रिबेल फुड स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Rebel foods Start up business success story in Marathi
रिबेल फुड स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Rebel foods Start up business success story in Marathi
जेव्हा आपल्याला भुक लागते अणि घरात स्वयंपाक न करता बाहेरून काहीतरी खायला मागवायचे ठरते.
तेव्हा आपण झोमॅटो,स्वीगी सारख्या ऑनलाईन फुड डिलीव्हरी ॲपवरून आपल्याला पाहिजे ते फुड ऑनलाईन ऑडर करत असतो.
जेव्हा आपण कुठल्याही ऑनलाईन फुड डिलीव्हरी ॲपवरून जेवण मागवतो तेव्हा तिथे आपल्याला फासोज रॅप,बेहरोज बिर्यानी,ओव्हेन स्टोरी पिझ्झा अशा रेस्टाॅरंटची नावे वाचायला मिळतात.
समजा आपण तीन मित्रांनी फासोजवरून रॅप ऑडर केले, बेहरोज वरून बिर्याणी मागवली अणि ओव्हेन स्टोरी वरून पिझ्झा ऑडर केला.
तेव्हा आपल्याला वाटते की हे तिन्ही खाद्यपदार्थ वेगवेगळ्या रेस्टॉरंट वरून ऑडर करण्यात आले आहे.
पण तसे नाहीये आता ह्या तिन्ही रेस्टॉरंटचे फुड आपल्याला वेगवेगळे ऑडर करण्याची आवश्यकता नाहीये.कारण हे तिन्ही रेस्टॉरंटचे फुड आपल्याला एकाच किचनमध्ये उपलब्ध करून देण्यात येतात.
फासोज रॅप,बेहरोज बिर्यानी अणि ओव्हेन स्टोरी पिझ्झा हे तिन्ही ब्रँड रिबेल फुड ह्या एका कंपनीच्या अंतर्गत येतात.रिबेल फुड ही एक भारतीय ऑनलाईन रेस्टॉरंट कंपनी आहे.
रिबेल फुड ह्या कंपनीची सुरूवात दोन आय-आयएम पदवीधर व्यक्तींनी मिळून केली होती.रिबेल फुड कंपनी फासोज रॅप बेहरोज बिर्यानी अणि ओव्हेन स्टोरी पिझ्झा सारख्या ४५ पेक्षा अधिक ब्रॅडला चालवते.
रिबेल फुड ही फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील सर्वात मोठी क्लाउड किचन रेस्टाॅरंट साखळी आहे.
रिबेल फुडचे एकुण १० वेगवेगळ्या देशात ४५० पेक्षा अधिक क्लाऊड किचन साखळ्या उपलब्ध आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे काही वर्षापुर्वी रिबेल फुडची सुरुवात फक्त एका रेस्टॉरंट मधुन करण्यात आली होती.तेव्हा कोणी विचार देखील केला नसेल की भविष्यात रिबेल फुड एवढी मोठी कंपनी बनेल.
अशावेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की रिबेल फुडने कशी कोणती बिझनेस स्ट्रॅटेजी वापरली ज्यामुळे हे सिंगल रेस्टाॅरंट जगातील सर्वात मोठी क्लाउड किचन रेस्टाॅरंट साखळी बनले.
आजच्या लेखामध्ये आपण रिबेल फुड ह्या स्टार्ट अप व्यवसायाची संपूर्ण यशोगाथा जाणुन घेणार आहोत.
रिबेल फुड युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?
ऑनलाईन फुड रेस्टाॅरंट कंपनी रिबेल फुडचे संस्थापक जयदीप बर्मन आहेत.जयदीप बर्मन मुळचे कोलकत्ता येथील होते.पण ते पुण्यात राहत होते.
एखादी व्यक्ती कोलकत्ता येथे थोडे दिवस गेली तरी देखील तिला तिथल्या खमंग जेवणाचा आस्वाद विसरता येत नाही.
अणि जयदीप बर्मन हे कोलकता येथेच लहानाचे मोठे झाले होते.
