Blog

ब्रेन राॅट म्हणजे काय ? सोशल मीडियावर तासनतास रील्स बघितल्याने ब्रेन राॅट कसा होतो.? Brain rot in Marathi

ब्रेन राॅट म्हणजे काय?सोशल मीडियावर तासनतास रील्स बघितल्याने ब्रेन राॅट कसा होतो?

ब्रेन राॅट हा एक शब्द जगभरात गाजत आहे.यामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडुन याला वर्ड ऑफ द इयर असे देखील घोषित केले आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात एकदा आपण सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करायला लागलो तर तासनतास आपण न थांबता रील्स बघत बसतो.कारण सोशल मीडियावर एका पाठोपाठ एक गंमतीदार विनोदी रील्स आपल्यासमोर येत असतात.

पण यामुळे सोशल मीडिया मानवी मेंदुला दगा देत असल्याचे समोर आले आहे.सोशल मिडियामुळे संपूर्ण जगभरातील लोकांचे मेंदु सडत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

आजच्या लेखामध्ये जेव्हा आपण सोशल मीडियावर तासनतास रील्स बघतो तेव्हा आपल्या मेंदुसोबत काय घडते हे जाणुन घेणार आहोत.

ब्रेन राॅट म्हणजे काय?

जेव्हा आपण सोशल मीडियावर तासनतास बसुन असे रील्स,व्हिडिओ इत्यादी ऑनलाईन कंटेंट बघत असतो.ज्यामुळे आपल्या मेंदुला कुठल्याही प्रकारची चालना प्राप्त होत नाही.

आपल्या बौद्धिक वैचारिक क्षमतेत विकास घडुन येत नाही.फक्त आपण तो कंटेंट सोशल मीडियावर तासनतास पाहत बसत असतो.

तेव्हा अशा आपल्या मेंदुस चालना न देणाऱ्या ऑनलाईन कंटेंटचा आपल्या मेंदुवर प्रमाणापेक्षा अधिक मारा झाल्याने आपल्या मेंदुच्या क्षमता अणि बुदधीमत्तेत घट होऊ लागते ह्या प्रक्रियेला ब्रेन राॅट असे म्हटले जाते.

आपल्यापैकी अनेकांना हा शब्द नवीन वाटत असेल पण असे नाहीये १८५४ मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांनी त्यांच्या वाॅर्डन नावाच्या लिहिलेल्या एका पुस्तकात प्रथमतः हा शब्द वापरला होता.

यात थोरो यांनी गुंतागुंतीच्या विचारांना कमी महत्त्व देणाऱ्या समाजाच्या सवयीवर टीका केली होती.तेव्हापासून १७० वर्ष झाली तरी देखील आज ही संकल्पना लागु होत आहे.

ऑक्सफर्ड भाषेचे अध्यक्ष ग्राथवोल यांचे याबाबत असे मत आहे की हा शब्द आधुनिक डिजीटल जीवनातील वाढत्या जोखीमांची उघड करतो. 

सोशल मिडियाचा आपल्या मानवी मेंदुवर काय परिणाम होतो?

सोशल मीडियाची सुरूवात झाल्यानंतर अधिकतम भर नेटवर्किंग वर देण्यात आला होता.

आपल्या पासुन दुर अंतरावर असलेल्या आपल्या मित्र मैत्रिणी नातलग कुटुंबीय यांच्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी त्यांच्यासोबत चॅट करण्यासाठी प्रारंभी सोशल मीडियाचा वापर केला जात होता.

याचसोबत नवीन मित्र मैत्रिणी बनवण्यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर केला जात होता.

पण आता सोशल मीडियावर रोज लाखो लोक आपले नाॅलेज अनुभव इतरांसोबत शेअर करण्यासाठी,सोशल मीडिया दवारे कमाई करण्यासाठी टेक्स्ट तसेच व्हिडिओ स्वरूपात कंटेंट अपलोड करत आहेत.

आज सोशल मीडिया माहीतीचा खुप मोठा भंडार बनला आहे.आज सोशल मीडिया वर लोक आपला अधिकतम वेळ रील्स बघण्यातच वाया घालवत असतात.

