Blog

भारतातील मध्यमवर्गीय व्यक्ती दिवसेंदिवस अधिक गरीब का होत आहे? Why indian middle class getting poorer 

भारतातील मध्यमवर्गीय व्यक्ती दिवसेंदिवस अधिक गरीब का होत आहे? why indian middle class getting poorer 

2020 मध्ये भारतातील 32,000000 मध्यमवर्गीय व्यक्ती हे एका झटक्यात गरीब झाले होते.

अणि एका रिपोर्टच्या नुसार भारतातील मध्यमवर्गीय व्यक्तीची अवस्था भविष्यात आणखी जास्त खराब होऊ शकते.

एवढेच नव्हे तर लवकरच भारतातील मध्यमवर्गीय व्यक्ती ही देशातील निम्न वर्गापेक्षा अधिक गरीब झाल्याचे दिसून येणार आहे.कारण मध्यमवर्गीय कुटुंब वारंवार अशा चुका करीत आहेत.

आज मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक मुलाचे स्वप्न आहे की आपण उच्च शिक्षण घेऊन डाॅक्टर,इंजिनिअर किंवा मोठा उद्योजक व्हायचे.

आज मध्यमवर्गीय कुटुंबातील कित्येक आईवडील आपल्या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार उच्च शिक्षण पुर्ण करता यावे म्हणून बॅकेकडुन त्यांच्या शिक्षणासाठी अवाढव्य कर्ज घेत असतात.

पण एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की पुढील १० वर्षांनंतर इंजिनिअरींग,मेडिकल, एमबीए इत्यादी शिक्षणाच्या फी मध्ये अधिक वाढ होणार आहे.

एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की १० वर्षांनंतर भारतातील मेडिकल शिक्षणाची फी ५५ लाख, इंजिनिअरींग शिक्षणाची फी २० लाख अणि एमबीएची फी कमीत कमी २७ लाख इतकी होणार आहे.

अणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी पुढील १० वर्षांनंतर कमीत कमी २ करोड इतकी फी लागणार आहे.

पण आश्चर्याची बाब म्हणजे जिथे इंजिनिअरींग,मेडिकल एमबीए सारख्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक फी मध्ये वर्षानुवर्षे एवढी वाढ होताना दिसुन येत आहे.

पण मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वेतनात कुठलीही वाढ होताना आपणास दिसून येत नाहीये.आज मध्यमवर्गीय व्यक्ती बॅकेकडुन कर्ज काढुन त्याचे व्याज अणि मुद्दल फेडण्यातच आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवत आहे.

आज भारतातील लोक अधिक प्रमाणात इतके मोठमोठे कर्ज उचलत आहेत त्यामुळे आरबीआयचे गवर्नर यांना स्वताहून बॅकेला अशी ताकीद द्यावी लागत आहे की त्यांनी 

विचारविनिमय करून कुठल्याही सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय व्यक्तीला कर्ज द्यावे.

आज मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती अशा चुका करीत आहेत त्यामुळे त्यांचे कुटुंब गरिबीतून बाहेर येऊ शकत नाहीये.

आजच्या लेखामध्ये आपण हे जाणुन घेणार आहोत मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती अशी कोणती चुक वारंवार करतो आहे ज्यामुळे तो दिवसेंदिवस अधिक गरीब होत चालला आहे.

इकोनाॅमिक टाईम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार कित्येक कंपन्या आपल्या कर्मचारींच्या वेतनात वाढ करणार नाही.

एक मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी वेतन वृद्धी अणि नोकरीत परिवर्तन ह्या दोन गोष्टींवर मुख्यत्वे अवलंबून असतो.

पण इकोनाॅमिक टाईम्सने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार इन्फोसिस, एचसीएल,विप्रो सारख्या कंपनींने आपल्या कर्मचारींच्या वेतनात वाढ करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

टीसीएस,टेक महिंद्रा सारख्या काही कंपन्यांनी आपल्या कर्मचारींच्या वेतनात वाढ केली पण फक्त ६ ते ८ टक्के इतकीच.

