Blog

मॅगी नुडल्सची यशोगाथा Maggi noodles success story in Marathi 

मॅगी नुडल्सची यशोगाथा Maggi noodles success story in Marathi 

आज आपल्या भारत देशातील किंचितच असे व्यक्ती असतील ज्यांनी कधीच मॅगीचे सेवण केले नसेल.आज लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळयांनाच मॅगी खायला आवडते.

कारण मॅगी हा असा एक एकमेव खाद्यपदार्थ जो आपण भुक लागल्यावर फक्त पाच मिनिटांत तयार करून खाऊ शकतो.

आज शहरात खेडेगावात तसेच डोंगराळ प्रदेश इत्यादी सर्व ठिकाणी आपल्याला ही दोन मिनिटात तयार होणारी डिश अधिक प्रमाणात खाताना लोक दिसुन येतात.

एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की भारतातील लोक हे जगात सर्वात जास्त मॅगी नुडल्सचे चाहते आहेत.अणि भारतात सर्वाधिक प्रमाणात मॅगी नुडल्सचे सेवण केले जाते.

एका रिपोर्ट नुसार असे म्हटले जाते आहे की फक्त भारत ह्या एकमेव देशात वर्ष २०२३/२०२४ मध्ये मॅगीच्या ६ अरबपेक्षा जास्त पाकिटांची विक्री करण्यात आली आहे.

ही आकडेवारी जगातील कुठल्याही देशापेक्षा अधिक मानली जाते.यावरून आपणास लक्षात येते की भारतातील व्यक्ती मॅगीचे किती मोठे चाहते आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या मॅगी नुडल्सची सुरूवात कशी झाली हे जाणुन घेणार आहोत.

मॅगी भारतातील सर्वात मोठी नुडल कंपनी कशी बनली? 

आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जुलीयस मॅगी यांनी आपल्या वडीलांनी सुरू केलेली पिठाची गिरणी सांभाळण्यास सुरूवात केली.

सुरूवातीला त्यांचा हा व्यवसाय खुप चांगल्या पद्धतीने चालला पण कालांतराने त्यांचा ह्या व्यवसायात मंदी येण्यास सुरुवात झाली.

तेव्हा जुलियस मॅगी यांनी दुसरा एखादा व्यवसाय करायचे ठरवले.तेव्हा जागोजागी औद्योगिक क्रांती घडुन येत होती.

जागोजागी नवीन कारखाने उभारले जात होते अणि जुन्या कारखान्यांना देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अपग्रेड करण्यात येत होते.

तेव्हा कारखान्यात काम करत असलेल्या कामगारांच्या जेवणात पौष्टिकता आणण्यासाठी त्यांनी अन्न उत्पादनात कार्य करण्यास सुरुवात केली.

त्यांनी कारखान्यात काम करत असलेल्या कामगारांसाठी सुप तयार केले ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीनचे प्रमाण असलेले लेगयुम मिल्स देखील समाविष्ट होते.

वर्ष १८७२ मध्ये स्वित्झर्लंड मध्ये वास्तव्यास असलेल्या जुलीयस मॅगी यांनी मॅगी ह्या नुडल कंपनीची सुरूवात केली होती.जुलियस मॅगी यांनी त्यांच्या नुडल्सचे नाव त्यांच्या आडनाव मॅगी वरून ठेवले होते.

१८७२ दरम्यान स्वित्झर्लंड ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती घडुन आली होती.

हया कालावधीत महिलांना रात्री उशिरापर्यंत कंपनीत काम करावे लागत होते अणि घरी गेल्यावर काम करून दमेल थकेल असताना देखील खुप कमी वेळात आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक बनवावा लागत होता.

औद्योगिक क्रांतीच्या ह्या काळात स्वीस पब्लिक वेल्फेअर सोसायटीने जुलियस मॅगी यांची मदत घेतली.अणि मग इथूनच पाच मिनिटांत तयार होणारा खाद्यपदार्थ मॅगीचा जन्म झाला.

महिलांना जास्तीत जास्त वेळ कंपनीत काम करता यावे अणि घरी गेल्यावर त्यांना झटक्यात कमी वेळात आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक देखील बनवता यावा म्हणून मॅगी नुडल्सचा जन्म झाला होता.

जुलियस यांनी त्यांच्या तयार केलेल्या ह्या प्रोडक्टचे नाव स्वताच्या आडनावावरून ठेवले होते.जुलियस यांचे पुर्ण नाव जुलीयस मायकल जोहानसन मॅगी असे होते.

जुलीयस मॅगी यांच्याच कंपनींने १८९७ मध्ये जर्मनी ह्या देशात सर्वप्रथम मॅगी नुडल्सला जगासमोर प्रस्तुत केले होते.

मॅगी नूडल्स ह्या जुलियस यांच्या प्रोडक्टला प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे नेसलेने केले होते.

