Blog

मनी व्युव्ह अॅप स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Money view app startup business success story in Marathi 

मनी व्युव्ह अॅप स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा Money view app startup business success story in Marathi 

स्वतासाठी अलिशान घर खरेदी करायचे असो किंवा एखादी कार विकत घ्यायची असो आज आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या वैयक्तिक कारणासाठी बॅकेकडुन पर्सनल लोन घेत असतो.

आपल्याला प्रत्येकालाच वाटते की बॅकेकडुन पर्सनल लोन घेताना आपल्याला कागदपत्रांसाठी जास्त धावपळ करावी लागु नये.आपल्याला जास्त कुठलीही धावपळ न करता अगदी सहजरित्या लोन प्राप्त व्हावे.

मनी व्युव्ह अॅप काय आहे?

मनी व्युव्ह हे भारतातील एक उत्तम दर्जाचे पर्सनल लोन अॅप आहे.इथे ग्राहकाला कुठल्याही प्रकारची धावपळ न करता अगदी सहज आपल्याला भरता येतील अशा हप्त्यात लोन प्राप्त होते.

मनी व्युव्ह हे ग्राहकांना क्रेडिट प्रोडक्टची सुविधा प्रदान करत असलेल्या हजार प्रोडक्टपैकी एक आहे.ज्यात पर्सनल लोन, कार्ड, आत्ता खरेदी करा पैसे नंतर द्या इत्यादी सुविधा समाविष्ट आहेत.

ज्यांच्याकडे स्वताचा स्मार्टफोन आहे अणि त्यांचे बॅकेत खाते देखील आहे त्यांच्यासाठी वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन उपाय देखील देण्याचे काम मनी व्युव्ह करते.

मनी व्युव्हवर ग्राहकाला त्याचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न अणि वय इत्यादी आवश्यक माहीती भरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज सादर करता येईल.

ग्राहक त्याचे क्रेडिट स्कोअर उत्पन्न वय इत्यादी आवश्यक माहीती भरून काही मिनिटांतच जाणुन घेऊ शकतात ते किती पर्सनल लोन घेण्यासाठी पात्र आहेत किंवा त्यांना किती पर्सनल लोन प्राप्त होऊ शकते.

पर्सनल लोन घेण्यासाठी ग्राहकाला केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी लागते ज्यात त्याला आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते.

मनी व्युव्ह ह्या अॅपचा वापर करून आज देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेले कित्येक लोक पाच हजारापासून १० लाखापर्यंतचे पर्सनल लोन आपल्या वैयक्तिक खर्चासाठी घेत आहेत.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या मनी व्युव्ह अॅपच्या साहाय्याने आपण दोन मिनिटांत पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो.

ग्राहकांना मनी व्युव्ह अॅपपासुन घेतलेले पर्सनल लोन फेडण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी कर्ज फेडण्याचा कमाल कालावधी ५ वर्ष इतका ठेवण्यात आला आहे.

याने ग्राहकांना दर महिन्याला ईएमआय देखील कमी भरावा लागतो आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना बराच अवधी देखील प्राप्त होतो.

मनी व्युव्ह अॅपच्या साहाय्याने पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यानंतर अणि आपला अर्ज स्वीकृत झाल्यानंतर फक्त २४ तासाच्या आत पैसे ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केले जातात.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे लोन देण्याची सर्व प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडते त्यामुळे इथे कागदोपत्री व्यवहाराची कुठलीही आवश्यकता भासत नाही.

आज मनी व्युव्ह हे अॅप देशातील पाच करोडपेक्षा अधिक लोकांनी गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले आहे.कंपनीचा दावा आहे की दरमहिन्याला १० लाखापेक्षा अधिक युझर्स हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करतात 

आजच्या लेखामध्ये आपण मनी व्युव्ह अॅप ह्या स्टार्ट अप व्यवसायाची संपूर्ण यशोगाथा जाणुन घेणार आहोत.

मनी व्युव्ह अॅप युनिकाॅन स्टार्ट अप कसे बनले?

मनी व्युव्ह अॅप हा बंगळुरू येथे स्थित असलेला एक आॅनलाईन फिनटेक स्टार्ट अप व्यवसाय आहे.ज्याची सुरुवात पुनीत अग्रवाल अणि संजय अग्रवाल या दोघांनी मिळून २०१४ मध्ये केली होती.

पुनीत अणि संजय ह्या दोघांनी आपल्या ग्राहकांसाठी वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन उपाय म्हणून मनी व्युव्ह हे पर्सनल लोन अॅप लाॅच केले होते.

ग्राहकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी अणि त्यांच्या जीवनात आर्थिक शिस्त आणण्यासाठी पुनीत अग्रवाल अणि संजय अग्रवाल ह्या दोघांनी हे अॅप सुरू केले होते.

कालांतराने ह्या दोघांनाही लोनमध्ये एक चांगली व्यवसाय संधी दिसुन आली.म्हणुन २०१६ मध्ये ह्या फिनटेक स्टार्ट अप व्यवसायाने आपल्या ग्राहकांना क्रेडिट प्रदान करण्यास सुरुवात केली.त्यांची ही कल्पणा यशस्वी ठरली.

मनी व्युव्हचे संस्थापक पुनित अग्रवाल यांनी त्यांच्या एका निवेदनात असे देखील सांगितले होते की मनी व्युव्हच्या दिवसेंदिवस होत असलेल्या वाढ अणि नफ्यासाठी त्यांची मजबुत व्यवस्थापन क्षमता कारणीभूत आहे.

ज्यामुळे मनी व्युव्हला कर्जासाठी सकारात्मक अर्थशास्त्र राखुन उत्पन्न श्रेणी अणि ब्युरो स्कोअर मधील वापरकर्त्यांना विस्तृत सेवा देता येते.तसेच वापरकर्त्यांना तिचा वापर करण्याची परवानगी देते.

मनी व्युव्ह २०० दशलक्ष पेक्षा अधिक जास्त असलेल्या अशा ग्राहकांना सेवा पुरविण्याचे काम करते.ज्यांना बॅक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून दुर्लक्षित करण्यात आले आहे.

हेच कारण आहे की आज हे फिनटेक अॅप फक्त एका वर्षात १ बिलियन डॉलर इतकी कमाई करत देशातील युनिकाॅन स्टार्ट अपपैकी एक बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button