सोशल मीडियावरील रील्स,व्हिडिओ पाहणे अणि त्यातील अनावश्यक आवाज ऐकणे ह्या दोन्ही गोष्टीतुन आपण आपल्या मेंदुपर्यत अशी माहिती पोहोचवत असतो.ज्याची आपल्या मेंदुला कुठलीही आवश्यकता नाहीये.

अणि त्या माहीतीचा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात तसेच भविष्यात देखील आपल्याला कुठलाही उपयोग देखील होत नाही.

आज आपण सोशल मीडिया वर जे कंटेंट बघतो त्यातील माहिती भविष्यात आपल्याला कधी आठवत देखील नसते.

पण महत्वाची बाब अशी आहे की जरी ह्या निरर्थक गोष्टी, माहीती आपण लक्षात ठेवत नसलो तरी रोज याचे सिग्नल हे आपल्या मेंदुपर्यत पोहोचत असतात.

मग आपला मेंदू यातील कुठल्या गोष्टी ठेवायच्या अणि कुठल्या गोष्टी सोडुन द्यायच्या हे तपासणी करून ठरवत असतो.पण ह्या प्रक्रियेत आपल्या मेंदुला देखील थकवा येतो.

हेच कारण आहे की जेव्हा इंस्टाग्राम युटयुब सारख्या सोशल मीडियावर तासनतास रील्स व्हिडिओ स्क्रोल करून बघतो तेव्हा आपल्याला फ्रेश न वाटता थकवा आल्यासारखे वाटते.

ह्या सोशल मीडियावरील रील्स मध्ये असणारे रंग,संगीत,ताल, भावना, इत्यादी गोष्टी आपल्या मानवी मेंदुच्या डाव्या अणि उजव्या ह्या दोन्ही बाजुला चालना देण्याचे काम करतात.

यातील भाषा ही आपल्या डाव्या मेंदूला चालना देते.अणि त्या रील्स व्हिडिओ मध्ये असलेल्या भावना,संगीत,रंग, अणि ताल आपल्या उजव्या मेंदुला चालना देण्याचे काम करतात.

हेच कारण आहे की आपण सोशल मीडियावर जेव्हा रील्स बघायला लागतो तेव्हा एका पाठोपाठ एक रील्स व्हिडिओ पाहण्यात आपण गुंतत जातो.

पण महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व कंटेंट मधुन आपल्या मेंदुला चालना प्राप्त होईल अशी कुठलीही माहीती आपल्या मेंदुला प्राप्त होत नसते.

यातच जेव्हा आपण आपल्या मेंदुपर्यत कुठलीही माहीती न पोहचवणारे मेंदुला चालना प्राप्त करून न देणारे रील्स व्हिडिओ आपण रोज चार पाच तास बघतो तेव्हा ही सर्व निरर्थक माहिती आपल्या मेंदुवर जाऊन आदळते.

ही माहीती आपला मेंदु स्वीकारत नसतो पण जेव्हा आपण तासनतास रील्स व्हिडिओ स्क्रोल करून बघतो तेव्हा ही माहीती आपल्या मेंदुवर जाऊन आदळते.ज्यामुळे आपल्या मेंदुला थकवा येऊ लागतो.

अणि जेव्हा आपल्या मेंदुपर्यत विश्लेषण अणि विचार करायला न लावत असलेली अशी माहीती वारंवार पोहोचते तेव्हा आपल्या मेंदुला काम करायची सवय राहत नाही.

यामुळे आपल्या मेंदुची आजुबाजुच्या आपले लक्ष वेधून घेत असलेल्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून एका ठिकाणी एकाग्र होऊन लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत घट होण्यास सुरुवात होते.

आज छोटछोटया रील्स पाहण्याची सवय झाल्याने मोठमोठे माहितीपूर्ण व्हिडिओ तसेच लेख वाचण्याचा संयम आपल्या मध्ये राहीलेला नाहीये.

