झोहो स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Zoho start up business success story in Marathi
झोहो स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Zoho start up business success story in Marathi
झोहो हा आपल्या भारत देशातील सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे.हया स्टार्ट अप व्यवसायाचे संस्थापक श्रीधर वेंबु आहेत.श्रीधर वेंबु हे एका छोट्याशा गावात वास्तव्यास आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब व्यक्तींप्रमाणे पोशाख परिधान करतात.नेहमी सायकलने प्रवास करतात.पण आज ते आपल्या भारत देशातील सर्वात फायदेशीर स्टार्ट अप व्यवसाय चालवत आहेत.
श्रीधर वेंबु हे २७०० करोड इतका नफा आपल्या ह्या स्टार्ट अप व्यवसायातुन कमवतात.आज आपल्या भारत देशात एकुण ११४ युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी आहेत.
त्यापैकी ७७ स्टार्ट अप कंपनी ह्या आज देखील नुकसानात आहे.अशा परिस्थितीत श्रीधर वेंबु सारखा ग्रामीण भागातील व्यक्ती आपल्या उद्योग व्यवसायातुन एवढी भरमसाठ कमाई करत आहे ही देशातील लोकांसाठी एक खूप प्रेरणादायक बाब आहे.
आज श्रीधर वेंबु यांचे १८० पेक्षा जास्त देशात स्वताचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत.यात ६ करोड पेक्षा अधिक ग्राहक त्यांच्याकडे आहेत.
अणि श्रीधर वेंबु यांच्या कंपनीत आज ११ हजारपेक्षा जास्त कर्मचारी कामाला आहेत.
आज बाजारातील दिग्दज कंपन्या ॲपल,महिंद्रा,नेट प्लिक्स, ॲमेझाॅन, इत्यादी श्रीधर वेंबु यांच्या कंपनीचे क्लाईंट आहेत.
श्रीधर वेंबु यांच्या कंपनीचा एकुण रेव्हेन्यू ७ हजार करोड इतका आहे.अणि कंपनीला आपल्या उद्योग व्यवसायातुन २७०० करोड इतका नफा प्राप्त होतो.अणि श्रीधर वेंबु यांच्या कंपनीचे एकुण बाजार मुल्यांकन ४० हजार करोड इतके आहे.
अणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्टार्ट अप व्यवसायात एवढे मोठे साम्राज्य निर्माण करण्यासाठी श्रीधर वेंबु यांनी बाजारातील कुठल्याही वित्तीय संस्था,बॅकेकडुन आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेतले नाही.
किंवा बाजारातील कुठल्याही कंपनीने त्यांच्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी फंडिंग देखील दिली नाही.
श्रीधर वेंबु यांनी आपले स्टार्ट अप सुरू करण्यासाठी कोणाकडूनही उधार उसनवारी पैसे न घेता सर्व पैसे स्वताच्या खिशातुन खर्च केले होते.
आजच्या परिस्थितीत बाजारातील स्टार्ट अप जिथे बॅकेकडुन कर्ज घेऊन, बाजारातील इतर कंपन्यांकडून फंडिग प्राप्त करून देखील नुकसानात आहेत त्यांना नफा प्राप्त होत नाहीये.
बाजारातील अशा नुकसानात जात असलेल्या सर्व कंपन्यांसाठी श्रीधर वेंबु हे एक मोठे आदर्श उदाहरण आहे.
आज बाजारात असे अनेक स्टार्ट अप व्यवसाय दिसुन येतात ज्यांना त्यांच्या वागणुकीमुळे शासनाकडून नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
पण श्रीधर वेंबु यांच्या स्टार्ट अप व्यवसायाला आपल्या उत्तम कार्यासाठी शासनाकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आजच्या लेखामध्ये आपण झोहो ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात कशी झाली?झोहो कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे?
आज जोहो बाजारातील एवढी मोठी कंपनी कशी बनली आहे इत्यादी सर्व महत्वाच्या गोष्टी ह्या स्टार्ट अप व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत.
जोहो स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात कशी झाली?
श्रीधर वेंबु यांचा जन्म तामिळनाडू ह्या राज्यातील एका छोट्याशा गावात झाला होता.श्रीधर वेंबु यांचे संपूर्ण कुटुंब शेती हाच एकमेव व्यवसाय करत होते.
