श्रीमंत लोकांच्या २७ सवयी 2७ best habits of rich people book review in Marathi
श्रीमंत लोकांच्या २७ सवयी 2७ best habits of rich people book review in Marathi
आज आपल्या दैनंदिन जीवनात जे व्यक्ती आपल्याला खुप श्रीमंत झालेले दिसुन येतात ते फक्त नशिबाने श्रीमंत झालेले नाहीयेत.
ह्या सर्व व्यक्तींनी धन अर्जित करण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य अणि अशा काही योग्य छंदांची जोपासना केली.ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त पैसे कमवता येतील.
आपण तेच बनत असतो जसा आपण विचार करत असतो.जशी आपण कृती करत असतो.ज्या लोकांना आपल्या कामात करीअरवर पुर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे.अणि जीवनात यशस्वी श्रीमंत उद्योजक बनायचे आहे.
अशा व्यक्तींनी श्रीमंत व्यक्तींच्या २७ सवयी आपल्या अंगी जोपासणे आवश्यक आहे.
श्रीमंत लोकांच्या ह्या २७ सवयी आपल्याला आपल्या जीवनात मोठे यश प्राप्त करण्यास यशस्वी होण्यास साहाय्य प्रदान करतील.
१) श्रीमंत व्यक्ती नेहमी लवकर उठतात –
आज जेवढेही श्रीमंत व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या मध्ये एक महत्वाची सवय आपणास आवर्जून पाहायला मिळते.श्रीमंत व्यक्ती झोपेतून रोज सकाळी लवकर उठतात.
रोज सकाळी लवकर उठून आपल्या कामाला लागणे आपल्या दिनचर्येची सुरुवात करणे ही यशस्वी होण्याची एक महत्वपूर्ण पायरी मानले जाते.
जे लोक आज बिलिनिअर आहेत ते जास्तवेळ झोपुन राहत नाही कारण त्यांच्याकडे पूर्ण करण्यासाठी रोज वेगवेगळी कामे असतात.
ही सर्व कामे त्यांना एका निर्धारित वेळेत पुर्ण करायची असतात.म्हणुन ते जास्तीत जास्त वेळ आपल्या कामात व्यस्त राहतात.
आज ४४ टक्के श्रीमंत व्यक्ती हे आपल्या कामाला सुरुवात करण्याच्या तीन ते चार तास अगोदर झोपेतून उठतात.
२) सकाळी लवकर उठून योगा तसेच कसरत करणे –
स्वताचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी स्वताला तंदुरुस्त निरोगी ठेवण्यासाठी पहाटेच्या वेळेस श्रीमंत व्यक्ती योगा,प्राणायाम तसेच कसरत करत असतात.
३) वाचन –
आपल्या ज्ञानात अधिक वाढ करण्यासाठी श्रीमंत व्यक्ती रोज सकाळी उठून प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करत असतात.किंवा आपल्या मधील निर्मितीशीलतेत वाढ करण्यासाठी ते सकाळी लवकर उठून लेखन देखील करत असतात.
४) आरोग्यदायी नाश्त्याचे सेवण –
श्रीमंत व्यक्ती हे पहाटे झोपेतून उठल्यावर आपल्या मोबाईल कंप्युटर लॅपटॉप इत्यादी मध्ये आलेले संदेश तसेच ईमेल तपासत नाही.
श्रीमंत व्यक्ती रोज पहाटे लवकर झोपेतून उठून योगा,प्राणायाम तसेच कसरत करतात अणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून आरोग्यदायी नाश्त्याचे सेवण देखील करीत असतात.
श्रीमंत व्यक्ती नेहमी आपल्या आरोग्याला विशेष प्राधान्य देत असतात याचकरीता ते रोज सकाळी योगा प्राणायाम कसरत करण्यासोबत आरोग्यदायी नाश्त्याचे सेवण देखील करीत असतात.
५) कॅलरी मोजणे –
५७ टक्के श्रीमंत व्यक्ती नेहमी आपल्या आहारातील कॅलरी मोजत असतात.एवढेच नव्हे तर ७० टक्के श्रीमंत व्यक्ती हे ३०० पेक्षा कमी कॅलरी असलेल्या जंक फूडचे सेवण करतात.
