ब्लिंकिंट स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Blinkit success story in Marathi
ब्लिंकिंट स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Blinkit success story in Marathi
ब्लिंकिंट ही स्टार्ट अप कंपनी आज झोमॅटो पेक्षा अधिक मोठी झाली असल्याचे आपणास दिसून येते.
वित्तीय सल्लागार कंपनी गोल्ड बर्गसेकने असे सांगितले आहे की येत्या काही वर्षात ब्लिंकिंटचे अंदाजे मुल्यांकन १३ बिलियन डॉलर्स इतके होणार आहे.
एकेकाळी ब्लिंकिंट ही कंपनी बाजारात ग्रोफर्स ह्या नावाने ओळखली जात असे.अणि बाजारात खुप अपयशी ठरलेली कंपनी होती.
पण आज ब्लिंकिंट ३३ ते ३५ टक्के मार्केट शेअर सोबत बाजारात आघाडीवर आहे.फक्त एका वर्षाच्या कालावधीत ब्लिंकिंट २ बिलियन डॉलर्स पासुन १३ बिलियन डॉलर्सची कंपनी बनली.
आजच्या लेखामध्ये आपण हे जाणुन घेणार आहोत की ह्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत ब्लिंकिंटने असे काय केले की आज ब्लिंकिंट इतर प्रति स्पर्धीपेक्षा बाजारात आघाडीवर आहे.
ब्लिंकिंट ही कंपनी १३ अब्जचा ब्रँड कशी बनली?How blinkit become 13 billion brand?
भारतात क्विक काॅमर्सचे मार्केट दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.अणि मागील दोन वर्षात ब्लिंकिंटने स्वताला ह्या मार्केटमध्ये आघाडीवर नेले आहे.
भारतातील क्विक काॅमर्स मार्केट मध्ये ब्लिंकिंट,झेपटो अणि इंस्टा मार्ट तीन मोठे खेळाडु आहेत.पण या तिघांमध्ये आज ब्लिंकिंट बाजारात सर्वात आघाडीवर आहे.
ब्लिंकिंटच्या कथेची सुरुवात २०१३ मध्ये तेव्हा झाली जेव्हा सौरभ कुमार अलविंदर डिंडसा भारतातील बदलत्या मार्केटचे खुप बारकाईने निरीक्षण करत होते.
तेव्हा भारतात इंटरनेटचा वापर वाढलेला होता.लोक टॅक्सी बुक करण्यापासून जेवण आॅडर करणे शाॅपिंग करणे इत्यादी सर्व काही इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने करत होते.
त्याचवेळी ग्रोफर ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात झाली यात लोकांना दैनंदिन जीवनात लागत असलेल्या वस्तु घरबसल्या पोहोचवण्याचे काम ग्रोफर करत होते.
फक्त दोन वर्षांच्या आत २५ पेक्षा अधिक शहरात ३० हजारपेक्षा अधिक आॅडर डिलीव्हर करत ग्रोफर पेपर टॅप,लोकल बनिया,टायनीआॅल सारख्या मोठमोठ्या स्टार्ट अप पेक्षा अधिक प्रगती करू लागले.
पण त्याच दिवसांमध्ये बाजारात सुरू झालेले बिग बास्केट ग्रोफरसाठी एक खूप मोठे आव्हान होते.कारण मार्जिन,अॅवरेज व्हॅल्यू, किंवा प्रोडक्टची संख्या असो सर्वच बाबतीत बिग बास्केट ग्रोफरपेक्षा अधिक पुढे होते.
२०२१ पर्यंत बिग बास्केटची कमाई ग्रोफरपेक्षा तीन पट अधिक झाली होती.२०२० ते २०२१ ह्या कालावधीत जेव्हा लोक कोरोनामुळे घरात बंद होते तेव्हा बिग बास्केटच्या सरासरी आॅडर मुल्यात वाढ होत होती.
