मारवाडी सर्वाधिक श्रीमंत का आहेत?why marwari is rich in Marathi
मारवाडी सर्वाधिक श्रीमंत का आहेत?why marwari is rich in Marathi
आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा नीट निरीक्षण करतो तेव्हा एक गोष्ट आपणास दिसून येईल की आज आपल्या भारत देशात जेवढेही श्रीमंत उद्योजक व्यावसायिक आहेत.
त्यापैकी अधिकतम व्यावसायिक हे मारवाडी आहेत.अशावेळी आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की आपल्या देशात मारवाडी हेच सर्वात जास्त श्रीमंत का आहेत?
मारवाडी लोकांमध्ये असे कोणते गुण आहेत ज्यामुळे ते व्यवसायात सर्वाधिक प्रमाणात यशस्वी ठरतात.
आजच्या लेखामध्ये आपण मारवाडी लोक सर्वात जास्त श्रीमंत का आहेत?तसेच आपल्या उद्योग व्यवसायात ते अशा कोणत्या रणनीतीचा वापर करतात ज्यामुळे आज ते व्यवसाय क्षेत्रात सर्वात जास्त यशस्वी झाले आहेत.
आज आपल्या भारत देशात एकुण १६९ बिलियनर्स आहेत.जे अमेरिका अणि चायना सारख्या देशानंतर सर्वात जास्त आहेत.
पण आश्चर्याची बाब अशी की यातील ४२ टक्के बिलियनर्स हे भारतातील एकाच प्रदेशात वास्तव्यास आहेत.अणि हे ठिकाण आहे राजस्थानचे मारवाड.
राधाकृष्ण दमाणी ज्यांचे डिमार्ट स्टोअर्स आज संपूर्ण देशात पसरलेले आहेत.जे आपल्या भारत देशातील टाॅप गुंतवणुकदार म्हणून ओळखले जातात.ते देखील मारवाडी कम्युनिटीचा भाग आहेत.
भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असलेले कुमार मंगलम बिर्ला, लक्ष्मी मित्तल,अनिल अग्रवाल हे देखील मारवाडी आहेत.
आज आपण देशातील ज्या सर्वात मोठ्या ई काॅमर्स स्टोअर वरून घरबसल्या शाॅपिंग करतो त्या फ्लिपकार्टचे मालक सचिन बंसल, बिन्नी बंसल हे दोघे देखील मारवाडीच आहेत.
मिंत्रा कंपनीचे सीईओ मुकेश बंसल, लेन्स कार्टचे सीईओ पीयुष बंसल, इंडिया मार्टचे दिनेश अग्रवाल,ओयो रूमचे फाऊंडर रितेश अग्रवाल तसेच भारतातील इलाॅन मस्क म्हणून ओळखले जाणारे भाविश अग्रवाल हे सुद्धा एक मारवाडीच आहेत.
एवढेच नव्हे तर आज आपल्या भारत देशातील सर्व टाॅपचे गृप द टाईम्स गृप,एचटी मीडीया,डीबी काॅर्प तसेच लोकमत इत्यादीला आज आपल्या देशातील मारवाडीच चालवत आहेत.
भारतातील ५० टक्के स्टार्ट अप मध्ये आपल्याला कमीत कमी एक मारवाडी नक्कीच पाहायला मिळतो.एक मारवाडी व्यक्तीला दुसरी कुठलीही गोष्ट जमो किंवा न जमो पण पैसे कसे कमवायचे हे सिक्रेट त्यांना माहीत असतेच.
हेच कारण आहे की असे म्हटले जाते की जहा पे ना पहुचे घोडागाडी वहा पहुचे रेलगाडी और जहा न पहुचे रेलगाडी पहुचे मारवाडी.
आज आपण मारवाडी लोकांचें काही असे बिझनेस सिक्रेट जाणुन घेणार आहोत ज्यामुळे आज ते सर्वाधिक श्रीमंत आहेत.
ज्यामुळे मारवाडी लोक आपल्या उद्योग व्यवसायात प्रगती करून आपल्या उद्योग व्यवसायाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातात.
मारवाडी लोकांचे हे बिझनेस सिक्रेट जाणुन घेतले तर आपण देखील भविष्यात एक यशस्वी उद्योजक बनू शकतात.
मारवाडी लोकांचे बिझनेस सिक्रेट-marwari business secrets in Marathi
आज आपल्याला रिच डॅड पुअर डॅड,सायकोलाॅजी आॅफ मनी सारख्या फायनान्स संबंधित प्रत्येक पुस्तकात सांगितले जाते की आपण आपले कमावलेले पैसे योग्य ठिकाणी खर्च करायला हवेत.
