झेपटो स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Zepto start up business success story in Marathi
झेपटो स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Zepto start up business success story in Marathi
झेपटो ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात एप्रिल २०२१ मध्ये दोन मित्र कैवल्या वोहरा अणि आदित्य पलीच्या ह्या दोघांनी मिळुन केली होती.
झेपटोचे आज बाजारातील एकुण मुल्यांकन ६ हजार ८९५ करोड रुपये पेक्षा अधिक आहे.आज ही कंपनी देशातील १०४ वी युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी म्हणून ओळखली जाते.
हुरून इंडिया फ्युचर युनिकाॅन इंडेक्स २०२२ नुसार आज हे दोघे एक हजार करोडच्या क्लब मध्ये प्रवेश करणारे देशातील सर्वात तरूण 19 वर्षीय उद्योजक देखील बनले आहेत.
आजच्या लेखामध्ये आपण कैवल्या वोहरा अणि आदित्य पलीच्या ह्या दोघे मित्रांना झेपटोची सुरूवात करण्याची कल्पणा कशी अणि कुठुन आली? तसेच ह्या दोघांनी १० मिनिटात घरबसल्या किराणा पोहोचवण्याची आयडिया कशी अंमलात आणली.
तसेच ह्या कंपनीची संपूर्ण यशोगाथा आपण जाणुन घेणार आहोत.
झेपटो युनिकाॅन स्टार्ट अप कशी बनली?
भारतीय ई काॅमर्स क्षेत्रात सर्वप्रथम फ्लिपकार्टने पाऊल टाकले होते.प्लिपकार्टने घरबसल्या मालाची पोहोच ह्या संकल्पनेला भारतात एक प्रसिद्ध केले.
यानंतर येथील ई काॅमर्स क्षेत्रात बिग बास्केटने प्रवेश केला त्यांनी देखील ह्या क्षेत्रात एक क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले अणि ग्राहकांना फक्त एका दिवसात घरपोच सामानाची सेवा देण्यास सुरुवात केली.
पण झेपटोने बाजारात १० मिनिटात ग्राहकांना घरबसल्या किराणा पोहोचवण्याची संकल्पना आणली अणि बाजारातील आपल्या इतर सर्व प्रतिस्पर्धीं कंपन्यांना काही कालावधीतच मागे टाकले.
झेपटोने बाजारातील ई काॅमर्स क्षेत्रातील प्रोडक्ट डिलिव्हरीची जी काही परिभाषा होती ती संपूर्ण परिभाषाच बदलुन टाकली.
झेपटो सुरू करण्याची कल्पणा कैवल्या वोहरा अणि आदित्य पलीच्या यांच्या डोक्यात कुठुन आली?
झेपटोचे फाऊंडर कैवल्या वोहरा अणि को फाऊंडर आदित्य पलीच्या हे दोघेही बालपणीचे मित्र होते.दोघेही मुळचे मुंबई येथील होते पण त्यांच्या बालपणीचा अधिक काळ त्यांनी दुबई मध्येच व्यतीत केला होता.
दोघेही मुंबई मधील रहिवासी होतेच शिवाय दोघांचेही शिक्षण दुबई मधील एकाच शाळेत झाले होते अणि कैवल्या अणि आदित्य दोघांचेही वडील एकाच प्रोफेशन मध्ये होते ते दोघेही इंजिनिअर होते.
यामुळे दोघांमधील अनेक गोष्टीत समानता असल्याने दोघांची चांगली मैत्री झाली.हे दोघेही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खुपच वास्तववादी होते.
कैवल्या अणि आदित्य ह्या दोघांनाही छोटछोटया प्रोजेक्टवर देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला आवडत होते.हया दोघांना मोबाईल ॲप,क्रोम ब्राऊझर, वेबसाईट इत्यादी बाबींमध्ये विशेष रूची होती.
याकरिता कैवल्या अणि आदित्य दोघांनीही कंप्युटर सायन्स मधुन आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हसिर्टीत प्रवेश घेण्याचे ठरवले.अणि दोघांना त्या युनिव्हसिर्टीत प्रवेश देखील मिळाला.
मग स्टॅनफोर्ड युनिव्हसिर्टीत दोघेही शिक्षण पूर्ण करत असताना अचानक तिथे कोरोना नावाच्या भयंकर महामारीने प्रवेश केला.
ह्या कालावधीत कैवल्या अणि आदित्य दोघेही मुंबई येथे आपल्या कुटुंबासमवेत येऊन राहु लागले.
कोरोनाच्या काळात संपूर्ण बाजार ठप्प झाले होते, सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.अणि जरी एखाद्या ठिकाणी आवश्यक जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी एखादे शाॅप किंवा दुकान उघडे असले तरी कोरोनाच्या भीतीने लोक घराबाहेर पडत नव्हते.