पण त्याचवेळी १९ वर्षाचे दोन मुले बाजारात उतरतात अणि त्यांचे झेपटो नावाचे स्टार्ट अप सुरू करतात.झेपटो आॅनलाईन आॅडर केल्यानंतर फक्त दहा मिनिटात ग्राहकाच्या घरी जाऊन आपल्या आॅडर पोहोचवत असे.
यामुळे बाजारात एक नवीन वातावरण तयार झाले.अणि बाजारात क्विक काॅमर्स नावाचे एक नवीन मार्केट तयार झाले होते ज्याचे नेतृत्व झेपटो करत होते.
ग्रोफरसाठी ही बाजारात संपण्याची स्थिती होती कारण ग्रोफर बाजारातील सर्वात जुने खेळाडु होते.तरी देखील आपल्या ग्राहकांना रेग्युलर घरपोच सामान डिलिव्हर करण्यात ते बिग बास्केट पेक्षा पिछाडीवर होते.
दुसरीकडे बाजारात सुरू झालेले टेन मिनिट डिलिव्हरी माॅडरमेबी हे देखील झेपटो अणि स्वीगी पेक्षा पिछाडीवर आले होते.
बाजारातील परिस्थिती बघुन देखील अलविंदर डिंडसा यांनी चिंता न करता बाजारात काही महत्वाचे निर्णय घेतले.त्यांनी ग्रोफरचे बिझनेस माॅडेल बदलुन टाकतात.
जिथे ग्रोफर बिग बास्केटच्या तुलनेत रेग्युलर डिलीव्हरी करण्यात पिछाडीवर होते ते माॅडेल अलविंदर डिंडसा एका रात्रीत बदलुन टाकतात.
अणि जिथे क्विक काॅमर्सच्या एका नवीन मार्केटने बाजारात प्रवेश केला होता तिथे ते प्रवेश करतात.यानंतर कंपनीचे नाव देखील ग्रोफर बदलून ब्लिंकिंट ठेवण्यात येते.
अणि टेन मिनिट डिलिव्हरी करीता अलविंदर डिंडसा यांनी कंपनीला पुन्हा रिब्रॅड केले.यानंतर फक्त सहा महिन्यांनंतर ह्या कंपनीने बाजारातील झोमॅटो अणि ग्रोफरला ४,४४७ करोड मध्ये खरेदी केले.
पण दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ब्लिंकिंट आज बाजारात ३३ टक्के शेअर सोबत मार्केट मध्ये आघाडीवर आहे.
इथे झेपटो,इंस्टा मार्ट,बिग बास्केट ब्लिंकिंट पेक्षा बाजारात खुप पिछाडीवर आहे.एवढेच नव्हे तर सरासरी आॅडर मुल्यात देखील ब्लिंकिंट बाजारात इतर प्रति स्पर्धीपेक्षा पुढे आहे.
ब्लिंकिंट प्रत्येक दिवशी ६ लाखापेक्षा अधिक आॅडर आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.
अशावेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की बाजारातील जी कंपनी एकेकाळी संपण्याच्या मार्गावर होती ती फक्त एक वर्षाच्या कालावधीत बाजारात आघाडीवर कशी आली.
हे समजुन घेण्यासाठी आपण सर्वप्रथम डार्क स्टोअरचे माॅडेल समजून घेणे आवश्यक आहे.
डार्क स्टोअरचे माॅडेल –
समजा एखाद्या ग्राहकाने टेन मिनिट डिलिव्हरी मध्ये एखादी वस्तू आॅडर केली तर एवढ्या कमी वेळात ग्राहकांना घरपोच सेवा प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या घराच्या नजीकच वेअर हाऊस असणे आवश्यक आहे.
म्हणुन सर्व क्विक काॅमर्स कंपन्या कुठल्याही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपले डार्क स्टोअर उभारत असतात.जे २५०० ते ३००० स्वेअर फुटच्या आत असते.
हे डार्क स्टोअर आपल्या जवळील डिपार्टमेंटल स्टोअर सारखेच असते.पण इथे फक्त कर्मचारी अणि सामान असते.
हया सर्व डार्क स्टोअरला असे डिझाईन करण्यात येते की प्रत्येक स्टोअर मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट ठेवता येतील.