यामुळे पुण्यात वास्तव्यास असताना देखील त्यांना कोलकत्ता येथील खमंग,स्वादिष्ट जेवणाची नेहमी आठवण येत असत.
मुख्यत्वे तेथील काठे रोल्सची त्यांना विशेष आठवण येत असत.कोलकत्ता भेटणारे काठे रोल्स पुण्यात कुठेही उपलब्ध होत नव्हते.
आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयदीप बर्मन यांनी स्वताचा एक स्टार्ट अप उद्योग व्यवसाय सुरू करायचे ठरवले.पण कोणता उद्योग व्यवसाय सुरू करायचा याबाबद त्यांच्या मनात प्रश्न सुरू होता.
जयदीप बर्मन यांनी ठरवले होते की त्यांना बाजारातील इतर प्रतिस्पर्धींपेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते.एकेदिवशी काठे रोल्सच्या ग्रेव्हींगमुळे त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली.
जयदीप बर्मन यांच्या डोक्यात विचार आला की कोलकत्ता सारखाच काठे रोल्सची चव पुणेकरांना देखील चाखायला द्यावी.
आपल्या ह्याच बिझनेस आयडियावर काम करण्यासाठी जयदीप बर्मन यांनी त्यांचे मित्र कल्लोळ बनर्जी सोबत मिळून २००४ मध्ये एका रोल स्टोअरची सुरूवात केली होती.ज्याला आज आपण फासोज ह्या नावाने ओळखतो.
जयदीप बर्मन अणि त्यांचे मित्र कल्लोळ बनर्जी यांनी आपल्या सेव्हिंग मधील पैसे हा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च केले.
एवढेच नव्हे तर दोघांनी आपल्या कुटुंबाकडून तसेच मित्रांकडून देखील पैसे उधार घेतले अणि आपल्या ह्या उद्योग व्यवसायात गुंतवले.असे दोघांनी मिळुन व्यवसायात तब्बल आठ लाखांपर्यंतची गुंतवणूक केली.
अशा पद्धतीने २००४ मध्ये भारतातील सर्वात प्रसिद्ध अणि एकमेव अशा क्लाउड किचन फासोसचा शुभारंभ करण्यात आला होता.
सुरूवातीला जयदीप बर्मन अणि कल्लोळ बनर्जी ह्या दोघांसाठी हा एक पार्ट टाइम व्यवसाय होता.तरी देखील फासोजला वेगाने प्रसिद्धी प्राप्त झाली.
हया प्रसिद्धीचे प्रमुख कारण होते जयदीप बर्मन यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अणि त्यातुन त्यांना प्राप्त झालेले व्यावसायिक धडे.
कारण जयदीप बर्मन यांच्या वडिलांचे अणि काकांचे देखील स्वताचे एक रेस्टॉरंट होते.त्यामुळे फुड बिझनेस कसा करायचा याचे ज्ञान त्यांना आपल्या घरातुनच प्राप्त झाले होते.
फासोजने सुरूवातीला आपला पुर्ण फोकस पुण्यात कोलकत्ता मधील बेस्ट काठे रोल्सची विक्री करण्यावर दिला.अणि लोकांकडुन देखील याला भरपूर पसंती प्राप्त झाली.
आपल्या पहिल्या प्रोडक्ट मध्ये प्राप्त झालेल्या यशानंतर फासोजने आपल्या मेन्यू मध्ये रॅप,रोज,फ्रॅकीज अणि काही इंडियन फुड आईटम देखील समाविष्ट केले.
हे इंडियन फुड आईटम सबवे,डाॅमीनोज,मॅक डोनाल्ड इत्यादी सारख्या बाजारातील प्रतिस्पर्धी सोबत स्पर्धा करण्यासाठी बनविण्यात आले होते.
फासोजने आपल्या फुडच्या स्वाद अणि चवीने त्या वेळच्या दिग्दज रेस्टाॅरंटला देखील मागे टाकले होते.पुढे २०११ पर्यंतचे फासोजचे बाजारात चांगले नाव झाले होते.
