Blog

पाईन लॅब स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Pine labs Start up business success story in Marathi 

पाईन लॅब स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Pine labs Start up business success story in Marathi 

पाईन लॅब ही एक पेमेंट समाधान प्रदाता कंपनी आहे.बाजारात जेव्हा पेमेंट समाधान प्रदात्यांचे नाव घेतले जाते तेव्हा त्यात सर्वात पहिले पाईन लॅबचे नाव येते.

पाईन लॅब ही एक कंपनी आहे.जिचे बाजारात कार्ड स्वाईप मशीन उपलब्ध आहेत.

जेव्हा आपण एखाद्या शाॅपिंग माॅल वगैरे मध्ये कपडे वगैरेची शाॅपिंग करण्यासाठी जातो.तेव्हा शाॅपिंग केल्यानंतर ज्या मशिनवर आपण कार्ड स्वाईप करून ऑनलाईन आपले पेमेंट करत असतो.

त्यापैकी अधिकतम मशिन हे पाईन लॅब ह्या कंपनीची असतात.पाईन लॅब ही पेमेंट प्रदाता कंपनींमध्ये मार्केट लिडिंग पोझिशन मध्ये आहे.

पाईन लॅब ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात १९९८ मध्ये करण्यात आली होती.पाईन लॅब ह्या कंपनीची सुरूवात तीन मित्रांनी मिळून केली होती.

पाईन लॅब ह्या स्टार्ट अप व्यवसायाचा सुरूवात एक छोट्याशा आयडीया सोबत करण्यात आली होती.

बाजारातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना पेमेंट समाधान प्रदान करण्यासाठी पाईन लॅब ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात करण्यात आली होती.

आज पाईन लॅबवर जवळपास दीड लाखापेक्षा जास्त व्यावसायिक हे ऑन बोर्डेड आहेत.अणि पाईन लॅब हे एशियातील एकमेव अणि सर्वात मोठी पेमेंट सेवा प्रदाता कंपनी म्हणून ओळखली जाते.

पाईन लॅब ह्या कंपनीचे एकुण बाजार मुल्यांकन ५ बिलियन डॉलर्स पेक्षा अधिक आहे.

पाईन लॅबचे मिनी प्रोडक्ट –

पाईन लॅब हे भारतातील एक प्रमुख फिनटेक स्टार्ट अप आहे.ज्याने भारतामध्ये मिनी नावाचे एक प्रोडक्ट लाॅच केले आहे.

मिनी हे पाईन लॅबने डेव्हलप केलेले एक इनोव्हेटिव्ह पेमेंट डिव्हाईस आहे.हे बाजारातील जेवढेही छोटे उद्योजक व्यावसायिक आहेत त्यांना मदत करते.

पाईन लॅबचे मिनी नावाचे हे डिव्हाईस बाजारातील व्यावसायिक उद्योजक यांना विश्वास देते की जेवढयाही त्यांच्या पीओ एस सर्विसेस आहेत त्यावरील चार्जेस हे कमी करते.

भलेही मग व्यावसायिक क्यु आर कोड स्कॅन करून आपले पेमेंट करत असतील किंवा मशिनवर कार्ड स्वाईप करून आपले पेमेंट करत असतील.

पाईन लॅबचे हे डिव्हाईस पेटीअम फोन पे मधील पीओएस सर्विसेस प्रमाणे कार्य करते.

इथे व्यावसायिकांना क्यु आर कोडची सुविधा देखील प्राप्त होते जिथे उद्योजक,व्यावसायिक स्कॅन करून युपीआय दवारे देखील आपले पेमेंट करू शकतात.किंवा युपीआय दवारे देखील पेमेंट करता येते.

याचसोबत मिनी मध्ये आपल्याला आपल्या क्यु आर कोडला कस्टमाईज देखील करता येते.इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने पेमेंट घ्यायचे असेल.किंवा दोन पेमेंट मध्ये फरक जाणुन घ्यायचा असेल 

तर इथे आपल्याला आपला क्यु आर कोड कस्टमाईज करण्यासाठी तसेच पेमेंट प्राप्त करण्यासाठी एक किपॅड उपलब्ध करून देण्यात आला आहे.

याचसोबत पेमेंट करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक स्पीकर नोटिफिकेशन देखील प्राप्त होते.

आपल्याला सर्वांनाच माहित आहे की पेटीअम फोन पेचे असे पीओएस डिव्हाईस बाजारातील व्यावसायिक पेमेंट करण्यासाठी नियमित वापरतात.मग बाजारात असे नवीन डिव्हाईस का गरजेचे आहे?हा प्रश्न देखील आपल्यापैकी अनेकांना पडतो.

पाईन लॅब आपल्या ग्राहकांना कमी चार्जेस मध्ये ट्रान्झॅक्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.आज भारतात प्रत्येक व्यावसायिकाला ट्रान्झॅक्शन करीता ३ ते ४ टक्के इतके चार्जेस आकारण्यात येतात.

बाजारातील ह्याच समस्येला दूर करण्यासाठी पाईन लॅब कंपनीने बाजारात आपले एक डिव्हाईस लाॅच केले आहे.

