Blog

बालाजी वेफर्सची यशोगाथा Balaji wafers success story in Marathi 

बालाजी वेफर्सची यशोगाथा Balaji wafers success story in Marathi 

एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जो सिनेमा थिएटर मध्ये पहारेकरी म्हणून काम करायचा त्या बदल्यात त्याला महिन्याला फक्त ९० रूपये प्राप्त व्हायचे.

आज त्याच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाने बाजारात अशी एक मोठी कंपनी उभारण्यात यश प्राप्त केले आहे.

ज्या कंपनीचे टर्न ओव्हर पाच हजार करोडपेक्षा अधिक आहे.

एक वेळ अशी होती जेव्हा चंदुभाई विराणी यांच्याकडे भाडे भरण्यासाठी फक्त ५० रूपये देखील नव्हते.

प्रारंभी चंदुभाई विराणी यांनी सिनेमा थिएटर मध्ये सीट साफ करण्याचे, सिनेमाचे पोस्टर्स लावण्याचे अणि सॅड वीच विकण्याचे काम केले.पण आज चंदुभाई विराणी हे गुजरात मधील सर्वात मोठी वेफर्स कंपनी बालाजीचे संस्थापक आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण १० वी उत्तीर्ण चंदुभाई विराणी यांच्या सिनेमा थिएटर मध्ये सीट साफ करणे,सिनेमाचे पोस्टर्स लावण्यापासुन,बालाजी वेफर्स सारखी गुजरात मधील सर्वात मोठी वेफर्स कंपनी उभी करण्यापर्यंतचा संपूर्ण संघर्षमय प्रवास जाणुन घेणार आहोत.

चंदुभाई विराणी यांनी वेफर्सचे चिप्स विकुन ५ हजार करोड पर्यंतचा ब्रॅड कसा उभा केला?

बालाजी वेफर्सच्या कहाणीला तेव्हा सुरूवात झाली जेव्हा गुजरात मधील जामनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये पोपटरामजी भाई विराणी नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता.

पोपट रामजीभाई विराणी शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

रोज शेती व्यवसाय करून रामजी भाई विराणी आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते.पण एक दिवस असा आला की त्यांच्या परिसरात पाऊसच पडला नाही.ज्यामुळे त्यांनी लावलेली सर्व पीके उद्ध्वस्त झाली.

याचसोबत अनेक वेळा झालेल्या बेमोसमी पावसामुळे देखील पोपट रामजीभाई अणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले.

अखेरीस ह्या सर्व समस्यांना कंटाळून पोपट रामजीभाई विराणी यांनी फक्त २० हजार रुपयेमध्ये आपली वडिलोपार्जित जमीन विकुन टाकली.

अणि जमिन विकुन जे पैसे प्राप्त झाले ते पैसे आपल्या तिन्ही मुले चंदुभाई विराणी,मेघजीभाई विराणी अणि भिक्खुभाई विराणी ह्या तिघांमध्ये समानरीत्या वाटुन टाकले.

जेणेकरून त्या तिघांना मिळालेल्या पैशातून स्वताचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करता येईल.

मग वडिलांकडून पैसे घेऊन १५ वर्षीय चंदुभाई विराणी आपल्या दोघे भावांसमवेत राजकोट येथे गेले.तिथे त्यांनी  कृषी उत्पादने अणि शेती विषयक उपकरणांचा एक व्यवसाय सुरू केला.

ज्या डिलरकडुन चंदुभाई विराणी यांनी शेतीचे प्रोडक्ट खरेदी केले त्याला माहीत होते की चंदुभाई विराणी अणि त्यांच्या दोघे बंधुंना व्यवसायाचे कुठलेही ज्ञान नाहीये.

म्हणुन ह्याच गोष्टींचा फायदा उठवत डिलरने चंदुभाई विराणी यांची खूप मोठी फसवणूक केली त्याने चंदुभाई विराणी यांना खूप जास्त किंमतीत बनावट खते विकली.

ह्यामुळे चंदुभाई विराणी यांचा हा पहिला व्यवसाय उपक्रम फक्त दोन वर्षांत अपयशी ठरला अणि चंदुभाई विराणी अणि त्यांचे दोघे भाऊ पुन्हा एकदा रस्त्यावर आले.

