Blog

वन थिंग पुस्तकाचा परिचय The one thing book summary in Marathi 

द वन थिंग पुस्तकाचा परिचय The one thing book summary in Marathi 

आज आपण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त त्यांच्या राजकारणामुळे ओळखतो.

क्रिकेटचा देव म्हणुन ओळखले जाणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या क्रिकेट मधील अवर्णनीय कामगिरीमुळे तसेच क्रिडा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमुल्य योगदानामुळे सर्व जग त्यांना आज क्रिकेटचे दैवत म्हणुन ओळखते.

अशी आपणास अनेक यशस्वी व्यक्तींची उदाहरणे आज पाहावयास मिळतात जे आज त्यांच्या एका गोष्टीमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे.

आज जेवढयाही लोकांना नाव,पैसा प्रसिद्धी प्राप्त झाली आहे ती त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रात स्वताला झोकुन देत

घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे. 

त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रात केलेल्या उत्तम उल्लेखनीय कामगिरीमुळे आज ते संपूर्ण जगात ओळखले जातात.

ह्याच सर्व गोष्टींचे निरीक्षण करत युएस मधील एका सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचे को फाऊंडर गॅरी कॅलर यांनी त्यांच्याच कंपनी मधील उपाध्यक्ष जय पापासा यांच्यासोबत मिळुन द वन थिंग नावाचे एक पुस्तक लिहिले.

आज जेवढेही लोक आपल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की आपल्याकडे जीवन जगण्यासाठी खुप कमी वेळ उपलब्ध आहे.

ह्या कमी वेळात आपण प्रत्येक गोष्ट शिकु शकत नाही तसेच प्रत्येक काम देखील करू शकत नाही.अणि स्पर्धेने भरलेल्या ह्या जगात आपण सर्व गोष्टींमध्ये स्वताला पारंगत करू शकत नाही.

म्हणून त्यांनी स्वतासाठी फक्त एक असे विशिष्ट क्षेत्र तसेच काम निवडले ज्यात त्यांनी स्वताला इतके झोकून दिले की आज ते क्षेत्र त्यांच्या नावामुळे ओळखले जाते.

आज आपण मार्क झुकरबर्ग यांना जगातील सर्वात यशस्वी उद्योजक म्हणून ओळखतो.कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त फेसबुक ह्या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले.

ज्यामुळे त्यांचे नाव जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत समाविष्ट झाले.

पण आज आपल्यातील कित्येक व्यक्तींना हे माहीतच नाहीये त्यांच्यामध्ये असलेली ती एक गोष्ट काय आहे अणि कोणती आहे?ज्यात पारंगत होऊन ते आपल्या जीवनात भरपूर यशस्वी होऊ शकतात.

गॅरी कॅलर अणि जय पापासा यांनी लिहिलेल्या द विन थिंग ह्या पुस्तकात असे सांगितले आहे की आपण आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या ध्येयाच्या प्रक्रियेची कल्पणा करत त्याला छोटछोटया हिस्सा मध्ये विभाजित करावे.

अणि त्यातील सर्वात लहान हिस्साचे कार्य लगेच करण्यास सुरुवात करावी.कारण कुठलेही मोठे यश लगेच प्राप्त होत नसते ते आपल्याला टप्याटप्याने कार्य केल्यावरच प्राप्त होत असते.

जर आपल्याला करोडपती बनायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला लखपती बनावे लागेल.थोडक्यात सांगायचे म्हटले तर मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आधी आपल्याला छोटे ध्येय साध्य करणे आवश्यक आहे.

द वन थिंग ह्या पुस्तकात असे देखील सांगितले आहे की एखादी व्यक्ती म्हणत असेल की मी एकाच वेळी सर्व कामे multitasking करू शकतो तर हे स्पष्टपणे खोटे आहे.

कुठलीही व्यक्ती एकाच वेळी अनेक कामे कोणीही करू शकत नाही स्वता संगणक देखील एकाच वेळी अनेक कामे करू शकत नाही.

कंप्युटरचा वेग खुप जास्त असतो त्यामुळे तो एका काम पुर्ण करत दुसरया कामाकडे अत्यंत जलदगतीने वळत असतो त्यामुळे आपल्याला असे वाटते की कंप्यूटर हा एकाच वेळी अनेक कामे करत आहे.

पण तसे नसते कंप्युटर देखील एकावेळी एकच काम पुर्ण करत असतो.जादुगर जे काही कर्तब दाखवतो तो देखील एक भ्रम आहे.

जादुगार जेव्हा चेंडु त्याच्या एका हातातून दुसरया हातात वेगाने फिरवत असतो वर फेकुन झेलत असतो तेव्हा आपल्याला वाटते की तो एकाच वेळी तीन चार चेंडू आपल्या हातात फिरवतो आहे.

पण तसे नसते तो फक्त एकाच चेंडूला झेलुन वर फेकत असतो.पण हे कार्य तो इतक्या अधिक वेगाने करतो ज्यामुळे आपल्याला वाटते की तिन्ही चेंडु तो हवेत एकाच वेळी फेकुन झेलतो आहे.

खर पाहायला गेले तर मल्टी टास्किंग करणे हे कार्यक्षम देखील नसते अणि प्रभावी देखील नसते.