मारवाडी लोकांमध्ये पैसे योग्य ठिकाणी खर्च करणे हा एक उत्तम गुण असतो.हे लोक पैसे खर्च करण्यात कंजुषी करतात पण पैसे खर्च करताना कोणत्या ठिकाणी कंजुषी करायची हे देखील त्यांचे ठरलेले असते.
मारवाडी लोक कधीही महागड्या गाड्या,महागडे कपडे, देखाव्यांच्या वस्तू ह्यावर पैसे खर्च करत नाहीत.पण सोन्यात पैसे गुंतवण्यात ते अजिबात विचार करत नाहीत.
कारण सोन्याचे मुल्य हे वेळेनुसार कधीच कमी होत नाही.यामुळे यात गुंतवणुक केलेले पैसे अधिक सुरक्षित असतात.
मारवाडी लोक फालतु खर्च कधीच करत नाही पण जेव्हा एखादा ग्राहक त्यांच्या दुकानात जातो तेव्हा त्याच्यासाठी चहापाणीचा खर्च नक्की करतील.
जेणेकरून ग्राहक अणि त्यांच्यामध्ये एक भावनिक कौटूंबिक नाते निर्माण होईल.
पण ग्राहकांसाठी चहा ते कुठल्याही मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल मधून नव्हे तर ते रस्त्यावर उभ्या केलेल्या छोट्याशा अशा चहाच्या टपरीतुन आणतात जिथे त्यांना उत्तम अणि स्वस्त दरात चहा उपलब्ध होईल.
म्हणजे मारवाडी लोक आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवत असतात जिथुन त्यांना भविष्यात अधिकतम प्रमाणात रिटर्न प्राप्त होण्याची शक्यता असते.
मारवाडी लोक जेव्हा कुठलेही सामान खरेदी करतात त्या अगोदर त्या सामानाची खरेदी केल्याने काय फायदा होईल हे बघतात.आपण कुठे पैसे गुंतवले तर आपल्याला फायदा होईल अणि कुठे पैसे गुंतवले तर आपल्याला तोटा सहन करावा लागेल.
अधिकतम लोक आपला स्वताचा उद्योग व्यवसाय ह्या गोष्टीमुळे सुरू करू शकत नसतात कारण ते एका योग्य वेळेच्या प्रतिक्षेत असतात.
जेव्हा त्यांच्या डोक्यात एखादी व्यवसाय कल्पणा येते किंवा वर्तमानात करत असलेल्या व्यवसायात त्यांना एक नवीन संधी दिसुन येते तेव्हा त्यांच्या मनात हा विचार येतो की आपल्याला ह्या क्षेत्राचे परिपुर्ण ज्ञान नाहीये.
त्यामुळे ते व्यक्ती स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकत नाही.अशा प्रकारे परिपुर्ण बनवण्याच्या प्रतिक्षेत त्यांना चांगली संधी गमवावी लागते.
पण मारवाडी लोक असे करत नाही ते कुठल्याही क्षेत्रात परिपुर्ण बनवण्याच्या नादात पडतच नाही.म्हणजे त्यांना एखाद्या व्यवसायाची फक्त वरवरची माहीती प्राप्त आहे.
त्यांना त्याच्याविषयी अधिक ज्ञान नाहीये पण त्यांना त्या व्यवसायात संधी दिसुन येत असेल तर ते अधिक विचार न करता त्या क्षेत्रात पाऊल टाकतात.
एकदा त्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर मारवाडी लोकांकडुन सुरूवातीला काही चुका देखील होतात.तसेच त्यात त्यांचे थोडेफार नुकसान देखील होते.
पण नंतर ते आपण कुठे चुकलो याचे निरीक्षण करत आपल्या चुकांमध्ये दुरुस्ती देखील करतात.
तसे पाहायला गेले तर बंगाली अणि गुजराती लोकांनी मारवाडी लोकांच्या अगोदर व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला होता.
पण ते योग्य वेळ अणि योग्य संधीची वाट पाहण्यावर अधिक विश्वास ठेवत होते अणि मारवाडी लोक मोजकीच जोखिम घेण्यावर विश्वास ठेवायचे.यामुळे मारवाडी लोक व्यवसायाच्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीये.
पण मारवाडी लोक समोर जो व्यवसाय दिसला त्यात डायरेक्ट प्रवेश करत नसतात.किंवा ज्या व्यवसायात तात्पुरता नफा आहे अशा व्यवसायात देखील ते प्रवेश करत नाही.