उभारण्यात आलेले हे डार्क स्टोअर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असतात.
पण अशा ठिकाणी हे उभारले जातात जिथे त्यांचे भाडे कमी लागत असते.ग्राहकाने आॅनलाईन आॅडर केल्यानंतर ती आॅडर आपल्या शहरातील डार्क स्टोअर पर्यंत जाते अणि मग फक्त दोन मिनिटांच्या आत ती आॅडर पॅक करून तयार केली जाते.
पुढील तीन मिनिटांत डिलिव्हरी मॅन येऊन ती आॅडर घेत असतो अणि दहा मिनिटात ती आॅडर आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतो.
शहरात उभारण्यात आलेले हे डार्क स्टोअर दोन ते किलोमीटर इतक्याच अंतरावर असते ज्यामुळे त्यांना दहा मिनिटांच्या आत ग्राहकांना घरपोच सामानाचे वितरण करता येते.
कुठल्याही क्विक काॅमर्स कंपनीला नफा प्राप्त होण्यासाठी त्यांचे डार्क स्टोअर देखील फायदेशीर असणे आवश्यक असते.
एक डार्क स्टोअर एक आॅडर वितरीत करण्याचे किती कमवतो?
समजा एक डार्क स्टोअर आहे जिथे आपण ३५० रूपयाची एक आॅडर केली.
एफ एमसीजी प्रोडक्ट वर थोडा कमी मार्जिन असतो तो ५ ते १० टक्के दरम्यान असतो.तसेच नाॅन ग्रोसरी वस्तुंवर ५ ते ४० टक्के मार्जिन प्राप्त होतो.
समजा आपण २० टक्के इतका मार्जिन गृहित धरला अणि एखाद्या कस्टमरने ३५० रूपयाची आॅडर केली आहे मग त्या ३५० रूपयात २० टक्केचा मार्जिन ७० रूपये होतो.
तसेच कंपनीचे काही फिक्स किंमती fixed cost असतात ज्या त्यांना पे कराव्या लागतात जसे की जागेचे भाडे लाईटबील,कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारींचे वेतन इत्यादी.
मागील दोन वर्षात ब्लिंकिंटने खुप वेगाने आपल्या सरासरी आॅडर मुल्यात वाढ केली आहे.
२०२२ मध्ये सरासरी आॅडर मुल्य -५५३ रूपये
२०२३ मध्ये सरासरी आॅडर मुल्य – ६३५ रूपये
याचठिकाणी ब्लिंकिंटचे प्रति स्पर्धी झेपटोचे सरासरी आॅडर मुल्य पुढीलप्रमाणे आहे –
२०२२ मध्ये सरासरी आॅडर मुल्य -४००
२०२३ मध्ये सरासरी आॅडर मुल्य – ५००
इंस्टा मार्ट –
२०२२ मध्ये सरासरी आॅडर मुल्य ५०० रूपये
२०२३ मध्ये सरासरी आॅडर मुल्य -५५० रूपये
ब्लिंकिंटचे सरासरी आॅडर मुल्य हे त्यांच्या बाजारातील इतर प्रतिस्पर्धींपेक्षा सर्वात जास्त आहे ही त्यांची सर्वात मोठी नफ्याची बाब आहे.
ब्लिंकिंटने आपल्या सरासरी आॅडर मुल्यात वाढ कशी केली?
ग्रोफरचे नाव बदलुन जेव्हा ब्लिंकिंट ठेवण्यात आले त्याचे रिब्रॅड करण्यात आले तेव्हा त्यांचे प्रारंभिक ग्राहक हे ग्रोफर मधीलच होते.
ग्रोफरचे हे प्रारंभिक ग्राहक ब्लिंकिंटला पुर्ण महिन्याच्या सामानाची आॅडर देत होते.अणि ह्या ग्राहकांचे आॅडर मुल्य आधीपासूनच जास्त होते.