श्रीमंत व्यक्तींचे असे मत आहे की नेहमी आरोग्यदायी अणि कमी कॅलरी असलेल्या संतुलित आहाराचे सेवन केल्याने आपल्याला दिर्घायुष्य प्राप्त होते.
आपले आरोग्य चांगले राहते ज्याने जास्त पैसे कमविण्याच्या संधी आपल्याला प्राप्त होतात.
अणि दिवसभरात आपल्या कामात देखील उर्जा प्राप्त होते आपल्या रोजच्या कामात प्रोडक्टीव्हिटी येते.आपले काम करत असताना आपल्याला आळस किंवा कंटाळा देखील येत नाही.
६) नियमित व्यायाम करणे –
श्रीमंत व्यक्ती रोज सकाळी न चुकता मेडिटेशन योगा तसेच कसरत करत असतात.कारण त्यांना माहीत असते की जर आपल्याला शारीरिक अणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहायचे असेल तर आपल्याला नियमित व्यायाम करावाच लागेल.
श्रीमंत व्यक्ती आपल्या कामात कितीही व्यस्त असले तरी ते दिवसभरात कसरत करण्यासाठी वेळ आवर्जुन काढत असतात.
७७ टक्के श्रीमंत व्यक्ती हे आठवड्यातून किमान चार वेळा एक्सरसाईज करीत असतात.हया चार दिवसात श्रीमंत व्यक्ती किमान ३० मिनिटे इतका कालावधी एक्सरसाईज करण्यासाठी देतात.
७) अनावश्यक खर्च करणे टाळतात –
श्रीमंत व्यक्ती नेहमी भविष्याच्या दृष्टीने पैशांची बचत तसेच योग्य ठिकाणी गुंतवणुक करतात.श्रीमंत व्यक्ती अनावश्यक खर्च कधीच करत नाही.
अनावश्यक खर्च टाळण्यासाठी श्रीमंत व्यक्ती नेहमी आपल्या खर्चाचे एक बजेट तयार करीत असतात.श्रीमंत व्यक्ती आपल्या कमाईतील ९० टक्के रक्कम खर्च करतात अणि त्यातील १० टक्के रक्कमेची नेहमी बचत करतात.
आज आपल्या भारत देशातील जेवढेही लोक आर्थिक तंगीने गस्त आहेत.ते आपल्या खर्चाचे एक बजेट तयार करीत नसतात.
ते महिन्याभरात जेवढे पैसे कमवतात त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करतात.यामुळे खुप पैसे कमावून देखील त्यांना नेहमी पैशांची चणचण भासत असते.
पण श्रीमंत व्यक्ती असे अजिबात करत नाही.ते आपल्या पैशाचे योग्यरित्या व्यवस्थापन करतात.त्यामुळे त्यांना सर्वसामान्य गरीब व्यक्तीं प्रमाणे कधीही आर्थिक तंगीला सामोरे जावे लागत नसते.
८) ध्येय लिहुन ठेवतात –
श्रीमंत व्यक्ती हे नेहमी आपले ध्येय एका कागदावर किंवा वहीत लिहून ठेवतात.अणि मग निर्धारित वेळेत ते ध्येय प्राप्त करण्यासाठी एक प्लॅनिंग तयार करतात.
अणि त्या प्लॅनिंग नुसार काम करत आपले ध्येय गाठण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात.
आज ६७ टक्के श्रीमंत व्यक्ती आपले ध्येय लिहुन ठेवतात अणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आवश्यक कृती रोज करतात.
९) टु डु लिस्ट तयार करणे –
श्रीमंत व्यक्ती नेहमी आपल्या रोज दिवसभरात करायच्या असलेल्या कामांची एक यादी तयार करतात.कारण आपल्याला मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपली रोजची छोटछोटे ध्येय साध्य करणे देखील आवश्यक असते.
याचकरीता अधिकतम श्रीमंत व्यक्ती रोज टु डु लिस्ट तयार करतात अणि त्यानूसार आपले काम करतात.