टाईम्स ऑफ इंडिया मधील एका जुन्या लेखात काही फायनान्शिअल एक्स्पर्टने देखील असे सांगितले होते की २०२३ मध्ये काही मोजक्याच ८०० कंपन्यांमध्ये कर्मचारींच्या वार्षिक वेतनात ६ ते ८ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.

म्हणजे १० हजार वेतन प्राप्त होत असलेल्या कर्मचारींच्या वेतनात फक्त ६०० ते ८०० रूपये वाढ करण्यात आली आहे.

आताच्या महागाईच्या तुलनेत एवढी किंचित वेतनवाढ नोकरी करत असलेल्या कर्मचारी वर्गासाठी काहीच नाहीये.

म्हणुन अनेक कंपनीमध्ये काम करत असलेले कर्मचारीं

आपली वर्तमान नोकरी सोडून आज नवीन कंपनीत नोकरीच्या शोधात फिरत आहेत.

पण २०२३ पासुन असा नियम काढण्यात आला आहे की नोकरीत परिवर्तन करत असलेल्या कर्मचारींना दिली जाणारी नवीनतम आॅफर केली जाणारी वेतन वाढ ५० टक्के इतकी कमी करण्यात आली आहे.

अणि समजा थोडीफार वेतनवाढ झाली तरी वर्षोनुवर्षे वाढत्या महागाई दरामुळे ते वेतन देखील कर्मचारींना पुरेसे पडत नाही.

कर्मचारींच्या वेतन वाढ अणि वाढती महागाई ह्या दोघांच्या डेटाचे विश्लेषण केल्यास निदर्शनास येते की मध्यमवर्गीय कुटुंबातील भारतीय व्यक्तीला कधीही महागाईच्या बरोबरीने वेतन प्राप्त होत नाही.

फायनान्सशिअल एक्स्प्रेस मधील एका अहवालानुसार पाच वर्षांत भारतीय कर्मचारींच्या वेतनात पाच वर्षांसाठी जी वेतनवाढ केली जात आहे.ती १० टक्के प्रमाणे केली जात आहे.

पण दरवर्षी महागाईच्या दरामध्ये २४ टक्के इतकी वाढ होत आहे.म्हणजे जेवढी वेतनवाढ केली जात आहे त्यापेक्षा अधिक दुप्पट प्रमाणात महागाईच्या दरामध्ये वाढ झालेली आपणास दिसून येते.

२० वर्षापुर्वी पेट्रोल ३३.४९ रूपयात मिळत होते.पण त्याच पेट्रोलची किंमत २०२३ मध्ये ९६.७२ रूपये इतकी झालेली आपणास पाहावयास मिळते.

पेट्रोलच्याच नव्हे तर साखर,शेंगदाणे, तांदूळ,दाळ इत्यादी वस्तुंच्या किंमतीत देखील अशीच निरंतर वाढ होत आहे.

२००५ मध्ये साखर १५.६ रूपये किलो ग्रॅम इतकी मिळत होती अणि २०२३ मध्ये तीच साखर ४१.१८ रूपये प्रति किलो ग्रॅम मिळताना दिसुन आली.

अशाच पद्धतीने वस्तुंच्या दरात होत असलेल्या वाढीला वाढते महागाई दर असे म्हटले जाते.

एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आपल्या सर्व खर्चासाठी त्याला नोकरीतुन प्राप्त होत असलेल्या वेतनावर पुर्णपणे अवलंबून राहत असतो.

पण अचानक वस्तुंच्या दरात वाढ झाल्याने अणि वेतन आहे तेवढेच असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची आर्थिक स्थिती बाजारातील वस्तु खरेदी करण्याइतपत राहत नसते.

२०२२ मध्ये एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीच्या खरेदी क्षमतेत २.९ टक्के इतकी घट झाल्याचे आपणास पाहायला मिळते.