याचठिकाणी ब्लिंकिंटचे बाजारातील इतर प्रतिस्पर्धी झेपटो अणि इंस्टा मार्ट यांना सुरूवातीपासून नवीन ग्राहक जोडायचे होते कारण त्यांच्याकडे कुठलेही प्रारंभिक ग्राहक उपलब्ध नव्हते.
जे ग्राहक झेपटो अणि इंस्टा मार्टच्या वेबसाईटवर अॅपवर वस्तु आॅडर करण्यासाठी येत होते ते डेली प्रोडक्ट फ्रुट, भाज्या,चाॅकलेट,कुकीज कोकोकोला असे पदार्थ ह्या प्लॅटफॉर्मवरून आॅडर करत होते.
ग्राहक आॅडर करत असलेल्या ह्या सर्व वस्तुंचा एक तोटा होता.हे असे अन्नपदार्थ आॅडर केल्यानंतर देखील कित्येक ग्राहक परत करत असत.
किंवा हे खाद्यपदार्थ जास्त कोणी खरेदी न केल्यास हे वाया जात असत.यामुळे होणारे सर्व नुकसान झेपटो अणि इंस्टा मार्ट सारख्या बाजारातील सर्व कंपनींना झेलावे लागत होते.
ब्लिंकिंट कडे एकुण सात हजार प्रकारचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत.हया सर्व प्रोडक्ट मध्ये किराणा माल अणि तसेच नाॅन ग्रोसरी वस्तु देखील ब्लिंकिंट विकत असत.
हया नाॅन ग्रोसरी वस्तुंमध्ये घरगुती आवश्यक वस्तु उपकरणे, ब्युटी प्रोडक्ट देखील समाविष्ट होते.आज ब्लिंकिंट मध्ये कुठलेही घरगुती उपकरण,लहान मुलांच्या खेळण्या इत्यादी घ्यायचे असेल तर ते देखील ग्राहकांना ब्लिंकिंट मध्ये मिळते.
ह्या सर्व प्रकारच्या वस्तू आॅडर केल्यानंतर फक्त दहा मिनिटात ग्राहकाच्या घरी पोहोचवण्याच काम ब्लिंकिंट करत होते.
ब्लिंकिंटला देखील बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यां प्रमाणे फळ भाज्या वाया गेल्याने नुकसानाला सामोरे जावे लागते.पण ब्लिंकिंट स्मार्ट फोन,एअरकुलर इत्यादी सारख्या महागड्या वस्तू देखील विकत होते.
म्हणुन भाजीपाला,फळे पेय पदार्थ ह्या वस्तुंमध्ये जे काही नुकसान ब्लिंकिंटला होत असत ते सर्व त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या महागड्या नाॅन ग्रोसरी वस्तुंमध्ये भरले जात होते.
पण नाॅन ग्रोसरी वस्तु जसे की दैनंदिन जीवनात लागणारी महत्वाची घरगुती उपकरणे,लहान मुलांच्या खेळण्या, साॅफ्ट टाॅय इत्यादी नाॅन ग्रोसरी वस्तुंचा एक तोटा देखील असतो.
जरी घरगुती उपकरणे,लहान मुलांच्या खेळण्या साॅफ्ट टाॅय इत्यादी नाॅन ग्रोसरी वस्तु जेवढा अधिक लाभ प्राप्त करून देत असतात तेवढी अधिक जागा देखील ह्या वस्तुंना ठेवण्यासाठी डार्क स्टोअर मध्ये लागत असते.
अणि ह्या नाॅन ग्रोसरी वस्तु नियमित विकल्या देखील जात नाही फक्त महिन्यातुन चार पाच आॅडर ग्राहकांकडून ह्या नाॅन ग्रोसरी वस्तुंसाठी येत असतात.
कंपनी जर हे नाॅन ग्रोसरी वस्तु एका ठिकाणी स्टोअर करून ठेवत असेल अणि पुर्ण महिन्याभरात ह्या वस्तू फक्त चार पाच वेळा विकल्या जात असतील तर कंपनीला इथे देखील नुकसानाला सामोरे जावे लागते.