चंदुभाई विराणी अणि त्यांच्या भावांना आता पुन्हा गावांकडे देखील जाता येत नव्हते कारण तिथे त्यांच्यासाठी काहीच उरलेले नव्हते.

मग चंदुभाई विराणी अणि त्यांचे दोघे बंधू राजकोट मध्ये भाड्याच्या खोलीत राहुन आपल्यासाठी काम बघु लागले.

चंदुभाई जास्त शिकलेले देखील नव्हते.म्हणुन त्यांना चांगली नोकरी देखील प्राप्त होत नव्हती.

त्याचवेळी चंदुभाई यांच्या आर्थिक अडचणी इतक्या वाढल्या होत्या की त्यांना घराचे भाडे ५० रूपये देखील भरणे शक्य होत नव्हते.

ज्यामुळे घरमालकाने चंदुभाई विराणी अणि त्यांच्या भावांना खोलीवरून काढुन टाकले.मग काही दिवसांनंतर चंदुभाई विराणी यांना ॲस्ट्राॅन नावाच्या एका सिनेमा थिएटर मध्ये पहारेकरी म्हणून काम प्राप्त झाले.

तिथे पहारेकरी म्हणून काम करण्यासाठी चंदुभाई यांना महिन्याला फक्त ९० रूपये मिळत होते.

सिनेमा थिएटर मध्ये पहारेकरीचे काम करण्यासोबत चंदुभाई यांनी सिनेमाचे पोस्टर्स लावण्याचे तसेच कॅन्टीन मध्ये सॅडविच विकण्याचे काम देखील केले.

अशा पद्धतीने कमी पैशात का होईना चंदुभाई विराणी आपला अणि आपल्या भावंडांचा उदरनिर्वाह करू लागले.

चंदुभाई विराणी त्यांच्या कामात खुपच मेहनती अणि इमानदार होते म्हणून ईमानदारीने काम केल्यामुळे त्यांना 

थिएटर मधील कॅन्टीनचा ठेका मिळाला.

मग चंदुभाई विराणी सिनेमा थिएटर मधील कॅन्टीन मध्ये इंटरवल मध्ये मसाला सॅड वीच बनवुन त्याची विक्री करू लागले.

चंदुभाई विराणी यांनी बनवलेले मसाला सॅड वीच थिएटर मध्ये सिनेमा पाहण्यासाठी येत असलेल्या लोकांना खुपच आवडु लागले.

थिएटर मध्ये इंटरवल मध्ये मसाला सॅड वीचची विक्री करत चंदुभाई विराणी यांनी थोडा अतिरिक्त नफा देखील प्राप्त केला.

मग १९८२ मध्ये चंदुभाई विराणी आपल्या गावाकडील सर्व कुटुंबाला राजकोट मध्ये आणले.अणि मग चंदुभाई विराणी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मिळुन एकत्रितपणे हे काम करू लागले.

पण यात समस्या अशी होती की चंदुभाई विराणी यांनी बनवलेले सॅड वीच आजुबाजुच्या परिसरात खुपच प्रसिद्ध झाले होते लोक ते खाण्यासाठी आवडीने चंदुभाई यांच्याकडे येत देखील होते.

पण संध्याकाळी जे सॅडवीच शिल्लक राहत होते दुसरया दिवशी बुरा लागत होता त्यामुळे ते सॅडवीच खराब झाल्याने वाया जाऊ लागले.आपल्या ह्या होत असलेल्या रोजच्या नुकसानामुळे चंदुभाई विराणी खुपच हैराण, त्रस्त झाले होते.

मग ह्याच परेशानी मध्ये चंदुभाई विराणी यांनी विचार करण्यास सुरुवात केली की आपण बाजारात असे काय विकु शकतो जे कित्येक दिवस खराब देखील होणार नाही.

याच दरम्यान चंदुभाई विराणी यांना बटाटयाचे वेफर्स विकण्याची कल्पणा सुचली.मग चंदुभाई विराणी यांनी 

एका दुकानदारा समवेत बटाटयाचे पातळ चिप्स खरेदी करण्याची डिल केली.

