हयुंदाई कंपनीची यशोगाथा Hyundai company success story in Marathi
![Hyundai company](https://deshanews.com/wp-content/uploads/2024/12/Hyundai-company-780x470.jpg)
हयुंदाई कंपनीची यशोगाथा Hyundai company success story in Marathi
हयुंदाई ही मारूती सिझुकी नंतर भारतातील सर्वात जास्त कारची विक्री करणारी कंपनी आहे.हयुंदाई ह्या कंपनीची सुरूवात चुंग जु युंग नावाच्या एका गरीब साऊथ कोरियन मुलाने केली होती.
चुंग जु युंग यांची घरची परिस्थिती गरीबीची होती म्हणून लहानपणी फक्त दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून त्यांना सतरा ते अठरा तास शेतामध्ये काम करावे लागत होते.
आपले श्रीमंत बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येकदा चुंग जु युंग घर सोडून पळुन देखील गेले.
एवढेच नव्हे तर चुंग जु युंग यांचे उद्योग व्यवसाय कित्येकदा कंपनीला आग लावल्याने पुर आल्याने तसेच युद्धामुळे बंद देखील पडले होते.
तरी देखील चुंग जु युंग यांनी खचुन जाऊन हार न मानता जगातील सर्वात मोठ्या कार कंपनींपैकी एक मानल्या जाणाऱ्या ह्युंदाई ह्या कंपनीची सुरूवात केली.
चुंग जु युंग यांचा जन्म १९१५ मध्ये एका गरीब कोरियन कुटुंबांमध्ये झाला होता.चुंग जु युंग यांचे वडील शेतकरी होते.
चुंग जु युंगचे वडील त्यांच्या सातही मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर शेतात मोलमजुरी करायचे.चुंग जु युंग ह्यांना उच्च शिक्षण घेऊन एक शिक्षक बनायचे होते.
पण त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने कित्येकदा त्यांना उपाशीच झोपावे लागत असे.अशातच उच्च शिक्षण घेणे त्यांच्यासाठी खुप अवघड बाब होती.
घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे कमविण्यासाठी चुंग जु युंग यांना वडिलांसोबत शेतीमध्ये दिवसभर काम करावे लागत होते.
याचसोबत चुंग जु युंग कधी जनावरांना चारा खाऊ घालण्याचे तसेच लाकुड तोडण्याचे काम देखील करत होते.
जेणेकरून त्यांना शहरात जाऊन लाकुड विकुन दोन पैसे कमवता येतील.
शहरात लाकुड विकण्यासाठी आल्यावर जेव्हा चुंग जु युंग शहरी जीवन बघायचे तेव्हा त्यांना खुपच आश्चर्य वाटायचे तेथील लोकांचे कपडे एकदम स्वच्छ धुतलेले असायचे.राहणीमान एकदम उच्च दर्जाचे असायचे.
अणि शहरात खाण्या पिण्याच्या वस्तुंची कुठलीही कमतरता नव्हती.एकापेक्षा एक उत्तम खाद्यपदार्थ शहरात मिळत होते.
हे सर्व बघुन चुंग जु युंग यांच्या मनात विचार आला की आपण देखील शहरात गेलो तर आपल्याला देखील शहरातील इतर लोकांप्रमाणे चांगले जीवन जगता येईल.
पण समस्या अशी होती की चुंग जु युंग हे फक्त सोळा वर्षांचे होते त्यामुळे एवढ्या लहान वयात त्यांचे आई वडिल त्यांना शहरात एकटे जाण्याची परवानगी देत नव्हते.
एकेदिवशी चुंग जु युंग यांच्या हातात एक वर्तमानपत्र आले ज्यात जाहीरातीत असे दिले होते की जवळील शहरात एक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू आहे अणि अणि त्या प्रोजेक्ट वर काम करण्यासाठी काही कामगारांची आवश्यकता आहे.
चुंग जु युंग यांना माहीत होते त्यांचे आईवडील त्यांना शहरात काम करण्यासाठी जाऊ देणार नाही.यामुळे १९३२ मध्ये घरात कोणालाही न सांगता चुंग जु युंग घरातुन शहरात पळुन गेले.
यानंतर चुंग जु युंग नोन नावाच्या शहरात गेले तिथे त्यांना कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टवर मजदुर म्हणून काम करण्यासाठी ठेवण्यात आले.
चुंग जु युंग ज्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टवर काम करत होते तेथील काम खुप अवघड होते अणि त्यातुन मिळणारे पैसे देखील खुपच कमी होते.
तरी देखील चुंग जु युंग यांनी ते काम केले कारण त्यांच्या मनात एका गोष्टीचे समाधान देखील होते की पहिल्यांदा ते स्वताच्या बळावर काम करून पैसे कमवत आहेत.
पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण त्यांनी घर सोडुन शहरात पळुन आल्यावर त्यांचे आईवडील शहरात जागोजागी त्यांचा शोध घेऊ लागले होते.
अणि मग दोन महिने जागोजागी शोधाशोध केल्यावर चुंग जु युंग त्यांच्या आईवडिलांना अखेरीस सापडले.
मग आईवडीलांनी त्यांना समजावून तसेच प्रसंगी रागावून कसे बसे घरी नेले.घरी आल्यावर चुंग जु युंग पुन्हा तेच रोजचे काम शेतात मोलमजुरी करणे,जनावरांना चारा खाऊ घालणे लाकुड तोडुन शहरात विकायला जाणे करू लागले.
पण ह्या कामांमध्ये त्यांचे मन अजिबात लागत नव्हते त्यांचे मन त्याच शहरातील कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू असलेल्या साईटवर फिरत होते.जिथुन त्यांचे आईवडील त्यांना घेऊन आले होते.
चुंग जु युंग शेतात काम करत असताना नेहमी कन्स्ट्रक्शन साईटवर व्यतीत केलेले क्षण आठवत असत.यामुळे कालांतराने कन्स्ट्रक्शन तसेच त्यासारख्या प्रोजेक्ट विषयी त्यांच्या मनात ओढ निर्माण होऊ लागली.
चुंग जु युंग यांचे घरी आल्याने त्यांचे आईवडील भावंड खुप आनंदी होते पण चुंग जु युंग यांचे तिथे मन लागत नव्हते.त्यांचा तिथे जीव गुदमरू लागला होता.जणु शहर त्यांना आपल्याकडे बोलवत होते.
त्यामुळे एकेदिवशी चुंग जु युंग हे पुन्हा घर सोडून शहरात निघुन गेले.पण काही दिवस शहरात काम केल्यावर आईवडिलांना त्यांचा तपास लागल्यावर ते पुन्हा त्यांना परत घरी घेऊन जात होते.
अशा प्रकारे ईच्छा नसताना देखील चुंग जु युंग यांना पुन्हा घरी वापस जावे लागत होते.
यानंतर चुंग जु युंग पुन्हा एकदा हिंमत करतात अणि अठरा वर्षाचे असताना चौथ्यांदा घर सोडून साउथ कोरीयाची राजधानी असलेल्या सियोल ह्या ठिकाणी पळुन गेले.
सियोल इथे आल्यावर पहिल्यांदा चुंग जु युंग याने एक मजदुर म्हणून काम केले.पण काही दिवसांनी त्यांना एका कारखान्यात असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली.
मग कारखान्यात काम करत असताना चुंग जु युंग यांना बोक्युंग राईस नावाच्या एका तांदळाच्या स्टोअर मध्ये चांगल्या पगाराची डिलेव्हरी बाॅय म्हणून नोकरी प्राप्त होते.
इथूनच चुंग जु युंग यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास सुरूवात झाली.चुंग जु युंग आपल्या कामाचा पुरेपूर आनंद घेत होते.
अणि पुर्ण मन लावून निष्ठेने प्रामाणिकपणे आपले काम देखील करत होते.चुंग जु युंग यांची कामातील निष्ठा प्रामाणिकपणा बघून स्टोअरचे मालक खुप आनंदी झाले.
अणि फक्त सहा महिन्यातच डिलीव्हरी बाॅयवरून त्यांना शाॅपमध्ये मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
पुढे १९३७ मध्ये शाॅपचे मालिक खुप आजारी पडतात.ते इतके अशक्त झाले की त्यांना शाॅपमध्ये येऊन कामकाजाकडे देखील लक्ष देता येत नव्हते.
तेव्हा त्यांनी त्यांचे राईस स्टोअर चुंग जु युंग यांच्याकडे सोपवले.
अशा प्रकारे फक्त २२ वर्षाचे असताना चुंग जु युंग आपल्या मेहनत अणि प्रामाणिकपणामुळे ज्या राईस स्टोअर मध्ये ते किरकोळ कर्मचारी म्हणून कामाला होते त्याचे मालक बनले.
मग चुंग जु युंग यांनी ह्या स्टोअरचे नाव बदलून क्युंगिल राईस असे ठेवले.
यानंतर चुंग जु युंग यांनी कमी किंमतीत उच्च दर्जाचा माल देणे तसेच मालाची वेळेवर पोहोच करणे ह्या तीन्ही गोष्टींच्या जोरावर बाजारात भरपूर कायमस्वरूपी ग्राहक प्राप्त केले.
पण चुंग जु युंग यांचा उद्योग व्यवसाय उत्तमरीत्या चालत असताना असे काही घडले की त्यांना नाईलाजाने सर्व उद्योग व्यवसाय सोडून पुन्हा आपल्या घरी परतावे लागले.
