Blog

रिविगो स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Rivigo Start up business success story in Marathi 

रिविगो स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Rivigo Start up business success story in Marathi 

ट्रक ड्रायव्हर यांना महिनाभर,आठवड्यातील ७ दिवसांपैकी ५ दिवस फक्त प्रवासच करावा लागत होता.त्यामुळे ट्रक ड्रायव्हर्सला आपल्या कुटुंबासोबत पाहीजे तितका वेळ व्यतीत करता येत नव्हता.

याचसोबत ट्रक ड्रायव्हर्सला महिनाभर तसेच आठवड्यातील पाच दिवस लागोपाठ ड्रायव्हिंग करावी लागत असल्याने त्यांची झोप देखील व्यवस्थित होत नव्हती.

ज्यामुळे त्यांना अनेक शारीरिक तसेच मानसिक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

ट्रक ड्रायव्हर यांना सलग पाच दिवस ट्रक चालवावा लागत होता त्यामुळे ड्रायव्हिंग करून मान पाठ दुखु लागल्याने तसेच थकवा आल्याने ट्रक ड्रायव्हर निर्धारित ठिकाणी माल घेऊन उशिरा पोहचत असत.

अणि क्लाईंटला देखील ह्याचे स्पष्टीकरण प्राप्त होत नव्हते की त्यांचा माल आत्ता कुठपर्यंत पोहोचला आहे. 

ट्रक ड्रायव्हरची हीच मुख्य समस्या दीपक गर्ग यांच्या लक्षात आली अणि त्यांनी ट्रक ड्रायव्हरवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी,तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहावे अणि क्लाईंटला देखील वेळेवर आपला माल प्राप्त व्हावा ह्या उद्देशाने २०१४ मध्ये रेवीगो ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली.

रिविगो युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?

दीपक गर्ग हे रेवीगो ह्या कंपनीचे फाऊंडर तसेच सीईओ देखील आहेत.

रेविगो मध्ये ड्राइव्हरला आपल्या गंतव्य ठिकाणी डायरेक्ट जाण्याची आवश्यकता नसते इथे फक्त ड्राइव्हर १ ला पाॅईंट ए पासुन बी पर्यंत माल घेऊन जावे लागते.

अणि मग पाॅईंट बी पासुन दुसरा ड्राइव्हर बी पासुन सी पर्यंत माल घेऊन जातो.अशा पद्धतीने रिवीगो ह्या स्टार्ट अप व्यवसायात दोन टप्प्यात ट्रक ड्रायव्हर दवारे मालाची पोहोच केली जाते.

याने ड्रायव्हरचे शारीरिक मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.त्यांना आपल्या कुटुंबासोबत देखील पुरेसा वेळ व्यतीत करता येतो अणि ट्रक कमीत कमी वेळात आपल्या गंतव्य ठिकाणी माल घेऊन पोहचते.

यामुळे फायदा असा झाला की जिथे मुंबई,बंगलौर वरून ट्रक पोहोचण्यासाठी ११० तासांचा कालावधी लागत होता आता त्याच ठिकाणी आता रिविगो हे स्टार्ट अप बाजारात सुरू झाल्यापासून मुंबई वरून बंगलौर वरून ट्रक पोहोचण्यासाठी फक्त ४४ तास इतकाच कालावधी लागतो.

म्हणजे रिविगो ह्या स्टार्ट अप व्यवसायाने दोन राज्यांतील प्रवास अंतर,अणि प्रवासासाठी लागणारा तासिकेचा कालावधीच कमी करून टाकला.

आपल्या ह्याच उत्तम कामगिरीमुळे रिविगो ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे आज एकुण बाजार मुल्यांकन १ बिलियन डॉलर्स पेक्षा अधिक आहे.

यामुळे आज ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे नाव देशातील युनिकाॅन स्टार्ट अप व्यवसायांच्या यादीत देखील समाविष्ट करण्यात आले आहे.रिविगोचे नाव भारतातील युनिकाॅन स्टार्ट अप व्यवसायाच्या यादीत २०१९ मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

आज रिविगोने सुरू केलेल्या लाॅजिस्टिक ट्रक सर्विसेसमुळे आपणास भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यात फक्त तीन दिवसात कोणत्याही ठिकाणी मालाची पोहोच करता येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button