त्यांना एकच उत्तर प्राप्त होत की तुमचे बॅकग्राऊंड नाॅन फायनान्शिअल आहे.मग शंभर पेक्षा जास्त बॅकेकडुन नकार प्राप्त झाल्यानंतर एचडी एफसी ह्या बॅकेने रेझर पेचा प्रस्ताव स्वीकारला.

मग २०१५ मध्ये रेझर पे ने वाई काॅम्बिनेटर जीआयसी कडुन १ लाख ५० हजार डॉलर्स इतका निधी प्राप्त केला.पुढे २०१६ मध्ये रेझर पे भारतातील सर्वात पहिले पेमेंट गेटवे बनले ज्याने युपीआयला लाॅच केले.

आपल्या पेमेंट सिस्टम दवारे छोट्या मोठ्या सर्व उद्योगांसाठी पेमेंट घेणे रेझोर पेने एकदम सोपे करून टाकले.पुढे २०१९ मध्ये रेझोर पेने कमालच केली.त्यांनी न्यु बॅकिंग अणि लेण्डिंगला देखील सुरूवात केली.

याने हजारो व्यवसायांना कर्जाची अणि बॅकिंगची सुविधा उपलब्ध झाली.२०२१ मध्ये रेझोर पेने ३७५ मिलियन डॉलर जमा केले.

अणि बघता बघता रेझोर पे ७.५ बिलियन डाॅलर्सची कंपनी बनली.फक्त सात वर्षे इतक्या कालावधीत रेझोर पेने १ मिलियन पेक्षा अधिक लोकांना आपली सेवा प्रदान केली आहे.

पेमेंट सिस्टम मधील अडथळे दूर करण्यासाठी शशांक अणि हर्षल यांनी हे पेमेंट गेटवे अॅप सुरू केले.आज रेझोर पे व्यावसायिकांच्या प्रत्येक दिवसाच्या लाखो रूपयांच्या देवाणघेवाणाला अधिक सहज अणि सोपे बनवत आहे.

आज रेझोर पेने जगातील टाॅप १०० युनिकाॅन स्टार्ट अप मध्ये देखील आपले नाव नोंदवले आहे.

रेझोर पे देशातील पहिली अशी पेमेंट गेटवे आहे जिने आपल्या ग्राहकांसाठी पेमेंट रिकाॅन्सिलेशन सर्विस सुरू केली आहे.

रेझोर पेचा युनिकाॅन स्टार्ट अप बनण्या पर्यंतचा एकुण प्रवास-

२०१२ मध्ये शशांक कुमार हे त्यांचे मित्र हर्षिल माथुर यांच्यासोबत मायक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी करत होते.

तेव्हा शशांक अणि हर्षिल याने स्टार्ट अप व्यवसाय सुरू करण्याचा कुठलाही प्लॅन केला नव्हता.पण हे दोघेही एका साईड प्रोजेक्टवर काम करत होते.ज्याने पेमेंट सिस्टम मध्ये येत असलेले अडथळे दूर होतील.

कारण आधी लोकांना आॅनलाईन पेमेंट करण्यात खुपच अडचणींना सामोरे जावे लागत होते.याकरीता लोकांना चांगली पेमेंट सर्विस देण्यासाठी दोघांनी रेझोर पे हे अॅप लाॅच केले होते.

आज रेझोर पेचे ३३ वर्षीय संस्थापक उपसंस्थापक हर्षिल माथुर अणि शशांक कुमार यांचे नाव सर्वात कमी वयातील भारतीय अरबपती म्हणून हुरून रिच लिस्ट २०२४ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार हर्षिल माथुर अणि शशांक कुमार ह्या दोघांची एकुण संपत्ती १.०३ बिलियन डॉलर्स इतकी आहे.

आज रेझोर पे द्वारे आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,नेटबॅकिंग,युपीआय,डिजीटल वाॅलेट अशा वेगवेगळ्या मार्गाने आॅनलाईन पेमेंट करता येते.यात रेझोर पे ट्रानझॅक्शन फी दवारे आपली कमाई करते.

रेझोर पे ह्या प्लॅटफॉर्मवर ट्रानझॅक्शन करण्यासाठी २ ते ३ टक्के फी आकारली जाते.रेझोर पे भारतातील अनेक महत्वाच्या वाॅलेटला सपोर्ट देखील करते.

ज्यात पे झॅप,जिओ मनी, एअरटेल मनी,मोबिविक ओलामनी,फ्री चार्ज इत्यादी वाॅलेटचा समावेश होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button