हे बघुनच सिकोया कॅपिटलने फासोज मध्ये पाच मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली.
पण कालांतराने फासोज ह्या कंपनीची वाढती प्रसिद्धी कमी होऊ लागली.जास्त भाडे,मोजकीच कमाई अणि जास्त खर्चामुळे कंपनीचे संस्थापक एकदम त्रस्त झाले होते.
मग कंपनीच्या फाऊंडर्सने कंपनीच्या नफ्यात वाढ घडवून आणण्यासाठी आपले पुर्ण लक्ष फासोज मधील खर्चावर केंद्रीत केले.
पण वेगवेगळ्या लोकेशनवर रेस्टाॅरंट उभे करण्यासाठी खुप जास्त रिसोर्स अणि एफर्टची आवश्यकता होती.
हया सर्व गोष्टी पुर्ण केल्या तरी याची कुठलीही निश्चित गॅरंटी नव्हती की त्या क्षेत्रातील लोकांना ही चव पसंद येईल.म्हणुन कंपनीच्या को फाऊंडरने एक शक्कल लढवली.
काही काळापर्यंत फासोज एक सर्वसामान्य रेस्टाॅरंट प्रमाणे कार्य करत होते ज्यात लोक टेबलवर बसुन जेवण ऑर्डर करत.अणि खाऊन झाल्यावर पेमेंट करून निघून जात असत.
काही लोक रेस्टाॅरंट मधील खाद्यपदार्थ पॅक करून देखील घेऊन जात असत.हा तो काळ होता जेव्हा इंटरनेट देशात प्रसिद्ध होत होते.देशात इंटरनेटचा वापर वाढु लागला होता.
म्हणुन फासोजने ह्या बदलत्या काळात एक प्रयोग केला अणि २०१४ मध्ये फासोजने आपले एक मोबाईल ऄप लाॅच केले.ह्या मोबाईल ॲपच्या माध्यमातुन कुठल्याही ग्राहकाला घरातुनच जेवणाची ऑडर करता येत होती.
काही वेळ सर्व ठिक चालले पण कालांतराने फाऊंडरच्या हे लक्षात आले की त्यांच्या ७० ते ८० टक्के लोकेशनवर ग्राहक फक्त ऑनलाईन फुड ऑडर करत होते.
हे बघता त्यांनी आपल्या ग्राहकांना जाणुन घेण्यासाठी एक कस्टमर सर्वे केला.ज्यात ग्राहकांनी फासोजचे फिजिकल आऊट लेटस पाहीले आहे किंवा नाही हे जाणुन घेण्यात आले.
कंपनीने केलेल्या सर्वे मधुन समोर आलेल्या निकालात असे निदर्शनास आले की ७४ टक्के ग्राहकांनी फासोजचे फिजिकल आऊट लेटस पाहीले नाहीयेत.
ग्राहकांकडून हे उत्तर प्राप्त झाल्यानंतर फाऊंडरने आपले पुर्ण लक्ष ऑनलाईन व्यवसाय करण्यावर केंद्रीत करायचे ठरवले.
एक सर्वसामान्य रेस्टाॅरंट चालविण्यासाठी आपणास एक चांगली जागा निवडावी लागते.ज्याचे भाडे खुपच जास्त असते.
याचसोबत रेस्टाॅरंट मधील काम करत असलेल्या कर्मचारींचे वेतन देखील द्यावे लागते.रेस्टाॅरंट मधील शेफच्या हाताच्या चवीवर स्वादावर व्यवसाय चालत असतो म्हणून फाऊंडरला शेफला खुश ठेवण्यासाठी देखील प्रयत्नशील असावे लागत.
कारण अशा परिस्थितीत शेफ रेस्टाॅरंट सोडुन निघुन गेला तर रेस्टाॅरंट मधील त्याच्या बरोबर काम करत असलेले इतर कर्मचारी देखील काम सोडून जाण्याची भीती असते.