त्यावेळी कोरिया ह्या देशावर जपानने कब्जा केला होता.अणि जपान दुसरया जागतिक महायुद्धात उतरले होते.
जापनीज सरकारची इच्छा होती की युदधादरम्यान त्यांच्या सैनिकांना वेळेवर त्यांच्या आवश्यकतेनुसार तांदुळ प्राप्त व्हावे.यामुळे त्यांनी कोरिया मधील सर्व राईस स्टोअरला आपल्या ताब्यात घेतले होते.
ज्यात चुंग जु युंग यांच्या राईस स्टोअरचा देखील समावेश होता.
मग चुंग जु युंग एक वर्ष आपल्या गावीच राहीले अणि मग एक वर्षांनंतर १९४० मध्ये एके दिवशी हिंमत केली अणि त्यांनी तीन हजार ओव्हनचे कर्ज घेत त्यांनी स्वताचे ॲडो सर्विस नावाचे एक गॅरेज सुरू केले.
पण इथे देखील चुंग जु युंग यांच्या नशिबाने त्या़ंच्यासोबत खेळ केला.अणि एक महिन्यातच त्यांच्या गॅरेजमध्ये भयंकर आग लागली अणि त्यात त्यांचे सर्व गॅरेज जळुन खाक झाले.
आता चुंग जु युंग यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता की गॅरेज सुरू करण्यासाठी आपण बॅकेकडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची?
अणि गॅरेज मध्ये आग लागल्याने जळुन खाक झालेल्या ग्राहकांच्या गाड्यांच्या पैशाची भरपाई कशी करायची?
अणि मग खुप विचारविनिमय केल्यावर चुंग जु युंग यांनी पुन्हा ३५०० ओहनचे कर्ज घेतात.अणि आधीपेक्षा जास्त मोठे गॅरेज सुरू करतात.
चुंग जु युंग हे खुप मेहनती होते ज्यामुळे त्यांचे काम ग्राहकांना अधिक पसंत आले.ज्यामुळे तीन वर्षांतच त्यांनी आपल्या गॅरज मधुन एवढा नफा प्राप्त केला की त्यांनी सर्व कर्ज फेडुन टाकले.
अणि घरच्यांना त्यांच्यासोबत राहण्यासाठी शहरात घेऊन आले.
चुंग जु युंग यांचा गॅरेजचा व्यवसाय इतका जोरात सुरू होता की त्यांच्या गॅरेजमध्ये ८० कर्मचारी कामाला देखील होतें.
पण त्यांचा हा सुखाचा काळ जास्त वेळ टिकला नाही.
जापनीज सरकारने युद्धात वापरल्या जात असलेल्या साधनांची निर्मिती करण्यासाठी त्यांच्या गॅरेजला एका स्टील प्लांट सोबत मर्ज केले.
यामुळे चुंग जु युंग यांनी जिथुन सुरूवात केली होती पुन्हा एकदा ते तिथेच येऊन ठेपले.
एकीकडे चुंग जु युंग यांना एकीकडे गॅरेज हातातुन जाण्याचे दुख होतेच शिवाय सियोल येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे चुंघ जु युंग आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन घरी परतले
चुंग जु युंग यांनी ५० हजार ओहनची बचत केलेली होती म्हणून त्यांच्या मध्ये पुन्हा आपला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची हिंमत होती.पण ते युद्ध संपण्याची वाट पाहत होते.
मग १९४६ मध्ये दुसरे महायुद्ध संपले अणि कोरिया जपानच्या ताब्यातुन स्वतंत्र झाला.त्याच वर्षी चुंग जु युंग हे सियोल येथे परतले.
अणि पुन्हा स्वताचे एक गॅरज सुरू केले ज्याचे नाव त्यांनी ह्युंदाई मोटर सर्व्हिसेस असे ठेवले होते.
जपानला दुसरया महायुद्धात पराभुत केल्यानंतर साऊथ कोरिया मधील यूएसचा प्रभाव अधिक वाढला होता त्यामुळे चुंग जु युंग यांना युएस आर्मीचे ट्रक दुरूस्ती करण्याचे काम मिळाले.
काही काळानंतर चुंग जु युंग यांच्या निदर्शनास आले की अमेरिका त्यांच्या मिलिटरी फोर्स करीता मोठ्या प्रमाणात बिल्डिंग बनवत आहेत.
हे पाहुन चुंग जु युंग यांना त्यांचे कन्स्ट्रक्शन साईटवर काम करण्याचे स्वप्न आठवले.मग त्यांच्यामधील दडलेले कन्स्ट्रक्शनचे जुने पॅशन पुन्हा एकदा जागे झाले.जे बालपणी त्यांना अनुभवायास मिळाले होते.