पण काही काळानंतर त्यांच्या वडिलांची बदली चेन्नई येथे बदली अणि तिथे हाय कोर्टात स्टेनो ग्राफर म्हणून ते काम करू लागले.
तेव्हा चेन्नई मध्ये वास्तव्यास असताना श्रीधर वेंबु यांनी जेईई परीक्षेचा अभ्यास केला अणि त्यात ते संपूर्ण भारतात २७ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले.
जेईई परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर श्रीधर वेंबु आय आयटी मद्रास येथे इंजिनिअरींगचे शिक्षण करण्यासाठी प्रवेश घेतला.
श्रीधर वेंबु हे त्यांच्या कुटुंबातील पहिले असे व्यक्ती होते ज्याने पदवी प्राप्त केली होती.श्रीधर वेंबु यांना आपल्या हाताने कंप्युटर तयार करायचे होते, वेगवेगळे मशिन तयार करायचे होते.
त्यामुळे त्यांनी ठरवले होते एकतर वैज्ञानिक बनायचे किंवा प्रोफेसर बनायचे किंवा ह्या क्षेत्रात संशोधन करायचे.
म्हणुन इंजिनिअरींग मध्ये त्यांनी आय आयटी मद्रास येथे इलेक्ट्रिक इंजिनिअरींग ह्या शाखेत प्रवेश घेतला.
पण आय आयटी मद्रास येथे इलेक्ट्रिक इंजिनिअरींगमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना त्यांच्या मनाला पाहिजे तसे शिक्षण प्राप्त झाले नाही.तरी देखील अभ्यासात मन लागत नसताना देखील त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.
मग त्यांनी पुढील शिक्षणासाठी पीएचडी प्राप्त करण्यासाठी प्रिन्स्टन युनिव्हसिर्टीत प्रवेश घेतला.तिथे त्यांनी पीएचडी ही पदवी प्राप्त केली.
पण तिथे देखील शिकत असताना त्यांना पाहीजे तसा आनंद प्राप्त होत नव्हता.मग त्यांनी ठरवले आपण पुस्तकांच्या भरवशावर नाही राहायचे.आपण स्वताच सेल्फ स्टडी करायचा.
मग ते वाचनालयात बसुन पुस्तके वाचुन आपल्या स्वताच्या पद्धतीने पुस्तकांचा अभ्यास करून त्यावर रिसर्च करू लागले.
मग आय आयटी मद्रास मधुन इलेक्ट्रिक इंजिनिअरींग, प्रिन्स्टन युनिव्हसिर्टीतुन पीएचडी प्राप्त केल्यानंतर श्रीधर वेंबु यांना एका चांगल्या कंपनीत नोकरी देखील प्राप्त झाली.
नोकरी मध्ये त्यांना सॅलरी पॅकेज देखील चांगले मिळत होते.
पण तरी देखील त्यात श्रीधर वेंबु हे संतुष्ट नव्हते कारण त्यांना काहीतरी मोठे करायचे होते पण शिक्षण घेऊन ते आपणास करता आले नाही असे त्यांना वाटत होते.
मग त्यांनी ठरवले मनाशी निर्धार केला की पुढे भविष्यात आपल्याला संधी प्राप्त झाली तर आपण देशासाठी नक्की काहीतरी करू.
श्रीधर वेंबु हे इतके हुशार बुद्धिमान होते की कंपनीत जेव्हा त्यांना एक प्रोजेक्टवर काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती तेव्हा त्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी सी++ ह्या लॅग्वेजचे ज्ञान असणे आवश्यक होते.
पण त्यांना सी++ लॅग्वेज येत नव्हती तेव्हा त्यांनी पुस्तकातुन अभ्यास करत स्वताच सी++ लॅग्वेज शिकुन घेतली.
अणि आपल्या सी लॅग्वेज मधील प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी असे एक साॅफ्टवेअर तयार केले जे हार्ड वेअर सोबत सुसंगत असे होते.
पुढे १९९६ मध्ये श्रीधर वेंबु यांच्या भावाने यांच्यापुढे एक प्रस्ताव सादर केला आपण स्वताची एखादी कंपनी सुरू करु अणि ती कंपनी आपल्या देशात सुरू करू म्हणजे देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अणि आपल्या देशाची देखील उद्योग व्यवसायात अधिक प्रगती होईल.
