Blog

गुजराती लोक एवढे श्रीमंत का आहेत..? Why Gujarati is very rich in India 

गुजराती लोक एवढे श्रीमंत का आहेत?why Gujarati is very rich in India 

गुजरात हे आपल्या देशातील असे एक राज्य आहे जे सध्या राॅकेटच्या गतीने प्रगती करत आहे.गुजरात हे राज्य भारतात उद्योग व्यवसायाकरीता सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

कापुस,हिरे, पेट्रोलियम पदार्थ,औषधे, दुध इत्यादीचे विक्रमी उत्पादन अणि निर्यात गुजरात ह्या राज्यातुनच विदेशात केली जाते.

मुकेश अंबानी,गौतम अडाणी, राधाकृष्ण दमाणी, लक्ष्मी मित्तल,कारसनभाई पटेल,उदय कोटक हे भारतातील सर्व श्रीमंत व्यक्ती गुजराती आहेत.

असे म्हटले जाते की मोगलांच्या काळापासून गुजराती समाज धंद्यात उतरलेला आहे.गुजराती लोकांमध्ये लहान मुलाला देखील शालेय शिक्षण घेण्याअगोदर धंद्याचे ज्ञान दिले जाते.

आज आपल्या देशात १६९ पेक्षा अधिक अब्जाधीश आहेत.त्यापैकी १४५ अब्जाधीश हे गुजराती अणि मारवाडी व्यक्ती आहेत.

जागतिक अव्वल श्रीमंतांच्या यादीत तीन अणि भारत देशातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत सहा गुजराती लोकांचा समावेश होतो.

गुजरातचा आपल्या देशातील अर्थव्यवस्थेत असलेला वाटा १० टक्के इतका आहे.आज आपल्या भारत देशातीलच नव्हे तर अमेरिकेतील ५० पेक्षा अधिक हाॅटेल व्यवसायाचे मालक गुजराती लोक असल्याचे आपणास दिसून येते.

आज अमेरिकेतील गुजराती व्यक्ती हे अमेरिकेतील हाॅटेल व्यवसायिकांपेक्षा सर्वाधिक उत्पन्न कमवितात.

आजच्या लेखामध्ये आपण हे जाणुन घेणार आहोत गुजराती व्यक्तींमध्ये असे कोणते कलागुण आहेत?ज्यामुळे ते एवढे यशस्वी उद्योजक व्यावसायिक आहेत?

गुजराती व्यक्ती व्यवसायात एवढे चांगले का आहेत?why gujratis so good in business 

आपल्यातील कित्येक लोकांना वाटते की आज गुजराती व्यक्ती त्यांच्या उच्च शिक्षणामुळे व्यावसायात यशस्वी आहेत.

पण असे नाहीये आज आपल्याला अनेक गुजराती उद्योजक व्यावसायिक असे पाहायला मिळतात ज्यांचे कुठलेही विशेष शिक्षण झालेले नाहीये तरी देखील ते आज एक यशस्वी उद्योजक आहेत.

अनेक गुजराती लोक असे आहेत ज्यांच्याकडे कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती देखील नाहीये जिचा वापर करून ते आपल्या उद्योग व्यवसायात पैशांची गुंतवणूक करतील.

तसेच गुजराती व्यक्तींकडे कुठल्याही प्रकारचे नाविन्य पुर्ण तसेच वैज्ञानिक विचार सुद्धा नाहीये.पण तरी देखील आज गुजराती व्यक्ती व्यवसायात अधिक यशस्वी आहेत.याला कारण आहे गुजराती लोकांमध्ये असलेला धंदो माईंडसेंट.

म्हणजे गुजराती लोकांची व्यावसायिक मानसिकता आहे.

आपल्याला वाटते की स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करणे ही एक खूप कठिण गोष्ट आहे.म्हणुन आपण व्यवसाय करण्यापेक्षा नोकरी करण्यास अधिक पसंती देतो.

आपल्यातील काही लोक असे देखील आहेत ज्यांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो पण कुठला व्यवसाय सुरू करायचा?तो कशा पद्धतीने करायचा याचा विचार करण्यातच ते आपला अमुल्य वेळ वाया घालवितात.

ज्यामुळे प्रत्यक्षात ते कुठलाही उद्योग व्यवसाय करीत नसतात.

पटेल हा गुजरात मधील असा एक समुदाय आहे ज्यांच्याकडे स्वताच्या मालकीची एकेकाळी अनेक एकर इतकी जमीन होती.