अशा परिस्थितीत कैवल्या अणि आदित्य ह्या दोघांनीही आपल्या घरचे सामान ऑनलाईन ऑडर करण्याला अधिक पसंती दिली.पण अडचण अशी होती की ऑनलाईन सामानाची ऑडर टाकल्यानंतर सात ते आठ दिवसांनी ती ऑडर ई काॅमर्स कंपनीकडून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येत होती.
ज्यामुळे लोकांना खूप दिवस किराणा मालाची भाजीपाल्याची वाट पाहत तात्कळत बसावे लागत होते.हयाच समस्येला कैवल्या अणि आदित्य हे दोघे देखील सामोरे जात होते.
तसेच त्यांच्या आजुबाजुला राहत असलेल्या व्यक्तींना देखील ह्याच समस्येला सामोरे जावे लागत होते.
सर्व जण बाजारातील ऑनलाईन ऑडर केलेला किराणा उशिरा घरापर्यंत पोहोचवण्याच्या सेवेमुळे खूप हताश निराश झाले होते.
मग बाजारातील ई काॅमर्स क्षेत्रातील ही सर्व दयनीय परिस्थिती बघुन कैवल्या अणि आदित्य ह्या दोघांनीही यावर तोडगा काढण्याचे ठरवले.
मग ह्या दोघांच्या डोक्यात घरोघरी जाऊन किराणा माल, भाजीपाला पोहोचवण्याची कल्पणा आली.मग आपल्या ह्या स्टार्ट अप आयडीयावर काम करत कैवल्या अणि आदित्य यांनी स्वता लोकांच्या घरी,दारोदारी जाऊन किराणा भाजीपाला पोहोचवणे सुरू केले.
इथुनच किराणा कार्टची सुरूवात देखील झाली जे बाजारातील लोकल स्टोअर सोबत काम करत होते.
ह्या कंपनीने एक आठवड्याच्या डिलीव्हरी टाईमला कट केले.अणि ह्या वेळेला ४५ मिनिटे इतके केले.
म्हणजे जिथे लोकांना त्यांचा ऑडर केलेला किराणा माल भाजीपाला वगैरे एक आठवड्यात प्राप्त होत असत तिथे तो फक्त ४५ मिनिटांत घरपोच प्राप्त होण्यास सुरुवात झाली.
किराणा कार्टच्या दवारे सुरूवातीला हे दोघेही फक्त आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील ठिकाणी माल डिलिव्हर करत होते.
पण वाढत्या लोकांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत किराणा माल पोहोचवण्यासाठी अनेक डिलीव्हरी पार्टनरला आपल्यासोबत हायर करून घेतले.
अणि जेव्हा ग्राहकांसोबत चर्चा करून त्यांनी त्यांचा प्रतिसाद जाणुन घेतला तेव्हा त्यांना लक्षात आले की ग्राहक किराणा कार्ट पासुन पाहीजे तितके संतुष्ट नव्हते.
कारण अनेकवेळा त्यांना ऑडर केलेल्या किराणा मालाच्या जागी दुसराच माल डेलीव्हर करण्याचे प्रकार घडुन येत होते.
पण त्यावेळी मार्केट मध्ये असा कुठलीही कंपनी दुसरा चांगला पर्याय म्हणून उपलब्ध नव्हती जी ४५ मिनिटात घरपोच किराणा भाजीपाला पोहोचवण्याची सेवा देईल.
त्यामुळे किराणा कार्टच्या सर्विसपासुन पाहीजे तेवढे संतुष्ट नसताना देखील ग्राहक त्यांच्याकडुनच सेवा घेत होते.
दुसरीकडे लोकांचें असे मत होते की लाॅकडाऊन ओपन झाल्यानंतर किराणा कार्ट पासुन त्यांना आलेल्या वाईट खराब अनुभवामुळे ते पुन्हा कधी त्यांच्याकडुन सेवा घेणार नाही.
हे जाणुन घेतल्यानंतर झेपटोचे फाऊंडर तसेच को फाऊंडर कैवल्या अणि आदित्य यांनी ह्यामधील कमतरता उणीवांना अधिक सविस्तरपणे जाणुन घेण्यास सुरुवात केली.
मग ग्राहकांना चांगला अनुभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या स्टार्ट अप व्यवसायात अनेक महत्वाचे बदल घडवून आणले.
मग आपल्या व्यवसायात अनेक महत्त्वपुर्ण बदल केल्यानंतर त्यांनी डार्क स्टोअर माॅडेल सोबत काम करण्यास सुरुवात केली.
डार्क स्टोअर हे एक प्रकारचे मायक्रो वेअर हाऊस असतात ज्यांची निर्मिती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी केली जाते.
ह्या डार्क स्टोअर मध्ये कुठल्याही ग्राहकाला जाण्याची परवानगी नसते.
ह्या डार्क स्टोअर मध्ये फक्त तिथे काम करत असलेल्या कर्मचारींना असते. डार्क स्टोअरच्या साहाय्याने किराणा कार्ट त्यांच्या गरजेची वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेच याचसोबत याचा अजुन एक फायदा झाला किराणा मालाची पोहोच करण्यासाठी लागत असलेल्या ४५ मिनिटे ह्या कालावधीत घट झाली.