मग श्रीधर वेंबु हे आपल्या भारत देशात चेन्नई येथे आले.अणि तिथे एका छोट्याशा रूममध्ये त्यांनी आपल्या ॲडवेट नेट नावाच्या एका स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली.
श्रीधर वेंबु यांच्या स्टार्ट अप कथेतुन आपणास ही एक गोष्ट शिकायला मिळते की सर्व ज्ञान हे पुस्तकातुन प्राप्त होत नसते.कधी कधी आपल्याला स्वताच नवनवीन पुस्तके वाचुन त्यावर संशोधन तसेच प्रयोग करून सेल्फ स्टडी द्वारे प्राप्त करावे लागते.
जेव्हा श्रीधर वेंबु अणि त्यांच्या भावाने व्यवसायाची सुरुवात केली होती तेव्हा त्यांचा पहिला प्लॅन होता हार्डवेअर तयार करण्याचा.
श्रीधर वेंबु यांनी असे ठरवले होते की अशा प्रकारचे मशिन तयार करायचे जे आपल्याला सेल करता येईल.पण श्रीधर वेंबु यांनी बचत केलेले सर्व पैसे मशिन तयार करण्यातच खर्च झाले.
मग अशावेळी श्रीधर वेंबु यांना प्रश्न पडला आता काय करायचे कारण त्यांच्या काळात स्टार्ट अप व्यवसायासाठी कुठलीही फंडिंग देखील बाजारातुन प्राप्त होत नव्हती.
अणि भारतातुन स्टार्ट अप व्यवसाय सुरू करण्यासाठी फंडिंग प्राप्त होणे खुप अवघड होते म्हणून श्रीधर वेंबु यांनी ठरवले की आपण हार्डवेअर नव्हे तर साॅफ्टवेअर कंपनीची सुरूवात करू कारण तिथे त्यांना गुंतवणूक देखील कमी लागणार होती.
एका छोट्याशा रूममध्ये श्रीधर वेंबु अणि त्यांचे बंधू यांनी कंप्युटर लॅपटॉप हातात घेऊन आपल्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात केली होती.
जेव्हा श्रीधर वेंबु यांनी आपल्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली तेव्हा त्यांना टेक्निकल बाबी तसेच साॅफ्टवेअर आयटी क्षेत्रातील ज्ञान होते पण व्यवसाय क्षेत्रातील कुठलेही ज्ञान त्यांना नव्हते.
एकवेळा श्रीधर वेंबु यांनी ३० हजार डॉलर्सची एक डिल केली होती.श्रीधर वेंबु अणि क्लाईट या दोघांमधील चर्चा अणि करार झाल्यानंतर क्लाईट श्रीधर वेंबु यांना म्हणतात
३० हजार डॉलर्स इतका मोठा व्यवहार करण्या इतपत तुझी क्षमता नाही.
पण तुझे प्रोडक्ट उत्तम होते म्हणून मी तेवढी रक्कम दिली अन्यथा ज्या पद्धतीने तु विक्री करत होता मी किंवा इतर कोणीही कधीच तुझ्याकडुन ते प्रोडक्ट खरेदी करणार नाही.
मग जेव्हा श्रीधर वेंबु यांच्या लक्षात आले की आपल्यामध्ये बाजारात मागणी असलेले व्यवसाय कौशल्य नाहीये.
मग त्यांनी दोन वर्षांच्या कालावधी करीता एका प्रोफेशनल सेल्स पर्सनला हायर केले.मग त्या सेल्स पर्सनसोबत राहुन त्यांनी सेल्स स्कील शिकुन घेतले.
पुढे त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला जर मी सेल्स पर्सनसोबत बाजारात फिरून व्यवसाय कौशल्य शिकत बसलो तर माझ्या गैरहजेरीत माझ्या टीमला कोण व्यवस्थापित करेल.
मग श्रीधर वेंबु यांनी वित्त, व्यवस्थापन करण्यासाठी देखील दोन व्यक्तीची नेमणूक केली.मग प्रत्येक ठिकाणी एक व्यक्तीची नेमणूक केल्यानंतर त्यांनी बाजारात आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार कसा करायचा याकडे लक्ष केंद्रित केले.