म्हणजे एका वर्षापुर्वी एक मध्यमवर्गीय कुटुंब १० किलो पिठाची खरेदी करत असेल तर महागाई दरात वाढ झाल्याने त्यांना आता फक्त ७ किलो पिठाची खरेदी करता येत आहे.

अशा पद्धतीने एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मध्यमवर्गीय व्यक्तीचे अर्धे आयुष्य महागाईला तोंड देण्यातच निघुन जाते.

एवढेच नव्हे तर टाईम्स ऑफ इंडियाने केलेल्या एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की वैद्यकीय महागाई दरात अधिक वाढ झाली आहे.

मागील पाच वर्षांत भारतातील वैद्यकीय खर्चात १४ टक्के इतकी दुप्पट वाढ झाली असल्याचे आपणास दिसून येते.

यात देखील कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक जास्त प्रमाणात आढळुन येते.

यात देखील देशातील २८ टक्के महिलांना स्तनांचा कर्करोग,१६.५ व्यक्तींना सरवाईकल कॅन्सर,६.२ टक्के व्यक्तींना ओव्हेरीयन कॅन्सर झाला असल्याचे दिसून येते.

कॅन्सर ह्या आजारावर उपचार करण्यासाठी खुप जास्त खर्च येत असल्याने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींना हा खर्च करणे वाढत्या महागाई अणि कमी वेतनवाढीमुळे परवडत नाही.

कारण कॅन्सर ह्या आजारावर उपचार करण्यासाठी साधारणतः ५ ते ६ लाख रुपये इतका खर्च लागतो.अणि यात किमोथेरपीचा खर्च समाविष्ट केला तर हा खर्च २० लाखापर्यंत देखील जातो.

मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने भविष्यात काही वैद्यकीय तसेच दवाखान्याचा खर्च उद्भवल्यास काय करायचे याची कुठलीही आधीपासून प्लॅनिंग देखील केलेली नसते.

याचकरीता प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी हेल्थ इन्शुरन्स तसेच टर्म इन्शुरन्स खरेदी करणे खुप आवश्यक आहे.

दुसरी चुक जी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती करतो ती म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीसाठी त्याचे सोशल स्टेटस मेंटेन ठेवणे खुप महत्वाचे असते.

यासाठी मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या घरात महागड्या शोभेच्या वस्तू जसे की टिव्ही, फ्रीज,कार, मोबाईल,दागिने इत्यादी ठेवत असते.

पण काही मध्यमवर्गीय व्यक्तींची आर्थिक परिस्थिती ह्या वस्तु खरेदी करण्याइतकी नसते म्हणून त्यांना बॅकेकडुन कर्ज घेऊन ह्या संसारोपयोगी वस्तुंची खरेदी करावी लागते.

आज भारतात टिव्ही, फ्रीज,कार,घर इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण दरवर्षी ८९ टक्के इतके वाढत आहे.

अशा पद्धतीने मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कर्जाचे हप्ते फेडण्यातच निघुन जाते.

अणि आज एवढ्या अधिक प्रमाणात कर्ज घेतल्याने १५ टक्के मध्यमवर्गीय कुटुंब असे दिसून येतात ज्यांचा ई एम आयचा हप्ता त्यांच्या एकुण उत्पन्नातील ५० टक्के इतका आहे.

म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न महिन्याला १० हजार रुपये इतके आहे तर दर महिन्याला सहा हजार रुपये तो फक्त बॅकेकडुन घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच खर्च करत आहे.

अशा परिस्थितीत पैशांची बचत करण्याचा कुठलाही विचारच मध्यमवर्गीय व्यक्ती करू शकत नाही.

मध्यमवर्गीय व्यक्तीच्या ह्या आपल्या ऐपतीच्या बाहेर खर्च करण्याच्या सवयीमुळेच आरबीआयचे गवर्नर शक्तीकांता दास यांनी सर्व नाॅन बॅकिंग फायनान्शिअल कंपन्या ज्या लोकांना वस्तु खरेदी करण्यासाठी कर्ज देतात.