आज आपण एखादा लेख वाचायला लागलो तर सुरूवातीच्या पाच दहा ओळी वाचल्यावर आपल्याला एवढा लांबलचक लेख वाचण्याचा कंटाळा येऊ लागतो.

कारण मिनिटात वेगवेगळ्या गोष्टी बघण्याची सवय आपल्या मेंदुला जडत आहे.

हेच कारण आहे की आज तरूणांमधील एकाच गोष्टीवर एकाग्रतेने लक्ष देण्याचा कालावधी (attention span) हा खुप कमी कमी होत चालला आहे.

आज आपण सोशल मीडियावर एकाच लेखावर,व्हिडिओ वर अधिकतम वेळ व्यतीत करण्याचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे.

संशोधनातून समोर आले आहे की लहान मुलांनी जर तासनतास बसुन सोशल मीडिया वर रील्स व्हिडिओ बघितले तर याचा त्यांच्या शिक्षणावर देखील याचा विपरीत परिणाम होतो.

ज्यामुळे लहान मुलांना अभ्यासाला बसल्यावर एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणे अवघड जाते.कारण रील्स बघितल्याने त्यांच्या मेंदुचा अटेंशन स्पॅम कमी झालेला असतो.

एवढेच नव्हे तर लहान मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर देखील याचा विपरीत परिणाम होतो.

लहान मुलांना आपल्या भावना विचार व्यवस्थित व्यक्त न करता आल्याने त्यांच्यामध्ये चीडचीड करण्याचे,संताप करण्याचे प्रमाण वाढु लागते.

तज्ञांचे असे मत आहे की आपला मेंदु नेहमी तल्लख ठेवण्यासाठी आपण पुढील गोष्टी करायला हव्यात.

सोशल मीडिया वरील रील्स व्हिडिओ बघण्या व्यतिरीक्त इतर ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात ज्याने आपला छंद जोपासला जातो अशा वेगवेगळ्या क्रियाकलाप आपण करायला हवेत.

ज्या गोष्टी केल्याने आपणास भावनिक समाधान प्राप्त होते अशा गोष्टी आपण करायला हव्यात.जसे की योगा प्राणायाम पुजापाठ इत्यादी

सोशल मीडियावर तासनतास रील्स व्हिडिओ बघण्यात वेळ वाया न घालवता आपण अधिकतम वेळ स्वताला कामात व्यस्त ठेवायला हवे.याने आपल्यातील प्रोडक्टीव्हीटी देखील वाढेल.

रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईल मध्ये रील्स व्हिडिओ पाहत बसणे टाळायला हवे रोज रात्री वेळेवर झोपायला हवे.

सोशल मीडिया वरील अलगोरिदमनुसार इंस्टाग्रामवर, युटयुबवर किंवा इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला तेच तेच कुठलीही महत्वाची माहिती समाविष्ट नसलेले निरर्थक वेळखाऊ फनी व्हिडिओ दाखवण्यात येत असतात.

असे निर्रथक बुद्धीला चालना न देणारे व्हिडीओ पाहणे आपण टाळायला हवे याव्यतिरिक्त आपण मेंदुला चालना प्राप्त होईल काहीतरी नवीन माहीती प्राप्त होईल.आपल्या ज्ञानात भर पडेल असे रील्स व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला हवेत.

आपण किती वेळ कोणत्या ॲपवर व्यतीत करतो आहे याचे निरीक्षण करायला हवे अणि ज्या ऄपवर आपण निर्रथक अधिकतम वेळ व्यतीत करत आहे त्या ॲपचा कमीत कमी वापर करायला हवा.

आवश्यकता नसल्यास आपण सोशल मीडियापासुन दुरच राहायला हवे.स्वताला काही काळासाठी सोशल मीडिया पासुन डिटाॅक्स करणे देखील आवश्यक आहे.

ह्याच वेळेत आपण कुठेतरी बाहेरगावी फिरायला जाऊ शकतो.नवीन लोकांना भेटणे संपर्क वाढवणे,मित्र मैत्रिणींना नातलगांना भेटु शकतो.एखादी ॲक्टीव्हीटी करू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button