ह्या जमिनीवर पटेल लोक शेती करायचे अणि शेतीतुन भरपूर पैसे देखील कमवायचे.पण जसजसे त्यांचे कुटुंब मोठे होत गेले अणि जमिनीची वाटणी केल्यानंतर त्यांच्याकडे असलेली जमीन देखील लहान होत गेली.

पटेल कुटुंबातील प्रमुख व्यक्ती पापा पटेल यांना चांगलेच ठाऊक होते की कमी जमिनीमध्ये शेती करणे म्हणजे जास्त मेहनत कमी नफा प्राप्त करणे आहे.

अणि ही गोष्ट गुजराती लोकांच्या व्यावसायिक मानसिकतेला न शोभणारे होती.याकरीता त्यांनी गुजरात मध्ये असलेली त्यांची शेतजमीन विकुन दिली.

अणि ते दक्षिण आफ्रिका ह्या देशात गेले.दक्षिण आफ्रिकेत पटेल यांनी स्वताच्या उद्योग कौशल्य अणि बुद्धीमत्तेचा वापर करून स्वताचा एक चांगला उद्योग व्यवसाय स्थापित केला.

पण दक्षिण आफ्रिकेतील सरकारला हे मान्य नव्हते म्हणून युगांडा मधील जनरलने पटेल लोकांची सर्व मालमत्ता ताब्यात घेतली अणि त्यांना तिथून हाकलून दिले.

मग यानंतर पापा पटेल आपल्या कुटुंबासमवेत अमेरिका ह्या देशात आश्रयासाठी गेले.पटेल यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते.

एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायात गुंतवणुक करण्यासाठी देखील जवळ पैसे उरलेले नव्हते.

अमेरिका मध्ये चांगल्या पगाराची नोकरी करण्याइतकी शैक्षणिक पात्रता देखील पटेल यांची नव्हती.

एवढेच नव्हे तर अमेरिकेत वास्तव्यास असताना अमेरिकेतील लोकांशी इंग्रजी भाषेत बोलायला देखील त्यांना जमत नव्हते.

अशा बिकट परिस्थितीत पापा पटेल यांचे लक्ष रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका हाॅटेलकडे जाते.त्या हाॅटेलचा बॅकेच्या वतीने लिलाव करण्यात येणार होता.

अणि ते हाॅटेल विकत घेण्यासाठी बॅकेकडुन ९० टक्के इतके कर्ज देखील मिळत होते.तेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले होते त्यामुळे अमेरिकेत सर्वत्र मंदी पसरलेली होती.

ज्यामुळे हाॅटेल व्यवसाय पुर्णतः उद्ध्वस्त होऊन बुडण्याच्या स्थितीत आले होते.कित्येक हाॅटेल मालक आपल्या हाॅटेलचा ई एम आय देखील वेळेवर भरू शकत नव्हते.

यामुळे त्यांच्या हाॅटेलवर बॅकेकडुन ताबा घेतला जात होता.अणि त्याच हाॅटेलचा बॅक लिलाव देखील करत होते.

पापा पटेल यांनी विचार केला की मंदी संपुष्टात आल्यानंतर लोक पुन्हा घराबाहेर पडतील अणि अमेरिकेत पर्यटनासाठी येण्यास सुरुवात होईल.

अणि याचसोबत तोपर्यंत आपल्याला राहण्यासाठी निवारा देखील उपलब्ध होईल.मग पाच हजार डॉलर्स इतके डाऊन पेमेंट भरत पापा पटेल यांनी २० खोली असलेले एक हाॅटेल विकत घेतले.

पापा पटेल यांनी हाॅटेल मधील कामाला असलेल्या सर्व कामगारांना कामावरून काढून टाकले अणि आपल्या घरातील सर्व लोकांना साफसफाई,धुणे,देखभाल दुरुस्ती करणे इत्यादी सर्व कामे नेमुन दिली.

यामुळे पापा पटेल यांचे हाॅटेल व्यवसायातील लागणारे प्रक्रिया शुल्क देखील कमी झाले.

ज्यामुळे पापा पटेल यांना त्यांच्या ग्राहकांना बाजारातील इतर प्रतिस्पर्धी हाॅटेल मालकांच्या तुलनेत अधिक किंमतीत रूम देता आले.

