डेलिव्हरी स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Delhivery start up business success story in Marathi
डेलिव्हरी स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Delhivery start up business success story in Marathi
जे व्यक्ती नियमितपणे ऑनलाईन शाॅपिंग करतात अशा व्यक्तींनी डेलिव्हरी ह्या कंपनीचे नाव नक्कीच ऐकले असेल.
कारण अधिकतम ई काॅमर्स कंपन्या डेलिव्हरी ह्या लाॅजिस्टिक सर्विस कंपनीच्या माध्यमातून आपले पार्सल पोहोचवतात.डेलीव्हरी ही आपल्या भारतातील सर्वात मोठी लाॅजिस्टिक स्टार्ट अप कंपनी आहे.
आजच्या लेखामध्ये आपण डेलिव्हरी ह्या लाॅजिस्टिक सर्विस कंपनीची यशोगाथा जाणुन घेणार आहोत.
डेलिव्हरी युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?
डेलिव्हरी ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात २०११ मध्ये दिल्ली मधील एका छोट्याशा अपार्टमेंट मध्ये रूम घेऊन तीन मित्रांनी मिळून केली होती.
२०११ मध्ये साहील,सुरज, भावेश,मोहीत, कपिल यांना रस्त्यात एक डेलिव्हरी बाॅय भेटला.त्या डेलिव्हरी बाॅयने बोलता बोलता सांगितले की जिथे ते नोकरी करत आहे ते रेस्टाॅरंट बंद होणार आहे म्हणून त्याची नोकरी जाऊ शकते.
हे ऐकल्यावर साहील अणि सुरजने रेस्टाॅरंटच्या मालकासोबत संपर्क साधला.अणि त्या रेस्टाॅरंट मधील डेलिव्हरी बाॅईजला हायर करून घेतले.
साहील,सुरज सोबत अजुन तीन मित्र देखील होते असे एकुण पाच जणांनी मिळून त्यांनी डेलिव्हरी नावाची एक कंपनी सुरू केली.ही कंपनी खुप कमी वेळात माल तसेच कुठलेही पार्सल त्याच्या निर्धारित ठिकाणी पोहोचवत असत.
फक्त दोन वर्षांच्या आत ह्या कंपनीने ॲमेझाॅन प्राईम नाऊ, फ्लिपकार्ट सोबत कोलॅब केले.
डेलिव्हरीची सुरूवात अशावेळी झाली होती जेव्हा देशातील ईकाॅमर्स कंपन्या प्रारंभीच्या स्थितीत होत्या तेव्हा ईकाॅमर्स प्लॅटफॉर्म सर्व कंपनींकडे होते.पण सगळयांकडेच डेलिव्हरी सर्विस उपलब्ध नव्हती.
अणि दुसरीकडे डेलिव्हरी ह्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक स्मुथ अणि वेगवान इको सिस्टम तयार करत होते.
डेलीव्हरीने बाजारातील छोटे ईकाॅमर्स प्लॅटफॉर्म
जबाॅग,स्नॅपडिल इत्यादींचे पार्सल डेलिव्हर केले.अणि जोपर्यंत ईकाॅमर्स क्षेत्रात परिवर्तन घडुन आले तोपर्यंत त्यांनी आपले इको सिस्टम बाजारातील इतर प्रतिस्पर्धीना टक्कर देण्यासाठी एकदम मजबूत बनवले होते.
ज्यामुळे यानंतर बाजारातील कुठल्याही ई काॅमर्स प्लॅटफॉर्मला वेअर हाऊसिंग, लाॅजिस्टिक,रिव्हस लाॅजिस्टिक, कॅश पेमेंट कलेक्शन, इत्यादी सारख्या कुठल्याही समस्येला पुन्हा सामोरे जावे लागले नाही.
२०१९ मध्ये डेलिव्हरीचा समावेश देशातील युनिकाॅन स्टार्ट अप व्यवसायाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.
आज ह्या कंपनीचे एकुण बाजार मुल्यांकन ५.५ बिलियन डॉलर्स पेक्षा अधिक आहे.
डेलिव्हरीने भारतातील लाॅजिस्टिक सर्विस मधील सर्वात मोठी अणि गंभीर समस्या दूर केली आहे.एक वेळ अशी होती की ह्या स्टार्ट अपला कोणतीही ई काॅमर्स कंपनी ऑडर देत नव्हती.
पण आज ई काॅमर्स कंपनींकडुन ह्या कंपनीला रोज १५ लाखापेक्षा अधिक ऑडर प्राप्त होत आहेत.
साहील बरवा अणि सुरज हे दोघे सुरूवातीला एका टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये कामाला होते.हया दोघांना वाटत होते की इंटरनेट लवकरच मोठी क्रांती घडवून आणेल.
