Blog

ताजमहाल पॅलेस हॉटेलची यशोगाथा Taj mahal palace hotel success story in Marathi 

ताजमहाल पॅलेस हॉटेलची यशोगाथा Taj mahal palace hotel success story in Marathi 

मुंबई मधील ताजमहल पॅलेस हाॅटेल हे आज विलासिनता,भव्यता,सौंदर्य अणि देशभक्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते.

आज सर्वसामान्य गरीब,मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा आहे की त्याला ताजमहाल हॉटेल मध्ये किमान एक रात्र मुक्काम करायचा आहे.अणि तेथील चहा,काॅफी तसेच महागड्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा.

१६ डिसेंबर १९०३ मध्ये म्हणजेच गेट वे आॅफ इंडियाची निर्मिती होण्याच्या २१ वर्षापुर्वी टाटा गृपचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी मुंबई येथे ताजमहल पॅलेस हाॅटेलची स्थापणा केली होती.

आजच्या लेखामध्ये आपण मायानगरी म्हणून ओळखले जाणारया मुंबई मधील ताजमहल पॅलेस हाॅटेलच्या यशोगाथेविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

ताजमहल पॅलेस हाॅटेल जगातील सर्वात मोठे हाॅटेल ब्रँड कसे बनले? 

१८९६ मध्ये सिनेमाचे जनक असलेल्या लुमायस ब्रदर्स यांनी यांनी त्यांच्या पहिल्या मुव्हीचा शो मुंबई मधील एका वाॅटसन नावाच्या एका आलिशान हॉटेलात आयोजित केला होता.

ह्या मुव्हीचा शो बघण्यासाठी वाॅटसन हाॅटेलात प्रवेश करण्याची फक्त गोरे लोकांना म्हणजे ब्रिटीश लोकांना संमती होती

त्यावेळी मुंबई मधील सर्व मोठमोठ्या हाॅटेलच्या बाहेर एक फलक लावले जात असे ज्यावर लिहिलेले असायचे की कुत्र्यांना अणि भारतीयांना आत प्रवेश करण्यास मनाई आहे.

एकेदिवशी ७ जुलै १८९६ मध्ये टाटा गृपचे संस्थापक जमशेटजी टाटा हे मुव्हीचा शो बघण्यासाठी वाॅटसन हाॅटेलात जातात.

पण हाॅटेलच्या मॅनेजरने त्यांना आत प्रवेश करण्यास मनाई केली.अणि हाॅटेलच्या बाहेर लावलेल्या फलकाकडे बोट दाखवत म्हटले की इथे भारतीयांना अणि कुत्र्यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.

ह्या घटनेमुळे जमशेटजी टाटा खुप दुखी झाले.जमशेटजी टाटा यांच्या मते ब्रिटीशांकडुन हा फक्त एकटा त्यांचा अपमान करण्यात आला नाहीये तर संपूर्ण भारत देशाचा अपमान करण्यात आला आहे.

जमशेटजी टाटा यांनी ठरवले की आपण असे हाॅटेल बनवायचे जिथे भारतातीलच नव्हे तर संपुर्ण जगभरातील लोक जेवणासाठी मुक्कामासाठी येतील.

मग ब्रिटीशांनी आपल्या देशाचा केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ह्या घटनेच्या फक्त दोन वर्षांनंतरच जमशेटजी टाटा यांनी वाॅटसन हाॅटेलला देखील पिछाडीवर टाकेल अशा एका आलिशान हॉटेलची मुंबई मध्ये सुरूवात केली.

ह्या हाॅटेलला जमशेटजी टाटा यांनी ताजमहल पॅलेस हाॅटेल असे नाव दिले होते.

ताजमहल पॅलेस हाॅटेल हे भारतातील पहिले असे अलिशान हाॅटेल होते ज्यात ग्राहकांसाठी विजेची सोय करण्यात आली होती.हया हाॅटेलात अमेरिकन फॅन देखील बसवण्यात आले होते.

एवढेच नव्हे तर ताजमहल पॅलेस हाॅटेल मध्ये जर्मन एलिवेटर देखील बसविण्यात आले होते.ताजमहल पॅलेस हाॅटेल मध्ये उभ्या केलेल्या स्तंभाकरीता स्टीलची खरेदी जमशेटजी टाटा यांनी पॅरेस येथुन केली होती.

त्यावेळी जमशेटजी टाटा यांना ताजमहल पॅलेस हाॅटेल बांधण्यासाठी एक लाख क्युरो म्हणजे दीड हजार करोड इतकी रक्कम मोजावी लागली होती.

१६ डिसेंबर १९०३ मध्ये ताजमहल पॅलेस हे देशातील सुंदर अणि अलिशान हाॅटेल बनले.त्यावेळी ताजमहल पॅलेस हाॅटेलच्या बाहेर जमशेटजी टाटा यांनी एक फलक लावले होते.

ताजमहल पॅलेस हाॅटेल मध्ये ब्रिटीश लोकांना अणि मांजरांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आहे.