आज ७७ टक्के श्रीमंत व्यक्ती आपल्या रोजच्या कामाची एक टु डु लिस्ट तयार करतात.अणि ६७ टक्के श्रीमंत व्यक्ती आपल्या टु डु लिस्ट मध्ये लिहिलेली रोजची कामे पुर्ण देखील करीत असतात.
१०) वेळेला पैशाच्या बरोबरीने महत्व देणे –
श्रीमंत व्यक्ती हे नेहमी आपल्या वेळेला पैशा इतकेच महत्व देत असतात कारण त्यांना माहीत असते की गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.
म्हणून श्रीमंत व्यक्ती आपल्या वेळेला सर्वात जास्त महत्व देतात.ते आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करतात.
अणि जे काम त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे आहे तेच काम करण्यात आपला अधिकतम वेळ व्यतीत करतात.अणि बाकीची कमी महत्वाची किरकोळ कामे करण्यासाठी आपल्या कंपनीत कर्मचारी ठेवतात.जेणेकरून त्यांना आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल.
श्रीमंत व्यक्ती कधीही व्हाटस अप इंस्टाग्राम फेसबुक सारख्या मनोरंजन ठिकाणी सोशल मीडियावर जास्त वेळ आपला व्यतीत करत नाहीत.
कारण ते आपल्या पैशाला वेळेसारखे महत्व देतात अणि वेळेचा अपव्यय म्हणजे पैशांचे नुकसान असते असे श्रीमंत व्यक्ती मानतात.
याकरिता श्रीमंत व्यक्ती सोशल मीडिया सारख्या नाहक वेळखाऊ प्लॅटफॉर्मवर आपला अमुल्य वेळ वाया घालवत नसतात.
११) डेली इन्कमवर फोकस करणे –
श्रीमंत व्यक्ती हे आपल्या आठवड्याच्या वर्षाच्या महिन्याच्या कमाईवर लक्ष केंद्रित न करता आपल्या रोजच्या कमाईवर लक्ष केंद्रित करतात.
श्रीमंत व्यक्ती ह्या गोष्टींवर अधिक लक्ष देतात की रोज प्रत्येक तासाला आपल्याला कोणत्या कामात किती पैसे कमवायचे आहेत.
श्रीमंत व्यक्ती असे काम करण्याला अधिक प्राधान्य देतात ज्यातुन त्यांना अधिकतम नफा प्राप्त होईल.
१२) दुपारच्या जेवणासाठी अधिकतम वेळ देणे –
श्रीमंत व्यक्ती दुपारच्या जेवणासाठी कमीत कमी एक तास इतका कालावधी देतात.कारण त्यांना माहीत असते की काम करण्याबरोबरच विश्रांती घेणे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे.
जास्त प्रोडक्टीव्ह काम करण्यासाठी शरीराला विश्रांती देणे देखील आवश्यक असते.
म्हणून श्रीमंत व्यक्ती दुपारच्या जेवणासाठी जास्तीत जास्त वेळ देतात.जेणेकरून त्यांना पुरेशी विश्रांती देखील घेता येते.अणि पुन्हा अधिक जोमाने उत्साहाने आपल्या कामाला सुरुवात करता येते.
१२) भरपूर वाचन करतात –
श्रीमंत व्यक्ती आत्मसुधारणेवर अधिक जास्त भर देतात.याकरीता ते सातत्याने नवनवीन कला कौशल्य शिकत असतात.
वाचनाने माणूस जुना राहत नाही नवा बनत जातो हे श्रीमंत लोकांना माहिती आहे म्हणून ते वाचन देखील करतात.आज ८६ टक्के श्रीमंत व्यक्तींना वाचणाची आवड आहे.
श्रीमंत व्यक्ती नेहमी सेल्फ इंप्रूव्हमेंट संबंधित पुस्तकांचे वाचन करणे अधिक पसंत करतात.
८० टक्के श्रीमंत व्यक्ती हे रोज कमीत कमी ३० मिनिटे सेल्फ इंप्रूव्हमेंट संबंधित पुस्तकांचे वाचन करतात.