मिडिया रिपोर्ट नुसार जुलियस मॅगी यांनी प्रोटीन युक्त अन्नपदार्थ अणि सुपची विक्री करण्यास सुरुवात केली होती.

अणि त्यानंतर पुढे त्यांनी मॅगी बनवण्याच्या कामाला सुरुवात केली.हया कार्यात जुलियस मॅगी यांचे चिकित्सक मित्र फ्रेडोलिन शुला यांनी भरपूर मदत केली होती.

ह्या दोन मिनिटात बनत असलेल्या चटकदार खाद्यपदार्थ मॅगीला बाजारात लोकांची भरपूर पसंती प्राप्त झाली.

१९१२ पर्यंत मॅगीने अमेरिका, फ्रान्स सारख्या अनेक देशांतील संपूर्ण बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.

पण १९१२ मध्ये जुलीयस मॅगी यांचे निधन झाले.जुलियस त्यांच्या मृत्यूचा परिणाम त्यांच्या कंपनीवर देखील पडला अणि कंपनीच्या प्रोडक्टच्या विक्री मध्ये घट होण्यास सुरुवात झाली.

पुढे १९४६ मध्ये नेसले कंपनीने मॅगीला खरेदी केले.नेसले ही लहान मुलांसाठी दुधाने बनविण्यात आलेले अन्नपदार्थ तयार करणारी कंपनी होती.

नेसले कंपनीने मॅगीची बाजारात ब्रॅडिग अणि मार्केटिंग करण्यासाठी आपले सर्व बळ लावले.

नेसलेने आपल्या जाहीरात दाखवले की हे मॅगी नूडल्स हे पौष्टिक अन्न विशेषतः अशा लोकांसाठी बनविण्यात आले आहे ज्यांच्याकडे स्वयंपाक बनविण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसतो.

मॅगी नूडल्स कोणीही दोन मिनिटात बनवून खाऊ शकते.मॅगी हे लोकांना त्यांच्या रोजच्या धावपळीच्या जीवनात दिलासा देणारे प्रोडक्ट होते.

मॅगीचा स्वाद एकदम चटकदार असल्याने आज जगभरातील प्रत्येक घरात आपल्याला मॅगी नूडल्सचे पाकीट पाहायला मिळते.

वर्ष १९४६ मध्ये जेव्हा मॅगी कंपनीचे नेसले कंपनीसोबत विलीनीकरण झाले यानंतर नेसलेने मॅगीला वर्ष १९९४ मध्ये भारतात आणले.

जेव्हा नेसले कंपनीने मॅगी हे प्रोडक्ट भारतात आणले तेव्हा कोणाला वाटत नव्हते की भविष्यात मॅगी भारतीय बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित करेल.अणि देशातील करोडो लोकांची पसंत बनेल.

नेसलेने मॅगी नूडल्स भारतात लॉन्च केल्यानंतर मॅगी प्रोडक्ट अणि त्याचा काही मिनिटांत तयार होण्याचा फाॅर्मयुला भारतातील लोकांना अधिक आवडु लागला.

अणि फक्त काहीच दिवसात बाजारातील सर्व ग्राहकांना मॅगीची चटक लागली.

आज नेसले कंपनीदवारे मॅगीच्या जाहीरातीवर १०० करोडपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे.आज मॅगी भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनले आहे.

पण मॅगीची स्वित्झर्लंड मधील सहयोगी कंपनी नेसले मॅगीची सहयोगी ब्रँड आहे.पण आज अधिकतम लोक नेसलेला नव्हे तर मॅगीलाच ब्रँड म्हणून ओळखतात.

भारतीय बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मॅगीने काय केले?

नेसलेने पहिल्यांदा जेव्हा मॅगी ब्रँडच्या अंतर्गत बाजारात नुडल्स लाॅच केले तेव्हा शहरी लोकांसाठी हे रोज सकाळी नाश्ता करण्याचा सर्वात उत्तम पर्याय बनले.

नेसले कंपनीने भारतीय बाजारात सर्वप्रथम नुडल्स सोबत पाऊल टाकले.

भारतात मॅगी नुडल्स इतर देशांप्रमाणे एका रात्रीत प्रसिद्ध झाले नाही पण कालांतराने संपूर्ण भारतीय लोक नेसलेने लाॅच केलेल्या मॅगी नुडल्सचे चाहते बनले.

कारण वेळेनुसार १९९९ मध्ये येथील लोकांच्या जीवनशैलीत देखील बदल घडुन आला.

त्यामुळे दिवसभर कंपनीतुन काम करून घरी परतल्यावर भुक लागलेली असल्याने झटक्यात जेवण करण्यासाठी आपली भुक भागविण्यासाठी लोक अधिकतम प्रमाणात मॅगीचे सेवण करू लागले.

एवढेच नव्हे तर सकाळी लवकर उठून कामावर जाण्याची घाई असलेले भारतीय व्यक्ती देखील कामावर जाण्याअगोदर झटपट तयार होणारा नाश्ता म्हणून मॅगीचे सेवण करू लागले.