म्हणून १९४७ मध्ये त्यांनी ह्युंदाई सिव्हील इंडस्ट्रीची सुरूवात केली.अणि छोटमोठया कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचे कंत्राट घेण्यास सुरुवात केली.
काही वर्षातच त्यांनी आपल्या ह्या व्यवसायाला प्रगत स्तरावर नेऊन ठेवले.याचसोबत त्यांना अनेक मोठमोठे प्रोजेक्ट देखील मिळु लागले होते.
पण चुंग जु युंग यांच्या नशिबाने इथे देखील त्यांची जास्तवेळ साथ दिली नाही.१९५० मध्ये साऊथ कोरिया अणि नॉर्थ कोरिया मध्ये युद्ध सुरू झाले.
नॉर्थ कोरियाने साउथ कोरीयावर अधिपत्य स्थापित करण्यास सुरुवात केली अणि त्यांच्या सैन्याने सियोलला आपल्या ताब्यात घेण्यासाठी तिथे घेराबंदी केली.
त्यामुळे तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अणि तेथील सर्व लोकांनी सियोल सोडले.यात चुंग जु युंग हे देखील होते.
मग त्यांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्व उद्योग व्यवसाय तिथेच सोडला अणि बचत केलेले काही पैसे सोबत घेऊन दुसरया शहरात निघुन गेले.
ह्या युद्धात यूएस सैन्य दलाने साऊथ कोरियाची भरपूर साथ दिली.अणि मग युदधादरम्यान चुंग जु युंग यांनी एक गोष्ट नोटीस केली की सैन्य दलाला वेअर हाऊस, आर्मी हेड क्वार्टर अणि टेंटची आवश्यकता आहे.
इथे चुंग जु युंग यांना एक मोठी व्यवसायाची संधी दिसुन आली म्हणून त्यांनी एका छोटासा गृप तयार केला अणि ते ह्या प्रोजेक्ट्सवर देखील काम करू लागले.
चुंग जु युंग यांनी सर्व छोट्या मोठ्या प्रोजेक्टसाठी काम केले.काही प्रोजेक्ट्सवर काम करताना त्यांना मोठ्या नुकसानाला देखील सामोरे जावे लागले.
पण तरी देखील त्यांनी वेळेवर काम पुर्ण करत युएस अधिकारींचे विश्वास जिंकून घेतला.
पुढे १९५२ मध्ये युद्ध संपले पण तोपर्यंत चुंग जु युंग यांनी युए्स अधिकारींसोबत आपले एक घट्ट व्यावसायिक नाते तयार केले होते.
त्यामुळे त्यांना युद्ध संपल्यावर देखील अमेरिका कडुन प्रोजेक्ट मिळत राहीले.
एकीकडे युदधात साऊथ कोरिया पुर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.मुलभुत पायाभूत सुविधांचा पुर्णतः नायनाट झाला होता.यामुळे सरकारला साऊथ कोरियाची पुनर्बाधणी करायची होती.
साऊथ कोरियाच्या सुधारणा घडवून आणण्यात हयुंदाई इंडस्ट्रीने आपली खुप महत्वाची भुमिका पार पाडली होती.
यात त्यांना अनेक मोठमोठे प्रोजेक्ट प्राप्त झाले होते.
यानंतर १९६० मध्ये कोरियन सरकारने असे एक धोरण आणले ज्यामुळे हयुंदाई इंडस्ट्री कार रिपेअरींग वरून कार मॅन्युफॅक्चरींग कंपनी बनण्यास खूप मदत केली.
कोरियन सरकारने तेथील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी म्हणून एक नियम तयार केला होता कुठलीही फाॅरेन ऑटोमोटिव्ह कंपनीला साउथ कोरीया मध्ये तेव्हाच व्यवसाय करता येईल.
जेव्हा ती कंपनी येथील लोकल कंपनीसोबत टाय अप करेल.यामुळे हयुंदाई कंपनींसाठी एक मोठी संधी निर्माण झाली अणि चुंग जु युंग यांनी देखील मिळालेली ही संधी गमावली नाही.
मग चुंग जु युंग यांनी १९६७ मध्ये ह्युंदाई मोटर गृपची स्थापणा केली.याच्या एक वर्षानंतर १९६८ मध्ये ह्युंदाईने फोर्ड सोबत पार्टनरशिप केली.
अणि उलसान शहरात सहा महिन्याच्या आत एक मोठा ॲसेंबली प्लांट बनवून दिला.जो आज जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल प्लांट म्हणून प्रसिद्ध आहे.याची वार्षिक उत्पादन क्षमता १.६ मिनिट पर युनिट इतकी आहे.
यात जगातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले ७५ हजारपेक्षा अधिक अत्यंत कुशल कर्मचारी कामाला आहेत.