अणि मग चंदुभाई विराणी यांनी विक्रेत्या कडुन खरेदी केलेले बटाट्याचे चिप्स त्यांच्या कॅन्टीन मध्ये विकण्यास सुरुवात केली.पण पुढे जाऊन ह्या व्यवसायात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली.

विक्रेत्या चंदुभाई विराणी यांना वेळेवर माल देत नव्हता.यामुळे थिएटर मध्ये सिनेमा पाहण्यासाठी आलेले लोक इंटरवल मध्ये जेव्हा चंदुभाई यांच्या कॅन्टीनवर चिप्स घेण्यासाठी यायचे तेव्हा चंदुभाई यांच्याकडे त्या ग्राहकांना देण्यासाठी चिप्स उपलब्ध नसायचे.

विक्रेत्या चंदुभाई विराणी यांना वेळेवर माल पुरवत नव्हताच. शिवाय विक्रेत्या जे वेफर्सचे चिप्स चंदुभाई यांना सप्लाय करत होता ते मोडके तोडके असायचे.

यामुळे चंदुभाई खुपच त्रस्त झाले होते मग चंदुभाई यांनी ठरवले की बाजारातील कुठल्याही विक्रेत्याकडुन चिप्स खरेदी न करता आपण स्वता वेफर्सचे चिप्स बनवायचे.

पण त्यावेळी चंदुभाई विराणी यांच्याकडे फक्त १० हजार रुपये शिल्लक होते तरी देखील हार न मानता चंदुभाई विराणी यांनी १९८२ मध्ये आपल्या घरासमोरील अंगणात

एक छोटासा स्टील सेट लावला.

अणि मग रात्री कॅन्टीन बंद केल्यानंतर चंदुभाई विराणी ह्या ठिकाणी बटाट्याचे वेफर्स बनवू लागले.चंदुभाई विराणी यांना बटाटयाचे वेफर्स बनविण्याचा कुठलाही अनुभव नव्हता.

यामुळे प्रारंभी चंदुभाई विराणी यांच्याकडुन कधी चिप्स बनविताना जळुन जात होते.किंवा काही चिप्स खुपच नरम राहुन जात होते.

पण चंदुभाई विराणी यांनी हार नाही मानली ते रोज बटाट्याचे वेफर्स बनवत राहीले.अणि मग काही दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर चंदुभाई विराणी एकदम उत्तमरीत्या बटाटयाचे वेफर्स बनवू लागले.

घरीच चिप्स बनवत असल्याने चंदुभाई यांना चिप्सच्या गुणवत्तेवर देखील नियंत्रण ठेवता आले.यामुळे त्यांच्या चिप्सची विक्री देखील अत्यंत वेगाने होऊ लागली.

चंदुभाई विराणी यांनी बनविलेल्या बटाट्याच्या वेफर्सला सिनेमा थिएटर मध्ये सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांची एवढी अधिक पसंती प्राप्त होत आहे.

हे बघुन थिएटर मालकाने चंदूभाई विराणी यांच्यासमोर पार्टनरशिप करण्याचा प्रस्ताव ठेवला.चंदुभाईंने ह्या प्रस्तावास होकार देखील दिला.

पुढे चंदुभाई विराणी तीन वेगवेगळ्या थिएटर मधील कॅन्टीन चालवू लागले.हळुहळु चंदुभाई विराणी यांच्या बटाटा वेफर्सला बाजारात अधिक मागणी प्राप्त होऊ लागली.

कालांतराने चंदुभाई विराणी यांनी बाजारातील २५ ते ३० व्यावसायिकांना देखील चिप्स सप्लाय करणे सुरू केले.

अणि हळुहळू चंदुभाई विराणी यांच्या बटाटा वेफर्सला पुर्ण 

राजकोट मध्ये पसंती प्राप्त होऊ लागली.

पण बाजारात इतर कंपन्यां देखील होत्या ज्या चंदु भाई विराणी यांच्याप्रमाणेच बटाटा वेफर्स चिप्सची विक्री करत होत्या.