पण क्लाउड किचन माॅडेल मध्ये कंपनीला ह्या सर्व त्रासापासून कायमची सुटका प्राप्त होते.झोमॅटो अणि स्वीगीने बाजारात प्रवेश केल्याने फुड जगतात एक मोठे क्रांतीकारी परिवर्तन घडून आले.
ज्यामुळे अधिकतम उद्योजक एक पारंपरिक रेस्टाॅरंट नव्हे तर क्लाऊड किचनला अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत.
ह्या सर्व गोष्टींचा विचार करून विजय शेखर शर्मा यांनी २०१५ मध्ये आपले पहीले क्लाउड किचन सुरू केले.पण याची सुरुवात करण्याआधी कंपनीने आधी तीन प्रकारच्या ग्राहकांची ओळख करून घेतली.
ज्यात रिच सोसायटी मधील कस्टमर, मिडल क्लास कस्टमर, अप्पर मिडल क्लास अशा तीन प्रकारच्या ग्राहकांचा समावेश होता.
आपल्या लक्ष्यित ग्राहकांची ओळख झाल्यानंतर कंपनीने अशा एका केंद्रबिंदू ठिकाणाची निवड केली.जिथुन त्यांना सर्व प्रकारच्या ग्राहकाला आपली सेवा पुरविता येईल.अणि त्या लोकेशनवर त्यांना जलदगतीने ऑडर देखील पोहोचवता येईल.
अणि अशा लोकेशनवर भाडे देखील कमी लागते.ज्यामुळे क्लाऊड किचनवर जास्त खर्च करावा लागला नाही.इथपर्यत सर्व काही ठीक चालले होते.
पण कालांतराने विजय शेखर शर्मा यांच्या कंपनीची प्रगती कमी होऊ लागली.कारण फासोज जे रोल्स विकत होते त्याची किंमत खूप कमी होते त्यासोबत फासोज आपल्या ग्राहकांना साॅफ्ट ड्रिंक,पोटॅटो वेज, इत्यादी सारखे अनेक खाद्यपदार्थ ऑफर करत होते.
पण सगळ्यात महत्वाची समस्या ही होती की ग्राहकांकडून केल्या जाणारया ऑडर मध्ये सातत्य नव्हते कारण कंपनी जरी वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स ग्राहकांना ऑफर करत होती.
पण एकाच खाद्यपदार्थाचे सेवन करण्याचा ग्राहकांना कंटाळा येत होता.म्हणुन यातुन बाहेर पडण्यासाठी कंपनीने आपल्या मेन्यू मध्ये काही नवीन खाद्यपदार्थ समाविष्ट करण्याचे ठेवले.
पण मुख्य समस्या अशी होती की फासोजची बाजारातील ओळख ही त्यांच्या रोल्स अणि रॅपमुळे होती.अशातच कंपनीने इतर कुठल्याही मेन्यूवर लक्ष केंद्रित केले तर ग्राहकांनी त्याला पसंती दर्शवली नसती.
कारण आज बाजारात उत्तम पिझझ्यासाठी जसे ग्राहक पिझ्झा हंट किंवा डाॅमीनोजला अधिक पसंती दर्शवतात.अणि बर्गर करीता मॅक डोनाल्ड,उत्तम काॉफी करीता स्टार बक किंवा सीसीडीला अधिक पसंती दर्शवतात.
ग्राहकांच्या मनात कधी असा विचार येत नाही की आपण मॅक डोनाल्ड मध्ये जाऊन पिझ्झा खाऊया किंवा पिझ्झा हंट मध्ये जाऊन बिर्याणी खायची.
कारण बाजारात प्रत्येक ब्रॅडची आपली एक स्पेशालिटी असते.अणि समजा एखाद्या ब्रँडने आपली स्पेशालिटी वगळता इतर खाद्यपदार्थाची देखील ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली.
तर ग्राहक त्या कंपनीकडून सेवा घेणार नाही.कारण त्या ब्रँडची ग्राहकांच्या नजरेत एक युनिक आयडेंटिटी बनत नाही.अणि असे केल्याने कंपनीची ग्राहकांच्या नजरेत आपल्या काही स्पेशल डिशेसमुळे जी युनिक आयडेंटिटी तयार झालेली असती ती देखील संपुष्टात येते.
