ममाअर्थ स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा MamaEarth success Start up business story in Marathi
ममाअर्थ स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा MamaEarth success Start up business story in Marathi
गझल अलग यांनी आपल्या पती वरूण अलग समवेत २०१६ मध्ये ममाअर्थ ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली होती.
गझल अलग ह्या मुळच्या चंदीगढ येथील रहिवासी आहेत.त्यांचे बालपण तिथेच गेले.
ममा अर्थ ह्या कंपनीचे स्वताचे कुठलेही प्रोडक्ट नाहीये मॅन्युफॅक्चरींग युनिट नाही तसेच स्वताची यादी देखील नाहीये.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा ही कंपनी सुरू झाली होती तेव्हा ह्या कंपनीने स्वताची कुठलीही गुंतवणूक देखील केली नव्हती.
तरी देखील ममा अर्थने आज २४ हजार करोडपेक्षा अधिक बाजार मुल्यांकन प्राप्त केले आहे.अणि आज हे भारतातील सर्वांत मोठे ब्युटी अणि पर्सनल केअर ब्रॅड बनले आहे.
प्रारंभी ममा अर्थची सुरूवात बेबी केअर प्रोडक्टदवारे करण्यात आली होती पण आज ममा अर्थ भारतातील एक टाॅप पर्सनल केअर ब्रॅड आहे.
जेव्हा वरूण अलग अणि गझल अलग ह्या दोघांनी ममा अर्थ ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरूवात केली होती तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही ग्राहक सेवा टीम नव्हती.
म्हणुन ग्राहकांना कस्टमर सर्व्हिस देण्यासाठी देखील वरून अणि गझल हे दोघे स्वता काऊंटरवर बसत असत.असे त्यांनी सलग सहा महिने केले.जेव्हा ह्या कंपनीची सुरूवात करण्यात आली तेव्हा कंपनीच्या टीम मध्ये फक्त तीन जण होते.
आज बाजारात मोठमोठ्या प्रतिस्पर्धी कंपन्या समोर असताना देखील ममा अर्थ वर्षाला १ हजार करोड इतका रेव्हेन्यू प्राप्त करत आहे.
गझल अलग यांनी आपल्या स्टार्ट अप व्यवसायात प्रोडक्ट इनोव्हेशनवर विशेष लक्ष केंद्रित केले.गझल अलग यांनी बघितले की बाजारात जेवढेही प्रोडक्टची विक्री केली जात आहे त्यावर सल्फेट नावाचे एक केमिकल वापरण्यात येते आहे.
अणि सल्फर नावाचे हे विषारी केमिकल बेबी केअर प्रोडक्टवर वापरणे योग्य नव्हते.याकरीता ममा अर्थने आपले सर्व प्रोडक्ट सल्फेट फ्री बनवण्यास सुरुवात केली.
सुरूवातीला ग्राहकांचा विश्वास संपादीत करण्यासाठी ममा अर्थने बाॅलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची आपल्या कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदासाठी नियुक्ती केली.
ममा अर्थ इंफ्लु एन्सर मार्केटिंगवर देखील विशेष लक्ष देते.आज सोशल मिडियावर अनेक इंफ्लुएन्सर हे ममा अर्थच्या प्रोडक्टला स्पाॅन्सर करताना दिसतात.
ममा अर्थ ही २०२२ मधील बाजारातील पहिली युनिकाॅन स्टार्ट अप कंपनी बनली होती.
प्रथमतः ममा अर्थने मदर अणि चाईल्ड केअर प्रोडक्टवर विशेष लक्ष केंद्रित केले पण वाढत्या प्रसिद्धीमुळे त्यांनी स्कीन केअर,पर्सनल केअर प्रोडक्ट देखील बाजारात विकण्यास सुरुवात केली.
आज ममा अर्थकडे असे १०० पेक्षा जास्त प्रोडक्ट उपलब्ध आहेत.ममा अर्थचे हे सर्व प्रोडक्ट प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे ममा अर्थचे सर्व प्रोडक्ट आयुवेर्दिक आहेत अणि हे सर्व प्रोडक्ट नैसर्गिक घटकांनी बनविण्यात आले आहेत.
ममा अर्थची सुरूवात कशी झाली?
ममा अर्थने बघितले की बाजारात जेवढेही बेबी केअर प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यावर विषारी केमिकलचा वापर केला जातो आहे.
इथूनच ममा अर्थची सुरूवात झाली.२०१६ मध्ये गझल अलग अणि वरून अलग यांनी ममा अर्थ ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात फक्त सहा बेबी प्रोडक्ट घेऊन केली.
पुढे कालांतराने ममा अर्थला हे देखील दिसुन आले की विषारी केमिकल मुक्त प्रोडक्ट फक्त लहान मुलांनाच नव्हे तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आज हवे आहेत.मग हळुहळू ममा अर्थने ब्युटी क्षेत्रात देखील प्रवेश केला.
ममा अर्थच्या फाऊंडर गझल अलग यांची कुठलेही व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती म्हणजे त्यांच्या घरात कोणी व्यवसायही केला नव्हता.तसेच गझल यांच्याकडे कुठलीही व्यावसायिक डिग्री देखील नव्हती.
फक्त त्यांनी स्वताच्या मनाशी एक निर्धार केला होता की त्या भारतातील ग्राहकांच्या पसंतीत बदल घडवून आणतील.त्यांना अधिक जागृत करतील जेणेकरून ते स्वतासाठी आपल्या बाळासाठी योग्य निर्णय घेऊ शकतील.