लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाची यशोगाथा Lovely professional University success story in Marathi
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाची यशोगाथा Lovely professional University success story in Marathi
अशोक कुमार मित्तल हे लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टीचे संस्थापक आहेत.
जेव्हा अशोक कुमार मित्तल यांनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टीची स्थापणा केली होती तेव्हा लोक म्हणायचे हा सर्वसाधारण लाडु विकणारा व्यक्ती काय विद्यापीठ स्थापित करणार.
पण आज लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये ३५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहे.लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये आज ५० पेक्षा अधिक देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
अशोक कुमार मित्तल ह्या मारवाडी व्यक्तीने सर्वप्रथम पंजाब मध्ये जाऊन स्वताचे एक मिठाईचे दुकान सुरू केले.यानंतर पुढे त्यांनी गाड्या विकण्याचा व्यवसाय देखील केला.
एवढेच नव्हे तर अशोक कुमार मित्तल यांनी विद्यार्थ्यासाठी लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टीची स्थापणा देखील केली.आज ते रिअल इस्टेट मध्ये देखील आता आपले नशिब आजमावताना दिसुन येत आहे.
अशोक कुमार मित्तल यांनी जालंदर सारख्या छोट्याशा शहरात आपले एक मोठे साम्राज्य कसे स्थापित केले हे आजच्या लेखामध्ये आपण जाणुन घेणार आहोत.
शिक्षण क्षेत्र कशा पद्धतीने कार्य करते अणि त्यात प्रगती कशी केली जाते?तसेच एखादी कंपनी एखाद्या शहरातील सर्वात मोठा ब्रँड कशी बनते हे देखील आपण ह्या यशोगाथेमधून जाणुन घेणार आहोत.
मिठाई बनवत असलेल्या व्यक्तीने कशी उभी केली एवढी मोठी युनिव्हसिर्टी?
बलदेव राज मित्तल हे मारवाडी होते.पण काही कारणास्तव त्यांना पंजाब राज्यात वास्तव्यास यावे लागले.
पंजाब येथे राहायला गेल्यावर आपण आपला अणि आपल्या कुटुबांचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.
बलदेव राज मित्तल यांना उत्तम प्रकारची मिठाई बनवता येत होती.म्हणुन त्यांनी आपला अणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पंजाब मध्ये एक छोटेसे मिठाईचे दुकान सुरू केले.
पण प्रत्येक क्षेत्रातील खाद्यपदार्थांची चव ही तेथील प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारची असते.अशा परिस्थितीत एक मारवाडी व्यक्ती पंजाबी लोकांसाठी पंजाबी पद्धतीची मिठाई तयार करणार हे खुप मोठे आव्हान होते.
अशा वेळी बलदेव राज मित्तल यांच्याकडे दोनच पर्याय उपलब्ध होते.पंजाब ह्या प्रदेशातील लोकल चवीनुसार मिठाई तयार करणे शिकुन घेणे किंवा त्यांना बनवता येत असलेला असा एखादा खाद्यपदार्थ त्यांना चाखायला देणे ज्याची चव त्यांनी कधी घेतलेली नाहीये.
पण तो खाद्यपदार्थ खाल्ल्यावर त्यांना देखील त्याची चव नक्कीच आवडेल.
बलदेव राज मित्तल यांनी ह्या दोघांमध्ये दुसरया क्रमांकाचा पर्याय निवडला.पंजाब ह्या राज्यातील लोक अधिकतम प्रमाणात लाडु खात असत.
पण पंजाब येथील लोक मोठे बुंधीचे लाडु खाणे अधिक पसंत करत.पण बलदेव राज मित्तल यांनी ठरवले की आपण येथील लोकांसाठी छोटे बुंधीचे लाडु मोतीचुर लाडु बनवायचे अणि येथील लोकांना खाऊ घालायचे.
कारण मोतीचुरचे लाडु पंजाब मध्ये कोणीही खात नव्हते म्हणून बलदेव राज मित्तल यांनी एक नवीन इनोव्हेशन म्हणून येथील लोकांना मोतीचुरचे लाडु बनवून खाऊ घालायचे ठरवले.