म्हणुन आपल्या युनिट आयडेंटिटीला जपण्यासाठी फासोजच्या फाऊंडरने आपल्या रेस्टाॅरंट मधील मेन्यू मध्ये वाढ न करता आपल्या उद्योग व्यवसायात अधिक विस्तार करण्याचे ठरवले.
मग फासोजने प्रत्येक डिशसाठी एक वेगळा ब्रँड तयार करण्यास सुरुवात केली.अशा पदधतीने २०१६ रिबेल फुडची सुरुवात करण्यात आली अणि फासोज देखील त्याचा एक महत्वाचा घटक बनले.
२०१६ मध्ये कंपनीने बिर्यानी सेगमेंट मध्ये आपले पाऊल टाकले.अणि बेहरोज बिर्यानी नावाने बाजारात एक नवीन ब्रँड लाॅच केला.
ज्याला ग्राहकांनी भरपूर पसंती दर्शवली ज्यामुळे फक्त एका वर्षात रिबेल फुड दर महिन्याला दोन लाखापेक्षा जास्त बिर्याणीचे पॅकेट डिलीव्हर करू लागले.
कंपनीने ह्या नवीन ब्रँडचा समावेश केल्याने कंपनीच्या नफ्यात अधिक वाढ झाली.ज्यामुळे कंपनीचा अधिक वेगाने विस्तार होऊ लागला.
बेहरोज बिर्यानी मध्ये प्राप्त झालेल्या भरघोस यशानंतर कंपनीने २०१७ मध्ये ओव्हन स्टोरी नावाचा एक पिझ्झा ब्रँड सुरू केला.ज्यात फक्त पिझझ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
२०१६ पर्यंत रिबेल फुडने सात शहरात आपल्या कार्यास सुरुवात केली होती.अणि त्याच वर्षी रिबेल फुड मध्ये मॅट्रिक्स पार्टनर इंडिया अणि सिकोया कॅपिटलने एक मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली.
यानंतर कंपनीच्या प्रगतीमध्ये अधिक वाढ होऊ लागली.कंपनीने नंतर पास्ता प्रेमींसाठी फिरंगी बेक नावाच्या ब्रँडची सुरूवात केली.
यानंतर कंपनीने घरातील राजमा चावल पसंत करत असलेल्या ग्राहकांसाठी लंच बॉक्स,न्युट्रीशनल फुड करीता न्युट बावन, बर्गर पॅटिज करीता विंडेज, चायनीज पसंत असलेल्यांसाठी मॅण्डेरियन ओक,डेझर्ट करीता स्वीट ट्रुथ अशा एकुण ४५ पेक्षा अधिक ब्रँडला रिबेल फुड अंतर्गत ओपन केले.
अणि यातील प्रत्येक ब्रँडच्या विशिष्ठ डिशमध्ये कंपनीने बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.याने रिबेल फुड ग्राहकांच्या प्रत्येक गरजेला पुर्ण करू लागले.
एवढेच नव्हे तर कंपनीने पिझ्झा हंट,के एफसी,मॅक डोनाल्ड, इत्यादी सारख्या कंपनींचे मार्केट शेअर देखील काबीज केले.
पण यात विशेष बाब म्हणजे एवढ्या सर्व ब्रँडला रिबेल फुडने एका किचनमधुन ऑपरेट केले.म्हणजे केक बनविण्यात यायचा तिथेच राजमा चावल देखील बनविण्यात येत होते.
अणि जिथे हेल्दी सॅलड बनवण्यात येत होते तिथेच पिझ्झा बर्गर देखील बनविण्यात येत असत.अशा प्रकारची स्ट्रॅटेजी कंपनीने आपल्या क्लाउड किचन माॅडेल मध्ये सुरू केल्याने कंपनीच्या नफ्यात तीन पटीने अधिक वाढ होऊ लागली.