श्रीधर वेंबु यांनी एका प्रदर्शनात आपले साॅफ्टवेअर लोकांसमोर सादर केले.मग ते साॅफ्टवेअर खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे जपानी ग्राहकांची गर्दी वाढु लागली.
अणि हे सर्व जापनीज ग्राहक अमेरिकेतील एचपी कंपनीचे प्रतिस्पर्धीं होते.अणि अमेरिकेतील एचपी कंपनी देखील त्याचवेळी बाजारात आपल्या ग्राहकांना खूप उत्तम दर्जाचे साॅफ्टवेअर पुरवत होते.
अणि ते साॅफ्टवेअर खूप उत्तमरीत्या चालत देखील होते.पण ते साॅफ्टवेअर प्रमाणापेक्षा अधिक महाग होते.त्यामुळे सर्वसामान्य गरीब व्यक्तींना ते साॅफ्टवेअर खरेदी करता येत नव्हते.
मग त्यांनी श्रीधर वेंबु यांना विनंती केली की त्यांना तसेच साॅफ्टवेअर कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ शकता का मग श्रीधर वेंबु यांनी असे करण्यास संमती दर्शवली.
मग श्रीधर वेंबु यांनी तसेच साॅफ्टवेअर जापनीज ग्राहकांना कमी किमतीत अणि छोट्या पॅकेज मध्ये उपलब्ध करून दिले. इथुनच श्रीधर वेंबु यांच्या कंपनीच्या बाजारातील प्रगतीला खरया अर्थाने सुरूवात झाली.
इथुनच श्रीधर वेंबु यांना बाजारात त्यांचे प्रतिस्पर्धी कोण आहेत अणि त्यांना आपल्या प्रतिस्पर्धीना मात देण्यासाठी काय करायचे आहे.
श्रीधर वेंबु यांनी ठरवले की जे साॅफ्टवेअर मोठमोठ्या कंपन्या तयार करून मोठ्या लोकांना विकत आहेत तेच साॅफ्टवेअर आपण बाजारातील इतर छोट्या व्यवसायांना कंपन्यांना उपलब्ध करून द्यायचे.
अशाप्रकारे १९९८ मध्ये श्रीधर वेंबु यांना एक मोठी ऑडर प्राप्त झाली. ज्यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू १ मिलियन डॉलर म्हणजे आठ करोड रुपये इतका झाला.
अशा पद्धतीने १९९६ मध्ये कंपनीची सुरूवात केल्यानंतर फक्त दोन वर्षांच्या कालावधीत श्रीधर वेंबु यांच्या कंपनीचा रेव्हेन्यू आठ करोड रुपये इतका झाला होता.
त्याचवेळी बाजारात डाॅट काॅमचा दौरा सुरू होता.बाजारातील प्रत्येक कंपनीला मोठमोठ्या मुल्यांकनात खरेदी केले जात होते.
मग हळूहळू जेव्हा श्रीधर वेंबु यांच्या ॲडवेट नेट ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे मुल्यांकन २ मिलियन डॉलर इतके झाले तेव्हा त्यांच्यासमोर एक प्रस्ताव आला की ते २५ मिलियन डॉलर मध्ये कंपनी विकणार आहे का?
मग श्रीधर वेंबु यांच्या स्टार्ट अप टीमने एकत्रितपणे चर्चा केली अणि सर्वांच्या संगनमताने कंपनी न विकण्याचे ठरविण्यात आले.मग श्रीधर वेंबु यांनी आलेल्या त्या ऑफरला स्पष्टपणे नकार दिला.
यानंतर कुठल्याही गुंतवणूक दाराने त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवण्यात अजिबात रूची दाखवली नाही.
श्रीधर वेंबु अणि त्यांची टीम स्वताच आपल्या उद्योग व्यवसायातुन पैसे कमवत होते अणि व्यवसायातुन जो काही नफा प्राप्त होत असत त्याला पुन्हा व्यवसायात गुंतवत होते.
अणि आज देखील ह्याच स्ट्रॅटेजीचा वापर आपल्या उद्योग व्यवसायात श्रीधर वेंबु अणि त्यांच्या टीमकडून केला जात आहे.
