लेन्स कार्ट स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Lenskart start up business success story in Marathi
लेन्स कार्ट स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Lenskart start up business success story in Marathi
लेन्स कार्ट ही चष्म्याचा व्यवसाय करणारी बाजारातील एक प्रसिद्ध कंपनी आहे.पीयुष बंसल यांनी २०१० मध्ये लेन्स कार्टची सुरूवात केली होती.
अणि काही वर्षातच लेन्स कार्ट बाजारातील बिलियन डॉलर्सचा व्यवसाय बनला.पीयुष बंसल यांनी असा एक व्यवसाय सुरू केला होता ज्याने लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोनच बदलुन टाकला.
लेन्स कार्ट हे प्रारंभी आपल्या ग्राहकांना ऑनलाईन सर्विसेस देत होते.
सुरूवातीला लेन्स कार्टच्या सर्विसेस दवारे ग्राहकांचे पाहीजे तसे समाधान होत नसल्याने, अणि लेन्स कार्ट ही नवीन कंपनी असल्याने बाजारातील ग्राहकांना त्यांच्यावर लगेच विश्वास नसल्याने सुरूवातीला खूप मंद गतीने लेन्स कार्ट चालत होते.
मग लेन्स कार्टने टेक्नॉलॉजीवर विशेष लक्ष केंद्रित केले ज्यातुन पीयुष बंसल यांच्या डोक्यात एक आयडिया आली.
मग लेन्स कार्टने बाजारात आपल्या असंतुष्ट ग्राहकांसाठी थ्रीडी ट्राय ऑन टेक्नॉलॉजी आणली.
ह्या टेक्नॉलॉजीमुळे लोकांना घरात बसूनच आपल्यावर कोणता चष्मा चांगला दिसेल हे तपासून पाहता येत होते.
काहीच काळात हे इनोव्हेशन इतके प्रसिद्ध झाले की
लेन्स कार्टच्या ग्राहकांमध्ये भरमसाठ वाढ व्हायला लागली.
आज लेन्स कार्ट दरवर्षी १५०० करोड पेक्षा जास्त कमाई करते.
लेन्स कार्टची सुरूवात कशी झाली?
पीयूष बंसलने याआधी दोन स्टार्ट अप वर काम केले होते पण त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी लेन्स कार्टची सुरूवात केली होती.
सुरूवातीला पीयुष बंसल यांनी सर्च माय कॅम्पस डाॅट काॅम नावाचे एक स्टार्ट अप सुरू केले होते.हे एक ऑनलाईन पोर्टल होते जे काॅलेजातील विद्यार्थ्यांना जाॅब शोधण्यासाठी मदत करायचे.
अणि त्यांचे दुसरे अपयशी ठरलेले स्टार्ट अप प्लायर्स डाॅट काॅम होते.जे यूएस मध्ये ई काॅमर्स द्वारे आयव्हीएल विक्री करायचे.
२०१० मध्ये पीयुष बंसल यांच्या निदर्शनास आले की भारतातील आयव्हीएल मार्केट मध्ये ४० हजार करोडने वाढ झाली आहे.पण त्यातील फक्त १० टक्के इतकीच संघटीत आहे.
मग २०१० मध्ये भारतात परत आल्यावर पीयुष बंसल यांनी लेन्स कार्ट ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली.
पीयुष बंसल हे युएस मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करत होते.पण जेव्हा त्यांनी लेन्स कार्टची सुरूवात केली तेव्हा मायक्रोसॉफ्ट मधील नोकरी देखील त्यांनी सोडली.
आपल्या ह्या स्टार्ट अप दवारे त्यांनी ऑनलाईन चष्म्याची विक्री करण्यास सुरुवात केली.
अणि येथील असंघटीत बाजाराला संघटीत बनवण्यास सुरुवात केली.
आज लेन्स कार्ट हाय व्हरायटी,कमी किंमत, उत्तम स्टोअर अनुभव,फ्री आय चेकअप सोबत लेन्स कार्ट आज भारतातील आय व्ही एल इंडस्ट्री मध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखले जाते.
आज पीयुष बंसल यांनी ह्या चष्म्याच्या ब्रॅडला ३६००० हजार करोडची कंपनी बनवले आहे.
लेन्स कार्टने यासाठी दोन महत्वाच्या स्टेपवर फोकस केले होते. लेन्स कार्टने चष्म्याच्या सोबत लाईफस्टाईल अणि फॅशनला देखील समाविष्ट केले.
याचसोबत लेन्स कार्टने आपल्या मार्केटिंगसाठी भुमन बम, कैटरीना कैफ सारख्या सेलिब्रिटींना आपले ब्रँड अॅम्बेसेडर बनवले.जेणेकरून लोक आकर्षित होऊन वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे परिधान करतील.
लेन्स कार्ट चष्म्याला खुप कमी किंमतीत विकत होते म्हणून लेन्स कार्टने आपल्या नफ्यात वाढ करण्यासाठी चष्म्यासाठी ग्लास अणि फ्रेम स्वताच बनवायला सुरुवात केली.
याचसोबत लेन्स कार्टने आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादीत करण्यासाठी ऑफलाईन स्टोअर देखील सुरू केले जेथे त्यांना मोफत डोळे तपासणीची सेवा देखील देण्यात येत होती.
आपल्या ह्याच स्ट्रॅटेजीचा वापर करून लेन्स कार्ट आज वर्षाला १५०० करोड रुपये पेक्षा अधिक रेव्हेन्यू जनरेट करते आहे.
आज लेन्स कार्टने जगभरात आपले हजारो स्टोअर उभारले आहेत.अणि त्यांच्याकडे लाखो ग्राहक देखील आहेत.लेन्स कार्ट मध्ये हजारो कर्मचारी कामाला देखील आहेत.