Blog

शिप राॅकेट ह्या स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Ship rocket Start up business success story in Marathi 

शिप राॅकेट ह्या स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Ship rocket Start up business success story in Marathi 

शिप राॅकेट हे २०१७ मध्ये एक छोटेसे स्टार्ट अप होते पण आज हे स्टार्ट अप सर्वात मोठी लाॅजिस्टिक कंपनी बनले आहे.

शिप राॅकेटचे को फाऊंडर तसेच सीईओ साहिल गोयल आहेत.

जेव्हा शिप राॅकेटने आपले एआयवाले शिपिंग सोल्युशन लाॅच केले.तेव्हा हजारो छोट्या व्यवसायांना आपल्या प्रोडक्टला वेगाने अणि योग्य पद्धतीने डिलिव्हर करण्याचा एक सोपा अणि स्वस्त मार्ग प्राप्त झाला.

आज शिपराॅकेट हा स्टार्ट अप व्यवसाय जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेला आहे ज्यामुळे व्यावसायिक भारताच्या बाहेर देखील आपले प्रोडक्ट पोहोचवू शकतात.

२०२१ मध्ये शिपराॅकेट १ बिलियन डॉलर्स इतक्या मुल्यांकनासोबत युनिकाॅन स्टार्ट अपच्या यादीत समाविष्ट देखील झाले आहे.

यावरून आपणास प्रेरणा प्राप्त होते की आज शिपराॅकेटने आपल्या दमदार आयडिया अणि मेहनतीच्या जोरावर एवढी प्रगती केली आहे तर आपण देखील करू शकतो.

शिपराॅकेट ही एक शिपिंग, लाॅजिस्टिक कंपनी आहे.जिच्यासोबत पार्टनरशिप करून कंपन्या आपल्या प्रोडक्टची भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यात कमीत कमी दरात विक्री करू शकतात.

सर्वसाधारणपणे जेव्हा आपण ऑनलाईन एखादे प्रोडक्ट ऑडर करत असतो तेव्हा आपण अशाच वेबसाईटची निवड करतो जिथुन आपल्याला वेगाने कमी दरात मालाची पोहोच केली जाते.

अणि जेव्हा आपण ऑनलाईन प्रोडक्टची विक्री करतो तेव्हा ग्राहक देखील आपल्याकडुन हीच अपेक्षा ठेवतात.

पण कुठल्याही एका कुरीअर कंपनीसोबत पार्टनरशिप करून असे करणे अशक्य आहे.

कारण एखाद्या पिनकोड मध्ये एक कुरीअर कंपनी आपल्याला चांगली सेवा देते.अणि एखाद्या दुसरया पिनकोड मध्ये दुसरी कंपनी आपल्याला चांगली सेवा देते.

आपल्या ह्याच समस्येचे निराकरण करण्यासाठी व्यावसायिक शिपराॅकेट ह्या वेबसाईट सोबत पार्टनरशिप करू शकतात.

कारण शिपराॅकेट इंडिया पोस्ट सारख्या २५ पेक्षा अधिक डिलीव्हरी सर्विसेस सोबत जोडलेले आहे.

शिपराॅकेटच्या डॅश बोर्ड वरून आपणास सहजपणे पिनकोडनुसार जी कंपनी आपल्याला उत्तम रेट अणि उत्तम वेळ देत असेल त्या कंपनी द्वारे आपल्या प्रोडक्टची डिलीव्हरी करता येते.

शिप राॅकेट ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात कशी अणि कुठुन झाली?

शिप राॅकेट हा स्टार्ट अप व्यवसाय सुरू करण्याच्या आधी शिप राॅकेटचे को फाऊंडर तसेच सीईओ साहिल गोयल हे युएसए मध्ये होते.

तिथे त्यांनी वाॅलमार्ट मध्ये नोकरी केली.तिथे काम करत असताना साहील यांना जाणवले की भारतात ५० करोडपेक्षा जास्त जे काही छोटछोटे उद्योग व्यवसाय आहेत.

त्यांना त्यांच्या प्रोडक्टला आॅनलाईन पाठविता यावे त्याची शिपिंग करता यावी यासाठी कुठलेही संसाधन उपलब्ध नव्हते.अणि ते उपलब्ध करून देण्याचा विचार देखील कोणी करत नाहीये.

ह्याच एका शिपिंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी साहील गोयल यांनी शिपराॅकेट ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली.

तब्बल अकरा वर्षं वेगवेगळ्या बिझनेस मॉडेलवर काम केल्यानंतर साहील गोयल यांच्या लक्षात आले की आॅनलाईन डायरेक्ट प्रोडक्ट विक्री करण्याच्या मार्गात शिपिंग अणि कुरीअर ही एक खुपच मोठी समस्या आहे.