अणि जेव्हा पंजाबी लोकांनी त्यांच्या हातचे बनवलेले मोतीचुरचे लाडु खाल्ले सगळ्यांनी त्यांच्या दुकानात मोतीचुरचे लाडु खाण्यासाठी मोठी लांबलचक रांग लावायला सुरुवात केली.
बलदेव राज मित्तल यांचे एक छोटेसे दुकान होते.पण ते पारदर्शक नव्हते म्हणजे त्यातुन आतील गोष्टी अजिबात दिसत नव्हत्या.अणि बलदेव राज मित्तल दिवसभरात फक्त दोन तास दुकान उघडत होते.
ज्यामुळे आजुबाजुच्या लोकांच्या मनात कुतूहल निर्माण व्हायचे की बलदेव राज मित्तल हे दिवसभरात फक्त दोन तासासाठी दुकान उघडतात अणि आतील गोष्टी दिसत नसल्याने ते आत काय करतात हे देखील कुतुहल लोकांमध्ये निर्माण होऊ लागले.
अणि ह्याच कुतुहलामुळे लोक त्यांच्या दुकानात मिठाई खाण्यासाठी प्रचंड गर्दी करत होते.
आज बलदेव राज मित्तल यांचे जालंदर अणि त्याच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये १० पेक्षा अधिक लव्हली स्वीटस स्टोअर पाहायला मिळतात.आज मिठाई सोबत इतर अनेक प्रोडक्ट देखील त्यांनी आपल्या दुकानात विक्रीसाठी समाविष्ट केले आहेत.
बलदेव राज मित्तल यांनी बाजारात इतर व्यक्ती जे प्रोडक्ट विकत आहेत ते न विकता आपल्या प्रोडक्ट मध्ये नवनवीन व्हरायटी समाविष्ट करत त्यात इनोव्हेशन केले.
बलदेव राज मित्तल हे एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता बाजारात नेहमी नवनवीन प्रयोग करत असत.
बलदेव राज मित्तल यांनी मिठाईचा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांच्या मोठ्या मुलाने देखील तोच व्यवसाय केला.अणि दुसरया मुलाने देखील तोच व्यवसाय केला.
पण त्यांच्या तिसरया मुलाला अशोक कुमार मित्तल यांना बलदेव राज मित्तल यांनी सुरू केलेला मिठाईचा व्यवसाय करण्यात कुठलीही रूची नव्हती त्याला काहीतरी युनिक करायचे होते.
म्हणून त्याने बाजारात स्वताचा एखादा नवीन उद्योग व्यवसाय करायचे ठरवले.त्यांना असा उद्योग व्यवसाय सुरू करायचा होता जो बाजारात नवीनच चाललेला आहे.
अणि त्यावेळी पंजाब मधील बाजारात गाड्यांची अधिक चर्चा असायची अणि तेथील लोक गाडयांचे खुप शौकीन होते.
म्हणून अशोक कुमार मित्तल यांनी बजाज कडुन डिलरशीप घेण्यासाठी अर्ज केला.त्यावेळी बजाजचे मालक राहुल बजाज स्वता वैयक्तिक रीत्या मुलाखत घेऊन डिलरशीप देत होते.
पण जेव्हा अशोक कुमार मित्तल हे बजाजची डिलरशीप प्राप्त करण्यासाठी मुलाखत द्यायला गेले तेव्हा बजाजचे मालक राहुल बजाज हे त्यांना म्हटले तु मिठाई बनवुन विकणारा व्यक्ती आहेस.
तुला गाडीच्या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करण्याचा कुठलाही अनुभव देखील नाही.आज बाजारात असे अनेक लोक उपलब्ध आहेत ज्यांना गाडीचा चांगला अनुभव प्राप्त आहे मी त्यांना डिलरशीप न देता तुला का देऊ?