त्यांना स्पष्टपणे सांगितले की आपण असे कमी उत्पन्न असलेल्या लोकांना असुरक्षित कर्ज देणे टाळावे.

आज प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीचे स्वप्न असते की आपल्या मुलांनी मेडिकल एमबीए इंजिनिअरींग इत्यादी सारखे उच्च शिक्षण घ्यावे अणि चांगल्या उच्च पदावर नोकरीला लागावे.

याचकरीता आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालक बॅकेकडुन ५ ते १० लाखांपर्यंतचे कर्ज घेतात.

पण सर्वेक्षणातून समोर आले आहे की कोरोनाच्या काळानंतर देशातील मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींच्या शैक्षणिक कर्ज घेण्याच्या प्रमाणात चार टक्के इतकी वाढ झाली आहे.

अणि भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या अशी आहे की एवढे उच्च शिक्षण घेऊन देखील अधिकतम विद्यार्थ्यां मध्ये कुठलेही प्रॅक्टिकल स्कील असल्याचे दिसून येत नाही.

आज लाखो इंजिनिअरींग मेडिकल एमबीए झालेले विद्यार्थी त्यांच्या अंगी बाजारात गरज असलेल्या कौशल्याच्या अभावामुळे बेरोजगार आहेत.कारण त्यांच्याकडे डिग्री आहे पण स्कील नाहीये.

यामुळे देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रमाणात अधिक वाढ होत आहे.आज आपल्या भारत देशातील १० टक्के युवक हे उच्च शिक्षण घेऊन देखील बेरोजगार आहेत.

अणि असेच चालले तर पुढील १० वर्षांनंतर देशातील बेरोजगारीचे प्रमाण २० टक्के पेक्षा अधिक झाल्याचे पाहायला मिळु शकते.

अशा प्रकारे एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती बॅकेकडुन कर्ज घेऊन आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करतो.

अणि एवढे उच्च शिक्षण घेऊन देखील आज त्याच्या मुलाला बाजारात चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त होत नाहीये.अणि नोकरी मिळाली तरी त्याला कमी पैशात काम करावे लागत आहे.

अणि महत्वाचे म्हणजे त्याच्या वेतनातील ५० टक्के इतकी रक्कम ही फक्त बॅकेचे हप्ते फेडण्यातच निघुन जात आहे.

आज मध्यमवर्गीय व्यक्ती नोकरी करून जेवढे पैसे महिन्याला कमवत आहेत ते सर्व पैसे चैनचंगळीच्या वस्तु खरेदी करण्यात, तसेच ईएम आयचे हप्ते फेडण्यातच खर्च करून टाकत आहे ज्यामुळे त्याला पैशाची पुरेशी बचत करता येत नाहीये.यामुळे तो दिवसेंदिवस अधिक गरीब होत चालला आहे.

आज मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या जेवढयाही पैशांची बचत करत आहे.जिथुन त्याला भविष्यात चांगला परतावा मिळेल अशा कुठल्याही योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणुक न करता आपल्या बॅक खात्यातच ते ठेवत आहे.

ज्यामुळे त्याच्या बचत केलेल्या पैशात कुठल्याही प्रकारची वाढ होत नाहीये.अणि त्यातच महागाई दरात देखील अधिक वाढ होत आहे.

आज मध्यमवर्गीय व्यक्ती जेवढे पैसे कमवत आहे त्यातील अर्धा हिस्सा त्याला सरकारला आयकराच्या स्वरूपात द्यावा लागत आहे.

अणि ह्या भरलेल्या आयकराच्या याबदल्यात मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वाट्याला पाहीजे तशा सेवा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत नाही.

आज मध्यमवर्गीय व्यक्तीने दुकानातून १० रूपयाचे वेफर्सचे पाकिट खरेदी केले तरी त्यावर मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला १२ टक्के पर्यंत कर भरावा लागतो आहे.

अशा प्रकारे वरील सर्व कारणांमुळे मध्यमवर्गीय व्यक्ती दिवसेंदिवस अधिक गरीब होत चालला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button