त्यामुळे एकाच वेळी अनेक कामे करण्यापेक्षा आपण आपल्या मन,बुद्धीला कुठलेही एक काम पूर्ण करण्यात व्यस्त ठेवायला हवे.याने आपण ते काम अधिक उत्तम पद्धतीने अणि अधिक प्रभावीरीत्या खुप कमी कालावधीत पुर्ण करू शकतो.

द वन थिंग ह्या पुस्तकाचे लेखक म्हणतात की आपली इच्छाशक्ती ही खुपच मर्यादित आहे.आपली इच्छाशक्ती ही मोबाईलच्या बॅटरीप्रमाणे असते ज्याची सकाळी फुल चार्जिंग झालेली असल्याचे पाहायला मिळते.पण संध्याकाळपर्यंत त्याची चार्जिंग पुर्णत संपलेली असते.

म्हणून आपण आपले सर्वात महत्वाचे कामाला रोज सकाळीच बसुन दुपारपर्यंत पुर्ण करून घ्यायला हवे.

ज्याप्रमाणे मोबाईलच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी वीजेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या संपलेल्या इच्छा शक्तीला रोज चार्ज करून पुन्हा उर्जा प्राप्त करून देण्यासाठी आपण चांगल्या विचारांचे वाचन करायला हवे.

हेच कारण आहे की एखादा प्रेरणादायी व्हिडिओ किंवा प्रेरणादायी पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपण एकदम ऊर्जेने संपन्न झालो असल्यासारखे वाटते.

कारण प्रेरणादायी व्हिडिओ बघितल्याने किंवा पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्या संपलेल्या इच्छा शक्तीला नवीन ऊर्जा प्राप्त होते.

पण खुप जणांची अशी तक्रार असते की प्रेरणादायी व्हिडिओ बघितल्यानंतर पुस्तकाचे वाचन केल्यानंतर आम्हाला थोडे दिवस जीवनात काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा उर्जा मिळते.पण काहीच दिवसात ती उर्जा संपुन देखील जाते.

मोबाईलची बॅटरी सुद्धा एकदा चार्ज केल्यानंतर तिची चार्जिंग एक दोन दिवस टिकत नसते तिला देखील दिवसभरात दोन तीन वेळा पुन्हा चार्ज करावे लागते.कारण दिवसभरात मोबाईलचा वापर केल्याने ती संपुन जात असते.

म्हणून द वन थिंग पुस्तकात सांगितले आहे की जेव्हा आपल्या मध्ये प्रचंड इच्छाशक्ती निर्माण होते तेव्हा लगेच आपण वेळ न गमावता त्वरीत आपल्या कामाला सुरुवात करायला हवी.

अन्यथा आपल्या मध्ये निर्माण झालेली इच्छाशक्ती वेळीच काम न केल्याने व्यर्थ वाया जाईल.

आपल्यातील खूप जणांना प्रश्न पडतो की आमच्याकडे भरपूर कामे आहेत त्यातील कुठले काम आम्ही सर्वप्रथम करायला हवे.

द वन थिंग ह्या पुस्तकात असे देखील सांगितले गेले आहे की आपण आपल्या रोजच्या करायच्या कामाच्या यादीचे म्हणजे टु डु लिस्टचे रूपांतर एका गोष्टीत करायला हवे.

पण यात देखील आपण ८०/२० ह्या तत्वाचे पालन करायला हवे.कारण आपल्याला आपल्या कामातील ८० टक्के रिझल्ट हा आपण केलेल्या फक्त २० टक्के कामातुनच प्राप्त होत असतो.

यामुळे आपण तयार केलेल्या टु डु लिस्ट मध्ये आपण अशा २० टक्के कामांची यादी तयार करायला हवी ज्यातुन आपल्याला ८० टक्के रिझल्ट प्राप्त होत आहे.

याला म्हणतात सक्सेस लिस्ट ह्या सक्सेस लिस्टच्या यादीत आपण पुन्हा एकदा ८०/२० ह्या तत्वाचे पालन केले तर आपल्याला शेवटी आपण तयार केलेल्या तीन चार कामांच्या यादीत शेवटी एकच काम दिसुन येईल.

शेवटी उरलेले ते एकच काम आपली ती एक गोष्ट असणार आहे जे करून आपण जीवनात खूप यशस्वी होऊ शकतो.नाव,पैसा प्रसिद्धी इत्यादी सर्व काही प्राप्त करू शकतो.

आपल्या टु डु लिस्टची यादी कितीही मोठी असो आपण त्या यादीला ८०/२० हे तत्व वापरून द वन थिंग मध्ये रूपांतरित करू शकतो.

अणि त्याच एका गोष्टीला आपणास आपल्या जीवनात सर्वप्रथम आपले मन अणि बुदधी एकाग्र करून प्रभावीरीत्या पुर्ण करायचे आहे.

द वन थिंग ह्या पुस्तकाचे वाचन केल्यावर आपल्याला एक महत्वाचा प्रश्न पडतो माझ्या आयुष्यात अशी एक कोणती गोष्ट तसेच काम आहे जे उत्तम पद्धतीने पुर्ण करून त्यात पारंगत होऊन मी जीवनात पाहिजे तितका यशस्वी होऊ शकतो.

अणि ह्याच एका प्रश्नाने आपल्याला आपली ती वन थिंग सापडते जी उत्तमरीत्या करून आपण जीवनात खूप यशस्वी होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button