वर्ष २००० पर्यंत त्यांच्याकडे जवळपास ११५ लोकांची टीम देखील बनली होती.अणि कंपनीचा एकुण टर्न ओव्हर देखील १० मिलियन डॉलर पर्यंत पोहोचला होता.
कंपनी समोरची आव्हाणे –
वर्ष 2000 मध्ये डाॅट काॅमची भांडाफोड झाली होती.तसेच नेसडेक जे पाच हजार पाॅईटवर होते.ते काही काळात ११४० वर येऊन ठेपले.
एवढेच नव्हे तर बाजारातील सिस्को,ओरॅकल, ओरिएंटल सारख्या कंपनींचे ८० टक्के इतके शेअर देखील पडले.
अशातच जोहोचे बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत छोटेसे स्टार्ट अप होते.जरी जोहो कंपनी शेअर बाजारात सुचीबदध करण्यात आली नव्हती.
पण ह्या कालावधीत जोहोचे जे काही मुख्य क्लाईट होते त्यातील ८० टक्के क्लाईट एका रात्रीत रस्त्यावर आले.
अशात कंपनीच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले.
कारण बाजारात क्लाईट कडे जी काही उधारी होती ती बुडणार होती नवीन ऑडर क्लाईट कडुन मिळणार नव्हती त्यातच कंपनीत कामाला असलेल्या कर्मचारींचे वेतन देखील कंपनीला द्यायचे होते.
ह्यावेळी श्रीधर वेंबु यांची चतुराई कामी आली.श्रीधर वेंबु हे नेहमी पैशांची बचत करत असत.ते काही ठाराविक रक्कम कुठेही न गुंतवता अडीअडचणी करीता सेव्ह करून ठेवत होते.
मग जोपर्यंत बाजारातील स्थिती नियंत्रणात येऊन कंपनीच्या आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत किमान सहा ते बारा महिने श्रीधर वेंबु यांनी आपल्या बचत केलेल्या पैशांतून कंपनीचा सर्व खर्च मॅनेज केला.
श्रीधर वेंबु यांच्या कंपनीत तब्बल ११५ इंजिनिअर कामाला होते किमान एक वर्ष त्यांचे वेतन श्रीधर वेंबु यांना आपल्या बचत केलेल्या पैशांतून द्यावे लागणार होते.
आजच्या परिस्थितीत जिथे कंपन्या आपल्यावर असा प्रसंग ओढावल्यावर कंपनीवर आर्थिक भार पडु नये म्हणून सर्वप्रथम आपल्या कर्मचारींना कामावरून काढून टाकतात.
पण श्रीधर वेंबु यांनी त्यांच्या कंपनीतील एकाही इंजिनिअरला कामावरून काढले नाही.
मग श्रीधर वेंबु यांनी आपल्या टीमला रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंटच्या कामाला लावले.यात बाजारात कोणती नवीन गोष्ट येऊ शकते तसेच कोणते नवीन प्रोडक्ट बनू शकते.
ह्याच कालावधीत श्रीधर वेंबु अणि त्यांच्या टीमने अशा प्रोडक्टवर रिसर्च केले ज्याची बाजारात उत्तम विक्री सुरू होती त्याच प्रोडक्टला अधिक उत्तम बनविण्यासाठी आपण काय करू शकतो ह्यावर त्यांनी संशोधन केले.
मग आपल्या ई आरपी साॅफ्टवेअर मध्ये परिवर्तन घडवून आणताना श्रीधर वेंबु अणि त्यांच्या टीमने मॅनेज इंजिन नावाचे एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप केले.
आज हे प्रोडक्ट कंपनीला बाजारातुन खूप चांगली कमाई करून देत आहे.
आपल्या ह्या रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट दरम्यान कंपनीने असा देखील विचार केला की आपण क्लाउड सर्विस वर जायला हवे का?ह्याच दरम्यान बाजारात जोहोचा जन्म झाला.
कंपनीने ठरवले की बाजारात आपण एक जोहो नावाचे साॅफ्टवेअर लाॅच करायचे.जोहो मध्ये व्यवसाय संबंधित जेवढेही कार्य आहेत.
उदा एच आर, मॅनेजमेंट,हायरींग, फायनान्स इत्यादी ह्या सर्वांच्या संबंधित ॲप बनवायचे त्याचे सर्वर कंपनीकडे ठेवायचे.ग्राहक त्या ॲपला ऑनलाईन डाऊनलोड करून आपले काम करू शकेल.