तेव्हा अशोक कुमार मित्तल त्यांना पुर्ण आत्मविश्वासाने म्हणतात की मी एक मिठाई वाल्याचा मुलगा आहे त्यामुळे मला माहीत आहे कोणत्या घरात कोणत्या लग्नात किती खर्च झाला?अणि कोणाची किती क्षमता आहे?
एवढेच नव्हे तर मला सगळ्यांचे नाव देखील माहीत आहे.
स्टोअर सुरू केल्यावर तुम्ही जिल्ह्यात दोन स्टोअर सुरू करा तुमच्या नजरेत जो अनुभवी व्यक्ती आहे त्याला पण एक शाखा देऊन बघा अणि मलाही एक शाखा देऊन बघा.बघु कोण अधिक चांगली कामगिरी पार पाडते.
मग अशोक कुमार मित्तल यांचा आत्मविश्वास बघुन राहुल बजाज यांनी त्यांच्याकडे डिलरशीप प्राप्त करण्यासाठी आलेल्या अनुभवी व्यक्तीला डिलरशीप देणे नाकारले अणि अशोक कुमार मित्तल यांना ती डिलरशीप दिली.
१९९१ मध्ये बजाज कडुन डिलरशीप प्राप्त झाल्यानंतर अणि मग त्यांनी मारूती कडुन देखील डिलरशीप प्राप्त केली.
आज लव्हली ह्याच लव्हली ऑटोचे २५ पेक्षा अधिक स्टोअर्स जालंदर तसेच आजुबाजुच्या परिसरात आहेत.
अशोक कुमार मित्तल यांनी बाजारात काय चालले आहे हे न बघता बाजारात भविष्यात काय चालेल यावर लक्ष केंद्रित केले ज्यामुळे त्यांना डिलरशीप प्राप्त झाल्या.
यानंतर अशोक कुमार मित्तल यांच्या कुटुंबातील सुरू करण्यात आलेला तिसरा उपक्रम होता लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी.
लाडु बनविण्याचा ऑटोच्या व्यवसायाशी कुठलाही संबंध नव्हता अणि ऑटोचा युनिव्हसिर्टी स्थापण करण्याशी कुठलाही संबंध नव्हता तिन्ही व्यवसाय एकमेकांपेक्षा वेगवेगळे होते.
पण तरी देखील त्यांनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टीची स्थापणा केली.मग पुन्हा लोक म्हणू लागले आधी लाडु बनवून विक्री केली अणि मग त्याच लाडु विकत असलेल्या व्यक्तीने गाडयांचा व्यवसाय सुरू केला.
अणि आता तो स्वताची युनिव्हसिर्टी सुरू करायला चालला आहे.लाडु विकणारा आता लोकांना डिग्री वाटणार असे लोक म्हणु लागले.
पण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अशोक कुमार मित्तल यांनी बाजारात सध्या काय चालले आहे हे न बघता बाजारात भविष्यात काय चालु शकते ह्या गोष्टीचा विचार केला.
अशोक कुमार मित्तल यांनी बघितले की संपूर्ण पंजाब मध्ये एकही प्रोफेशनल युनिव्हसिर्टी उपलब्ध नाहीये.मग त्यांनी विचार केला की आपण जर पंजाब मध्ये युनिव्हसिर्टी स्थापण केली खुपच फायदेशीर ठरेल.कारण शिक्षणाची भविष्यात वाढणारच आहे.
कारण आज हळुहळू तरूणांमध्ये शिक्षणाविषयी जागृकता निर्माण होत आहे.येथील तरूण आजुबाजुच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जात आहेत आपण जर इथेच विद्यापीठ स्थापित केले तर त्यांना इथेच शिक्षण करता येईल.
ह्याच विचाराने अशोक कुमार मित्तल यांनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी स्थापित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले.
कारण हया व्यवसायात त्यांच्यासमोर बाजारात कुठलाही प्रति स्पर्धी नव्हता अणि भविष्यात शिक्षणाची मागणी वाढणार आहे हे त्यांना माहीत होते म्हणून ह्या व्यवसायाला पुढे खुप स्कोप असेल हे त्यांना ठाऊक होते.