मारवाडी लोक अशा व्यवसायात प्रवेश करणे अधिक पसंत करतात ज्यात त्यांची वर्षोनुवर्षे अणि नेहमी प्रगती होईल.
याचसोबत मारवाडी लोक नेहमी बदलत असलेल्या मार्केट रेटवर देखील लक्ष ठेवतात.
अणि आपल्या उद्योग व्यवसायात त्यानुसार परिवर्तन देखील घडवून आणतात.बाजारात जेव्हा त्यांना एखादी नवीन संधी दिसुन येते तेव्हा सर्वप्रथम त्या संधीचा लाभ घेण्याचा ते प्रयत्न करत असतात.
अणि मारवाडी अशाच संधीचा लाभ उठवतात ज्यात त्यांना दीर्घकाळ प्रगती अणि नफा दिसुन येतो.
मारवाडी लोक पैशाशी संबंधित सर्व मोठे अणि महत्वाचे निर्णय स्वता घेत असतात.ज्यामुळे चुकांची शक्यता खुप असते.
मारवाडी कम्युनिटी मध्ये त्या व्यक्तीला अधिक इज्जत दिली जात नाही जो सर्वात महागडा उद्योग व्यवसाय करतो.
त्या व्यक्तीची अधिक इज्जत केली जाते ज्याचा व्यवसाय सर्वात मोठा असतो.
मारवाडी लोकांमध्ये बिझनेस माईंडसेट असतो जो त्यांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो.
मारवाडी परिवारात यात आईवडील त्यांचा मुलगा लहान असतानाच त्याला आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जातात.
आपल्या उद्योग व्यवसायात आपल्या मुलांना समाविष्ट करून घेतात त्यातील बारकावे त्यांना व्यवस्थित समजावून देखील सांगतात.
अणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहानपणापासूनच आपल्या मुलांना ते पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे पैशांची गुंतवणूक कुठे करायची हे शिकवत असतात.
मारवाडी लोकांमध्ये एक म्हण खुप प्रसिद्ध आहे हमे बासी रोटी नही खाना है याचा अर्थ असा होतो की आम्हाला आमच्या वाडवडिलांनी कमावून ठेवलेल्या संपत्तीवर ऐशोआराम करायचा नाहीये.
आपल्या पूर्वजांनी कमावलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणुक करून आपल्या व्यवसायात अधिक वाढ विस्तार कसा करता येईल यावर त्यांचे लक्ष असते.
ह्यामुळे आज मारवाडी लोक पिढ्यानपिढ्या पासुन व्यवसाय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करून आहेत.
मारवाडी लोक आपल्या उद्योग व्यवसायात अधिक वाढ घडवून आणण्यासाठी आपले इतर काम आपल्या दुकानात कामाला ठेवलेल्या कर्मचारी कडून करून घेतात.
आपल्या मनात नेहमी प्रश्न निर्माण होतो की श्रीमंत मारवाडी लोक आपले छोटछोटे काम करण्यासाठी देखील कर्मचारींन कामाला का ठेवतात.त्याचे देखील एक महत्वाचे कारण आहे.
मारवाडी लोक हा विचार करतात की एक तास काम करून आपल्याला ५०० रूपये कमवायचे आहेत अणि त्याच ठिकाणी आपल्याला कार धुवायचे काम ५०० रूपयात करायचे असेल जिथे एक तास इतका कालावधी लागणार आहे.
मग अशावेळी मारवाडी आपले तेच काम दुसरया व्यक्तीकडून २०० रूपयात करून घेतात ज्याने त्यांना नफा देखील प्राप्त होतो अणि त्यांचा अमुल्य वेळ वाया देखील जात नाही.
तोच वेळ त्यांना इतर महत्वाचे काम करण्यास देता येतो.
याने त्यांना वेळेचा सदुपयोग देखील करता येतो.
मारवाडी लोक व्यवसायात ह्याच स्ट्रॅटेजीचा वापर करत आपले अधिकतम काम आपल्या कर्मचारी वर्गाकडून करून घेतात.अणि स्वता सर्वात जास्त महत्वाचे काम हातात घेत असतात.
मारवाडी लोक वेळोवेळी आपल्या कंपनीतील कर्मचारी कशापद्धतीने काम करत आहेत याचा आढावा घेत असतात.
अणि आपल्या व्यवसायातील सर्व महत्वाचे निर्णय स्वताच्या हातात ठेवतात ज्याने त्यांना आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार देखील करता येतो.
एखादी मोठी मल्टी नॅशनल कंपनी असो किंवा एखादी छोटेसे किराणा दुकान असो तिथे कामाचे वातावरण खुप महत्वाचे असते.