मग बाजारात आपल्या बटाटा वेफर्सला एक वेगळी ओळख प्राप्त करून देण्यासाठी चंदुभाई विराणी यांनी त्यांच्या बटाटा वेफर्सला एक नाव देण्याचे ठरवले.

अणि मग बटाटा वेफर्सला काय द्यायचे ह्या विचारात असतानाच चंदुभाई विराणी यांना त्यांच्या कॅन्टीनच्या बाजुला असलेले एक बालाजी मंदीर दिसले.

मग त्यांनी त्यांच्या कॅन्टीनच्या समोरील हनुमानाच्या मंदिराच्या नावावरून प्रेरणा घेत आपल्या बटाटा वेफर्सला बालाजी वेफर्स असे नाव देण्याचे ठरवले.अणि मग बालाजी वेफर्स ह्या नावाने बाजारात त्यांच्या बटाटा वेफर्सची विक्री होऊ लागली.

वेगवेगळ्या कॅन्टीन तसेच व्यावसायिक यांच्यासोबत जोडले गेल्याने चंदुभाई विराणी यांच्या बटाटा वेफर्सला बाजारात अधिक मागणी प्राप्त होत होती.

अणि एक वेळ अशी आली चंदुभाई विराणी यांच्या संपूर्ण कुटुंबाने मिळुन दिवसरात्र काम केले तरी देखील त्यांना बाजारातील मागणी पूर्ण करता येत नव्हती.

मग चंदुभाई विराणी यांनी विचार केला आपण बाजारातून वेफर्स बनवण्याची मशिन खरेदी करायला हवी.जेणेकरून कमी वेळात आपल्याला जास्त उत्पादन करता येईल.

पण जेव्हा चंदुभाई विराणी बाजारात वेफर्स बनविण्याचे मशिन खरेदी करायला गेले तिथे मशिनची किंमत विचारल्यावर त्यांना कळले की मशिन खूप महाग आहे अणि तेव्हा एवढे अधिक पैसे देखील चंदुभाई यांच्याकडे उपलब्ध नव्हते.

आता ह्या समस्येचे निराकरण कसे करावे यासाठी खूप विचार विनिमय केल्यावर चंदुभाई यांनी वेफर्स बनविण्याचे मशिन कसे कार्य करते हे समजुन घेण्यास सुरुवात केली.

अणि जेव्हा चंदुभाई विराणी यांना पुर्णपणे समजलें की वेफर्स बनविण्याचे मशिन कसे कार्य करते तेव्हा त्यांनी बाजारातुन वेगवेगळे पार्ट खरेदी केले अणि स्वताच आपल्या उद्योग व्यवसायासाठी बटाटा सोलण्याचे अणि चिरण्याचे मशिन तयार केले.

काही वर्षे हयाच मशिनवर चंदुभाई विराणी यांनी बटाटा सोलण्याचे अणि चिरण्याचे काम केले.दुसरीकडे चंदुभाई विराणी यांच्या व्यापारात देखील वृदधी घडुन येत होती.

मग राजकोट मध्ये आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार केल्यानंतर चंदुभाई विराणी यांनी त्यांचे वेफर्स देशातील इतर ठिकाणी देखील कसे लोकप्रिय बनवता येतील याकडे लक्ष केंद्रित केले.

पण यासाठी त्यांना एका मोठया पातळीवर उत्पादनाची गरज होती.म्हणुन चंदुभाई विराणी यांनी बॅकेकडुन कर्ज घेतले.

अणि गुजरात मधील सर्वात मोठ्या बटाटा वेफर्स चिप्स प्लांट उघडले.चंदुभाई विराणी यांनी उचललेले हे पाऊल खुपच जोखिमदायी होते.

कारण त्यावेळी बाजारातील गुंतवणूकदार तसेच उद्योजक अशा कुठल्याही नव्या व्यावसायिक उपक्रमात पैसे गुंतवायला घाबरत होते.

अशातच कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केल्यानंतर तो नाही चालला तर व्यवसायात येणारया सर्व आर्थिक नुकसानाला चंदुभाई विराणी यांना स्वता सामोरे जावे लागणार होते.