१३) यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहणे –
श्रीमंत व्यक्ती असे मानतात की जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल आपण जे आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत अशा इतर यशस्वी व्यक्तींच्या सान्निध्यात संपर्कात राहायला हवे.
श्रीमंत व्यक्ती यशस्वी होण्यासाठी इतर यशस्वी लोकांशी मैत्री करतात त्यांच्या सान्निध्यात राहतात जेणेकरून त्यांना देखील अधिकतम यश प्राप्त करता येईल.
आज ७९ टक्के श्रीमंत व्यक्ती महिन्याभरात कमीत कमी ८ ते १० तास नेटवर्किंग मध्ये व्यतीत करत असतात.
१४) टिव्ही बघणे टाळतात –
श्रीमंत व्यक्ती हे कधीच टिव्ही बघत नाहीत.ते आपला वेळ कधीच टीव्हीवरील चित्रपट,मालिका बघण्यात वाया घालवत नाही.
६७ टक्के श्रीमंत व्यक्ती हे दिवसभरात एका तासापेक्षा कमी कालावधी टिव्ही बघत असतात.ते आपला वेळ व्यतीत करण्यासाठी इतर प्रोडक्टीव्ह काम करणे पसंत करतात.
१५) लाॅटरी सटटा लावणे टाळतात –
श्रीमंत व्यक्ती हे जुगार सट्टा खेळणे नेहमी टाळतात.म्हणुन फक्त ६ टक्के श्रीमंत व्यक्ती हे लाॅटरी खेळतात.श्रीमंत लोकांचे मत असते की फोकस अणि कठोर परिश्रमाने आपल्याला स्वता आपले नशिब घडवायचे असते.
१६) कमी बोलणे जास्त ऐकणे –
संवादा दरम्यान श्रीमंत व्यक्ती हे कमी बोलतात अणि जास्तीत जास्त ऐकुन घेतात.श्रीमंत व्यक्ती १ मिनिटे बोलतात समोरच्या व्यक्तीचे बोलणे पाच मिनिटे ऐकत असतात.
समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे आहे हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी त्यांना कमी बोलणे अणि जास्त ऐकुन घेणे अधिक फायदेशीर ठरते.
याने त्यांना समोरच्या व्यक्तीसोबत एक चांगले नाते तयार करता येते.
१७) श्रीमंत व्यक्ती हे कधीही सेवानिवृत्त होत नाही –
श्रीमंत व्यक्ती हे कधीच आपल्या कामातून सेवानिवृत्ती घेत नसतात.
अधिकतम देशात ६० वय झाल्यानंतर कामातुन नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली जाते.पण श्रीमत व्यक्ती हे कमीत कमी ७० वय होईपर्यंत सेवानिवृत्त होत नसतात.
श्रीमंत व्यक्तींना काम करायची इच्छा असते म्हणून ते ७० वय होईपर्यंत सेवानिवृत्त न होता आपले काम करीत असतात.
श्रीमंत व्यक्तींचे असे मानने आहे की आपण जितका अधिक वेळ काम करण्यात व्यतीत करतो तेवढ्या अधिक पैशांची कमाई आपल्याला करता येईल.
श्रीमंत व्यक्तींचे आरोग्यदायी जीवन जगण्याचे हेच एक मोठे रहस्य आहे ते कधीही आपल्या कामातुन सेवानिवृत्ती घेत नाही.
१८) कामाला उशिर करत नाही-
जेवढेही श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांना माहीत आहे की कुठल्याही कामाला उशिर करणे हे आपल्या उद्योग व्यवसायाकरीता घातक ठरू शकते.
म्हणून श्रीमंत व्यक्ती आजचे काम उद्यावर न ढकलता आजचे काम आजच पुर्ण करण्यावर अधिक विश्वास ठेवतात.
यासाठी ते आपल्या रोजच्या कामाची एक टु डु लिस्ट देखील तयार करीत असतात.अणि त्यातील ७० टक्के पेक्षा अधिक काम पुर्ण करीत असतात.