२०१८ मध्ये रिबेल फुड कंपनीचा रेव्हेन्यू १४६ करोड रुपये इतका होता.तोच रेव्हेन्यू २०१९ मध्ये ३०५ करोड रुपये पर्यंत पोहोचला होता.
भारतामध्ये रिबेल फुडने बाजारात चांगले वर्चस्व प्रस्थापित केले होते अणि कंपनीचे सर्वच ब्रँड आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत होते.
म्हणुन मग कंपनीने आपले लक्ष फाॅरेन कंट्री कडे वळवले.अणि २०१९ मध्ये इंडोनेशिया अणि युएई मधील बाजारात प्रवेश केला.
यानंतर २०२० मध्ये कंपनीने मलेशिया,सिंगापूर,बांगलादेश,युके मध्ये देखील इंट्री केली.ज्यामुळे कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये वाढ झाली अणि तो ५६१ करोड रुपये इतका झाला.जो २०१९ च्या तुलनेत ८३ टक्के अधिक होता.
पण त्याच दरम्यान रिबेल फुड समोर कोरोना एक मोठे आव्हान येऊन उभे राहिले.कोविडच्या कालावधीत लोक बाहेरचे खाणे टाळु लागल्याने मार्च २०२० मध्ये रिबेल फुडला त्यांचे ७० टक्के किचनला बंद करावे लागले.
तरी देखील कंपनीने हार नाही मानली त्यांनी दोन महिन्यांनंतर फासोजच्या डी आय वाय मिल किट ह्या एका नवीन आयडीयावर काम सुरू केले.
यात आपल्याला स्वयंपाक घरात बनविण्यासाठी आवश्यक सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यात येतात.ही किट पास्ता बिर्याणी सारख्या एखाद्या विशिष्ट रेसीपीसाठी असते.
प्रत्येक किट मध्ये सर्व सामग्री अणि ते कसे बनवायचे याची रेसीपी देखील दिलेली होती.ज्या लोकांना स्वयंपाक जमत नव्हता किंवा ज्यांना बाहेरचे फुड खाण्याची अत्यंत सवय झाली आहे अशा लोकांना ही कीट खुपच पसंद आली.
एकीकडे झोमॅटो अणि स्वीगी सारख्या ऑनलाईन फुड डिलीव्हरी करत असलेल्या कंपनी बाजारात आल्याने रिबेल फुडला खुपच नफा प्राप्त झाला.
रिबेल फुडचे क्लाउड किचन यशस्वी बनविण्यात त्यांचा खुप मोठा वाटा होता.पण काही काळानंतर हेच झोमॅटो स्वीगी रिबेल फुडकरीता बाजारातील सर्वात मोठा अडथळा बनू लागले.
कारण क्लाऊड किचन क्षेत्रात अधिक वेगाने विस्तार घडुन येत होता.त्यामूळे बाजारात ह्या क्षेत्रात नवनवीन खेळाडू जोडले जात होते.
ज्यामुळे बाजारात वाढत असलेल्या स्पर्धेला सामोरे जाणे कंपनीला अवघड जाऊ लागले.कारण झोमॅटो स्वीगीने देखील आपले एक वेगळे क्लाउड किचन नेटवर्क बनविले होते.
ज्यामुळे रिबेल फुडला बाजारात मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत होते.
याचसोबत रिबेल फुडला बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्या ओला फुडस,फ्रेश मेन्यू, बाॅक्स,इनर शेफ,क्यु एस आर फुड इत्यादी सारख्या ब्रँडमुळे देखील मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत होते.
ह्या स्पर्धेतुन बाहेर पडण्यासाठी रिबेल फुडने कुकिंग अणि टेक्नॉलॉजी मध्ये एक चांगला समतोल राखला.याकरीता कंपनीने रिबेल ओएस नावाची एक मजबूत ऑपरेटिंग सिस्टिम देखील तयार केली.
रिबेल फुड आय ओटी,ए आय अणि रोबोटिक्स सारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करते.ज्यामुळे त्यांच्या क्लाउड किचन मध्ये जेवण तयार करण्याची प्रक्रिया ऑटोमॅटिक झाली आहे.