ह्याच कारणामुळे किराणा कार्टवर भेट देत असलेल्या ग्राहकांच्या संख्येत अधिक वाढ होण्यास सुरुवात झाली.
अणि ग्राहकांच्या नकारात्मक प्रतिसादाचे रूपांतर सकारात्मक प्रतिसादात झाले.
मग ह्या यशानंतर कैवल्या अणि आदित्य यांनी आपल्या उद्योग व्यवसायाचा अधिक विस्तार करण्यासाठी कंपनीची पुनर्बाधणी केली.
यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून किराणा कार्टच्या जागी झेपटो असे ठेवण्याचा निर्णय घेतला.
सध्या झेपटो भारतातील एकुण ११ शहरात आपली सेवा देत आहे.ज्यात दिल्ली, चेन्नई, गुडगाव, बंगलौर, हैदराबाद, मुंबई सारख्या अनेक मोठमोठ्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
आज भारतातील १० मिलियन पेक्षा अधिक ग्राहक घरबसल्या किराणा भाजीपाला खरेदी करण्यासाठी झेपटोचा वापर करतात.
झेपटोचे बिझनेस मॉडेल –
झेपटोने किराणा माल पोहोचवण्यासाठी अनेक डार्क स्टोअर ओपन केले आहेत.अणि ह्या डार्क स्टोअरला देखील अगदी ऑप्टीमाईज पद्धतीने ऒपरेट केले जाते.
डेटा विश्लेषणाच्या मदतीने सर्वप्रथम कंपनीकडुन ही माहीती प्राप्त केली जाते की कोणकोणत्या शहरात लोकेशनवर कुठल्या प्रोडक्टची अधिक मागणी केली जात आहे.अणि कुठल्या प्रोडक्टची खूप कमी मागणी केली जात आहे.
मग विश्लेषण करून झाल्यानंतर ग्राहकांकडून सगळ्यात जास्त ऑडर करण्यात येत असलेल्या प्रोडक्टला योग्य ठिकाणी ठेवण्यात येते.जेणेकरून ऑडर पडल्यावर कर्मचारीला तिथुन लगेच ते प्रोडक्ट उचलून डिलिव्हर करण्यासाठी जाता येते.
जेव्हा झेपटोवर कुठलीही ऑडर ग्राहकांकडून केली जाते तेव्हा त्या ऑडरच्या लोकेशन नुसार जे त्या लोकेशन जवळील डार्क स्टोअर असते तिथे ती ऑडर ट्रान्स्फर केली जाते.
डार्क स्टोअर मध्ये ऑडर डिटेल्स बघितल्यावर फक्त एक मिनिटात ती ऑडर पॅक केली जाते.अणि डिलिव्हर करण्यासाठी पाठविण्यात येते.डार्क स्टोअर मध्ये अंदाजे फक्त ५७ सेकंदात ऑडर केलेला माल पॅक करण्यात येतो.
एवढेच नव्हे तर झेपटो आपल्या डिलिव्हरी बॉयला निर्धारित स्थळी लवकर पोहोचण्यासाठी कोणत्या रस्त्याने त्यांनी जायला हवे जेणेकरून त्यांना ग्राहकांपर्यंत ऑडर घेऊन वेळेवर पोहचता येईल.
आपल्या ह्याच स्ट्रॅटेजीचा वापर करून झेपटोने आज १० मिनिटात घरपोच किराणा भाजीपाला पोहोचवणे शक्य केले आहे.
काहीवेळा झेपटो आपल्या ग्राहकांपर्यंत ७ मिनिटात देखील घरपोच किराणा भाजीपाला पोहोचवते.हयाच कारणामुळे झेपटोने सुरूवातीच्या सहा महिन्यातच ४९० करोड इतकी फंडिंग प्राप्त केली होती.
झेपटो ह्या कंपनीचे एकुण बाजार मुल्यांकन ६ हजार ८९० करोडपेक्षा अधिक आहे.अणि आज झेपटोकडे जवळपास ८६ डार्क स्टोअर देखील उपलब्ध आहेत.
झेपटोने आपल्या उत्तम स्ट्रॅटेजीचा वापर करत आज बाजारातील फ्लिपकार्ट,झोमॅटो, स्वीगी, ॲमेझाॅन,बुंजो इत्यादी सारख्या मोठमोठ्या दिग्दज कंपन्यांना देखील टक्कर देत आहे.
झेपटो सध्या झोमॅटो,स्वीगी,ॲमेझाॅन,फ्लिपकार्ट,बुंजो प्रमाणे देशातील सर्वच लोकेशनवर उपलब्ध झाले नाहीये पण लवकरच देशातील सर्व लोकेशनवर झेपटोचे वर्चस्व पाहायला मिळेल.