कुठल्याही प्रोडक्टला जलदगतीने आॅनलाईन सहजपणे शिप करणे अणि विशेषत देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी ही सुविधा निर्माण करणे ही एक खुप मोठी व्यावसायिक संधी असल्याचे साहील गोयल यांना वाटत होते.

म्हणुन त्यांनी शिप राॅकेट ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली.

मागील चार पाच वर्षांत ईकाॅमर्स मध्ये खुपच प्रगती झाली आहे.सर्व प्रकारच्या व्यवसाय तसेच साॅफ्टवेअरने चांगली कामगिरी पार पाडली आहे.पण शिपराॅकेटने ह्या सर्वांपेक्षा एक वेगळी ओळख बाजारात निर्माण केली आहे.

शिपराॅकेटने १५०० शहरातील एक लाखापेक्षा जास्त छोटे एमएमई उद्योग व्यवसाय यांना अॅग्रीगेट करत १५० पेक्षा जास्त सेवा त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत त्याही फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर.

ज्यात कुरीअर,वेअर हाऊसिंग,मार्केटिंग,पेमेंट इत्यादी सेवांचा समावेश होतो.जेणेकरून छोट्या व्यवसायांना व्यवसाय करण्याची पुर्ण पद्धत एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

शिपराॅकेट हे आज भारतातील १०६ वे युनिकाॅन स्टार्ट अप बनले आहे.शिपराॅकेटने ३३ मिलियन यूएस डाॅलर्स इतकी फंडिग प्राप्त केली आहे ज्यामुळे शिपराॅकेटचे मुल्यांकन 1.23 बिलियन युएस डाॅलर्स इतके झाले आहे.

शिपराॅकेट ह्या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला २ करोडपेक्षा अधिक प्रोडक्टची विक्री होते.

सुरूवातीला साहील गोयल अणि त्यांच्या टीमने वेबसाईट बिल्ड करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले.तिथुनच शाॅपिंग कार्ट ह्या शब्दावरून कार्ट हा शब्द आला त्यावरून कंपनीचे नाव कार्ट राॅकेट असे पडले.

राॅकेट ह्या नावाच्या संकल्पनेचा अर्थ जलदगतीने राॅकेटच्या वेगाने सामान पोहचवणे असा होता.

पण हे काम करताना २०११ २०१२ दरम्यान गोयल यांच्या लक्षात आले की भारतातील जे काही प्रचंड लोक आहेत ते मोबाईलचा वापर अधिक करत होते.डेस्कटाॅपवर नव्हते.

इथुनच गोयल अणि त्यांच्या सहकाऱ्यांना कळले की देशात शिपिंग ही एक खूप मोठी समस्या आहे.तेव्हा ईकाॅमर्स आॅनलाईन करण्यात अधिक समस्या होती.

तेव्हा लोक अॅमेझाॅन फ्लिपकार्ट सारख्या ईकाॅमर्स साईटवर जाऊन देखील आपल्या प्रोडक्टची विक्री करता येत होती.पण ते देखील मध्यस्थी होते.

कारण समजा इथे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला सामान दिले मग तो व्यक्ती पुढे ग्राहक तसेच खरेदीकर्ताला ते सामान देतो आहे तर त्यात मध्यस्थी करण्यासाठी तो नक्कीच स्वताचे काहीतरी कमिशन काढणार हे नक्की होते.

पण शिपराॅकेटने कुठल्याही मध्यस्थी विना डायरेक्ट खरेदी कर्त्याला आपले सामान कसे विकता येईल यावर विशेष लक्ष केंद्रित केले.

शिपराॅकेट सोबत काम करणारे एस एम ई तसेच बाजारातील जे एक लाखापेक्षा जास्त व्यवसाय आहेत.त्यांच्याकडून सरासरी १५० ते २ हजार आॅडर दर महिन्याला शिपराॅकेटकडे येतात.

त्यांना दीड ते दोन लाख इतकी विक्री आॅनलाईन करता येते.यातील जास्तीत जास्त प्रोडक्टची विक्री इंस्टाग्राम व्हाटस अप इत्यादी सोशल मीडियावर केली जाते.

शिपराॅकेट एक लाखापेक्षा जास्त व्यवसायांना जे काही हवे आहे मग ते कुरीअर,लोकल,नॅशनल,एअर इंटरनॅशनल,वेअर हाऊसिंग हवी असेल तर छोट्या मोठ्या ५० पेक्षा जास्त वेअर हाऊस शिपराॅकेटकडे उपलब्ध आहेत.

एवढेच नव्हे तर त्यांना इन्शुरन्स,मार्केटींग टुल्स,पेमेंटस इत्यादी जे काही हवे असेल ते एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येते.

शिपराॅकेट ह्या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला दोन करोडपेक्षा जास्त प्रोडक्ट दर महिन्याला विकले जातात.शिपराॅकेट त्यांच्या एक लाखापेक्षा जास्त क्लाईटला सर्विस देण्याचे काम करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button