इथे देखील कंपनीने तीच गोष्ट केली जी याआधी केली होती.
जसे बाजारातील मोठया कंपन्या इतर मोठ्या कंपनींसाठी साॅफ्टवेअर बनवत होत्या.
तसेच जोहोने देखील बाजारातील इतर छोट्या कंपन्यांसाठी कमी किंमतीत छोट्या पातळीवर साॅफ्टवेअर बनवण्यास सुरुवात केली.ज्यामुळे कंपनीच्या क्लाईट मध्ये देखील भरमसाठ वाढ झाली
आजही ह्या कंपनीचे बाजारातील नाव ॲडवेंट नेट असेच आहे अणि जोहो हे ह्या कंपनीच्या प्रोडक्टचे नाव आहे.
ॲडवेंट नेट ही कंपनी यूएस ए मध्ये रेजिस्टर आहे.
मग श्रीधर वेंबु यांच्या मनात विचार आला की भारतात देखील त्यांची कंपनी रेजिस्टर असणे आवश्यक आहे मग २००९ मध्ये त्यांनी भारतात देखील त्यांच्या कंपनीला रेजिस्टर केले.अणि त्या कंपनीचे नाव जोहो काॅर्पोरेशन असे ठेवले.
भारतात जोहो कंपनीचे रेजिस्ट्रेशन होण्याच्या आधीपासुन युएस ए मध्ये कंपनी उत्तम कामगिरी बजावत होती.
पण भारतात रेजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनी अधिक उत्तम कामगिरी बजावू लागली.
जोहो कंपनी बाजारात आज एवढी यशस्वी का ठरली?
आज जोहो कंपनीच्या काही मुळ संकल्पना आहेत ज्यामुळे बाजारात ती एवढी यशस्वी ठरली आहे.
जोहो कंपनीने जे साॅफ्टवेअर मोठमोठ्या कंपन्या आपल्या क्लाईट करीता तयार करत होत्या तेच साॅफ्टवेअर जोहो कंपनीने बाजारातील आपल्या सर्वसामान्य छोट्या कंपन्यांना ग्राहकांना त्यांना परवडेल अशा किमतीत स्वस्त दरात उपलब्ध करून दिले.
जोहो कंपनीने आपल्या स्टार्ट अप मध्ये क्लासिक जिओ आर्बिटराज प्लेचा वापर केला.
म्हणजे ज्या देशातुन आपल्याला स्वस्त मिळते आहे तिथुन प्रोडक्ट विकत घ्यायचे अणि ज्या देशात महाग विक्री केली जाते तिथे त्यांची विक्री करायची.
साॅफ्टवेअरची सर्वात जास्त महाग विक्री युएस मध्ये होत असत अणि ते साॅफ्टवेअर बनविण्यासाठी सर्वात स्वस्त दरात कर्मचारी हे भारतात उपलब्ध होत होते.
म्हणून जोहोने भारतातील लोकांकडून कमी किंमतीत काम करवून घेतले अणि तेच तयार झालेले प्रोडक्ट युएस ए मध्ये महागात विकण्यास सुरुवात केली.
कारण भारतातील कर्मचारींना काम करण्यासाठी वेतन कमी द्यावे लागत होते,इथे भाडे देखील जास्त लागत नव्हते.
अशा पद्धतीने कंपनीच्या प्रोडक्टची किंमत कमी असल्याने त्यांना आपल्या ग्राहकांना परवडेल अशा स्वस्त दरात प्रोडक्ट उपलब्ध करून देता आले अणि कंपनीला बाजारात आर्थिक दृष्ट्या टिकुन देखील राहता आले.
याचसोबत जोहोकडे भरपूर प्रोडक्ट उपलब्ध आहेत अणि जोहोची टीम दरवर्षी किमान तीन नवीन प्रोडक्ट लाॅच करते.
कंपनीजवळ प्रोडक्ट जास्त असल्याने कंपनीची विक्री अणि कमाई देखील जास्त होते.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जोहोने सर्वप्रथम आपल्या ग्राहकांना आपले साॅफ्टवेअर सुरूवातीच्या एक दोन महिन्यांसाठी फ्री मध्ये उपलब्ध करून दिले.
