जगप्रसिद्ध लेखिका जे के रोलिंगची यशोगाथा World famous Writer JK Rowling success story in Marathi
जगप्रसिद्ध लेखिका जे के रोलिंगची यशोगाथा world famous Writer JK Rowling success story in Marathi
असे म्हटले जाते की आपल्याला जीवनात खरे यश हे अनेक मोठमोठ्या अपयशांना सामोरे गेल्यानंतर मिळत असते.
हॅरी पॉटर ह्या कादंबरीच्या जगप्रसिद्ध लेखिका जेके रोलिंग यांची कथा देखील काही अशाच स्वरूपाची आहे.हॅरी पाॅटर हे विसाव्या शतकातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे.
जे के रोलिंग यांनी लिहिलेल्या तब्बल आठ हॅरी पॉटर नावाच्या पुस्तकांवर आतापर्यंत आठ चित्रपट देखील बनविण्यात आले आहेत.
हॅरी पॉटर ह्या पुस्तकाच्या मालिकेने जगभरात अनेक मोठमोठे पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत.आतापर्यत ह्या पुस्तकाच्या ४०० मिलियन पेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.
म्हणून याला एकेकाळी जगातील सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणून देखील ओळखले जात असे.
हॅरी पॉटर ह्या कादंबरीच्या लेखिका जेके रोलिंग यांनी खुप अडीअडचणींना संकटांना सामोरे जात आपल्या ह्या पुस्तकाचे लेखन केले होते.
अणि पुस्तक लिहुन झाल्यानंतर कुठलाही प्रकाशक तसेच प्रकाशन संस्था त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यास तयार नव्हते.पण पुढे जाऊन जेके रोलिंग यांनी लिहिलेली हीच कादंबरी मालिका जगातील सर्वात उत्तम कादंबरी म्हणून प्रसिद्ध झाली.
जेके रोलिंग यांची संघर्षापासुन यशापर्यतची कथा –
३१ जुलै १९६५ मध्ये याते इंग्लंड ह्या ठिकाणी जेके रोलिंग यांचा जन्म झाला होता.जेके रोलिंग यांचे पुर्ण नाव जाॅन कॅथलीन रोलिंग असे होते.
फक्त चार वर्षांच्या असताना जेके रोलिंग आपल्या आईवडिलांसोबत जवळील एका गावात राहण्यासाठी जातात.तेथील सेंट मायकल प्रायमरी स्कूल मधून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
ह्याच प्राथमिक शाळेतील प्राचार्य आल्फ्रेड यांच्या वरून जेके रोलिंग यांनी हॅरी पॉटर मधील हेडमास्तर अल्बर्ट डंबल्डो हया पात्राविषयी लेखन केले होते.
जे के रोलिंग यांना लहानपणापासूनच कथा लिहिण्याची आवड होती.यामुळे लहानपणी त्या वेगवेगळ्या विचित्र कथांचे लेखन करायच्या अणि आपल्या बहिणीला त्या सर्व कथा ऐकवायच्या.
पुढे जेके रोलिंग यांनी वाईडनी स्कुल अॅण्ड काॅलेज मधुन आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
याच कालावधी दरम्यान त्यांच्या मावशीने त्यांना जेसिका मिटफोर्ड यांचे आत्मचरित्र वाचण्यासाठी आणुन दिले.ह्या पुस्तकाचे नाव होते होन्स अॅण्ड रेबल्स.
होन्स अॅण्ड रेबल्स ह्या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर जेके रोलिंग ह्या जेसिका यांच्या खुप मोठ्या चाहत्या बनल्या.यामुळे जेके रोलिंग यांनी जेसिका यांनी लिहिलेल्या इतरही पुस्तकांचे वाचन केले.
पुढे 1982 मध्ये जेके रोलिंग यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली.पण तिथे त्यांची निवड होत नाही.
म्हणून त्यांना नाइलाजाने एक्सीटर नावाच्या युनिव्हसिर्टी मधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे लागले.
ह्या युनिव्हसिर्टीमधुन पदवी प्राप्त केल्यानंतर जे के रोलिंग यांनी काही काळ एका आंतरराष्ट्रीय कंपनीत सेक्रेटरी म्हणून नोकरी केली.
एवढेच नव्हे तर त्यांनी मॅचेस्टर येथे राहुन चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून देखील काम केले.अणि जेव्हा त्या मॅचेस्टर येथुन लंडनकडे येण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होत्या.
तेव्हा त्यांच्या मनात जादुगरीच्या शाळेत शिकत असलेल्या एका तरूण मुलाची कथा येते.ज्या कथेला त्यांनी आपल्या मनात पुर्णपणे तयार करून ठेवले होते.