जर आपण आपल्या परिसरातील दुकानात गेले तर आपल्याला पाहावयास मिळते की दुकानदार आपल्या कर्मचारींना एकदम वाईट वागणूक देत असतो.
कामात काही चुक झाल्यास त्यांच्यावर ओरडत असतो त्यांच्याशी उद्धटपणे बोलत असतो.त्यांना तो नोकरासारखी वागणुक देत असतो.
छोट्या छोट्या कारणांवरून पगारातुन पैसे कापुन घेण्याची धमकी आपल्या कर्मचारींना देत असतो.
दुकानात कामाला असलेल्या कर्मचारींच्या आयुष्यात काही अडचण असेल काही दुखद प्रसंग घडला असेल तर त्याला मदत देखील करत नाही तसेच एक दोन दिवसांसाठी सुट्टी देखील देत नाही.
पण मारवाडी लोक असे अजिबात करत नाही त्यांना माहित असते त्यांचे कर्मचारी त्यांच्यासाठी किती अधिक महत्वाचे आहेत.
त्यांना माहीत असते आपल्या उद्योग व्यवसायाला सर्वाधिक यशस्वी बनवण्यासाठी आपल्या कामगारांची आपणास विशेष आवश्यकता असणार आहे.
अणि आपल्या कुटुंबानंतर आपल्याला आपल्या कामगारांंसोबतच अधिक वेळ व्यतीत करायचा आहे.
याचमुळे मारवाडी लोक आपल्या दुकानात,कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारींना कुटुंबातील सभासदाप्रमाणे वागणुक देतात.
यामुळे कर्मचारी आपल्या मालकाच्या प्रती नेहमी प्रामाणिक राहतात.अणि कधी कोणाच्या तोंडून आपल्या मालका विरोधात एक चुकीचा शब्द देखील ऐकुन घेत नाही.
एवढेच नव्हे तर ते आपल्या मालकाच्या कंपनीला दुकानाला आपले समजुन त्यात निष्ठेने प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करतात.
जेणेकरून त्यांच्या मालकाच्या दुकानात जास्तीत जास्त ग्राहक येतील अणि त्यांची जास्तीत जास्त कमाई देखील होईल.
मारवाडी लोक ॲक्टीव्ह इन्कम पेक्षा पॅसिव्ह इन्कम तयार करण्यावर अधिक भर देतात.अणि जेव्हा तिथुन त्यांना कमाई होऊ लागते.
तेव्हा तो पैसा स्टाॅक, म्युच्युअल फंड, गोल्ड, रिअल इस्टेट सारख्या ठिकाणी गुंतवत असतात.याने त्यांना कमावलेल्या पैशावर व्याज मिळते.अणि त्यांच्याकडे अजुन एक उत्पन्नाचे साधन तयार होते.
आपल्या उत्पन्नातील काही रक्कम मारवाडी लोक समाजाच्या हितासाठी एनजीओ किंवा एखाद्या मंदिरात दान करतात.तसेच त्याद्वारे कम्युनिटी एव्हेंट करतात.
पण याने त्यांच्या पैशात अधिक वाढ होण्यास मदत होते.कारण मारवाडी लोक सोसायटी मध्ये जेव्हा दान करतात.
तेव्हा जनमानसात त्यांचे चांगले नाव होते.याने त्यांच्या नेटवर्किंग मध्ये वाढ होतेच शिवाय मारवाडी लोकांना आपल्या उद्योग व्यवसायात नवनवीन ग्राहक प्राप्त होतात.
कारण समाजातील लोकांचा ग्राहकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढलेला असतो.
मारवाडी लोक स्वताचा उद्योग व्यवसाय उत्तमरीत्या चालु लागल्यावर त्यातुन चांगले इन्कम येऊ लागल्यावर आपल्या परिवारातील,कम्युनिटी मधील इतर परिचयातील लोकांना देखील त्यांच्या उद्योग व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात.
जेणेकरून त्यांना देखील उद्योग व्यवसायात पुढे जाता येईल अणि त्यांच्याप्रमाणे यशस्वी होता येईल.
याने मारवाडी लोकांना दुसरया व्यवसायात गुंतवणुक करून आपल्या पैशात देखील वाढ करता येते.अणि ते आपल्या कम्युनिटीला देखील व्यवसायाच्या क्षेत्रात अधिक पुढे नेत आहेत.
हेच कारण आहे की मारवाडी लोक वर्षानुवर्षे पासुन भारतात सर्वात जास्त श्रीमंत आहेत अणि उद्योग व्यवसाय क्षेत्रात पिढयान पिढ्यांपासून आपले वर्चस्व स्थापित करून आहेत.