ज्यांनी ह्या साॅफ्टवेअरचा फ्री मध्ये उपयोग केला त्यांना आपल्या उद्योग व्यवसायात भरपूर फायदा प्राप्त झाला त्यामुळे ते ग्राहक पुढे एक दोन महिन्यांच्या फ्री ट्रायल नंतर देखील जोहोकडुन पेड सर्विस घेऊ लागले.
यामुळे जोहोला बाजारात आपल्या उद्योग व्यवसायाची मार्केटिंग करण्याची आवश्यकताच भासली नाही.जोहो मार्केटिंग मध्ये आपले पैसे खर्च करत नाही.
जोहोचे मत आहे की आमचे प्रोडक्ट उत्तम आहेत ग्राहक त्याचा वापर करतात वापर केल्यानंतर स्वता इतरांसमोर त्याचे कौतुक देखील करतात.
म्हणजे जोहोचा एक ग्राहक दुसरा ग्राहक त्यांच्यासाठी घेऊन येतो.
म्हणून देखील जोहोला आपल्या ग्राहकांमध्ये वाढ करण्यासाठी,आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाही.
जोहोचा सर्व व्यवसाय रेफरल तसेच चॅनल पार्टनर वर चालतो.रेफरल मध्ये एक ग्राहक दुसरा ग्राहक माऊथ पब्लिसिटी द्वारे आणुन देतो.
याचसोबत जोहोने आपल्या ग्राहकांना चॅनल पार्टनर देखील बनवले आहे म्हणजे जो ग्राहक जोहोसाठी ग्राहक घेऊन येईल त्याला जोहोकडुन कमिशन देखील दिले जाते.
जोहो आज बाजारात यशस्वी असण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आज बाजारातील मोठमोठ्या कंपन्या इतर कंपन्यांना महागडे साॅफ्टवेअर विकत आहेत.
पण बाजारातील ज्या इतर छोट्या कंपन्या होत्या त्यांच्यासाठी कोणीही साॅफ्टवेअर बनवायला तयार नव्हते.
कारण त्यांना स्वस्तात परवडेल अशा दरात साॅफ्टवेअर बनवून हवे होते.अणि छोट्या कंपनींसाठी कमी किंमतीत साॅफ्टवेअर तयार करायला बाजारात कोणीही उपलब्ध नव्हते.
जोहोने बाजारातील हाच गॅप लक्षात घेतला अणि तो भरून काढला.ज्यामुळे जोहो आज बाजारात एवढी यशस्वी कंपनी ठरली आहे.
जोहो आपल्या कंपनी मध्ये काम करण्यासाठी कर्मचारींना हायर कुठुन करते? जोहोची कमाई कशी होते?
आज देशातील जेवढेही मोठमोठे काॅलेज आहेत तिथे स्टुडंटला जाॅबसाठी हायर करण्यासाठी देशातील टेक महिंद्रा, इन्फोसिस,गुगल सारख्या मोठमोठ्या कंपन्या जातात.
पण जोहो बाजारातील छोटी कंपनी होती म्हणून जोहो कर्मचारीं प्राप्त करण्यासाठी देशातील मोठ्या काॅलेजात न जाता छोट्या काॅलेजात जात.हया छोट्या काॅलेज मधील हायर केलेल्या स्टुडंटला काहीच जमत नव्हते.
म्हणुन त्यांना सर्व काम सुरूवातीचे काही दिवस जोहोच्या इतर स्टाफला शिकवावे लागत होते.
पुढे जोहोने विचार केला आपल्याला शिकवायचेच आहे तर काॅलेज मधील विद्यार्थ्यांना का शिकवायचे?
म्हणून त्यांनी डायरेक्ट १० वी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरूवात केली.
मग जोहोने भारतातील गुरूकुल मेथडचा वापर केला.ज्या विद्यार्थ्यांला जी गोष्ट शिकवायची आहे त्याच क्षेत्रात शिक्षण देखील द्यायचे असे ठरवले.
जोहोने दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी पुढे डिप्लोमा कोर्स उपलब्ध करून दिला.
वर्ष २००४ मध्ये जोहोने सहा विद्यार्थी अणि दोन प्रोफेसरां समवेत जोहो विद्यापीठाची स्थापना केली.यात जेवढयाही विद्यार्थ्यांना हायर केले जाते.त्यांना इंग्लिश बोलायला शिकवले जाते.