अशा प्रकारे १९९९ मध्ये अशोक कुमार मित्तल यांनी पंजाब युनिव्हसिर्टीची स्थापणा केली.पण जेव्हा युनिव्हसिर्टी स्थापित करण्यात आली तेव्हा तिचे नाव लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी असे नव्हते.
युनिव्हसिर्टीचे नाव इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टुडंटस असे होते.अणि ही युनिव्हसिर्टी पंजाब टेक्निकल युनिव्हसिर्टी अंतर्गत कार्य करीत होते.
मग युनिव्हसिर्टी स्थापण केल्यानंतर त्यांनी तिची जाहीरात करण्यास,तिचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली.पण सुरूवातीला ह्या विद्यापीठात एकही विद्यार्थी येत नव्हता.
कारण अशोक कुमार मित्तल यांनी विद्यापीठ स्थापित केले पण त्यांनी आपल्या विद्यापीठाचे बाजारातील इतर मोठ्या विद्यापीठांच्या तुलनेत वेगळेपण काय आहे हे सांगितले नाही.
त्यांच्या विद्यापीठात असे काय वेगळे आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांनी तिथे शिक्षणासाठी प्रवेश घ्यायला हवा हेच स्पष्ट केले नव्हते.म्हणुन सुरूवातीला कुठलाही विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत नव्हता.
याचसोबत त्यांच्या विद्यापीठाला स्वतंत्रपणे काम देखील करता येत नव्हते कारण अशोक कुमार मित्तल यांनी स्थापित केलेले विद्यापीठ पंजाब टेक्निकल युनिव्हसिर्टी अंतर्गत येत असल्याने त्यांच्यावर पंजाब टेक्निकल युनिव्हसिर्टी दवारे काही नियम मर्यादा लादण्यात आल्या होत्या.ज्याचे त्यांना काटेकोर पद्धतीने पालन करावे लागत असत.
ज्यामुळे अशोक कुमार मित्तल यांना आपल्या युनिव्हसिर्टी मध्ये कुठलेही नवीन इनोव्हेशन करता येत नव्हते.नवीन गोष्टी देखील समाविष्ट करता येत नव्हत्या.
ज्यामुळे चांगल्या सुविधा समाविष्ट करता न आल्याने विद्यार्थी युनिव्हसिर्टी मध्ये शिक्षण घेण्यासाठी येत नव्हते.
यामुळे अशोक कुमार मित्तल खूप परेशान झाले होते.
मग त्यांना कुणीतरी सल्ला दिला की तुमचे विद्यापीठ खाजगी युनिव्हसिर्टी म्हणुन रेजिस्टर झाले तर तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रम अणि नियमांनुसार कार्य करता येईल.
ज्यामुळे तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमात नवीन इनोव्हेशन देखील करता येईल.अणि स्वताचा एक युएसपी तयार करून बाजारात मार्केटिंग देखील करता येईल.
मग अशोक कुमार मित्तल यांनी आपल्या युनिव्हसिर्टीला खाजगी युनिव्हसिर्टी म्हणुन रेजिस्टर करण्यासाठी अनेक शासकीय कार्यालयात चक्कर मारले कित्येकदा अर्ज देखील केला पण ते शक्य झाले नाही.
मग २००५ दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री अमर्रिंदर सिंग यांच्याशी मित्तल यांचे बोलणे झाले.मग खुप चर्चा झाल्यावर अमरिंदर सिंग यांनी त्यांना त्यांच्या युनिव्हसिर्टीला खासगी युनिव्हसिर्टी म्हणुन रेजिस्टर करण्यास संमती दिली.
अशोक कुमार मित्तल यांच्या डोक्यात विचार येतो की लव्हली नावाने आपले कित्येक स्टार्ट अप व्यवसाय सुरू केले जे यशस्वी देखील ठरले.