जेव्हा जेके रोलिंग लंडनमध्ये त्यांच्या कॅम्पस मध्ये पोहोचतात तिथे आल्यावर त्या लगेच त्यावर कथा लिहायला सुरुवात करतात.
पण काही दिवसातच जेके रोलिंग यांच्या आईचे निधन झाले.जेके रोलिंग यांची आई त्यांच्या सर्वात जवळ होती.
त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाने जेके रोलिंग ह्या खुप दुखी निराश झाल्या होत्या.यामुळे त्यांच्या लिहिण्यावर देखील ह्या गोष्टीचा खूप मोठा प्रभाव पडला.
जेके रोलिंग ह्या आईच्या मृत्यूनंतर नेहमी उदास अणि दुखी राहु लागल्या.पुढे कालांतराने त्यांनी आपले दुःख विसरण्यासाठी लेखन करण्यास सुरुवात केली.अणि त्यांचा पुर्ण वेळ त्यांनी लिहिण्यात व्यतीत केला.
पण काही दिवसांनंतर जेके रोलिंग नोकरीच्या शोधात पोर्तुगाल येथे निघुन जातात.तिथे त्यांना एका शाळेत इंग्रजी विषय शिकविण्याचे काम मिळाले.
मग जेके रोलिंग ह्या दिवसभर लेखन करायच्या अणि रात्री जाॅब करत होत्या.पोर्तुगाल मध्ये जेके रोलिंग यांची भेट पत्रकार जाॅर्ज ऑरेन्स्ट यांच्याशी भेट होते.
जेके रोलिंग अणि जाॅर्ज ऑरेन्स्ट ह्या दोघांचे विचार जीवनविषयक दृष्टिकोन इत्यादी सर्व काही सारखे होते.
त्यामुळे पुढे दोघांचे प्रेमसंबंध जुळले अणि दोघांनी १६ ऑक्टोबर १९८२ रोजी विवाह केला.
पुढे २७ जुलै १९९३ मध्ये त्यांना एक मुलगी अपत्य झाले.हया मुलीचे नाव त्यांनी जेसिका असे ठेवले.
पण आपल्या पतीच्या वाईट वागणुकीला कंटाळून जेके रोलिंग यांनी १७ नोव्हेंबर १९९३ रोजी जाॅर्ज सोबत फारकती घेतली.
यानंतर जेके रोलिंग त्यांच्या मुलीला सोबत घेऊन आपल्या बहिणीकडे स्काॅटलॅड येथे जातात.तोपर्यत त्यांनी हॅरी पॉटर ह्या कादंबरीचे तीन धडे लिहुन टाकले होते.
ही वेळ रोलिंग यांच्यासाठी खुप दुःखदायक होती कारण त्यांचे वैवाहिक जीवन अयशस्वी ठरले होते.अणि मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील एकट्या जे के रोलिंग यांच्या खांद्यावर आली होती.
त्यांच्याकडे त्यावेळी कुठलेही काम देखील नव्हते ह्यामुळे त्या अधिक विचार केल्याने अधिक नैराश्यात जाऊ लागल्या.
पुढे जेके रोलिंग यांनी त्यांच्या मुलीचा अणि त्यांच्या वैयक्तिक खर्चाचा भार स्वता उचलण्यासाठी वेल्फेअर बेनिफिटचा फाॅर्म भरला.
वेल्फेअर बेनिफिट मध्ये ब्रिटीश सरकारच्या वतीने गरीब तसेच आपल्या मुलीचे पालनपोषण करत असलेल्या एकट्या मातेला आर्थिक साहाय्य प्रदान केले जात होते.
ह्या सर्व अडीअडचणींना सामोरे जात असताना एवढे नैराश्यात असताना देखील जेके रोलिंग यांनी आपले लिहिण्याचे काम अजिबात बंद पडु दिले नाही.
अणि मग शेवटी त्यांनी लिहायला घेतलेले पहिले पुस्तक हॅरी पॉटर अँड फिलाॅसाॅफर स्टोन हे लिहुन पुर्ण झाले.१९९५ मध्ये त्यांनी जुन्या टाईप राईटरच्या मदतीने टाईप केले.
अणि त्या पुस्तकाला प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकाकडे घेऊन गेल्या पण तिथे देखील त्यांना खुप संघर्ष करावा लागला.
तब्बल १२ प्रकाशन संस्थांमध्ये त्यांनी त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी गेल्या पण सर्व ठिकाणी त्यांना पुस्तक प्रकाशित करण्यास नकार देण्यात आला.