१९) कधीच गिव्ह अप करत नाही –
श्रीमंत व्यक्ती हे कुठलीही परिस्थिती असो ते कधीच परिस्थिती समोर हार पत्कारून गिव्ह अप करत नाही उलट त्यावर मार्ग काढुन पुढे जाण्याचा प्रयत्न ते करीत असतात.
आज जे व्यक्ती जीवनात यशस्वी झाले आहेत त्यांच्यामध्ये हे तीन गुण होते फोकस,संयम अणि चिकाटी.
२०) मार्गदर्शकासह कार्य करणे –
श्रीमंत व्यक्ती हे नेहमी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात.मार्गदर्शक त्यांना हे शिकवण्याचे काम करत असतात की त्यांना कुठली गोष्ट करायची आहे अणि कुठली गोष्ट नाही करायची आहे.
याने श्रीमंत व्यक्तींना आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ करण्यास, उद्योग व्यवसायात प्रगती करण्यास साहाय्य प्राप्त होते.
२१) नशिबाला दोष देत बसत नाही –
जेवढेही श्रीमंत यशस्वी व्यक्ती आतापर्यंत ह्या जगात होऊन गेले आहेत त्यांनी कधीच आपल्या परिस्थिती तसेच नशिबाला आपल्या अपयशासाठी दोष देण्यात वेळ वाया घालविला नाही.
श्रीमंत व्यक्ती आपल्या कठोर परिश्रम जिद्द चिकाटीच्या जोरावर आपले नशिब स्वता घडविण्यात विश्वास ठेवतात.
२२) पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे –
श्रीमंत व्यक्ती आपल्या कमावलेल्या पैशांची अशा एखाद्या योग्य ठिकाणी गुंतवणुक करीत असतात जिथुन त्यांना दुप्पट पैसे प्राप्त होतील.
श्रीमंत व्यक्ती योग्यरीत्या आपल्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी वित्तीय नियोजन करीत असतात.
२३) रिस्क घेणे –
आज जेवढेही व्यक्ती आपल्या उद्योग व्यवसायात यशस्वी झाले आहेत त्या सर्वांनी आपल्या आयुष्यात जोखिम घेतली होती.
म्हणून आज ते एवढे यशाचे उंच शिखर गाठु शकले आहेत.म्हणजेच यशस्वी अणि श्रीमंत व्यक्ती रिस्क घ्यायला कधीही घाबरत नसतात.
२४) उत्पन्नाची विविध साधने तयार करणे –
श्रीमंत व्यक्ती हे कुठल्याही एका विशिष्ट उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहत नसतात.ते आपल्यासाठी उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत निर्माण करत असतात.
आज जेवढेही श्रीमंत व्यक्ती आपणास दिसुन येतील त्यांनी कुठल्याही एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून न राहता त्यांच्यासाठी उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत तयार करण्यावर अधिक भर दिला.
२५) समस्येवर नव्हे तर उपायावर लक्ष देतात –
श्रीमंत व्यक्ती हे कुठल्याही समस्येवर नव्हे तर त्यावरील उपायावर अधिक विश्वास ठेवतात.ते कुठल्याही परिस्थितीत अडचणींवर लक्ष देत नाही.
आपल्या दैनंदिन जीवनात आलेल्या प्रत्येक समस्येत ते व्यवसायाची संधी शोधत असतात.
२६) पॅसिव्ह इन्कम तयार करणे –
श्रीमंत व्यक्ती हे अॅक्टीव्ह इन्कम पेक्षा पॅसिव्ह इन्कम वर अधिक लक्ष केंद्रित करतात.ते असे इन्कमचे सोर्स तयार करतात जिथुन त्यांना ते पलंगावर आरामात झोपेल असताना देखील पैसे मिळत राहतील.
२७) कृतज्ञता व्यक्त करणे –
श्रीमंत व्यक्तींकडे जी काही धन दौलत संपत्ती असते त्यासाठी ते नेहमी कृतज्ञता व्यक्त करीत असतात.याकरिता ते आपल्या कमाईतील काही टक्के रक्कम मंदिर ट्रस्ट तसेच गरीब गरजु व्यक्तींना दान करीत असतात.