याचसोबत हे रिबेल फुड सामानाची इनव्हेंटरी,खरेदी उत्पादन करण्यात तसेच वेअर हाऊसला ट्रॅक करण्यास देखील साहाय्य प्रदान करते.
आज रिबेल फुडचे स्मार्ट किचन त्यांच्या ह्याच टेक्नॉलॉजीमुळे बाजारातील इतर प्रतिस्पर्धींपेक्षा कंपनीला पुढे नेण्यास कारणीभूत ठरत आहे.
रिबेल फुडच्या किचनमध्ये असे अनेक इंडस्ट्री फस्ट ऑटोमॅटिक प्रोडक्ट बसविण्यात आले आहेत जे कुकिंगला सोपे बनविण्याचे काम करते.
इथे आय ओटी इनेबल डीप फ्रायर अणि सेंसर इनेबल क्वालिटी चेक स्टेटस बसविण्यात आले आहेत.जे खाण्याचे सातत्य अणि टेस्ट प्रोफाईलची तपासणी करते.
ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांना चवीमध्ये आस्वादात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.अणि हे काम करण्यासाठी माणसांची आवश्यकता खुपच कमी भासत असते.
ज्यामुळे क्लाउड किचन हे स्टाफ किंवा शेफवर पुर्णपणे अवलंबून राहत नाही अणि किचन मध्ये काम करत असलेला एखादा कर्मचारी किंवा शेफ मध्येच नोकरी सोडून गेला तरी देखील त्याचा काही विशेष प्रभाव कंपनीला जाणवत नाही.हा एक खूप मोठा फायदा कंपनीला ह्यामुळे होतो.
आपला भारत देश खाद्यपदार्थांच्या बाबतीत असाच जगप्रसिद्ध नाहीये कारण इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत ज्यांचे नाव देखील आपणास माहीत नाही.
इथे प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाद्यपदार्थ आहेत त्यात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत.
अशात नवीन लोकेशनवर जाण्यासाठी कंपनीला वारंवार आपल्या मेन्युत बदल करावा लागतो.तसेच प्रादेशिक चव लक्षात घेऊन फुड बनवावे लागते.जेणेकरून त्या विशिष्ट प्रदेशातील लोकांना यांचा स्वाद आवडेल.
म्हणुन २०१६ ते २०१८ दरम्यान रिबेल फुडने आपल्या शेफ समवेत मिळुन गृपच्या मल्टिपल ब्रँड साठी २८० वेगवेगळ्या डिशेस अणि रेसीपी लाॅच केल्या.
ज्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या ग्राहकांना आपल्या प्रदेशात पाहीजे तशी चव प्राप्त होईल.अणि ते रिबेल फुडशी जोडले जातील.
रिबेल फुडने घेतलेल्या ह्याच एफर्टमुळे त्यांना आतापर्यंत खूप मोठमोठ्या फंडिंग देखील प्राप्त झाल्या आहेत.२०२१ मध्ये रिबेल फुडला १७५ मिलियन डॉलर इतकी फंडिग प्राप्त झाली होती.
यानंतर रिबेल फुडचे नाव देशातील स्टार्ट अप युनिकाॅन यादीत समाविष्ट झाले.
२०२३ मध्ये रिबेल फुडचे एकुण बाजार मुल्यांकन १.४ बिलियन डॉलर्स इतके झाले होते.अणि रेव्हेन्यू १२ हजार ५८ करोड रुपये इतका रेव्हेन्यू जनरेट केला होता.
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये रिबेल फुडने ९०७ करोड रुपये इतकी कमाई केली होती.म्हणजे २०२२ पेक्षा २०२३ मध्ये कंपनीने सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट केला होता.
आज रिबेल फुडचे १० देशात ४५० पेक्षा अधिक क्लाऊड किचन आहेत.आज रिबेल फुडला जगातील सर्वात मोठी क्लाउड किचन रेस्टाॅरंट साखळी म्हणून ओळखले जाते.