पण चंदुभाई विराणी यांच्यावर अशी कुठलीही वेळ आलीच नाही कारण वेळेनुसार बालाजी वेफर्सच्या मार्केट शेअर अणि ग्राहकांमध्ये अधिक वाढ होत गेली.

पुढे १९९२ मध्ये चंदुभाई विराणी यांनी आपल्या उद्योग व्यवसायाला बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने रेजिस्टर केले.

याचसोबत आपल्या उद्योग व्यवसायातील उत्पादन निर्माण प्रक्रियेला स्वयंचलित बनण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान असलेल्या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली.

चंदुभाई विराणी यांचे असे मत होते की मशिन खरेदी करण्यास महाग असतात.पण मशीनचा वापर केल्याने आपणास मानवी चुका टाळता येतात.याचसोबत मशिन सातत्यपूर्ण गुणवत्ता राखण्यास देखील मदत करते.

याचसोबत चंदुभाई विराणी यांनी व्यवसायात प्रत्येक कर्मचारीला वेगवेगळ्या भुमिका वाटुन दिल्या ज्यामुळे त्यांना व्यवसाय ऑपरेशनला व्यवस्थापित करणे अधिक सोपे झाले.

कारण यानंतर प्रत्येकाला आपण काय काम करायचे आहे?आपली त्यात काय भुमिका असणार आहे हे माहीत असणार होते.

पुढे चंदुभाई विराणी यांनी त्यांच्या कंपनीचे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क ठिक केल्यानंतर त्यांची कंपनी लोकल वरून प्रादेशिक अणि मग राष्ट्रीय पातळीवरचा ब्रँड बनली.

एकीकडे बाजारात अंकल चिप्स,सिंबा,बिन्नीज सारखे अनेक मोठमोठे ब्रँड देखील होते ज्यांच्यासमोर उभे राहून बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित करणे कुठल्याही नवीन कंपनींसाठी सोपे नव्हते.

पण बालाजी वेफर्सने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या अणि उत्तम गुणवत्तेच्या जोरावर बाजारात आपल्या प्रोडक्टला बाजारात लोकप्रियता प्राप्त करून दिली.

जिथे बालाजी वेफर्सचे बाजारातील प्रतिस्पर्धीं अजुनही पारंपरिक पद्धतीने चिप्स बनवत होते.पण त्याचठिकाणी बालाजीने इनोव्हेटिव्ह पद्धतीचा वापर करून बाजारात आपल्या ब्रॅडला अधिक मजबुतीने स्थापित केले.

बालाजी वेफर्सच्या बाजारातील वाढत्या प्रगती अणि लोकप्रियतेला बघुन बाजारातील एका मल्टी नॅशनल कंपनीने चंदुभाई यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की चंदुभाई विराणी यांनी ४ हजार करोड रुपये मध्ये आपली कंपनी त्यांना विकत द्यावी.

पण चंदुभाई विराणी यांनी असे करण्यास स्पष्टपणे नकार दिला.काही कालावधी नंतर बालाजी वेफर्सने बटाटा वेफर्स व्यतिरिक्त नमकीन तसेच इतर स्नॅक्स देखील बनवण्यास सुरुवात केली.

बालाजी वेफर्सच्या हया नमकीन तसेच स्नॅक्सच्या चवीला देखील बाजारातील ग्राहकांकडून भरपुर पसंती प्राप्त झाली.

मग बालाजी वेफर्सने गुजरात सोबत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी सारख्या अनेक राज्यात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली.

आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करत असताना कंपनी ह्या गोष्टीची देखील काळजी घेत होती जे प्रोडक्ट ते तयार करत आहेत ते बाजारातील ग्राहकांच्या पसंतीनुसार आहे किंवा नाही.

कारण चंदुभाई विराणी यांना माहीत होते की गुजरात मधील लोकांना जे वेफर्स चिप्सचे फ्लेवर आवडते तेच इतर राज्यातील लोकांना देखील आवडेलच असे नाही.

म्हणुन बालाजी वेफर्सने अशा प्रकारचे स्नॅक्स देखील बनवण्यास सुरुवात केली जे तेथील स्थानिक चवीनुसार असतील.