हे आपले पहिले स्टार्ट अप होते ज्यात लव्हली नाव नाही दिल्याने आपल्याला एवढ्या अडीअडचणींना सामोरे जावे लागले म्हणून आपण आपल्या ह्या युनिव्हसिर्टीचे नाव देखील लव्हलीच ठेवुया.
मग त्यांनी त्यांच्या विद्यापीठाचे नाव बदलुन लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी असे ठेवले. लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी २००५ मध्ये रेजिस्टर झाली.
अणि २००६ मध्ये त्यांच्या सेशनला सुरूवात झाली होती.अणि मग २०२२ मध्ये ह्या विद्यापीठात ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये सर्व राज्यातील किमान एक विद्यार्थी शिक्षण घेत आहे अणि ५० पेक्षा अधिक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
हे सर्व अशोक कुमार मित्तल यांनी वापरलेल्या काही व्यावसायिक रणनीतीमुळे शक्य झाले आहे.
मित्तल यांनी वापरलेल्या बिझनेस स्ट्रॅटेजी –
आज सर्वच विद्यार्थी हे शिक्षण चांगली नोकरी प्राप्त होण्यासाठी करत असतात.
अशातच विदयार्थ्यांना समजले की लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी ह्या विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर आपल्याला चांगली जाॅब प्लेसमेंट प्राप्त होईल.तर अशावेळी आपल्या विद्यापीठात जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घेतील.
म्हणुन लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टीने विद्यार्थ्यांसाठी चांगल्या जाॅब प्लेसमेंट उपलब्ध करून देणे यावर अधिक लक्ष केंद्रित केले याकरीता त्यांनी एक कॅम्पस प्लेसमेंट अणि सेल्स टीम तयार केली.
अणि ते वेगवेगळ्या ठिकाणच्या काॅर्पोरेट सोबत भेटत होते.अणि आपल्या युनिव्हसिर्टी बद्दल अणि आपल्या काॅलेज मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या कोर्सेस विषयी सांगत होते.
अणि कंपनींशी टाय अप करत होते अणि प्लेसमेंट करीता आपल्या लव्हली युनिव्हसिर्टी मध्ये बोलवत असत.याचे परिणाम स्वरूप आज लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये २ हजार पेक्षा अधिक कंपन्यां नोकरभरतीसाठी येऊ लागल्या.
अणि त्यातील हजार कंपन्या अशा देखील आहेत ज्या विद्यार्थ्यांना पाच लाख तसेच त्यापेक्षा जास्त पॅकेज ऑफर करते.
त्यातील ३५० अशा कंपन्या आहेत ज्या आय आयटी,आय आय एम मध्ये देखील जाॅबसाठी हायरींग करण्यासाठी जातात.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मधून सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय पॅकेज जे लागले आहे ते ३ करोडचे आहे.
अणि सर्वात मोठे राष्ट्रीय पॅकेज जे विद्यार्थ्यांना लागले आहे ते ६४ लाखापर्यंतचे आहे.
अशा प्रकारे अशोक कुमार मित्तल यांनी व्यवसायात त्यांच्या ग्राहकाची मुख्य गरज समजुन घेतली. त्यांच्या ग्राहकाला नेमके काय हवे आहे हे समजून घेतले.अणि ती गरज पुर्ण करण्यावर मुख्य भर दिला.
मित्तल यांच्या युनिव्हसिर्टी मध्ये शिकण्यासाठी जेवढेही विद्यार्थी आले होते त्यांना जी मुख्य गोष्ट हवी होती तीच त्यांनी त्यांना लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये उपलब्ध करून दिली.
ज्यामुळे त्यांचे लक्ष्यित ग्राहक म्हणजे विद्यार्थी आपोआप त्यांच्या काॅलेज विद्यापीठापर्यंत प्रवेश घेण्यासाठी येऊ लागले.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मित्तल यांनी कुठल्याही युनिव्हसिर्टी मध्ये प्रवेश घेण्यात जे काही अडथळे विद्यार्थ्यांसमोर येत असतात अणि ज्यामुळे त्यांना प्रवेश घेता येत नाही असे ते सर्व अडथळे दूर केले.