पण ह्या समस्येला सोडविण्यासाठी ब्लिंकिंटने आपल्या सर्व डार्क स्टोअरला केंद्रीकृत केले आहे.
समजा एखाद्या परिसरात पाच डार्क स्टोअर आहेत ह्या पाचही डार्क स्टोअर मध्ये किराणा माल सारखाच असेल पण जेवढे उर्वरीत क्षेत्र असेल त्या ठिकाणी घरगुती उपकरणे,लहान मुलांच्या खेळण्या साॅफ्ट टाॅय इत्यादी ठेवण्यात येते.
एखाद्या ग्राहकाने आॅडर केली अणि ती आॅडर दोन डार्क स्टोअर मध्ये आहे तर दोन्ही डार्क स्टोअर मधुन ग्राहकाला आॅडरचे वेगवेगळे वितरण करण्यात येते.
म्हणजे समजा ग्राहकाला एक एल ईडी बल्ब अणि बुदधा शो पीस खरेदी करायचा आहे.
हया दोन्ही आॅडर केलेल्या वस्तु वेगवेगळ्या डार्क स्टोअर मध्ये असतील तर कंपनीकडुन आपल्याला कळविण्यात येईल की पहिली आॅडर दहा मिनिटात अणि दुसरी आॅडर २० मिनिटात घरपोच पोहचवण्यात येईल.
ह्या दोन्ही आॅडर दोन वेगवेगळे डिलिव्हरी मॅन येऊन ग्राहकाला देऊन जातात.इथे ब्लिंकिंट एक केंद्रीकृत प्रणालीचा वापर करत असल्याने एकाच वेळी अनेक प्रोडक्ट ब्लिंकिंटला ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतात.
ब्लिंकिंटची कमाई कशी होते?
कोणतीही क्विक काॅमर्स कंपनी आपला रेव्हेन्यू प्राप्त करण्यासाठी एकुण तीन स्त्रोतांवर अवलंबून असते.
१)जाहीराती मधुन होणारी कमाई –
जेव्हा आपण कुठल्याही क्विक काॅमर्स कंपनीचे अॅप ओपन करतो.तेव्हा टाॅपला जे प्रोडक्ट दिसुन येतात ह्या प्रोडक्ट करीता इतर कंपन्या ह्या क्विक काॅमर्स कंपन्यांना पे करते.
डिसेंबर २०२३ मध्ये ब्लिंकिंटच्या जाहिरातीतील कमाईत २२० टक्के वाढ झालेली आपणास दिसून येते.अणि ही कमाई ३ हजार ५४२ करोड इतकी झाली होती.
ब्लिंकिंटच्या जाहिरातदारांमध्ये देखील १३० टक्के वाढ झाली आहे.अणि आता जाहिरातदार संख्या ५५७ झाली.
बाजारात जेवढ्या क्विक काॅमर्स कंपन्यां आहेत त्यात ब्लिंकिंट जाहीरातीतुन सर्वात जास्त कमाई करणारी कंपनी आहे.
कारण ब्लिंकिंटच्या अॅपवर बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत सर्वात जास्त कॅटॅगरी आहे.याने कुठल्याही ब्रॅडला आपल्या प्रोडक्टला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होते.
याचसोबत ब्लिंकिंट त्यांच्या ग्राहकांना एक नफा उपलब्ध करून देते ब्लिंकिंटच्या अॅपवर जे काही बॅनर आहेत.त्या बॅनरमध्ये बदल करण्याची सवलत देखील ब्लिंकिंट आपल्या ग्राहकांना देते.
याचसोबत ब्लिंकिंट त्यांना विकली रिपोर्ट देखील पाठवत असते.म्हणजे एखाद्या कंपनीने बॅनर लावले आहे तर त्यावर लोकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे किंवा नकारात्मक याचा अहवाल देखील ब्लिंकिंट कंपनीला पाठवते.
याने ब्लिंकिंटला आपल्या ग्राहकांचा प्रतिसाद आपल्याला कसा प्राप्त होतो आहे हे लक्षात येते त्यानुसार ते सातत्याने आपल्या बॅनर मध्ये बदल करत असतात.