कमी किंमतीत हाॅटेल उपलब्ध असल्याने पापा पटेल यांच्या हाॅटेल मध्ये ग्राहकांची गर्दी वाढु लागली.अणि काही दिवसातच पापा पटेल यांनी एका हाॅटेल मध्ये प्राप्त झालेल्या नफ्यात इतर हाॅटेल्सची देखील खरेदी केली.

पापा पटेल यांना बघुन इतर पटेलांनी देखील अमेरिकेत हाॅटेल व्यवसायात गुंतवणुक केली.

असे करत करत पटेल हे अमेरिका ह्या देशातील हाॅटेल किंग बनले.आज अमेरीका ह्या देशात पापा पटेल यांची एक अब्ज डॉलर पेक्षा अधिक संपत्ती असलेली आपणास पाहावयास मिळते.

अणि पापा पटेल ७२ हजार डॉलर्स पेक्षा अधिक आयकर देखील भरतात.आज त्यांनी दहा लाखापेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

आज पटेल एवढे यशस्वी उद्योजक बनले आहेत त्याचे कारण म्हणजे त्यांनी आर्थिक जोखीम घेत कुठलीही नवीन गोष्ट करण्याची रिस्क घेतली नाही.

तसेच त्यांनी स्वताची काही नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया अंमलात न आणता जे आधीपासून व्यवसायात यशस्वी आहेत त्यांची नक्कल केली.तसेच आपल्या चालु व्यवसायातच गुंतवणुक केली.

गुजराती लोक नेहमी तोंडात साखर अणि डोक्यावर बर्फ ठेवत असतात.गुजराती लोक हे नेहमी गोड बोलुन आपले काम करून घेतात.

गुजराती लोकांना त्यांच्या मालाविषयी कितीही प्रश्न विचारले तरी ते कधीही चिडत नसतात.गुजराती व्यक्तीच्या दुकानात आलेला ग्राहक काही तरी खरेदी केल्याशिवाय जातच नाही.

इतके ते ग्राहकांशी आपुलकी अणि प्रेमाने वागतात.

गुजराती लोक नोकरी करण्यापेक्षा स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करून इतरांना नोकरी रोजगार उपलब्ध करून देण्याचे तत्व बाळगत असतात.

गुजरात ह्या राज्याची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की इथे कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करणे अधिक सोपे जाते.

गुजरात ह्या राज्याला सुमारे १६०० किलोमीटर इतका लांब सागरकिनारा लाभलेला आहे.त्यामुळे इथून मालाची आयात निर्यात करणे सोपे जाते.गुजरात मधुन कुठल्याही उद्योग व्यवसायाची सुरुवात केल्यास स्वस्त अणि नफादायक ठरते.

गुजराती लोक चैनचंगळीच्या वस्तु खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा त्याची गुंतवणुक करण्याला अधिक प्राधान्य देतात.

दुसरी गोष्ट म्हणजे गुजराती लोक हे रिस्क घ्यायला विचार करत नाही.कारण त्यांना माहीत असते कुठल्याही धंद्यात प्रगती करायची असेल तर रिस्क घ्यावीच लागेल.

गुजराती व्यक्ती लहानपणापासून आपल्या मुलांना देखील धंद्यात रिस्क घेण्याची शिकवण देतात.

गुजराती व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी लागतील त्याच गोष्टीचा उद्योग व्यवसाय करतात.कारण अशा व्यवसायात कधीच मंदी येत नसते.उदा कपडे,साडी,बुट, चप्पल किराणा इत्यादी 

गुजराती लोक जो व्यवसाय करतात मग तो कितीही छोटासा उद्योग व्यवसाय असला छोटेसे दुकान असले तरी त्या दुकानाला अधिक मोठे करण्याला अधिक महत्व देतात.

गुजराती लोक कोणतेही काम करण्याची लाज बाळगत नसतात छोटीशी चहाची टपरी चालविण्यापासुन घरोघरी भाजी विकण्याच्या कामाची देखील ते कधीच लाज बाळगत नाहीत.

गुजराती लोक कुठल्याही कामाला कमी समजत नाही हे त्यांच्यामधील एक महत्वाचा गुण आहे.

गुजराती लोक हे ऐक्याला अधिक महत्व देतात आपल्यासोबत आपल्या समाजातील इतर लोकांचा विकास व्हावा यासाठी गुजराती लोक नेहमी प्रयत्नशील असतात.

गुजराती लोक आपल्या समाजातील इतर व्यक्तींना देखील उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button