जेके रोलिंग यांच्या स्वप्नांवर पाणी पडल्यासारखे त्यांना वाटु लागले होते.पण तब्बल एक वर्षानंतर लंडनच्या एका ब्लोमज्बरी नावाच्या प्रकाशन संस्थेने जेके रोलिंग यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित करण्यास होकार दिला.
पण तेथील एडिटर बॅरी केलिंगम यांना असे वाटत होते की बाजारात हे पुस्तक यशस्वी ठरणार नाही.
यामुळे त्यांनी जेके रोलिंग यांना हे पुस्तक प्रकाशित करण्याच्या मागे न लागता कुठेतरी नोकरी कर असा सल्ला दिला.
पण २६ जुन १९९७ रोजी पुस्तक प्रकाशित केल्यानंतर ह्या पुस्तकाला वाचकांनी भरपूर पसंती दर्शवली.यामुळे फक्त पाच महिन्यातच जेके रोलिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकाला नेसले स्मार्टीज बुक तसेच चिल्ड्रन्स बुक ऑफ दी इअर नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ह्या पुस्तकाचा सिक्वेल हॅरी पॉटर द चेंबर ऑफ सिक्रेटसला २ जुले १९९८ रोजी प्रकाशित करण्यात आले होते.
मग ८ जुलै १९९९ रोजी तिसरी कादंबरी हॅरी पॉटर अँड प्रिझनर ऑफ अजकबन रिलीज करण्यात आली होती.
यानंतर ८ जुलै २००० मध्ये चौथी कादंबरी हॅरी पॉटर अँड गाॅबलेट ऑफ फायर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.हया पुस्तकाने रेकॉर्ड नोंदविले.ह्या पुस्तकाच्या तब्बल ३ लाख ७२ हजार प्रतींची युके मध्ये पहिल्याच दिवशी विक्री झाली.
२००१ मध्ये जेके रोलिंग यांनी नील मोरे नावाच्या एका डाॅक्टर सोबत दुसरा विवाह केला.अणि मग २४ मार्च २००३ रोजी त्यांचा मुलगा डेव्हीड गाॅर्डन याचा जन्म झाला.
२१ जुन २००३ रोजी हॅरी पॉटर कादंबरीची चोथी मालिका प्रकाशित करण्यात आली.अणि २००४ मध्ये जेके रोलिंग ह्या पुस्तक लिहुन करोडपती बनलेल्या जगातील पहिल्या लेखिका बनल्या.
१६ जुले २००५ मध्ये सहाव्या अणि २१ जुलै २००७ रोजी त्यांनी लिहिलेली सातवी अणि शेवटची कांदबरी प्रकाशित झाली.
ह्या कादंबरीने सर्व रेकाॅर्ड तोडुन बेस्ट सेलिग बुक ऑल टाईम बनण्याचा बहुमान देखील प्राप्त केला.युके अणि युई मध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ह्या पुस्तकाच्या एक करोडपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या.
मग कालांतराने ह्या पुस्तकांवर चित्रपट देखील बनण्यास सुरूवात झाली.
अशा प्रकारे एक गरीब कुटुंबातील जेके रोलिंग नावाची लहान मुलगी जिला लहानपणापासून लिखाणाची प्रचंड आवड होती.जी लहानपणी पुस्तके अणि तिच्या स्वताच्या कल्पणा विश्वात रमुन जाणारी ती एक निष्पाप निरागस मुलगी होती.
लहानपणी शाळेत शिकत असताना आईचे निधन झाल्याने त्यांना खुप एकटे वाटु लागले होते त्यामुळे त्या आतुन पुर्णपणे तुटुन गेल्या होत्या.
पुढे त्यांचे एका व्यक्तीशी लग्न होते पण घरगुती हिंसाचारामुळे अवघ्या तेरा महिन्यातच त्यांचा संसार मोडला.
अशावेळी आपल्या नैराश्य अणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करण्याचे विचार जेके रोलिंग यांच्या मनात येऊ लागले.
पण तरी देखील एवढ्या विपरीत परिस्थितीत धीर न सोडता मार्ग काढत तसेच आपली स्वताची आवड जपत आपल्या धैर्य आणि चिकाटीने सर्व अडचणींवर मात करून रोलिंग यांनी टप्याटप्याने का होईना आपले पुस्तक लिहुन पुर्ण केले.
अणि पुस्तक लिहुन जगातील अरबपती लोकांच्या यादीत नाव प्राप्त करणारी जगातील पहिली लेखिका त्या बनल्या.