हे काम योग्य पद्धतीने व्हावे म्हणून चंदुभाई विराणी यांनी वेगवेगळ्या राज्यात आपले मॅन्युफॅक्चरींग युनिट सेट अप केले.

ज्यातील तीन मॅन्युफॅक्चरींग युनिट हे गुजरात मधील राजकोट,वलसाड अणि वडोदरा अणि एक मॅन्युफॅक्चरींग युनिट मध्य प्रदेश मधील इंदौर मध्ये स्थित आहे.

ह्या मॅन्युफॅक्चरींग युनिटची एकुण क्षमता प्रति दिन एक हजार क्विंटल बटाटा वेफर्स अणि पाच हजार क्विंटल नमकीन बनवण्याची होती.

वेगवेगळ्या ठिकाणी कारखाने उभारल्याने बालाजी वेफर्सला लोकल मार्केटला देखील चांगल्या पद्धतीने सेवा प्रदान करता आली.ज्यामुळे कंपनीला आपल्या मार्केट शेअर मध्ये वाढ करण्यास साहाय्य प्राप्त झाले.

हेच कारण आहे की २००६ मध्ये बालाजी वेफर्सने गुजरात मधील बटाटा वेफर्स मार्केटचा ९० टक्के हिस्सा आपल्या नावावर करून घेतला.

मग यानंतर बालाजी वेफर्सच्या प्रगतीला बाजारात कोणीही थांबवू शकले नाही.पण २०११ मध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे कंपनीसमोर मोठे संकट उभे राहिले.

२०११ मध्ये बालाजी वेफर्सच्या बाजारातील एका प्रतिस्पर्धीं कंपनी पेप्सिकोने बालाजीवर केस दाखल केली.पेप्सिकोने असा आरोप केला होता की बालाजी वेफर्सने त्यांच्या ले मॅक्स चिप्सची डिझाईनचा त्यांच्या रंबल नावाच्या एका वेफर्स मध्ये वापर केला आहे.

यासाठी पेप्सिकोने बालाजीला कुठलीही पुर्वसुचना दिली नाही तसेच बालाजी कंपनी सोबत चर्चा देखील केली नव्हती.अणि बालाजीवर डिझाईन इंफ्लुएन्स मेंटची केस केली.

पण चंदुभाई विराणी यांनी हार नाही मानली त्यांनी पेप्सिकोच्या आरोपाचा सामना करत कोर्टात युक्तीवाद केला की पेप्सिकोने बालाजीला ह्या गोष्टीसाठी टार्गेट केले आहे कारण बाजारात बालाजी वेफर्सने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

अणि बालाजी वेफर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पेप्सिकोच्या व्यवसायावर देखील मोठा प्रभाव पडत आहे.

पण तरी देखील हाय कोर्टाने पेप्सिकोच्या बाजुने निर्णय दिला.अणि कोर्टाकडून बालाजी वेफर्सला त्यांच्या चिप्सची डिझाईन बदलण्याचा हुकुम केला.

कोर्टाच्या निर्णयानंतर बाजारातील अनेक एक्सपर्टने असे मत व्यक्त करण्यास सुरुवात केली की बालाजीने आपल्या वेफर्सच्या पॅकेजिंगचे डिझाईन बदलले तर याने त्यांच्या ब्रॅडला मोठे नुकसान होऊ शकते.

 पण चंदुभाई विराणी यांचे मत होते की बाजारातील ग्राहक हे बालाजीच्या वेफर्सला अधिक पसंत करतात त्यांच्या पॅकेजिंग लोगो किंवा डिझाईनला नाही.

म्हणून जरी बालाजीने आपल्या वेफर्सच्या पॅकेजिंगचे डिझाईन बदलले तरी ब्रॅडला कुठलेही नुकसान होणार नाही.

अणि चंदुभाईंचा हा विश्वास खरा ठरला.

बाजारात जेव्हा लेसचे मार्केट शेअर कमी कमी होऊ लागले होते त्याचठिकाणी बालाजी वेफर्सच्या मार्केट शेअर मध्ये दरवर्षी २० ते २५ टक्के इतकी वाढ होत होती.