जेणेकरून खूप कमी ट्रान्झॅक्शन किंमतीत व्यावसायिकांना ट्रान्झॅक्शन करता येईल.

अणि सर्व व्यावसायिकांना एकाच डिव्हाईस मध्ये क्यु आर अणि स्वाईप ह्या दोन्ही सुविधा देखील उपलब्ध होतील.

युपीआय आल्यानंतर क्यु आर कोड स्कॅन करणे खूप सोपे झाले आहे.पण बाजारात असे देखील लोक आहेत जे आज देखील पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात कारण त्यांना पाॅईंट जमवायचे असतात.

बाजारातील अशा व्यक्तींना आपले हे टु इन वन सोल्युशन उपलब्ध करून देत मार्केटवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पाईन लॅब करत आहे.

तसे पाहायला गेले तर पाईन लॅबचे पीओएस डिव्हाईस क्षेत्रात आधीपासूनच एक मोठे नेटवर्क आहे.आतापर्यत पाईन लॅबने भारतात १० लाखापेक्षा जास्त डिव्हाईसची विक्री करण्यात यश प्राप्त केले आहे.

पाईन लॅबचे मिनी डिव्हाईस नक्कीच भविष्यात बाजारात जास्तीत जास्त आपले वर्चस्व प्रस्थापित करून फोन पे पेटीअम सारख्या कंपनींना देखील मोठी टक्कर देऊ शकते.

भारतातील फिनटेक इको सिस्टम मध्ये सुधारणा घडवून आणण्यात पाईन लॅब आपले प्रमुख योगदान दिले आहे.

भारतातील फिनटेक इको सिस्टम मध्ये खुप मोठे परिवर्तन पाईन लॅबने केले आहे.

पाईन लॅब कंपनीची सुरूवात कशी झाली?

१९९८ मध्ये लोफिर कपुर यांनी पाईन लॅब ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली होती.

जेव्हा पाईन लॅबची सुरूवात झाली तेव्हा प्रारंभी पॅन लॅब कंपनीने लाॅयल्टी प्रोग्राम अणि कार्ड सोल्युशन प्रदान करत होते.

तेव्हा पाईन लॅब प्रयत्न करत होते की रिटेलर्स अणि डिजीटल एमरजिंग टेक्नॉलॉजी यादोघांमधील जो काही गॅप आहे तो भरून निघावा.

जेव्हा भारतातील डिजीटल इको सिस्टम तयार होताना दिसत होते तेव्हा पाईन लॅबला एक मोठी संधी दिसुन आली.

भारतातील जेवढयाही पेमेंटविषयक पायाभूत सुविधा होत्या त्यावर भारतात काम केले जात होते.मग पाईन लॅबने आपले पुर्ण लक्ष तिथे केंद्रीत केले.

अणि बाजारातील छोटे उद्योजक व्यावसायिक यांना पेमेंट सर्विस देण्यावर अधिक भर दिला.आज पीओएस सोल्युशन प्रदाता कंपनी म्हणून पाईन लॅबचे खुप मोठे नाव आहे.

आज ग्राहक पाईन लॅबच्या डिव्हाईसचा वापर करून युपीआय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादी कुठल्याही पद्धतीने पेमेंट करू शकतात.

अणि रिटेलर अणि ग्राहक यांच्यामधील एक समस्या होती जिथे दोघांकडे सुट्टे पैसे नसल्याने पैसे वापस करण्यास अडचण येत होती त्यावर देखील इथे आपणास समाधान प्राप्त होते.

कारण इथे आपल्याला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तसेच इतर कुठल्याही डिजीटल वाॅलेटचा वापर करून पेमेंट करता येते.

कारण पाईन लॅब हे बीटुबी सोल्युशन प्रदाता कंपनी आहे.

पाईन लॅबने आपल्या प्रोडक्ट मध्ये सुधारणा घडवून आणण्यावर देखील अधिक काम केले आहे.पाईन लॅबच्या मशिनवर ई एम आय पद्धतीने देखील पेमेंट करता येते.

पाईन लॅब हे बाजारातील पहिले असे प्रोडक्ट आहे ज्याच्या द्वारे खरेदी केल्यास आपल्याला ई एम आय पद्धतीने पेमेंट करता येते.यामुळे सेल्स मध्ये देखील वाढ झाली आहे.

कारण आता आपल्याकडे ही सुविधा उपलब्ध आहे की जर एखादी १० हजाराची वस्तू आपल्याला रोख पैसे भरून खरेदी करता येत नसेल तर आपण ती वस्तू खरेदी करून ई एमआय मध्ये त्याचे पेमेंट टप्याटप्याने करू शकतो.

याआधी असे शक्य नव्हते.पण पाईन लॅब बाजारातील असे परिवर्तन घडवून आणणारी एकमेव कंपनी आहे.

आजही पीओएस डिव्हाईस मध्ये ई एम आयची सुविधा देणे अनेक कंपनींस्कडुन बॅकाकडुन शक्य झाले नाहीये जे पाईन लॅबने करून दाखवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button