११७ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ह्या मुंबई मधील अलिशान हाॅटेलात हाॅटेलात मुक्कामासाठी थांबलेल्या ग्राहकांसाठी ५६० पेक्षा अलिशान खोल्या अणि ४४ पेक्षा अधिक स्वीटस उपलब्ध आहेत.

१९०३ मध्ये ताजमहल पॅलेस हाॅटेल मध्ये एक रात्र मुक्काम करण्यासाठी लोकांना फक्त १३ रूपये द्यावे लागत होते.पण आज ह्या हाॅटेलात एक दिवस मुक्काम करण्यासाठी २५ हजार ते एक दीड लाखांपर्यंतची रक्कम देखील आपणास मोजावी लागते. 

ताजमहल हे भारतातील पहिले असे हाॅटेल होते ज्यात डिस्कोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.याचसोबत हे मुंबई मधील पहिले हाॅटेल होते ज्यात बिअर बार देखील होते.

ताजमहल पॅलेस हाॅटेल ही आपल्या भारत देशातील पहिली इमारत आहे जिने आपल्या आर्किटेक्चरल डिझाईनचा बौद्धिक संपदा हक्क प्राप्त केलेला आहे.

ताजमहल पॅलेस हाॅटेलच्या आज जगभरात १०० पेक्षा अधिक शाखा असल्याचे आपणास पाहायला मिळते.त्यातील ८४ शाखा आपल्या भारत देशात आहेत.

आज ताजमहल पॅलेस हाॅटेलच्या १६ शाखा मलेशिया,भुतान, मालदीव, नेपाल,दक्षिण आफ्रिका, श्रीलंका,युएई,युके,युएस ए,झांबिया इत्यादी ठिकाणी आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ताजमहल हाॅटेलचे रूपांतर ६०० बेड असलेल्या एका हाॅस्पिटल मध्ये करण्यात आले होते.

२००८ मध्ये मुंबई वर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात दहशतवादींने हाॅटेलला आग लावत तोडफोड करत ताजमहल हाॅटेलचे खुप जास्त आर्थिक नुकसान केले होते.

पण आपल्या भारत देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे ताजमहल पॅलेस हाॅटेल पुन्हा नव्याने उभे करण्यात आले होते.

आज मुंबईत गेल्यावर ताजमहल पॅलेस हाॅटेलकडे बघताना देशातील प्रत्येक व्यक्तीला जमशेदजी टाटा यांच्या देशभक्तीचा अभिमान वाटतो.ज्यांनी आज मुंबई शहराला देशाचे स्वाभिमानाचे प्रतीक ताजमहल हाॅटेल उपलब्ध करून दिले.

जमशेटजी टाटा यांना जेव्हा वाॅटसन हाॅटेलात प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली तेव्हा त्यावेळचे खुप मोठे व्यावसायिक होते.त्यावेळी त्यांनी विजेची, प्रकाशाची क्रांती घडवून आणली जागोजागी पाण्याचे डॅम बांधले अशी अनेक कामे ते करत होते.

पण जमशेटजी टाटा यांचे मत होते की एक भारतीय व्यक्ती म्हणून आपण आपली प्रतिष्ठा तसेच सम्मान मजबुत करणे आवश्यक आहे.

म्हणून त्यांनी मनाशी निर्धार केला की मुंबई मध्ये असे एक हाॅटेल बांधायचे ज्याची बरोबरी जगातील कुठलेही हाॅटेल आज करू शकणार नाही.

ताजमहल पॅलेस हाॅटेल बांधण्यासाठी जमशेटजी टाटा यांना तब्बल अकरा वर्षे इतका कालावधी लागला होता.जमशेटजी टाटा यांनी जेव्हा ताजमहल हाॅटेल बांधण्याचा निर्णय घेतला.

ताजमहल पॅलेस बांधण्यासाठी त्यांना कोटी रुपये खर्च करावे लागले.

तेव्हा त्यांना त्यांच्या निर्णयाला घरच्यांकडून भावंडांकडुन देखील विरोध करण्यात आला होता.पण त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन ताजमहल पॅलेस हाॅटेल बांधले.

अणि आज ते हाॅटेल जगातील सर्वात मोठे हाॅटेल ब्रँड म्हणून ओळखले जाते.

जमशेटजी टाटा यांच्या यशोगाथेमधून आपल्याला ही एक गोष्ट शिकायला मिळते की कधी कधी बदल्याच्या वचपा काढण्याच्या नादात देखील आपण मोठी क्रांती घडवून आणतो.

आज जमशेटजी टाटा यांनी बांधलेल्या भारताची शान असलेल्या ताज हॉटेल मध्ये जगभरातील मोठमोठे श्रीमंत लोक ब्रिटीश व्यक्ती देखील जेवणासाठी मुक्कामासाठी येतात.

ज्या ब्रिटीशांनी जमशेटजी टाटा यांना आपल्या हाॅटेलात प्रवेश करण्यास मनाई केली होती आज तेच ब्रिटीश व्यक्ती आज भारतात आल्यावर सर्वप्रथम ताज हॉटेल मध्ये राहण्या खाण्यासाठी तसेच मुक्कामासाठी जाणे अधिक पसंद करतात.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button