वेगवेगळ्या साॅफ्टवेअर स्कील शिकविण्यात येतात.तसेच इतर सर्व टेक्निकल बाबी देखील शिकविण्यात येतात.अणि मग सहा महिन्यांत त्या विद्यार्थ्याला पुर्ण प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट देखील देण्यात येते.
यानंतर कंपनीला तो विद्यार्थी पुर्णपणे प्रशिक्षित झाला आहे असे वाटले तेव्हा त्या विद्यार्थ्याला जोहोमध्ये कर्मचारी म्हणून हायर केले जाते.
अणि ह्या ट्रेनिंग कालावधी दरम्यान त्या विद्यार्थ्यांकडून एकही रूपया घेतला जात नाही.उलट त्या विद्यार्थ्याला ट्रेनिंग दरम्यान १० हजार रुपये महिना इतका स्टायपॅड कंपनीकडुन दिला जातो.
आता हळुहळु ह्या विद्यापीठात वाढ होत असल्याने एका बॅचला २०० विद्यार्थ्यांना घेण्यात येते.प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून ह्या विद्यापीठात भरपूर प्रोफेसरांना हायर करण्यात आले आहे.
आज जोहोकडे ११ हजार कर्मचारी कामाला आहेत त्यापैकी १५०० कर्मचारी हे जोहो स्कुलमधून प्रशिक्षण प्राप्त करून डायरेक्ट आले आहेत.
जोहो मध्ये इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या १५ टक्के इंजिनिअरकडे कुठलीही औपचारिक डिग्री नाहीये.
दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कोडिंग शिकली अणि जोहोमध्ये कामाला लागले आहेत.
मिटिंग मध्ये जास्त वेळ वाया जातो म्हणून जोहोमध्ये कुठलीही मीटिंग ठेवण्यात येत नाही.आवश्यकता असल्यास महिन्यातुन एक वेळा मिटिंग घेतली जाते.त्यातच कोणाला काही चर्चा करायची असेल प्रश्न विचारायचे असतील ते विचारले जातात.
जोहोमध्ये काम करत असलेल्या कर्मचारींना अनेक मोठमोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जोहोने आपल्या कार्यालयानजीक प्ले ग्राउंडची तसेच लॅबची सोय देखील केली आहे.एवढेच नव्हे तर कर्मचारींना मोफत जेवणासाठी फ्री कॅन्टीनची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जेव्हा देशात कोरोना महामारीने प्रवेश केला होता तेव्हा जोहोने आपल्या एकाही कर्मचारीला कामावरून काढून टाकले नाही उलट त्यांच्या खाण्या पिण्याची विशेष व्यवस्था केली होती.
जोहो मध्ये काम करत असलेल्या सर्व कर्मचारींना मोफत जेवण,मोफत प्रवास,मोफत वैद्यकीय तपासणी ह्या महत्वाच्या आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यात येतात.
याचमुळे जोहो मध्ये नोकरी सोडून जात असलेल्या कर्मचारींचे प्रमाण फक्त ७ टक्के आहे.
जोहो कंपनीला सर्वात जास्त रेव्हेन्यू युएस ए मधुन प्राप्त होतो.भारतामधून जोहोला फक्त १० ते १५ टक्के इतकाच रेव्हेन्यू प्राप्त होतो.
भारतातील आपला रेव्हेन्यू ३० टक्के पर्यंत घेऊन जाणे हे जोहोचे पहिले उद्दिष्ट आहे.
याचसोबत जोहोला देशात विशेषतः ग्रामीण भागातील तरूणांसाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे.
याकरिता जोहो ग्रामीण भागात एक जागा घेते अणि तिथेच आपले केंद्र सुरू करून तेथील ग्रामीण भागातील तरूणांना जाॅबसाठी हायर करते.
जोहोचे ग्रामीण भागात दोन मुख्य कार्यालय आहेत.एक कार्यालय तामिळनाडू मधील तनकासी येथे आहे अणि दुसरे आंध्र प्रदेश मधील रेनीगुंता ह्या ठिकाणी आहे.तिथे ५०० पेक्षा जास्त कर्मचारी एकत्रितपणे काम करत आहेत.