अणि जेव्हा इंटरनेटचा वापर वाढु लागला तेव्हा यांनी विचार केला की आपण देखील याचा हिस्सा बनायला हवे म्हणून त्यांनी आजुबाजूच्या स्मार्ट लोकांकडून माहीती काढण्यास सुरुवात केली.
इंटरनेट काय करू शकते?इंटरनेटमुळे कोणते परिवर्तन घडून येईल?तेव्हा त्यांना एकच उत्तर जास्त प्राप्त झाले की ई काॅमर्स कंपनींना दत्तक घेतले जाईल.
ई काॅमर्स कंपन्या लाखोच्या मर्यादेत प्रोडक्टला शिफ्ट करतील अणि लाखो लोक त्या प्रोडक्टची खरेदी देखील करतील.
मग साहील यांनी विचार केला की एवढ्या अधिक प्रमाणात लोक सामान प्रोडक्टची खरेदी करतील अशावेळी लाॅजिस्टिक हे बाजारातील सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.
आतापर्यंत जेवढेही स्टार्ट अप व्यवसाय बाजारात सुरू झालेले आहेत त्या सर्वामागे समस्यांचा खुप मोठा हात होता.
सुरज अणि साहील यांच्यासमोर उभ्या असलेल्या बाजारातील ह्या सर्वात मोठ्या समस्येतुनच डेलीव्हरी ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात झाली.
सुरज अणि साहील ह्या दोघांचे घर एक ठाराविक अंतरावर असल्याने जेव्हा ह्या दोघांपैकी कोणालाही काही एखादे सामान प्रोडक्टची एकमेकांना डेलिव्हरी करायची असायची तेव्हा त्यांना कुरीअर सर्विसला त्यांना जास्त पैसे द्यावे लागत असत.
अणि सामान प्रोडक्टची पोहोच करण्यासाठी देखील दोन ते तीन दिवस इतका कालावधी लागत असे.अणि एवढया कमी अंतरावर कुरीअर पोहोचवण्यासाठी एवढा अधिक वेळ घेणे खुपच अयोग्य होते.
मग सुरज अणि साहील यांनी जेव्हा लाॅजिस्टिकचा अभ्यास केला रिसर्च करून लाॅजिस्टिकला अगदी व्यवस्थित समजून घेतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ह्या क्षेत्रात किंमत अणि ग्राहक अनुभव यात खुपच अकार्यक्षमता आहे.
मग साहील अणि सुरजने ह्या समस्येला सोडविण्यासाठी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
मग २०११ मध्ये डेलिव्हरीची सुरूवात साहील,सुरज,मोहीत,भाविश,कपिल ह्या सर्व मित्रांनी मिळून केली होती.
प्रारंभीच डेलिव्हरीने आपले संपूर्ण लक्ष तीन प्रमुख गोष्टींकडे केंद्रीत केले.यात पहिले ह्या गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित केले की आपण जलदगतीने प्रोडक्ट्ची डेलिव्हरी कशी करू शकतो?
अणि फक्त एका दिवसात किंवा दुसरयाच दिवशी आपल्याला प्रोडक्टची व्हिझिबिलिटी देखील निर्माण करायची आहे.
जेव्हा ई काॅमर्स कंपनींकडुन प्रोडक्ट शिफ्ट केला जातो तेव्हा ग्राहकांना संदेश पोहोचवण्यात येतो की तुमचे प्रोडक्ट शिफ्ट झाले आहे.
पण लाॅजिस्टिक कंपनीला हे सांगणे खूप कठिण जात असत की क्लाईंटचे प्रोडक्ट आत्ता कुठपर्यंत पोहोचले आहे.म्हणुन डेलिव्हरीने ठरवले की आपण एक अशी प्रणाली तयार करणार ज्यामुळे क्लाईंटला आपल्या प्रोडक्टची रिअल टाइम लोकेशन प्राप्त होईल.
याचसोबत त्यावेळी भारतात ऑफलाईन पेमेंट गेटवे खुप मोठे होते.लोक डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड दवारे पेमेंट करत नव्हते ते अधिकतम प्रमाणात कॅश ऑन डिलिव्हरीची सेवा घेणे अधिक पसंद करत होते.
यामुळे डेलिव्हरी कंपनीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला की ते पैशांचे व्यवस्थापन कशापद्धतीने करतील.कारण जेव्हा कुठलीही लाॅजिस्टिक कंपनी आपल्या ग्राहकांकडून कॅश प्राप्त करते.
तेव्हा तो पैसा ३० दिवसांनंतर ई काॅमर्स कंपनी पर्यंत पोहोचत होता.अणि मग ते पैसे विक्रेत्यां पर्यंत पोहोचण्यासाठी १५ दिवस इतका कालावधी लागत असत.