यामुळे बाजारातील कंपन्या ब्लिंकिंट सोबत जोडल्या जात आहेत.याचठिकाणी इंस्टा मार्ट अणि झेपटो ह्या कंपन्यांचे टेक प्लॅटफॉर्म एवढे अधिक मजबुत नाहीये त्यांच्याकडे भरपूर जाहिरातदार देखील नाहीयेत.
कारण त्यांच्याकडे ब्लिंकिंट बाजारात ज्या सब कॅटॅगरी देत आहेत त्यासारख्या सब कॅटॅगरी उपलब्ध नाहीयेत म्हणून ब्लिंकिंट बाजारातील इतर क्विक काॅमर्स कंपनींच्या तुलनेत जाहीरातीतुन सर्वात जास्त कमाई करताना दिसुन येते.
२) ब्रॅडपासुन प्राप्त होणारा मार्जिन –
ब्लिंकिंटने आपल्या अॅपवर सर्वात जास्त सब कॅटॅगरी बनवून ठेवलेल्या असल्याने याने प्रत्येक ब्रॅडला आपले प्रोडक्ट बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी सोपे जाते.
अशा पद्धतीने ब्लिंकिंटने हजारो नवीन ब्रॅडला आपल्यासोबत जोडुन घेतले आहे.अणि जिथे नवीन ब्रँडला संधी मिळते तिथुन कमाई अधिक वाढत असते.
३) डिलीव्हरी फी –
प्रत्येक कंपनीकडुन सगळ्यात पहिले ग्राहकाला इथे फ्री डिलीव्हरी दिली जाते मग आपल्या नुकसानाचे व्यवस्थापन केले जाते.
सर्व ब्रँडचे सर्वात जास्त रक्कम फ्री डिलीव्हरी सर्विस देण्यात जात असते.यासाठी प्रत्येक ब्रॅडने आपला एक लाॅयल्टी प्रोग्राम बनवून ठेवलेला आहे.
ह्या लाॅयल्टी प्रोग्राम दवारे आपल्या ग्राहकांना रिपीट कस्टमर बनवण्याचा प्रयत्न कंपनीकडुन केला जातो.यात कंपनीकडुन दोन फायदे ग्राहकांना दिले जातात.
फ्री डिलीव्हरी सर्विस,अणि प्रत्येक आॅडरवर २० ते ३० टक्के सवलत.ग्राहकाला अतिरिक्त सवलत मिळते त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सर्विस घेण्यासाठी येतात.
ह्या सर्व खर्चाला कंपनीला स्वताच्या वैयक्तिक खर्चातुन मॅनेज करावे लागते.त्यामुळे सर्व क्विक काॅमर्स कंपन्यां नेहमी नुकसानात असतात.
पण ब्लिंकिंट असे काही करत नाही ब्लिंकिंटने आपला कोणताही लाॅयल्टी प्रोग्राम बनवलेला नाहीये.ब्लिकिंट सर्व डिलीव्हरी चार्जेस ग्राहकांकडून स्वता घेते.
जेवढ्या रूपयांची आॅडर ग्राहकांकडून केली जाईल तेवढ्या रूपयांचा डिलीव्हरी चार्ज त्याला द्यावा लागतो.
फ्रीज डिलीव्हरी सर्विस देत नसल्याने पैसे वायफळ खर्च होण्याच्या समस्येला ब्लिंकिंटला सामोरे जावे लागत नाही.
ब्लिंकिंट आपल्या ग्राहकांना असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते जिथे ७ हजारपेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत यातील जे प्रोडक्ट ग्राहक आॅडर करतो ते त्याला दहा मिनिटात घरपोच दिले जाते.इथुनच ब्लिंकिंटकडे रिपीट कस्टमर बनतात.
हाच फरक आहे बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यां अणि ब्लिंकिंट मध्ये म्हणून ब्लिंकिंटचा बाजारातील मार्केट शेअर ३३ ते ३५ टक्के इतका आहे.