२०१९ पर्यंत बालाजी वेफर्सकडे ६५ पेक्षा जास्त प्रोडक्ट उपलब्ध होते अणि बालाजी वेफर्सच्या ह्या प्रोडक्टची पोहोच मोठमोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत निर्माण झाली होती.

आज बालाजी वेफर्सचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क १२२५ पेक्षा जास्त डीलर्स पर्यंत पोहोचले आहे.

इकोनाॅमिक टाईम्सने बालाजी वेफर्सच्या बाजारातील वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला दी सुलतान ऑफ दी वेफर्स अशी उपाधी दिली होती.

आज बालाजी वेफर्स मध्ये हजारो कर्मचारी कामाला आहेत.

कंपनीकडून प्रत्येक कर्मचारीला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाते.

बालाजी वेफर्सच्या ह्याच तत्वांमुळे आज बालाजी वेफर्स कंपनी बाजारातील एक सर्वात लोकप्रिय अणि भरवशाचा ब्रँड बनली आहे.

बाजारातील प्रतिस्पर्धींवर मात करण्यासाठी बालाजी वेफर्सने कोणत्या बिझनेस स्ट्रॅटेजीचा वापर केला?

बालाजी वेफर्सने बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांवर मात करण्यासाठी काही महत्वाच्या व्यवसाय स्ट्रॅटेजीचा देखील वापर केला.ज्यामुळे बाजारातील इतर प्रतिस्पर्धीं त्यांच्यापुढे जास्त काळ तग धरू शकले नाही.

बालाजी वेफर्सची सुरूवात गुजरात मधुन झाली होती.पण चंदुभाई विराणी यांना माहीत होते की जर आपल्याला राष्ट्रीय पातळीवर आपले नाव बनवायचे आहे तर आपल्याला गुजरात व्यतिरिक्त इतर राज्यात देखील बालाजी वेफर्सला लोकप्रिय बनवावे लागेल.

म्हणून चंदुभाई विराणी यांनी आपला उद्योग व्यवसाय फक्त गुजरात पुरता सीमीत न ठेवता देशातील इतर राज्यात देखील त्याचा विस्तार केला.

ह्या विस्ताराचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की चंदुभाई विराणी यांना लोकल फ्लेवर्स सोबत देखील इनोव्हेशन करता आले.

चंदुभाई विराणी यांनी हे इनोव्हेशन फक्त फ्लेवर्स पर्यंत सीमीत ठेवले नाही त्यांनी आरोग्यदायी स्नॅक्स देखील उत्तम पर्याय म्हणून ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध करून दिले.

ज्यात बेक्ड वेफर्स अणि रोस्टेड नमकीनचा देखील समावेश होता.ज्यामुळे आरोग्य विषयक जागृत ग्राहकांना देखील हेल्दी पदार्थ खायला मिळतील.

याचसोबत नुकतेच बालाजी वेफर्सने आपले हाऊस मेड नुडल्स गिपीला देखील बाजारात लाॅच केले आहे.याचसोबत बालाजी वेफर्सने नुडल्स मार्केट मध्ये देखील प्रवेश केला आहे.

याचसोबत बालाजी वेफर्सने आंतरराष्ट्रीय बाजारात देखील प्रवेश केला आहे.बालाजी वेफर्सने ऑस्ट्रेलिया,युए,युई युके इत्यादी सारख्या देशात जागतिक ओळख निर्माण करत आहे.

बालाजी वेफर्सने बाजारात टिकुन राहण्यासाठी अणि स्वताला आपल्या इतर प्रतिस्पर्धींपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी

इनोव्हेशन अणि उत्पादन विविधतेवर अधिक भर दिला.

बालाजी वेफर्सने बाजारात टिकुन राहण्यासाठी आपल्या प्रोडक्ट मध्ये वैविध्य निर्माण केले.ज्यात बालाजी वेफर्सने तीन महत्वाच्या प्रोडक्ट कॅटॅगरी तयार केल्या.

ज्यात पहिले वेस्टर्न स्नॅक्स होते ज्यात एकुण बारा प्रोडक्टचा समावेश करण्यात आला आहे.हे स्नॅक्स तरूण पिढी अर्बन लोकांना टार्गेट करण्यासाठी बनविण्यात आले होते.