यामुळे छोटे व्यापारी यांच्याकरिता हा ५० ते ६० दिवसांचा कालावधी पैशांची वाट पाहत बसण्यासाठी खुप मोठा होत होता.
त्यामुळे डेलिव्हरीने ह्या समस्येला देखील समजून घेतले अणि त्यांनी ठरवले की ते पैशांचे अशा प्रकारे व्यवस्थापन करतील ज्यामुळे ई काॅमर्स कंपन्यांना फक्त दोन तीन दिवसात त्यांची कॅश प्राप्त होईल.
डेलिव्हरीने हे लाॅजिस्टिक क्षेत्रातील उचललेले एक खूप मोठे क्रांतीकारी अणि महत्वाचे पाऊल होते.
पुढे साहील अणि सुरजला असे लक्षात आले की लाॅजिस्टिक प्रणालीला सीओडी, तसेच लास्ट वाईल्ड डिलिव्हरीपेक्षा अधिक खुप काही हवे आहे.
भारतातील लाॅजिस्टिक प्रणालीला मोठ्या पायाभूत सुविधा तसेच अपडेटेड टेक्नॉलॉजी असलेले प्लॅटफॉर्म प्राप्त होणे देखील आवश्यक आहे.
उदा,वेअर हाऊसेस,लॅण्ड हाॅल, फस्ट माल डिलिव्हरी, लास्ट माल डिलिव्हरी इत्यादी
याचकरीता डेलिव्हरी ह्या कंपनीने मोठ्या पायाभूत सुविधा असलेल्या तसेच अपडेटेड टेक्नॉलॉजी असलेल्या एका ओपन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली.
याचसोबत डेलिव्हरीने इतर कंपन्यांना देखील आपले पार्टनर बनण्याची तसेच त्यांच्या प्लॅटफॉर्म,टेक्नॉलॉजी अणि पायाभूत सुविधांचा वापर करण्याची देखील संमती दिली.
भलेही बाजारातील इतर कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्म करीता डेलीव्हरी सोबत स्पर्धा करीत होत्या तरी देखील डेलिव्हरीने त्यांना आपल्या प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी अणि पायाभूत सुविधांचा वापर करण्याची परवानगी दिली.
कारण साहील बरवा यांचे असे मत होते की लाॅजिस्टिक ही भारतातील सर्वात मोठी समस्या आहे जी फक्त कुठलीही एक कंपनी दुर करू शकत नाही सर्व कंपन्यांनी यासाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे.
डेलिव्हरी ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली तेव्हा साहील बरवा अणि सुरज यांना सुरूवातीपासून खुप अडीअडचणींना सामोरे जावे लागले होते.
जेव्हा साहील अणि सुरज कुठल्याही ई काॅमर्स कंपनी कडे जात असत अणि ऑडर देण्यासाठी प्रस्ताव ठेवत होते तेव्हा ती ई काॅमर्स कंपनी त्यांना म्हणत तुम्ही बाजारात अजुन नवीन आहात, आम्ही तुम्हाला ओळखत देखील नाही आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा.
मग साहील यांनी ई काॅमर्स कंपन्यांना विश्वास दिला की आम्ही बाजारातील इतर कंपनींच्या तुलनेत फार कमी वेळात मालाची पोहोच करू शकतो.
जिथे बाजारातील इतर कंपन्या तीन दिवसांत माल पोहोच करत होत्या.अणि रक्कम त्यांना ३० दिवसात प्राप्त होत होती.
तिथे आम्ही आपल्या मालाची पोहोच फक्त एक दिवसात करू अणि कॅश देखील दोन दिवसात प्राप्त करून देऊ शकतो.
याचसोबत डेलिव्हरीने पहिल्या महिन्यात कुठलाही चार्ज घेणार नाही अशी शाश्वती देखील दिली.अणि यानंतर देखील तुम्हाला आमची सर्विस आवडली नाही तर तुम्ही आमची सर्विस नाकारू शकतात अशी कमिटमेंट देखील दिली.
यामुळे बाजारातील अनेक कंपन्या हळुहळू डेलिव्हरीला ऑडर देऊ लागल्या.सर्वात पहिली ऑडर डेलिव्हरी कंपनीला उर्बटचचे अभिषेक यांच्याकडुन प्राप्त झाली जे पुढे जाऊन डेलिव्हरीचे एंजेल इन्वहेस्टर देखील बनले.
मग यानंतर हेल्थ कार्डचे प्रशांत टंडन, इत्यादी बाजारातील उद्योजक तसेच कंपन्यांनी डिलीव्हरीवर विश्वास करण्यास सुरुवात केली.अणि कंपनीला त्यांच्याकडून ऑडर प्राप्त होऊ लागल्या.