पुढे भारतीय बाजारात मॅगीची वाढती क्रेझ पाहुन नेसले कंपनीने बाजारात मॅगी ब्रँडच्या अंतर्गत आपले इतर प्रोडक्ट देखील लाॅच केले.

आज भारतातील ९० टक्के मॅगीचे भारतातील विविधता अणि येथील संस्कृतीला लक्षात घेऊन बनविण्यात आले आहेत.अणि हे प्रोडक्ट इतर कुठल्याही ठिकाणी उपलब्ध होत नाही.

आज भारतात नेसले गृपला प्राप्त होत असलेल्या नफ्यात फक्त मॅगीचा ७५ टक्के एवढा हिस्सा असल्याचे आपणास दिसून येते.

आज नेसले कंपनी दरवर्षी एक हजार करोडपेक्षा जास्त कमाई आपल्या भारतात लाॅच केलेल्या मॅगी ह्या प्रोडक्ट दवारे करीत आहे.

पुर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर देखील मॅगीने बाजारात पुन्हा आपले वर्चस्व कसे प्रस्थापित केले?

२०१५ मध्ये जेव्हा बाजारात अशी वार्ता पसरली की मॅगीमध्ये लेड कंटेंट खुप जास्त प्रमाणात असते तेव्हा एका दिवसात नेसले मॅगी कंपनीला २०० करोड रुपये इतके नुकसान झाले होते.

कारण २०१५ मध्ये मे महिन्याच्या अखेरीस उत्तर प्रदेश मध्ये मॅगीच्या सॅपल मध्ये प्रमाणापेक्षा जास्त लेड कंटेंट आढळून आला होता.यानंतर मॅगी खाण्यावर उत्तर प्रदेश मध्ये बंदी घालण्यात आली होती.

बघता बघता इतर राज्यात देखील मॅगीवर बंदी घालण्यात आली होती.अणि ५ जुन २०१५ मध्ये देशभरात मॅगीला बॅन करण्यात आले होते.

मॅगीवर असे आरोप करण्यात आला होता की त्यात प्रमाणापेक्षा अधिक शिसे आहेत.अणि मॅगीचे उत्पादन केलेल्या नेसले कंपनीदवारे नो एडेड एस एमजी असे खोटे लेबल लावून लोकांना फसवण्यात आहे.

मॅगीवर असा देखील आरोप करण्यात आला होता की मॅगी उडस मसाला नुडल्स अणि टेक मेकरची विक्री नेसले कुठल्याही प्रकारची संमती न घेता करत आहे.

बाजारात ह्या आरोपांमुळे,मॅगीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे नेसले कंपनीला ३२० करोड इतके नुकसान देखील झाले होते.

याचसोबत केंद्र सरकारने मॅगी नूडल्स विरोधात अनुचित व्यापार पद्धतीत गुंतणे,चुकीची लेबलिंग करणे,मॅगी नूडल्स बाबत लोकांची दिशाभूल करणारी जाहीरात दाखवणे याची भरपाई म्हणून ६४० करोड रुपये इतका दंड देखील ठोठावला होता.

यानंतर अनेक महिने बाजारात पुर्णतः मॅगीवर बंदी घालण्यात आली होती.

तोपर्यंत बाजारात ईपी सारखे अनेक झटक्यात बनणारे नुडल्स आले होते पण लोकांच्या जीभेवर असलेली मॅगीची चव संपली नव्हती.

म्हणुन सगळ्यांची इच्छा होती की बाजारात पुन्हा एकदा मॅगी नूडल्स यायला हवेत.अणि लोकांच्या इच्छेनुसार घडले देखील काही महिन्यांच्या कालावधीतच मॅगीने पुन्हा बाजारात प्रवेश केला.

कारण नेसलेने भारतातील ज्या प्रयोगशाळेत मॅगीची चाचणी करण्यात आली होती त्या प्रयोगशाळेच्या विश्वसनीयतेवर संशय घेतला.

कारण भारताच्या बाहेर केलेल्या चाचणीमध्ये मॅग नुडल्स पुर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला होता.

पुढे मुंबई हायकोर्टाने आधीचे टेस्ट रिझल्ट विश्वसनीय नसल्याचे मान्य केले.

अणि मग पुन्हा एकदा पंजाब, हरियाणा, जयपुर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मॅगी नूडल्ची टेस्टिंग करण्यात आली अणि ह्या टेस्ट रिझल्ट मध्ये मॅगी खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे सिदध झाले. 

यानंतर मॅगी नुडल्सने बाजारात पुन्हा प्रवेश केला.बाजारात मॅगी नूडल्सची विक्री पुन्हा एकदा सुरू झाली.तेव्हापासून आजपर्यंत मॅगीने आपल्या नुडल्सच्या गुणवत्ता,चव अणि आस्वादामध्ये कुठलीही कमतरता भासु दिली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button