नमकीन हे भारतीय घरात खुपच लोकप्रिय आहे.अनेक ठिकाणी चहाच्या वेळी स्नॅक्सच्या स्वरूपात हे खाल्ले जाते.

ह्या नमकीन कॅटॅगरी मध्ये देखील बालाजी वेफर्सने एकुण २३ प्रोडक्ट लाॅच केले आहे.

वेफर्स ही बालाजी वेफर्सने तयार केलेली मुख्य कॅटॅगरी आहे ज्यात एकुण १२ प्रोडक्ट समाविष्ट आहेत.बालाजी वेफर्स बाजारात आपल्या ह्या युनिक अणि खुशखुशीत वेफर्समुळे अधिक ओळखले जाते.

चंदुभाईची तिसरी बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर.चंदुभाई विराणी यांनी सुरूवातीला वेफर्स तळणे पॅक करणे इत्यादी सर्व कामे स्वता आपल्या हातानेच केली.

पण चंदुभाई यांना जेव्हा लक्षात आले की माणसे जेव्हा मशिनवर काम करतात तेव्हा तिथे सातत्याचा अभाव जाणवत असतो.

म्हणून जेव्हा बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्या हाताने बनविण्यात आलेल्या चिप्सची निर्मिती करत होते तेव्हा चंदुभाई यांनी स्वयंचलित मशिनचा वापर केला.

याचसोबत चंदुभाई विराणी यांनी सुरूवातीला जेव्हा त्यांचा व्यवसाय बाजारात नवीन होता तेव्हा आपल्या वेफर्सची मार्केटिंग ब्रॅडिंग करण्यासाठी १५ ते २० लोकांना १५ हजार रुपये इतके वेतन देऊन हायर केले.

अणि ह्या सर्व कर्मचारींना सांगितले आपल्या परिसरातील जेवढेही दुकानदार आहेत तिथे जा अणि विचारा बालाजीला वेफर्स आहेत का?

अशा प्रकारे रोज हे २० ते ३० लोक हजारो दुकानांवर जात अणि बालाजी वेफर्स आहेत का असे विचारू लागले.

दुकानदारांकडे बालाजी वेफर्स तेव्हा नसायचे म्हणून त्यांना त्यावेळी नकार द्यावा लागत असे.मग चंदुभाई त्याच दुकानात १५ दिवसांच्या कालावधीनंतर आपल्या एका डिस्ट्रि ब्युटरला पाठवायचे बालाजी वेफर्स पॅकेट हवे आहेत का हे विचारण्यासाठी.

दुकानात रोज ग्राहक बालाजी वेफर्सची खरेदी करण्यासाठी येत असल्याने 

बाजारातील सर्व ग्राहक बालाजी वेफर्सची अधिक मागणी करत आहे असा समज सर्व दुकानदारांचा त्यावेळी झाला होता म्हणून ते बालाजी वेफर्स मधुन वितरक वेफर्सचे चिप्स विकण्यास आल्यावर त्वरीत त्याची खरेदी करून घेत.

आज बालाजी वेफर्स जगातील टाॅप फुड प्रोसेसिंग सप्लायर्स कडुन मशिन आयात करते.याचा परिणाम बालाजी वेफर्सच्या उत्पादन कार्यक्षमतेवर झाला आहे.ज्यामुळे बालाजी वेफर्सची किंमत कमी आहे.

बालाजी वेफर्सने नेहमी आपल्या ग्राहकांना राजा मानले आहे.त्यांनी नेहमी ग्राहकांना उत्तम दर्जाचे प्रोडक्ट परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्यावर अधिक भर दिला.

जेव्हा बाजारातील इतर प्रतिस्पर्धी ग्राहक समाधानाला अजिबात महत्व देत नव्हते त्याचवेळी बालाजी वेफर्सने ग्राहक समाधानावर विशेष लक्ष केंद्रित केले.

बालाजी वेफर्स मध्ये आज पाच हजारपेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत ज्यातील अधिकतम कर्मचारी महिला आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button