आज अनेक विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याअगोदर त्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते.अणि त्यात अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी एक दोन गुण कमी पडल्याने प्रवेश परीक्षेत नापास होतात.
ज्यामुळे त्यांना विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्राप्त होत नाही.
पण मित्तल यांनी त्यांच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये १० वी तसेच १२ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त आहेत अशा विद्यार्थ्यांना कुठलीही प्रवेश परीक्षा न घेता डायरेक्ट प्रवेश दिला.
याठिकाणी लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टीने स्वताची एक प्रवेश परीक्षा आयोजित केली आहे.जिचे नाव नॅशनल इंट्रान्स ॲण्ड स्काॅलरशीप टेस्ट असे आहे.
ह्या टेस्टच्या माध्यमातून लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.अणि ज्या विद्यार्थ्यांना आय आयटी जेईई मध्ये ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त आहेत त्यांना ही एल पीयु टेस्ट देण्याची देखील गरज नसते.
एलपीयु टेस्ट इतर परीक्षांच्या तुलनेत उत्तीर्ण होण्यासाठी सोप्पी आहे.
याचसोबत एलपीयु कडुन टक्के वारीनुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील दिली जाते.याकरीता त्यांनी एक कॅटॅगरी देखील बनवलेली आहे.
अणि ह्या प्रत्येक कॅटॅगरी मधील प्रवेश घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती मिळतेच.
मागील वर्षी १०० करोड पेक्षा अधिक रक्कम एलपीयुने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी वितरीत केली आहे.
इतर काॅलेज मध्ये आपल्याला फक्त काही ठाराविक कोर्स उपलब्ध करून दिले जातात ज्यात आपल्याला प्रवेश घेता येतो पण लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये विद्यार्थ्यांना
१५० पेक्षा जास्त कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ज्यामुळे कुठल्याही क्षेत्रातील कोणताही कोर्स करण्यासाठी विद्यार्थी अधिकतम प्रमाणात एल पीयु मध्ये येतात.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी जालंदर मध्ये आहे पण ह्या युनिव्हसिर्टीने ३०० पेक्षा अधिक परदेशातील युनिव्हसिर्टी सोबत टाय अप केला आहे.
ज्यामुळे भारतातील एलपीयु युनिव्हसिर्टी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत परदेशात शिक्षणासाठी जाता येते अणि तिथल्या विद्यार्थ्यांना भारतात देखील येता येते.
जेव्हा विद्यार्थी अणि त्यांच्या पालकांना कळते की लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केले जाते त्यामुळे अधिकतम विद्यार्थी ह्याच युनिव्हसिर्टी मध्ये प्रवेश घेण्यास अधिक पसंती दर्शवतात.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टीचे कॅम्पस देखील ६०० एकर एवढे मोठे आहे.लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये असलेली लायब्ररी एकदम वल्ड क्लास दर्जाची आहे.
युनिव्हसिर्टी मधील लॅब मध्ये उत्तम दर्जाचे कंप्यूटर बसविण्यात आले आहेत.युनिव्हर्सिटी मध्ये एक माॅल आहे.
ज्यात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत.
अणि ती सर्व दुकाने युनिव्हसिर्टी मध्ये शिकत असलेले विद्यार्थीच चालवतात.युनिव्हर्सिटी मध्ये एक हाॅटेल देखील आहे जे हाॅटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी चालवतात.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये स्टार्ट अप करीता वेगळा फंड आहे अणि उद्यमशिलतेसाठी वेगळा फंड आहे.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिर्टी मध्ये विद्यार्थ्यांना स्विमिंग पासुन स्पोर्ट्स पर्यंतच्या सर्व मोठमोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आज लव्हली गृप ऑटो, स्वीट अणि युनिव्हसिर्टी ह्या तिन्ही व्यवसायातुन वर्षाला ११३५ करोड इतका टर्न ओव्हर जनरेट करते.लव्हली गृपच्या तिन्ही व्यवसायात प्रत्येकी ५५०० पेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत.